18.3 C
New York
Saturday, September 19, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 87

सुपर-८ फेरीत आज भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने; हेड-टू-हेडमध्ये भारताची आघाडी

सुपर-८ फेरीत आज हेड-टू-हेडमध्ये भारताची आघाडी

अहमदाबाद, दि.२२ : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सुपर-८ फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता हा सामना सुरू होणार असून दोन्ही संघांनी गट टप्प्यात अपराजित राहून दमदार कामगिरी केली असल्याने आजची लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
अहमदाबादची खेळपट्टी स्पर्धेतील सर्वोत्तम पिचांपैकी एक मानली जाते. काळ्या मातीच्या पृष्ठभागामुळे चेंडूला चांगली उसळी आणि गती मिळते, ज्यामुळे फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होते. मात्र योग्य लांबी साधल्यास गोलंदाजांनाही येथे चांगली साथ मिळू शकते. त्यामुळे फलंदाज-गोलंदाज यांच्यातील संतुलित लढत पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.
या मैदानावर आतापर्यंत टी-२० विश्वचषकातील चार सामने खेळले गेले असून त्यापैकी दोन वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील थरारक डबल सुपर ओव्हर सामना देखील याच मैदानावर झाला होता, ज्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीकडे पाहिल्यास भारताचा वरचष्मा दिसतो. आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३५ टी-२० सामने झाले असून त्यात भारताने २१ विजय मिळवले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत; एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. अहमदाबादमध्ये भारताने खेळलेल्या ९ टी-२० सामन्यांपैकी ७ सामने जिंकत मजबूत विक्रम नोंदवला आहे, तर दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे.आजच्या सामन्यात दोन्ही संघांची अपराजित मालिका कायम ठेवण्याची प्रतिष्ठेची लढत रंगणार असल्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚀 यशस्वी व्हायचंय? मग हे ५ ‘जागतिक नियम’ नक्की माहीत हव्यात! 🌍

🚀 🌍 आयुष्यात गोंधळलेले असाल किंवा प्रगती थांबली आहे असं वाटत असेल, तर…

वॉशिंग्टन दि.२२: जगातील विचारवंतांनी दिलेली ही ‘यशस्वी आयुष्याची पंचसूत्री’ तुम्हाला नवी दिशा देऊ शकते. 💡

1️⃣ मर्फीचा नियम (Murphy’s Law) 😟
“ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, ती घडण्याची शक्यता जास्त असते.”
धडा: भीतीवर नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक विचार करा. भीतीपेक्षा आत्मविश्वासाची शक्ती मोठी असते!
2️⃣ किडलिनचा नियम (Kidlin’s Law) ✍️
“समस्या स्पष्टपणे कागदावर लिहा, तुमची अर्धी समस्या तिथेच सुटली समजा.”
धडा: मनात विचार घोळवण्यापेक्षा ते लिहून काढा. स्पष्टता (Clarity) हीच अर्ध्या यशाची गुरुकिल्ली आहे.
3️⃣ गिल्बर्टचा नियम (Gilbert’s Law) 💪
“कामाची जबाबदारी फक्त तुमचीच आहे.”
धडा: कोणाकडून सूचना मिळण्याची वाट पाहू नका. आपल्या कामाचे मालक स्वतः बना आणि ते सर्वोत्तम करा.
4️⃣ विल्सनचा नियम (Wilson’s Law) 📚
“ज्ञानाला प्राधान्य द्या, पैसा आपोआप येईल.”
धडा: स्वतःला अपडेट ठेवा आणि कौशल्य मिळवा. तुम्ही जितके सक्षम बनाल, तितकीच लक्ष्मी तुमच्याकडे चालत येईल.
5️⃣ फाल्कलँडचा नियम (Falkland’s Law) ⏳
“गरज नसेल तर निर्णय घेऊ नका.”
धडा: प्रत्येक वेळी घाई करणं चुकीचं असतं. जेव्हा गरज नसेल, तेव्हा शांत राहून परिस्थिती समजून घेणं अधिक श्रेयस्कर असतं.

📌 हे नियम तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आयुष्यात बदल घडवून आणा!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 शिवराय डोक्यावर नव्हे, ‘डोक्यात’ घाला! 🚩

शिवव्याख्याते प्रा.रूपेश पाटील यांचा सन्मान करतांना

🚩 🚩पनवेलमध्ये शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे धगधगते व्याख्यान संपन्न!

मुंबई पनवेल दि.२२: “छत्रपती शिवरायांची युक्ती आणि महापराक्रमी शंभूराजांचे शौर्य जर आपल्या अंगी बाळगले, तर जगातले कोणतेही यश दूर नाही!” असे परखड विचार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी पनवेल येथे व्यक्त केले.

