विद्याविभूषित शिक्षक श्री. नरेश कारिवडेकर यांचा सावंतवाडीत गौरव; सेवानिवृत्तीनिमित्त चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून सत्कार

सावंतवाडी दि.२३: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, शाखा सावंतवाडीचे विद्यमान सहसचिव आणि माजी उपाध्यक्ष श्री. नरेश कारिवडेकर सर ३१ मे २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवाकार्यातून निवृत्त होत आहेत. या निवृत्तीचे औचित्य साधून आणि त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने २१ मे रोजी त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

एक प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास
शिक्षक ते पदवीधर शिक्षक आणि प्रभारी मुख्याध्यापक अशी सरांची वाटचाल थक्क करणारी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीत, आई-वडील शेतमजूर असतानाही जिद्दीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. केवळ एस.एस.सी. वर नोकरीला लागून न थांबता, त्यांनी पदवी संपादन केली आणि पदवीधर श्रेणीतून निवृत्त होत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले, जे आज देशपातळीवर नाव गाजवत आहेत. त्यांनी केंद्रप्रमुख म्हणूनही उत्कृष्ट जबाबदारी सांभाळली आहे.
सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवा
केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर समाजातही कारिवडेकर सरांचे मोठे योगदान आहे. संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात आर्थिक मदतीसोबतच प्रत्यक्ष उपस्थित राहून ते कार्य करतात. त्यांच्या आनंदी चेहऱ्यामुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे ते समाजाचे ‘प्रेरणास्थान’ बनले आहेत.
सत्कार समारंभाला मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्यावेळी संघटनेचे सचिव जगदीश चव्हाण, अध्यक्ष विनायक चव्हाण, बाबुराव चव्हाण, पी. बी. चव्हाण, गणेश म्हापणकर, राजेश फोंडेकर, सूर्यकांत सांगेलकर, नरसू रेडकर, विजय चव्हाण, श्री. इन्सुलकर आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
यावेळी चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी मार्फत तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समिती सावंतवाडी तसेच कोलगांव केंद्रामार्फत सत्कार करण्यात आला
यावेळी केंद्र प्रमुख श्रीम.भावना गावडे,माजी केंद्र प्रमुख श्री म.ल.देसाई, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रमोद पावसकर.उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री विठ्ठल कदम व केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका.शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री अनिल मुळीक, प्रदीपकुमार म्हाडगूत,अस्मिता मुननकर,स्नेहा धोंड, मृगाली पालव,गोपाळ गावडे आदी उपस्थित होते.

शुभेच्छांचा वर्षाव
पी. बी. चव्हाण आणि परिवाराने सरांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “कारीवडेकर सरांनी कष्टाने शिक्षण पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव हे त्यांचे गुण खरोखर प्रेरणादायी आहेत.”
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, सुख-शांती आणि दीर्घायुष्य देवो, अशा शुभेच्छा याप्रसंगी शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि संपूर्ण समाजाच्या वतीने देण्यात आल्या.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here