सावधान! खिशात हात न घालताही तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं; ‘कॉन्टॅक्टलेस’ फसवणुकीपासून असा करा बचाव

मुंबई दि.२७: डिजिटल क्रांतीच्या युगात आता चोर तुमच्या खिशाला हात न लावताही पैसे चोरू शकतात. गर्दीच्या ठिकाणी ‘पॉईंट ऑफ सेल’ (POS) मशीनचा वापर करून सायबर ठग तुमच्या खिशातील क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चोरून स्कॅन करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. वाय-फाय सुविधेमुळे अवघ्या काही सेकंदांत हा व्यवहार पूर्ण होत असून, पीडिताला कळेपर्यंत खात्यातून पैसे कट झालेले असतात.

आजकालच्या बहुतांश कार्ड्समध्ये NFC (Near Field Communication) म्हणजेच वाय-फाय सुविधा असते. यासाठी पिन टाकण्याची किंवा कार्ड मशीनमध्ये स्वाइप करण्याची गरज नसते. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. गर्दीच्या ठिकाणी तुमचं पाकीट ज्या बाजूला आहे, त्याजवळ चोर हळूच POS मशीन नेतात. कार्ड मशीनच्या संपर्कात येताच २-३ सेकंदात व्यवहार पूर्ण होतो.या आधुनिक डिजिटल चोरीपासून वाचण्यासाठी खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे:NFC सुविधा बंद करा: तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपवर जाऊन ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’ किंवा ‘NFC’ पर्याय तातडीने बंद करा. गरज असेल तेव्हाच तो सुरू करा.
मर्यादा (Limit) निश्चित करा: जर तुम्हाला ही सुविधा वापरायची असेल, तर त्याची दैनंदिन मर्यादा १,००० रुपयांपेक्षा कमी सेट करा, जेणेकरून मोठी चोरी टाळता येईल.
RFID-Blocking पाकीट वापरा: बाजारात ‘RFID-Blocking Wallet’ किंवा विशेष कार्ड होल्डर मिळतात. यामुळे मशीन तुमच्या कार्डचे सिग्नल पकडू शकणार नाही.
कार्ड पाकीटात अशा प्रकारे ठेवा की ते बाहेरील स्पर्श किंवा स्कॅनिंगला लगेच प्रतिसाद देणार नाही.

महत्त्वाची टीप:

सतर्क राहणे आणि तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित ठेवणे, हाच या आधुनिक चोरीपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.


फसवणूक झाल्यास काय करावे?
१. विलंब न करता बँकेला कळवून आपले कार्ड त्वरित Block करा.
२. नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० वर त्वरित संपर्क साधा.
३. ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here