📍 ठिकाण: केदार सहकारी गृहनिर्माण संस्था व सोशल असोसिएशन, पनवेल.

💥 व्याख्यानातील काही खास ‘धगधगते’ विचार:
विचारांची गरज: महाराजांना केवळ डोक्यावर घेऊन नाचू नका, तर त्यांचे विचार डोक्यात घाला.

अंधश्रद्धेला थारा नाही: शिवरायांच्या अनेक मोहिमा ‘अमावस्येला’ यशस्वी झाल्या, त्यांनी कधीही अंधश्रद्धा पाळली नाही.

शेतकरी राजा: स्वराज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, हे महाराजांच्या सूक्ष्म नियोजनाचे यश होते.

मैदान गाजवा: अफजलखानाचा वध, बाजीप्रभूंचा पराक्रम आणि शिवा काशिद यांची निष्ठा आजही तरुणाईला प्रेरणा देणारी आहे.

🎊 उत्सवाचे स्वरूप:
शिवजयंती निमित्त केदार सोसायटीमध्ये उत्साहाचा महापूर आला होता:
🔥 भव्य शिवज्योत आगमन सोहळा
🩸 सामाजिक भान जपणारे ‘रक्तदान शिबीर’
🚩 ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ‘मिरवणूक’
🎭 लहान मुलांचे आणि महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम

युवा पिढीने शिवरायांचे ‘मॅनेजमेंट’ शिकले तर प्रत्येक क्षेत्रात विजय आपलाच असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिवरायांबद्दल धगधगते व जाज्वल्य विचार मांडताना शिवव्याख्याते प्रा.रूपेश पाटील

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी शाळा क्रमांक 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO (9001:2015) मानांकन प्राप्त सावंतवाडी जि प क्र. 6 शाळा 

सावंतवाडी दि.२१-:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी क्रमांक ६ व कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ तसेच ISO (9001:2015) मानांकन प्रदान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

शाळेस कंपाउंड वॉल बांधून सहकार्य करणारे राजू भालेकर, नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिपाली भालेकर, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील करडे, राज्यस्तरीय जिजाऊ माता पुरस्कार प्राप्त शिक्षिका सायली लांबर, तसेच स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना विनामूल्य अध्यापन करणाऱ्या रेखा कांबळे व रिया पाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेला यावर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO (9001:2015) मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेला मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

संध्याकाळी स्वच्छतादूत व युवा प्रबोधनकार सगुण जाधव यांनी ‘संत गाडगेबाबा’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून समाजप्रबोधन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दिपाली भालेकर (सभापती, महिला व बालकल्याण समिती, नगरपरिषद सावंतवाडी), राजू भालेकर (सामाजिक कार्यकर्ते), सविता परब (गटशिक्षणाधिकारी, सावंतवाडी), सहदेव चव्हाण (ISO समन्वयक, कोकण विभाग), कमलाकर ठाकूर (केंद्रप्रमुख), दिलीप भालेकर (शिक्षणतज्ज्ञ), संतोष तळवणेकर (जिल्हाध्यक्ष, राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग), सतीश धुमाळे (मुख्याध्यापक, वि.स. खांडेकर हायस्कूल) तसेच अभिनव ॲकॅडमीचे प्राचार्य पोळ उपस्थित होते.

कार्यक्रमास आरोग्य व क्रीडा समिती सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दहा हजार रुपयांची देणगी देऊन शुभेच्छा दिल्या, तर शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर यांनी पाच हजार रुपयांचे योगदान दिले. पालकवर्गानेही मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्षा पूनम तुयेकर, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, ईश्वरी तेजम, गुरुप्रसाद तेजम, जान्हवी वारीक, अश्विनी गावडे, दिपा गावडे, मयुरेश सुतार तसेच शिक्षकवृंद केशव जाधव, सायली लांबर, रेखा कांबळे, रिया पाल आदींनी विशेष परिश्रम घेतले.विविधरंगी कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन करणे हास्यास्पद;

