सिंधुदुर्ग दि.२१: महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागतर्फे आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा – २०२६ हा कार्यक्रम २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
२०२५-२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी मोहिम (NCD Portal Screening) अंतर्गत जिल्ह्याने राज्यात सिव्हिल सर्जन तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाला आहे.
इतर मानकरी
ग्रामीण रुग्णालय रँकिंगमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी डॉ. प्रकाश पाटोडेकर यांना पुरस्कार
देवगड तालुक्यातील पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मोहोड व ग्रामीण रुग्णालय देवगड यांना गौरव
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील आशा सेविका समीक्षा संतोष जठार यांना उत्कृष्ट कार्यासाठी राज्यस्तरीय आशा पुरस्कार
आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व समर्पित कामगिरीचा गौरव करणारा हा सोहळा मानाचा समजला जातो. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यस्तरीय प्रतिमा अधिक भक्कम झाली असून जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सिंधुदुर्गनगरी दि.२१: मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भवनात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक आणि समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी आपल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून समाजजागृतीची नवी दिशा मिळाली. सत्य, विवेक आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी पत्रकारिता आजही त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेते. लोकशाही बळकट करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्ण आणि जबाबदार पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव बाळ खडपकर, सदस्य संजय वालावलकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवु महाडेश्वर, संदीप गावडे तसेच दत्तप्रसाद वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी जांभेकर यांच्या कार्याचा आदर्श घेत पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
ऐतिहासिक ‘गिरोबा उत्सव’! १ मार्चला हजारो भाविकांच्या साक्षीने साकारली जाणार मूर्ती; उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल
सावंतवाडी दि.२१: कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरांपैकी एक असलेल्या सांगेली ग्रामदैवत गिरीजानाथाचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अर्थात ‘गिरोबा उत्सव’ येत्या रविवार, १ मार्च रोजी साजरा होत आहे. तब्बल दोन तपानंतर (२२ वर्षांनंतर) हा सोहळा गुरगुट सुतारटेंबवाडीत होत असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्त दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फणसाच्या झाडातून साक्षात गिरोबा!
सांगेलीचे गिरीजानाथ देवस्थान हे राज्यातील एकमेव असे देवस्थान आहे, जिथे दरवर्षी देवाची मूर्ती फणसाच्या झाडाच्या लाकडातून नव्याने साकारली जाते. यावर्षी या उत्सवासाठी सुतारटेंबवाडीतील अरुण शांताराम रेडीज यांच्या घराजवळच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात आली आहे. महाशिवरात्रीपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून, दररोज या वृक्षाची विधिवत पूजा केली जात आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
उत्सवाच्या निमित्ताने २१ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
आज २१ फेब्रुवारी: महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (बुवा प्रसाद आमडोसकर) आणि रात्री धामापूरकर दशावतार.
२२ ते २४ फेब्रुवारी: निरवडेकर दशावतार, भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन आणि खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे प्रयोग.
२५ ते २६ फेब्रुवारी: कुडाळचा फुगडी कार्यक्रम, संतोष धर्णे (कलंबिस्त) व अमित मेस्त्री (ओरोस) यांची भजने.
२७ ते २८ फेब्रुवारी: लहान मुलांचे कार्यक्रम, ‘खेळ पैठणीचा’, शुभम नाईक (गोवा) यांचे भजन आणि गणेश माऊली ग्रुपचे गायन.
१ मार्चला मुख्य सोहळा आणि थरार
उत्सवाचा मुख्य दिवस १ मार्च रोजी असेल. दुपारी ४ वाजता गिरीजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाणकाठीसह मानकरी व ग्रामस्थ मिरवणुकीने सुतारटेंब येथे येतील. तिथे ‘हर हर महादेव’च्या जयघोषात फणसाच्या झाडाला पहिली खाप मारली जाईल. त्यानंतर हजारो भाविकांच्या डोळ्यांसमोर देवाच्या मूर्तीला आकार दिला जाईल, जो एक अद्वितीय असा अनुभव असतो.
