सावंतवाडी दि.२३ : शहरात सध्या गॅस आणि पाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, या कामांमुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या दहा दिवसांपासून विविध ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. खोदकामादरम्यान पाण्याच्या मुख्य लाईनना धक्का बसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.याबद्दल शिवसेना माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
रस्त्यांवर सर्वत्र खड्डे असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. दिवसभर वाहतूक कोंडी होत असून, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत यंत्रांच्या आवाजामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. ध्वनी व वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन किंवा नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गॅस कंपनीला परवानगी देताना अटी व शर्तींचे पालन करून कामाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे.
खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करणे, पाण्याच्या गळतीची तात्काळ दुरुस्ती करणे आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवणे ही जबाबदारी ठेकेदाराची असताना याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे “याला जबाबदार कोण?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
पावसाळा तोंडावर असताना शहरातील नालेसफाई, गटार साफसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती यांसारखी कामे अद्याप सुरू नसल्याने आगामी काळात नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
एकूणच नगरपरिषदेचा कारभार गोंधळलेल्या अवस्थेत सुरू असून, नागरिकांना अपेक्षित नागरी सेवा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी केली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



📍 आंबोली/सावंतवाडी दि.२३:
सावंतवाडी दि.२३: येथे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा विशेष सत्कार उत्साहात पार पडला. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी दि.२३: तालुक्यातील उत्कर्ष कला क्रीडा मंडळ केणीवाडा (पाडलोस) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित ‘केणीवाडा महोत्सव २०२६’ चे दिमाखदार उद्घाटन नुकतेच पार पडले. या महोत्सवाचे उद्घाटन युवा नेतृत्व ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्थानिक कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सावंतवाडी दि.२२: शहरातील गॅस पाईपलाईन आणि नळ पाणी योजनेच्या कामात जुन्या जलवाहिन्या फुटल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात गेल्या ४ दिवसांपासून पाणी नाही, तर काही ठिकाणी गढूळ पाणी येत आहे.
सावंतवाडी दि.२२: येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोयीसुविधांचा अभाव आणि प्रलंबित समस्यांबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत भोसले यांनी पालिका प्रशासकीय भवनात तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयाचे नूतनीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि डॉक्टरांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी ठोस निर्णयांची घोषणा केली.
शिरोडा आरवली दि.२२: कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबा चरणी युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या निमित्ताने आयोजित या भेटीत त्यांनी कोकणातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले.