35.7 C
New York
Saturday, July 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 13

सावंतवाडीत भरवस्तीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी हिसकावली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

सावंतवाडी दि.१०: शहरातील गजबजलेल्या कॉसमॉस बिल्डिंग परिसरात आज सकाळी भरवस्तीत एका महिलेची सोन्याची साखळी (चैन) लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवासी रंजना ठाकूर या सकाळी आपल्या घरासमोरील बागेत फुले काढत होत्या. दरम्यान, मोटरसायकलवरून दोन अज्ञात चोरटे तिथे आले. त्यांनी ठाकूर यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि काही समजण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून वेगाने पोबारा केला.

चोरटे सीसीटीव्हीत कैद; परप्रांतीय असण्याची शक्यता
हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी केलेल्या पेहरावावरून ते परप्रांतीय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका नीलम नाईक यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली आणि रीतसर पंचनामा केला. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अज्ञात चोरट्यांचा माग काढत असून त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहरातील वाढत्या चोऱ्या लक्षात घेता पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत राजकीय वाकयुद्ध पेटले!

“स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठेचे धडे देऊ नयेत!” – साक्षी वंजारी यांचा ‘त्या’ तथाकथित नगरसेवकावर पलटवार!

📍 ठळक मुद्दे:
👉 उपनगराध्यक्ष पद का हुकले? ज्येष्ठ असूनही डावलले गेले, याचे आधी आत्मपरीक्षण करा.
👉 पाटेकर देवाची शपथ घ्या: ‘धनशक्ती’ की ‘जनशक्ती’? निवडणुकीतील ‘मिठाई’च्या देवाणघेवाणीवर वंजारींनी बोट ठेवले.
👉 “आकां”साठी जागा हवी? व्यापारी संकुलात जागा मिळवण्यासाठीच नेत्यांना खुश करण्याचा हा खटाटोप तर नाही ना?
👉 गॉगलचा टोला: सत्तेची धुंदी उतरली नसेल तर तुम्हीही काळा चष्मा लावा, म्हणजे वास्तव्य दिसेल!

सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे सौ. साक्षी वंजारी (अध्यक्षा, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस) यांचे सडेतोड उत्तर!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

ऐन पावसाळ्यात गटाराचे काम सुरू; शिवसेना नगरसेविका शर्वरी धारगळकर आक्रमक! 🚨

📍 सावंतवाडी (प्रभाग ६) दि.०८:
शहरात विठ्ठल मंदिर ते मच्छी मार्केट दरम्यान ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या गटाराच्या कामावरून मोठा वाद पेटला आहे. पावसाळ्यापूर्वीच भूमिपूजन होऊनही प्रशासनाने कामाला नाहक उशीर लावल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांनी केला आहे.

⚠️ अपघात झाल्यास ‘ते’ जबाबदार!
भर पावसात सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात चिखल आणि पाण्याचे साम्राज्य पसरले असून नागरिक घसरून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. “येथे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर आणि नगराध्यक्षा सौ श्रद्धाराजे सावंत-भोसले पूर्णपणे जबाबदार असतील,” असा थेट इशारा धारगळकर यांनी दिला आहे.

🛑 मुख्य मुद्दे:

भूमिपूजन होऊनही नगरपरिषदेची कामात मोठी दिरंगाई.
चिखलामुळे पादचारी आणि वाहनचालकांची प्रचंड गैरसोय.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

💐 भार्गवराम शिरोडकर यांची ‘प्रमुख लिपिक’ पदी पदोन्नती! 💐

सावंतवाडी दि.०८ : येथील ‘भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय’ येथे कार्यरत असलेले श्री. भार्गवराम विठ्ठल शिरोडकर यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल ‘प्रमुख लिपिक’ (Office Superintendent) या वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ✨
संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना नुकतेच हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. 📄🤝
📸 याप्रसंगी उपस्थित मान्यवर: संस्थेचे सचिव श्री. गणेश बोर्डेकर, संचालक श्री. उमाकांत वारंग, श्री. रमेश बोंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दळवी, सर्व डॉक्टर्स आणि सर्व सहकारी कर्मचारी वृंद.
आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि मनमिळावू स्वभावाने सर्वांची मने जिंकणाऱ्या श्री. भार्गवराम शिरोडकर यांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सदिच्छा! 🎉💐