उत्सवाची जय्यत तयारी: सुतारटेंबवाडीतील रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सांगेली सरपंच लवू भिंगारे व ग्रामपंचायत सदस्य या सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
कसई दोडामार्ग येथील श्री देवी सातेरीचा दहावा वर्धापनदिन
दोडामार्ग दि.२१: कसई दोडामार्ग गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा दहावा कलश वर्धापनदिन शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी शेकडो भाविकांनी श्री देवी सातेरी, श्री देवी केळबाय, श्रदेव सत्यनारायण महापूजा, तसेच इतर देवता यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला तर काही महिलांनी देवीची ओटी भरली. दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
नवसाला पावणारी श्री देवी सातेरी, देवी केळबाय, या देवतांच्या कलश दहावा वर्धापनदिन शनिवारी पार पडला. या निमित्ताने मंदिरात देवी मूर्ती सजवण्यात आली होती. या अगोदर अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा झाली. यानंतर शेकडो भक्तांच्या उपस्थितीत आरती झाली. दुपारी १.३० वाजता महाप्रसाद आयोजित केला होता. याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. दहावा कलश वर्धापनदिन कसई दोडामार्ग गावातील तसेच इतर गावातील भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसाद लाभ घेतला. देवी सातेरी केळबाय देवस्थान उत्सव समिती तसेच ग्रामस्थांनी योग्य नियोजन केले होते. मानकरी ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अमेरिकेत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आज सावंतवाडीत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींचा पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ठळक मुद्दे:
🔹 पंतप्रधानांचा अपमान: राहुल गांधींनी भारत-अमेरिका करारावरून केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून तीव्र निषेध.
🔹 जोरदार निदर्शने: जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर शिवसैनिकांची राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी.
🔹 नेत्यांची उपस्थिती: जिल्हा प्रमुख संजू परब, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला जिल्हा प्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मैदानात.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२१: महाराष्ट्र शासनाचा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उपक्रम आता आपल्या सिंधुदुर्गात! टप्पा क्र. १ चे सविस्तर वेळापत्रक जाहीर. 📝
✅ या शिबिरात कोणती कामे होणार?
🔹 ७/१२ व फेरफार: चुकांची दुरुस्ती आणि प्रलंबित फेरफार मार्गी लावणे.
🔹 दाखले वितरण: विविध शासकीय दाखल्यांचे जागेवरच वाटप.
🔹 जमीन व रस्ते: अकृषिक (NA) मार्गदर्शन, घरांसाठी पट्टे वाटप आणि पाणंद रस्ते मान्यता.
🔹 योजनांचे लाभ: सामाजिक अर्थसहाय्य आणि ‘ॲग्रीस्टॅक’ सुविधा.
📍 आपल्या मंडळाचे वेळापत्रक तपासा:
🗓️ सावंतवाडी तालुका:
७ मार्च: सावंतवाडी व बांदा मंडळ
१० मार्च: आजगाव व आंबोली मंडळ
१४ मार्च: निरवडे व क्षेत्रफळ मंडळ
१७ मार्च: माडखोल व मडुरा मंडळ
🗓️ वेंगुर्ला तालुका:
७ मार्च: वेतोरे | १० मार्च: म्हापण
१४ मार्च: मातोंड | १७ मार्च: शिरोडा
८ मे: वेंगुर्ला शहर व मंडळ
🗓️ दोडामार्ग तालुका:
७ मार्च: कसई, तळकट, साटेली-भेडशी
१४ मार्च: मणेरी, कुम्ब्रल, आयनोडे
१० एप्रिल: सासोली, पिकुळे | १७ एप्रिल: माटणे, उसप
८ मे: कळणे, खानयाळे | १५ मे: आयी, मांगेली
💡 आवाहन: सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याऐवजी, आपल्या महसूल मंडळाच्या दिवशी शिबिरात उपस्थित राहून तक्रारींचे निराकरण करून घ्या!
🚩 प्रशासकीय मार्गदर्शक: जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व उपविभागीय अधिकारी सावंतवाडी.
📌 हा मेसेज जास्तीत जास्त शेअर्स करा, जेणेकरून प्रत्येक गरजू नागरिक आणि शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल! 🙏
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
रत्नागिरी दि.२१;कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये तिकीट परीक्षक सचिन सावेकर यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाची चोरी झालेली मालमत्ता परत मिळाली आहे.
📌 काय घडले?
पहाटे ४:३० च्या सुमारास गाडी रोहा स्थानकातून सुटली असता, सावेकर यांना S-2 डब्यात दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी वेळ न घालवता प्रवाशांच्या मदतीने दोघांना पकडले.
💰 काय काय जप्त केले?
