“अदृश्य शक्तीचे नाव घेण्याची राणेंमध्ये हिंमत नाही” — माजी आमदार परशुराम उपरकर

कणकवली, दि. १२: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत “अदृश्य शक्ती” कार्यरत असल्याचा आरोप करणाऱ्या पालकमंत्र्यांनी त्या शक्तीचे नाव स्पष्टपणे सांगण्याची हिंमत दाखवावी, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. कणकवलीतील संपर्क कार्यालयात बोलताना त्यांनी सांगितले की, फोंडाघाट व नेरूरसह अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला. हे उमेदवार विजयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत असताना पालकमंत्री मात्र “अदृश्य शक्ती”चा उल्लेख करतात, यामागचे कारण स्पष्ट करावे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांना पैसे वाटप झाल्याचे आरोप करत उपरकर म्हणाले, हीच का ती अदृश्य शक्ती असा प्रश्न जनतेला पडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आदर्श राजकीय परंपरा असताना विरोधी उमेदवार विकत घेऊन बिनविरोध निवडून आणण्याची प्रवृत्ती वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे शिवसेना संपलेली नसून पुन्हा नव्या जोमाने उभी राहील, असा विश्वास व्यक्त करत “खरा शिवसैनिक विकला जात नाही,” असेही ते म्हणाले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here