सावंतवाडी दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे, माळकरवाडी येथे शुक्रवार, ३ एप्रिल आणि शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी ‘निरवडे महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कलागुणांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
महोत्सवाचे सविस्तर वेळापत्रक:
शुक्रवार, ३ एप्रिल २०२६:
सायंकाळी ७:०० वा.: स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचे बहारदार सामूहिक नृत्य.
रात्री ८:०० वा.: देवगड येथील किंजवडे येथील प्रसिद्ध ‘पावणादेवी समई नृत्य’.
रात्री १०:०० वा.: दिनेश मेस्त्री ग्रुप (नेरूर) यांचा ‘शिमगोत्सव’. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘इंडियन आयडॉल’ फेम श्री. गणेश मेस्त्री हे असणार आहेत.
शनिवार, ४ एप्रिल २०२६:
सायंकाळी ७:०० वा.: सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. नागेश आडगावकर यांचा शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम.
रात्री १०:०० वा.: ओंकार डान्स अकॅडमी, सिंधुदुर्ग निर्मित ‘नृत्यविष्कार’ हा भव्य नृत्याचा कार्यक्रम.
रात्री ११:०० वा.: महोत्सवाचा मुख्य भाग असलेली ‘भव्य लकी ड्रॉ सोडत’ आणि निकाल.
आयोजकांचे आवाहन:
“हा महोत्सव स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि संस्कृती जोपासण्यासाठी आयोजित केला आहे. तरी सर्व रसिकांनी आणि नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


