सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करताना डॉक्टर
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या संजय पेडणेकरांनी वाचवले जीव
सावंतवाडी दि.३१: मळगावच्या मेटामध्ये आज सायंकाळी सात वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात निरवडे येथील महादेव निरवडेकर (वय 60) तर त्यांची मुलगी ममता निरवडेकर (वय 25) या अपघातात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली.
श्री. निरवडेकर आपल्या मोटरसायकलने निरवडे येथे आपल्या गावी जात होते तेव्हा हा अपघात झाला. त्यावेळी ती मुलगी माझ्या बाबांना वाचवा वाचवा म्हणून जोर जोराने ओरडणाऱ्या परंतु जमावाने फक्त बघ्यांची भूमिका घेतली एकही मदतीला पुढे आले नाही परंतु सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर यांनी आपल्या गाडीमध्ये आम्हा दोघांना घालून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि आमचा जीव वाचवला असे ती मुलगी म्हणाली. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर,रूपा मुद्राळे,रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
अपघातग्रस्त व्यक्ती सावंतवाडीचे प्रभारी
नगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांचे नातेवाईक असल्याचे वृत्त आहे.