विकासासाठी महायुती सज्ज! मळगाव येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. 🚩🚩

मळगाव नेमळे आणि तळवडे मतदार संघासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना सावंतवाडी चे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर सोबत उमेदवार संदीप गावडे गौरव मुळीक विनोद राऊळ गणेश प्रसाद पेडणेकर आदी

सावंतवाडी दि.३०:
मळगाव-नेमळे आणि तळवडे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत संपर्क कार्यालयाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला.
सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उच्चशिक्षित लोकप्रतिनिधीच समाजाचा खरा विकास करू शकतात, हा विचार घेऊन आमचे उमेदवार संदीप गावडे आणि गौरव मुळीक निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
या कार्यक्रमाला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रामुख्याने खालील मान्यवर उपस्थित होते संदीप गावडे: उमेदवार, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ.
गौरव मुळीक: उमेदवार, मळगाव–नेमळे पंचायत समिती.विनोद राऊळ: माजी सरपंच, नेमळे.
गणेशप्रसाद पेडणेकर: शक्ती केंद्रप्रमुख.
लक्ष्मण गावकर: विभागप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य.
याशिवाय माजी सरपंच निलेश कुडव, नीलकंठ बुगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, निकिता राऊळ, अनुजा खडपकर, तसेच बूथ अध्यक्ष महेश गवंडे, सुदेश राऊळ, मदन तेंडोलकर, रुपेश सावंत आणि सुभाष देवळी यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मळगाव नेमळे तळवडे मतदार संघाच्या महायुतीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर सोबत संदीप गावडे गौरव मुळीक विनोद राऊळ गणेश प्रसाद पेडणेकर आदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here