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी CAP प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना थेट मार्गदर्शन; शंकानिरसनाची मिळणार संधी

सावंतवाडी दि.०८:महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसले नॉलेज सिटी, चराठे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच प्रवेश प्रक्रियेशी संबंधित घटकांना CAP प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे._

_अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या CAP प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी, कागदपत्र पडताळणी, पर्याय भरणे, गुणवत्ता यादी, प्रवेश फेऱ्या तसेच विविध तांत्रिक बाबींविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने राज्यातील विविध विभागांमध्ये सुसंवाद कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी व पालकांना अधिकृत, अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे._

_सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सीईटी सेलचे अधिकारी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी व पालकांना थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

‘काळा चष्मा लावून फिरणाऱ्यांना भाजपचे उपक्रम दिसणार कसे?’ – सभापती आनंद नेवगींचा विरोधकांवर घणाघात! 🔥👇

📌 सावंतवाडी दि.०८: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सावंतवाडीत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेवरून आता चांगलंच राजकीय वातावरण तापलं आहे. ऐतिहासिक आणि पवित्र ‘देव पाटेकर मंदिर’ परिसराच्या स्वच्छतेवर टीका करणाऱ्यांना सभापती आनंद नेवगी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले आनंद नेवगी? 🤔

जनतेने चोख उत्तर दिलंय: “अशा संकुचित विचारसरणीला सावंतवाडीच्या सुजाण जनतेने नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांवर मतांच्या माध्यमातून चोख उत्तर दिलं आहे, हे टीका करणाऱ्या विसरल्या का?”

पवित्र कामावर आक्षेप का?: “जर ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाची स्वच्छता होत असेल, तर नेमका आक्षेप कशाबद्दल?”

तेव्हा का गप्प होतात?: नगरपालिकेने यापूर्वी सलग ७ दिवस शहरात स्वच्छता अभियान राबवलं, तेव्हा टीका करणारे गप्प का होते?

श्रमदानातून शिवभक्तीचा संदेश! 🚩
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाच्या तपपूर्तीनिमित्त देशभरात विविध उपक्रम सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडीच्या नगराध्यक्षा आणि भाजप नगरसेवकांनी राजवाडा व देव पाटेकर मंदिर परिसरात स्वतः ‘श्रमदान’ करून परिसर चकाचक केला आणि शिवभक्तीचे अनोखे उदाहरण जनतेसमोर ठेवले.

“स्वच्छ भारत अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नाही. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी आमची ही तत्परता भविष्यातही कायम राहील!”
— आनंद नेवगी (सभापती, सावंतवाडी)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

📌 सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार राजवाड्यातून चालतोय का? महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांचा संतप्त सवाल!

💥 “भाजपचे नगरसेवक म्हणजे राजवाड्याचे साफसफाई कर्मचारी आहेत का?” – सौ. साक्षी वंजारी यांची सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका!

सावंतवाडी दि.०८: ६ जून रोजी राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. मात्र, या निमित्ताने सावंतवाडीत झालेल्या एका साफसफाई मोहिमेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी प्रेस नोट प्रसिद्ध करत सत्ताधारी नगराध्यक्षा आणि भाजपच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच थेट “कारभार राजवाड्यातूनच सुरू झाला का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

🛑 वंजारी यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे आणि सवाल:
खाजगी मालमत्तेची साफसफाई कशासाठी?
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्षा श्रद्धा भोसले व लखमराजे भोसले यांच्या पुढाकाराने राजवाडा परिसराची साफसफाई करण्यात आली. “शहरात नरेंद्र डोंगर, जगन्नाथराव भोसले उद्यान, जिमखाना, मोती तलाव अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक आणि कचऱ्याचे साम्राज्य आहे. तिथे मोहीम न राबवता केवळ राजवाडा या खाजगी मालमत्तेचीच निवड कोणत्या निकषांवर केली?” असा प्रश्न वंजारी यांनी विचारला आहे.