✅ सोन्याचे मंगळसूत्र व कानातील रिंग
✅ मोबाईल फोन
✅ रोख रक्कम ₹४,७५०
👏 कौतुकास्पद: कोकण रेल्वेचे CMD संतोष कुमार झा यांनी सावेकर यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
⚠️ सावधान: प्रवाशांनी रात्रीच्या वेळी सामानाची काळजी घ्यावी. काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ कळवावे! असे आवाहन करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
वेंगुर्ले दि.२१ : पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे शिवसेना आता अधिक आक्रमक झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शिरोडा, रेडी आणि आरवली विभागाच्या संयुक्त मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडले. शिवसैनिकांच्या अलोट गर्दीने आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन
वेंगुर्ले तालुकाप्रमुख निलेश चमणकर यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघटनेला बळकटी देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्याला खालील मान्यवर उपस्थित होते:
युवासेना: सागर नाणोसकर (उपजिल्हा प्रमुख), रोहित पडवळ (उप तालुका प्रमुख).
तालुका व शहर पदाधिकारी: प्रविण धानजी (ओबीसी प्रमुख), शैलेश परुळेकर (शहर प्रमुख), सुधाकर राणे (जिल्हा समन्वयक), नामदेव राणे (विभाग प्रमुख).
शाखाप्रमुख: राकेश परब (शिरोडा), बाळा पेडणेकर (आरवली).
अल्पसंख्याक सेल: रफिक बेग (तालुका प्रमुख).
महिला आघाडीचा सक्रिय सहभाग
या कार्यक्रमात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. समृद्धी कुडव (उप तालुका प्रमुख), स्नेहा राणे (रेडी महिला उपविभाग प्रमुख), वंदना कांबळी (रेडी शाखा प्रमुख), नंदीनी धानजी (युवती सेना उप जिल्हा अधिकारी) आणि शीतल नाईक (ग्रामपंचायत सदस्य) यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवून महिला शक्तीचे दर्शन घडवले.
कार्यकर्त्यांचा उत्साह
उद्घाटनावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी संतोष कुडव, विनोद कांबळी, अमोल परब, विलास चिपकर, अजित आरोलकर, अशोक नाईक, आबा चिपकर, दाजी गावडे, नारायण गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुका आणि जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने हे कार्यालय आता शिरोडा-रेडी परिसरातील राजकारणाचे मुख्य केंद्र ठरणार आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
मुंबई दि.२१: कोकणचा सण म्हणजे ‘शिमगा’ या उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आनंदाला आता उधाण येणार आहे. दरवर्षी रेल्वेचे बुकिंग आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या कोकणवासीयांसाठी राज्य सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग अशी ‘फेरी बोटीची’ सेवा सुरू होणार असून, अवघ्या ७ तासांत चाकरमान्यांना समुद्राच्या लाटांवरून गावी पोहोचता येणार आहे.
समुद्रमार्गे कोकण गाठणं होणार सोपं!
मंत्री नितेश राणे यांनी या जलवाहतुकीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘एम टू एम’ (M2M) फेरीच्या माध्यमातून १ मार्चपासून ही सेवा सुरू होईल. विशेष म्हणजे, १ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या प्रवासात स्वतः नितेश राणे देखील सहभागी होणार आहेत.
जलवाहतुकीचे वेळापत्रक:
मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग: सकाळी ८:०० वाजता सुटेल (दुपारी ३:०० वाजता पोहोचेल).विजयदुर्ग ते मुंबई (भाऊचा धक्का): दुपारी १२:०० वाजता सुटेल (सायंकाळी ७:०० वाजता पोहोचेल).फेरीच्या तारखा: १, २, ४, ५, ७ आणि ८ मार्च रोजी या फेऱ्या नियोजित आहेत.
रेल्वेच्या १८६ विशेष फेऱ्यांचा ‘बॅकअप’
केवळ जलमार्गच नाही, तर रेल्वे प्रवाशांसाठीही मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. होळी आणि शिमगोत्सवासाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता १८६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात प्रामुख्याने मुंबई-सावंतवाडी, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर या मार्गांचा समावेश आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.एकूण १८६ पैकी ९४ फेऱ्या केवळ ‘होळी स्पेशल’ म्हणून चालवल्या जाणार आहेत.
चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर
दरवर्षी एसटी आणि खाजगी बसच्या अवाच्या सव्वा तिकीट दरामुळे आणि रेल्वेच्या वेटिंग लिस्टमुळे कोकणी माणूस मेटाकुटीला येतो. मात्र, यंदा रस्ते आणि रेल्वे पर्यायासोबतच ‘जलमार्ग’ खुला झाल्यामुळे शिमग्याचा उत्साह द्विगुणीत होणार आहे. समुद्रमार्गे प्रवासाचा हा अनुभव कोकणवासीयांसाठी नक्कीच सुखद आणि वेळ वाचवणारा ठरेल.