साक्षी वंजारी

सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांचा शिंदे सेनेवर घणाघात

सावंतवाडी दि.२१: सावंतवाडी येथे शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे करण्यात आलेले दहन हे अत्यंत हास्यास्पद आणि केविलवाणे कृत्य आहे, अशी घणाघाती टीका सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी केली आहे. “सूर्यावर थुंकले तर ती थुंकी स्वतःच्याच तोंडावर पडते,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘पहिले स्वतःची उंची तपासा’
साक्षी वंजारी यांनी शिंदे सेनेचे नेते संजू परब आणि पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावताना म्हटले की, राहुल गांधी हे हार्वर्ड विद्यापीठात शिकलेले, उच्चशिक्षित आणि देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जाणारे राष्ट्रीय नेते आहेत. भारत-अमेरिका व्यापार करारासारख्या जटिल विषयावर बोलण्यासाठी लागणारा अर्थशास्त्रीय अभ्यास आणि उंची या पदाधिकाऱ्यांकडे नाही. राष्ट्रीय सत्ताधारी पक्ष जिथे शांत आहे, तिथे एका प्रादेशिक पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी असे कृत्य करणे म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला स्टंट आहे.
ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
साक्षी वंजारी यांनी शिंदे सेनेला सणसणीत टोला लगावत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले:
बेपत्ता महिलांचा प्रश्न: महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईत रोज बेपत्ता होत असलेल्या लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेबाबत या नेत्यांनी जागरूकता दाखवावी.
एपिस्टीन फाईल प्रकरण: जगभरात गाजत असलेल्या या प्रकरणावर आंदोलन केले असते, तर ते जास्त भूषणावह ठरले असते.
स्थानिक अस्तित्व: नगरपालिकेत आणि निवडणुकीत जनतेने नाकारलेले अस्तित्व लक्षात घेऊन शिंदे सेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे.
लोकशाहीचा अपमान आणि पुढील पाऊल
राहुल गांधींचा पुतळा जाळणे ही कृती केवळ निषेधार्ह नसून लोकशाहीचा अपमान आहे, असे वंजारी यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष कोणत्याही धमक्या किंवा हिंसक प्रवृत्तीसमोर झुकणार नाही. संविधानावर आमचा विश्वास असून येणाऱ्या काळात महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

“विचारांची लढाई रस्त्यावर पुतळे जाळून जिंकता येत नाही. ज्यांना युतीशिवाय स्वतःचे अस्तित्व नाही, त्यांनी राहुल गांधींसारख्या नेत्यावर टीका करण्यापूर्वी आपली कुवत तपासावी.” — सौ. साक्षी वंजारी, अध्यक्षा, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत घरसमोरून चोरीला गेलेली दुचाकी २४ तासांत हस्तगत; आरोपी गजाआड

संशयित रवी शंकर लाखे काही तासांत जेरबंद 

सावंतवाडी दि.२१: माजगाव खोतवाडा येथून चोरीला गेलेली सुझुकी एक्सेस दुचाकी शोधण्यात सावंतवाडी पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले असून, याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी आदित्य गोविंद खोरजूवेकर (वय १९, रा. माजगाव खोतवाडा) यांनी आपली सुझुकी एक्सेस गाडी (क्र. MH 07 AW 1048) घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली होती. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:४५ च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही गाडी लंपास केली होती. याप्रकरणी खोरजूवेकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती.
पोलिसांची तपासाचक्र आणि यश
गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करत असतानाच, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित रवी शंकर लाखे (वय ४०, रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गाडी चोरल्याचे निष्पन्न झाले.
चोरलेली दुचाकी आरोपीने सावंतवाडी शहरातच एका ठिकाणी लपवून ठेवली होती. पोलिसांनी ती तातडीने जप्त केली असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
तपास पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस हवालदार मनोज राऊत, प्रवीण वालावलकर, आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब यांनी केली. या तपासकामी त्यांना पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे व सुरेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाला राज्यस्तरावर ‘आरोग्यरत्न’ सन्मान

सिंधुदुर्ग दि.२१: महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागतर्फे आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा – २०२६ हा कार्यक्रम २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
२०२५-२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी मोहिम (NCD Portal Screening) अंतर्गत जिल्ह्याने राज्यात सिव्हिल सर्जन तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाला आहे.
इतर मानकरी
ग्रामीण रुग्णालय रँकिंगमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी डॉ. प्रकाश पाटोडेकर यांना पुरस्कार
देवगड तालुक्यातील पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मोहोड व ग्रामीण रुग्णालय देवगड यांना गौरव
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील आशा सेविका समीक्षा संतोष जठार यांना उत्कृष्ट कार्यासाठी राज्यस्तरीय आशा पुरस्कार
आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व समर्पित कामगिरीचा गौरव करणारा हा सोहळा मानाचा समजला जातो. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यस्तरीय प्रतिमा अधिक भक्कम झाली असून जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

*आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अभिवादन*

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सिंधुदुर्गनगरी दि.२१: मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भवनात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक आणि समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी आपल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून समाजजागृतीची नवी दिशा मिळाली. सत्य, विवेक आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी पत्रकारिता आजही त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेते. लोकशाही बळकट करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्ण आणि जबाबदार पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव बाळ खडपकर, सदस्य संजय वालावलकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवु महाडेश्वर, संदीप गावडे तसेच दत्तप्रसाद वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी जांभेकर यांच्या कार्याचा आदर्श घेत पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सांगेलीत २२ वर्षांनंतर सुतारटेंबवाडीत रंगणार ऐतिहासिक ‘गिरोबा उत्सव’!

