सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद; संघर्ष मोर्चाला लोटला विराट जनसागर! महायुती सरकारविरोधात संतापाची लाट

कोल्हापूर दि.०९ : सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या भूमीत लोकशाहीचा आवाज बुलंद झाला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला १३ जागांवर विजयी करून स्पष्ट कौल दिला होता. महायुतीतील मतदारांनी नाकारलेला हा लोकशाहीचा प्राथमिक निर्णय असतानाही पराभव स्वीकारण्याऐवजी सत्तेची मस्ती डोक्यात शिरलेल्या महायुती सरकारने सहकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक असल्याचा तांत्रिक नियम पुढे करून राज्य सरकारने तडकाफडकी चार स्वीकृत संचालक नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकारही बहाल केला. यामुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पराभव पचवता येत नसल्याने सत्तेचा वापर करून सहकार क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. सामान्य शेतकरी, कष्टकरी महिला आणि दूध उत्पादकांच्या भावनांचा विचार न करता घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here