उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सावंतवाडी न. प. ची विशेष समिती सभापती निवड रद्द

सावंतवाडी दि.२८ :
सावंतवाडी नगरपालिकेच्या विशेष
समिती सभापतींची निवड आज, २८ जानेवारीला सकाळी ११.०० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार होती.परंतू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवड सभा रद्द करण्यात आली तर शोकसभा घेण्यात आली.
सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता असून अकरा नगरसेवक निवडून आले आहेत. या विशेष समिती सभापतीपदी भाजपच आपला दावा होता. शिवसेनेचे सात नगरसेवक विरोधी बाकावर असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष व काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक हे तटस्थ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here