नगरसेवकांना सफाई कर्मचारी समजता का?
या मोहिमेत भाजपचे काही मर्जीतले नगरसेवक आणि पदाधिकारी झाडू हातात घेऊन पाहायला मिळाले. यावरून, “सत्ताधारी नगराध्यक्षा नगरपालिकेच्या नगरसेवकांना आपले साफसफाई कर्मचारी समजतात का? आणि राजवाड्यातील कर्मचारी नेमके सुट्टीवर गेले होते का?” असा टोला त्यांनी लगावला.

निवडणुकीतील भाकीत खरे ठरतेय?
“निवडणुकीपूर्वीच मी म्हटले होते की, सावंतवाडीतील नागरिकांना आणि नगरसेवकांना आपल्या कामासाठी राजवाड्याचे उंबरठे झिजवावे लागतील. सध्या नगरपरिषदेच्या अनेक बैठका राजवाड्यात होत असल्याची चर्चा गांधी चौकातील व्यापाऱ्यांमध्ये आहे. कालच्या घटनेवरून या विधानाची सुरुवात झाल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे,” असे सौ. वंजारी यांनी नमूद केले.

शहरातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष:
आज सावंतवाडी शहर उघडी गटारे, खड्डेमय रस्ते, भटके कुत्रे-जनावरांचा त्रास आणि पाईपलाईनच्या कामांतील त्रुटी अशा अनेक गंभीर समस्यांनी ग्रासले आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये “यापेक्षा प्रशासकीय कारभारच बरा होता” अशी भावना निर्माण झाली आहे.

💣 शिंदे सेनेच्या नगरसेवकाचे स्टेटस चर्चेत!
याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुरतडकर यांचे सोशल मीडियावरील स्टेटस सध्या सावंतवाडीत जोरदार चर्चेत आहे. महायुतीचे नगरसेवकही आता उघडपणे बोलणे टाळत असून, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या सर्व प्रकारात वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

📢 ‘जनतेसाठी रस्त्यावर उतरणार’ – काँग्रेसचा इशारा
“सत्ताधाऱ्यांचा हा नियोजनशून्य कारभार थांबला नाही आणि नगराध्यक्षा-नगरसेवकांनी शहरात फिरून जनतेच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल!”
— सौ. साक्षी वंजारी (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कोकण रेल्वे विस्कळीत! मान्सूनपूर्व दुरुस्तीमुळे गाड्या ४ ते ५ तास उशिरा 🚂👇

चिपळूण दि.०८: सुट्ट्या संपवून मुंबईकडे परतणाऱ्या कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासाला मोठा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-माणगाव भागातील वाहतूककोंडी सहन केल्यानंतर, आता कोकण रेल्वेच्या रखडपट्टीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

📌 गाड्यांना प्रचंड उशीर:
एलटीटी-मडगाव, तेजस एक्सप्रेस, कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या तब्बल ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. गाड्या उशिरा धावण्याची कोणतीही ठोस माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

📌 वेग मंदावण्यामागचं कारण काय?
कोकण रेल्वे मार्ग डोंगराळ भागातून जातो आणि येथे मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी सध्या रुळांचे नूतनीकरण, ट्रॅक लिफ्टिंग आणि कटिंग-लोअरिंगसारखी मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे गाड्यांचा वेग तात्पुरता कमी करण्यात आला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🌱 ‘एक तरी झाड लावा!’… सातार्डा ग्रामपंचायतीचा पर्यावरण दिनी संकल्प! 🌳

सातार्डा ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करताना सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू व इतर मान्यवर.

🌱 🌳📍 सावंतवाडी (सातार्डा) दि.०८:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने ‘एक तरी झाड लावा’ या विशेष संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच श्री. संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेची सुरुवात झाली.

“निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाने वृक्षतोड थांबवली पाहिजे आणि धरतीचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे,” असे आवाहन यावेळी सरपंच संदीप प्रभू यांनी केले.

