अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर यांची पुनश्च निवड

सावंतवाडी दि.२९: अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भरत केसरकर यांची पुनश्च एकदा निवड करण्यात आली आहे. कोकणातील डिजिटल पत्रकारितेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, सावंतवाडी येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत घोषणा
सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी ही घोषणा केली. राष्ट्रीय स्तरावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राजा माने हे प्रथमच सावंतवाडीत आले होते. यानिमित्ताने संघटनेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा
यावेळी केवळ जिल्हाध्यक्षच नव्हे, तर कोकण विभाग आणि तालुका स्तरावरील महत्त्वाच्या पदांचीही घोषणा करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या निवडी खालीलप्रमाणे आहेत:
राज्य संघटक: सीताराम गावडे (ज्येष्ठ पत्रकार)
कोकण विभाग अध्यक्ष: प्रा. रुपेश पाटील व राजेश नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष: भरत केसरकर
सावंतवाडी तालुका अध्यक्ष: सिद्धेश सावंत
सावंतवाडी तालुका संघटक: आनंद धोंड यांची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल पत्रकारितेला मिळणार बळ
भरत केसरकर यांच्या अनुभवाचा फायदा जिल्हयातील डिजिटल मीडियाला होणार असून, त्यांच्या निवडीमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. या नूतन नियुक्त्यांमुळे कोकणातील डिजिटल पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि संघटनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here