श्री देव गिरोबा (संग्रहित)

ऐतिहासिक ‘गिरोबा उत्सव’!
१ मार्चला हजारो भाविकांच्या साक्षीने साकारली जाणार मूर्ती; उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

सावंतवाडी दि.२१: कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरांपैकी एक असलेल्या सांगेली ग्रामदैवत गिरीजानाथाचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अर्थात ‘गिरोबा उत्सव’ येत्या रविवार, १ मार्च रोजी साजरा होत आहे. तब्बल दोन तपानंतर (२२ वर्षांनंतर) हा सोहळा गुरगुट सुतारटेंबवाडीत होत असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्त दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फणसाच्या झाडातून साक्षात गिरोबा!
सांगेलीचे गिरीजानाथ देवस्थान हे राज्यातील एकमेव असे देवस्थान आहे, जिथे दरवर्षी देवाची मूर्ती फणसाच्या झाडाच्या लाकडातून नव्याने साकारली जाते. यावर्षी या उत्सवासाठी सुतारटेंबवाडीतील अरुण शांताराम रेडीज यांच्या घराजवळच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात आली आहे. महाशिवरात्रीपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून, दररोज या वृक्षाची विधिवत पूजा केली जात आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
उत्सवाच्या निमित्ताने २१ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
आज २१ फेब्रुवारी: महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (बुवा प्रसाद आमडोसकर) आणि रात्री धामापूरकर दशावतार.
२२ ते २४ फेब्रुवारी: निरवडेकर दशावतार, भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन आणि खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे प्रयोग.
२५ ते २६ फेब्रुवारी: कुडाळचा फुगडी कार्यक्रम, संतोष धर्णे (कलंबिस्त) व अमित मेस्त्री (ओरोस) यांची भजने.
२७ ते २८ फेब्रुवारी: लहान मुलांचे कार्यक्रम, ‘खेळ पैठणीचा’, शुभम नाईक (गोवा) यांचे भजन आणि गणेश माऊली ग्रुपचे गायन.
१ मार्चला मुख्य सोहळा आणि थरार
उत्सवाचा मुख्य दिवस १ मार्च रोजी असेल. दुपारी ४ वाजता गिरीजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाणकाठीसह मानकरी व ग्रामस्थ मिरवणुकीने सुतारटेंब येथे येतील. तिथे ‘हर हर महादेव’च्या जयघोषात फणसाच्या झाडाला पहिली खाप मारली जाईल. त्यानंतर हजारो भाविकांच्या डोळ्यांसमोर देवाच्या मूर्तीला आकार दिला जाईल, जो एक अद्वितीय असा अनुभव असतो.
उत्सवाची जय्यत तयारी: सुतारटेंबवाडीतील रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सांगेली सरपंच लवू भिंगारे व ग्रामपंचायत सदस्य या सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कसई दोडामार्ग येथील श्री देवी सातेरीचा कलश वर्धापनदिन भक्तीमय वातावरणात संपन्न

कसई दोडामार्ग येथील श्री देवी सातेरीचा दहावा वर्धापनदिन

दोडामार्ग दि.२१: कसई दोडामार्ग गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा दहावा कलश वर्धापनदिन शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी शेकडो भाविकांनी श्री देवी सातेरी, श्री देवी केळबाय, श्रदेव सत्यनारायण महापूजा, तसेच इतर देवता यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला तर काही महिलांनी देवीची ओटी भरली. दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.

नवसाला पावणारी श्री देवी सातेरी, देवी केळबाय, या देवतांच्या कलश दहावा वर्धापनदिन शनिवारी पार पडला. या निमित्ताने मंदिरात देवी मूर्ती सजवण्यात आली होती. या अगोदर अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा झाली. यानंतर शेकडो भक्तांच्या उपस्थितीत आरती झाली. दुपारी १.३० वाजता महाप्रसाद आयोजित केला होता. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. दहावा कलश वर्धापनदिन कसई दोडामार्ग गावातील तसेच इतर गावातील भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसाद लाभ घेतला. देवी सातेरी केळबाय देवस्थान उत्सव समिती तसेच ग्रामस्थांनी योग्य नियोजन केले होते. मानकरी ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563