सावंतवाडी दि २७ :सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये भाजपला एकीकडे बिनविरोध विजयाचा आनंद मिळाला असला, तरी दुसरीकडे अनेक मतदारसंघांत स्वकीयांच्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.शेर्ले गणात भाजपचा श्रीगणेशा: महेश धुरी बिनविरोधसावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद चे बांदा मधील भारतीय जनता पार्टीचे प्रमोद कामत हे यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. आणि आजसावंतवाडी पंचायत समितीच्या शेर्ले निर्वाचन गणामध्ये भारतीय जनता पार्टीने आपले खाते उघडले आहे. भाजपचे उमेदवार महेश मोहन धुरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले अपक्ष उमेदवार जगन्नाथ धुरी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने महेश धुरी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.४८ जणांची माघार; भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना थेट लढत१७ जागांसाठी पंचायत समिती आणि आठ जागांसाठी जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे यासाठी तालुक्यात आज एकूण ४८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ५३ जण रिंगणात उतरले आहेत. बहुतांश ठिकाणी आता भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे शिवसेना) असा तिरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. मात्र, काही महत्त्वाच्या मतदारसंघांत अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी राजकीय समीकरणे कठीण केली आहेत.बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढलीअनेक मतदारसंघांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध स्वकीयांनीच शड्डू ठोकल्याने चुरस वाढली आहे कोलगाव जि.प. मतदारसंघात भाजपमध्ये उघड बंडखोरी झाली आहे. अधिकृत उमेदवार महेश सारंग यांच्या विरोधात नुकतेच ठाकरे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले मायकल डिसोझा यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला असून, त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.इन्सुली जि.प. मतदारसंघात भाजपचे स्वागत नाटेकर यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने येथे तिरंगी लढत होत आहे, ज्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तांबोळी पं.स. मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या अर्चना पांगम यांनी बंडखोरी केल्याने महायुतीसमोर आव्हान उभे राहिले आहे. आंबोली जिल्हा परिषदेमध्ये शिंदे शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सामना होत असल्याने महायुती पूर्णतः अपयशी ठरली आहे या मतदारसंघांमध्ये शोभा गावडे या भारतीय जनता पार्टी पक्षामधून देऊ नका आहेत तर शिंदे शिवसेनेच्या सुप्रिया दिनेश गावडे या सुद्धा रिंगणात आहेत तर अपक्ष उमेदवार सेजल सदाशिव नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तळवडे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भाजपचे संदीप गावडे त्यांच्याविरुद्ध ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ हे रिंगणात आहेत तर या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाराम पै हे रिंगणात आहे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.सावंतवाडीत एका बाजूला बिनविरोध निवडीचा उत्साह असताना, दुसऱ्या बाजूला बंडखोरीमुळे होणारी मतविभाजन थोपवण्याचे मोठे आव्हान भाजप आणि महायुतीसमोर असणार आहे.
या ठिकाणी रंगणार ‘तिहेरी’ थरार
माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत समझोता न झाल्याने खालील ठिकाणी तिरंगी लढती निश्चित झाल्या आहेत
:मळेवाड पंचायत समिती,सातार्डा पंचायत समिती,तांबोळी पंचायत समिती


