राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा; शिवराज्याभिषेक प्रतिमा व गीता पुस्तक देऊन केले सन्मानित…
सावंतवाडी,दि.१५:येथील नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात सकाळपासूनच ॲड. निरवडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्यासह उपस्थित विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन ॲड. निरवडेकर यांना दीर्घायुष्यासाठी आणि भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या आनंदाच्या क्षणी त्यांना ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ प्रतिमा भेट देऊन त्यांचा विशेष गौरवही करण्यात आला.
ॲड. अनिल निरवडेकर यांच्या दांडग्या जनसंपर्काची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली. यावेळी उत्सवमूर्ती ॲड. निरवडेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा युवानेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव आणि पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय त्यांच्या कार्यालयामध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव सर्व पत्रकार मंडळींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या प्रभाग क्रमांक दहा मधील युवकांनी सुद्धा त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
तसेच भाजपा आंबोली मंडल युवामोर्चा सरचिटणीस स्वप्नील राऊळ, उपाध्यक्ष सुहास राऊळ, संदेश बिडये, विकास परब, मकरंद तोरसकर व साहिल कल्याणकर यांनीही उपस्थित राहून लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, गोविंद साटेलकर, बूथ अध्यक्ष सुमित वाडकर, सेबेस्तीन फर्नांडीस, गोपाळ नाईक, पुंडलिक कदम, साई परब, गुरू पेडणेकर, महेश डोंगरे, सुधीर मळीक यांच्यासह शहरातील व्यापारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा; शिवराज्याभिषेक प्रतिमा व गीता पुस्तक देऊन केले सन्मानित…
🚨🤝 पिग्मी एजंटांना ३ टक्के कमिशन देण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे सहकार आयुक्तांचे आश्वासन!
सावंतवाडी दि.१५: नगरपरिषदेचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सावंतवाडी दि.१३: शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या, नरेंद्र डोंगर येथील बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सावंतवाडी दि.१४: “सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे फक्त नावापुरतंच उरलं असून ते केवळ कुंकवाला आधार बनलं आहे,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे. रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त करत, २४ तासांत रुग्णावर उपचार न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा मनसेने दिला आहे. या गंभीर परिस्थितीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांना थेट जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
📍 आंबोली दि.१४ :पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या आंबोली घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर आली आहे. आज (रविवार, १४ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अचानक दोन भलेमोठे दगड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
सावंतवाडी दि.१३: भाजपचे युवा नेते तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी दि.१३ : मान्सून काळात कोकण पट्टीतील मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन संपूर्ण मार्गावर व्यापक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, येत्या १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या काळात मार्गावरील विविध विभागांमध्ये वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहेत.
सावंतवाडी दि.१३: “ग्रो बीग टेक्नॉलॉजी ही कोणतीही सामाजिक संस्था नसून एक खासगी संस्था आहे. १५ दिवसांचे भाडे भरून त्यांनी तब्बल दीड महिना नगरपरिषदेच्या जागेचा वापर केला. एका रूमची परवानगी असताना बेकायदेशीरपणे तीन रूम वापरल्या. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत असताना, माझ्यावर टीका न करता मायकल डिसोजा थेट सावंतवाडी राजघराण्यावर आणि माझ्या कुटुंबावर नाहक आरोप करत आहेत. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, याप्रकरणी आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत,” असा घणाघाती पलटवार नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी केला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.