——–
तुमच्या माहितीसाठी, M2M Ferries (भाऊचा धक्का ते मांडवा चालवणारी कंपनी) या प्रवासाचे नियोजन करत असली, तरी विजयदुर्ग सारख्या लांबच्या प्रवासासाठी ‘नवल फेरीज’ (Naval Ferries) किंवा ‘माझगाव डॉक’ शी संबंधित यंत्रणांकडून अधिकृत बुकिंग पोर्टल चालवले जाते.
सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार, तुम्ही खालीलप्रमाणे अधिक माहिती मिळवू शकता:१. बुकिंग कसे कराल? (How to Book)या फेरी सेवेचे बुकिंग प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असते.अधिकृत वेबसाइट: तुम्ही M2M Ferries किंवा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या (MMB) अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘Mumbai to Vijaydurg’ हा पर्याय तपासून पाहू शकता.ऑफलाइन: मुंबईतील ‘भाऊचा धक्का’ (M2M Terminal, Ferry Wharf) येथील काउंटरवर जाऊनही तिकीट उपलब्धतेनुसार घेता येईल.२. अंदाजित तिकीट दर (Expected Fare) मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास मोठा (सुमारे ७ तास) असल्याने, याचे दर मांडवा फेरीपेक्षा थोडे जास्त असतील. अंदाजित दर खालीलप्रमाणे असू शकतात:साधारण आसन (Economy): ₹८०० ते ₹१,२०० च्या दरम्यान.बिझनेस क्लास (Business/AC): ₹१,५०० ते ₹२,२०० च्या दरम्यान. (टीप: नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या विशेष फेऱ्यांसाठी दरात सवलत किंवा विशेष बदल असण्याची शक्यता आहे.) ३. प्रवासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:वेळेचे नियोजन: फेरी सकाळी ८:०० वाजता सुटणार असल्याने किमान १ तास आधी (सकाळी ७:०० वाजता) ‘भाऊचा धक्का’ टर्मिनलवर पोहोचणे आवश्यक आहे.ओळखपत्र: बुकिंग करताना आणि प्रवासावेळी आधार कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र सोबत ठेवा.वाहन सुविधा: ही ‘रो-रो’ (Ro-Ro) फेरी असल्यास तुम्ही तुमची कार किंवा दुचाकी देखील नेऊ शकता, मात्र त्यासाठी वेगळे शुल्क आणि आगाऊ बुकिंग आवश्यक असते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
सावंतवाडी दि.२०: भाजपा युवा नेते विशाल परब यांनी दिला शब्द – नाट्यचळवळीला मिळणार भव्य स्वरूप आणि खंबीर पाठबळ. सोशल मीडियाच्या काळातही रंगभूमीची सेवा करणाऱ्या कलाकारांचे केले कौतुक.
सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने:
बाळ पुराणिक (अध्यक्ष, क्षितिज इव्हेंट)
हर्षवर्धन धारणकर (स्व. धारणकर सरांचे सुपुत्र)
लक्ष्मण नाईक (चार्टर्ड अकाउंटंट)
ॲड. संतोष सावंत ( पत्रकार)
ॲड. सिद्धार्थ भांबुरे (नगरसेवक तथा रोटरी क्लब अध्यक्ष)
सौ. दिपाली भालेकर (महिला बालकल्याण सभापती)
तसेच नगरसेविका सौ. निलम नाईक, सौ. सुनिता पेडणेकर, पत्रकार विनायक गांवस, भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, सत्यजीत धारणकर, गुरु चिटणीस यांसह नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कला आणि संस्कृतीचा वारसा जपणारा ‘क्षितिज नाट्यमहोत्सव’! 🎭✨
युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन. स्व. दिनकर धारणकर सरांच्या नाट्यचळवळीला आता मिळणार नव्या मार्केटिंगची जोड आणि भव्य रूप! 🤝🚩
📍 सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंटचा स्तुत्य उपक्रम.
१. “पुढचा क्षितिज नाट्यमहोत्सव अधिक भव्यदिव्य करणार!” – विशाल परब यांचा संकल्प.
२. सावंतवाडीत रंगला बालनाट्याचा आविष्कार; स्व. धारणकर सरांच्या स्मृतींना परब यांनी वाहिली आदरांजली!
३. नाट्यचळवळीला आता ‘ब्रँडिंग’ची जोड; युवा नेते विशाल परब सरसावले मदतीला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563