👥 कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
या पर्यावरणपूरक उपक्रमाला सरपंच संदीप प्रभू, ग्रामविकास अधिकारी कुणाल मसगे, उपसरपंच विशाखा पारीपत्ये, सदस्य शालिनी राऊळ, योगेश गोवेकर, संतोष गोवेकर, डॉ. एमगेकर, पोलीस पाटील विनीता मयेकर, मनाली पेडणेकर, प्रमिला यमगेकर, ग्रामसखी स्नेहा पारिपत्ये आणि सातार्डा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

माझी कुंडली काढण्यापेक्षा संजू परबांनी ज्योतिषाचं दुकान घालावे; रूपेश राऊळांचा पलटवार

केसरकरांच्या दुर्लक्षामुळे जनता ८ दिवस काळोखात; मळेवाड येथे ‘रास्ता रोको’चा इशारा

सावंतवाडी दि.०६: “माझ्या कुंडल्या काढण्याची भाषा करणाऱ्या शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आता ज्योतिषाचे दुकान घालावे. त्यांच्या अशा पोकळ धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही,” असा घणाघाती पलटवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला आहे.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील वीज समस्या, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अपयशावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

💡 विजेचा लपंडाव आणि ८ दिवसांचा काळोख
पावसाच्या आगमनाबरोबरच सावंतवाडी तालुक्यातील जनतेला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या तालुक्यात विजेचा मोठा लपंडाव सुरू असून, ग्रामीण भागातील जनतेवर तब्बल ८-८ दिवस काळोखात राहण्याची वेळ आली आहे.

“या परिस्थितीला स्थानिक आमदार दीपक केसरकर हेच पूर्णपणे जबाबदार आहेत. यापूर्वी देवासमोर आरती करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही. अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली; मात्र तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. आता आमचा संयम संपला असून, पुढील ८ दिवसांत ही परिस्थिती न बदल्यास मळेवाड येथे तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल.”
— रूपेश राऊळ, विधानसभा प्रमुख (शिवसेना ठाकरे गट)

🔄 महावितरणचा अजब आणि त्रासदायक कारभार
तालुक्यातील वीज वितरणाच्या अजब कारभारावर बोलताना राऊळ यांनी प्रशासनाचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला:

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, आरोंदा यांसह सुमारे १५ ते १६ गावे आजही वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण कार्यालयाशी जोडलेली आहेत.

यामुळे वीज खंडित झाल्यास किंवा तक्रार करायची असल्यास, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आधी सावंतवाडीत आणि तिथून पुन्हा वेंगुर्ल्याला फेऱ्या माराव्या लागतात.

या त्रासदायक कारभारामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल होत असून, स्थानिक आमदारांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

🏥 आरोग्य व्यवस्था आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
“आज सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागत आहे, मात्र कुठेही विकासकाम दिसत नाही,” असे सांगत राऊळ यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर बोलताना देखील लाज वाटली पाहिजे. आम्ही सत्तेत असताना हे हॉस्पिटल वेत्ये गावात होण्यासाठी जमीन देखील उपलब्ध करून देत होतो. त्यामुळे आरोग्याविषयी केवळ पोकळ गप्पा मारणाऱ्यांनी आता लाज बाळगली पाहिजे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

⚖️ आडाळी माती उत्खनन आणि संजू परबांवर हल्लाबोल
जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यावर थेट हल्लाबोल करताना राऊळ म्हणाले की:

आडाळी येथील माती उत्खननावरून आम्ही केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यास संजू परब यांच्याकडे एकही ठोस मुद्दा उरलेला नाही.

राज्याचे उद्योगमंत्री त्यांच्याच पक्षाचे असूनही, ते बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर साधी कारवाई करू शकत नाहीत.

आपली निष्क्रियता लपवण्यासाठी ते माझ्या कुंडल्या काढण्याची भाषा करत आहेत, त्यापेक्षा त्यांनी ज्योतिषाचे दुकान टाकलेले बरे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

उपस्थिती:
ह्या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, अशोक परब, अशोक धुरी, सुरेश गावडे, राजू शेटकर, गुरु नाईक यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563