सावंतवाडी दि.२०:तालुक्यातील मळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गावात शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवरायांना अभिवादन केले.
रेडी येथील ऐतिहासिक यशवंतगडावर प्रज्वलित करण्यात आलेली शिवज्योत पहाटे शिवभक्तांनी धावत आणत मळगावमध्ये मोठ्या उत्साहात पोहोचवली. शिवज्योतीच्या आगमनावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिल्लवाडी गृपकडून शिवरायांच्या पुतळ्यावर सकाळी अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, युवक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. ढोलपथकाच्या गजरात शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले.
यानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांसाठी वकृत्व स्पर्धा, शिवरायांच्या जीवनावर आधारित वेशभूषा स्पर्धा, महिलांसाठी खेळ-स्पर्धा तसेच पारंपरिक पैठणी खेळ यांचा समावेश होता. या कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रात्री पारंपरिक दशावतार नाटक सादर करण्यात आले. या नाटकाद्वारे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करत शिवभक्तांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली.
शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व गावांमध्ये शिवभक्तांनी एकत्र येऊन शिवरायांच्या विचारांचे स्मरण केले आणि त्यांच्या स्वराज्याच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने रयतेचे राजा तथा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर सोबत प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर आनंदने वगी दिपाली भालेकर सुनीता पेडणेकर ऍड सायली दुभाषी,शर्वरी धारगळकर प्रतीक बांदेकर देवेंद्र टेमकर आदी
सावंतवाडी दि.२०: सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर साहेब यांच्या शुभहस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पूजन करण्यात आले. शिवरायांच्या विचारांनी शहराचा विकास करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
📍 प्रमुख उपस्थिती:
✅ अॅड. अनिल निरवडेकर (प्रभारी नगराध्यक्ष)
✅ नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर सोबत प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर आनंदने वगी दिपाली भालेकर सुनीता पेडणेकर ऍड सायली दुभाषी,शर्वरी धारगळकर प्रतीक बांदेकर देवेंद्र टेमकर आदींसह
✅ पालिकेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी.
“शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच लोकहितार्थ कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— अॅड. अनिल निरवडेकर
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती केंद्रांच्या संख्येत वाढ
सिंधुदुर्ग दि.२०: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिपत्याखालील लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदांसाठीची बहुप्रतिक्षित सरळ सेवा भरती परीक्षा आता २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. आय.बी.पी.एस. (IBPS) मार्फत ही प्रक्रिया राबवली जात असून, जिल्ह्याबाहेरील उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता आता परीक्षा केंद्रांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे.
आता १० शहरांमध्ये होणार परीक्षा
बँकेने सुरुवातीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव आणि म्हापसा ही पाच केंद्रे जाहीर केली होती. मात्र, लिपिक पदासाठी एकूण ५०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांची सोय व्हावी आणि परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी आणखी पाच नवीन केंद्रे वाढवण्यात आली आहेत. आता ही परीक्षा खालील १० शहरांमध्ये घेतली जाईल:
कोकण व गोवा: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, म्हापसा, मडगाव, पणजी.इतर शहरे: कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई.
हॉल तिकीट आणि महत्त्वाच्या सूचना
उपलब्धता: परीक्षेचे हॉल तिकीट दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sindhudurgdcc.bank.in उपलब्ध होईल.
संपर्क: उमेदवारांना हॉल तिकीटबाबतचा संदेश त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाईल नंबरवर आय.बी.पी.एस. कडून पाठवण्यात येईल.
वेळ: उमेदवारांनी हॉल तिकीटवरील सूचनांचे वाचन करून, मूळ कागदपत्रांसह रिपोर्टिंग वेळेच्या किमान १५ मिनिटे आधी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
बँकेचे आवाहन: > “निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली ही परीक्षा आता निश्चित तारखेला होत आहे. उमेदवारांनी आपला ई-मेल नियमित तपासावा आणि बँकेच्या संकेतस्थळावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी, दि.२०: – महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर कठोर आणि अजामीनपात्र ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मातर विरोधी कायदा’ येत्या अधिवेशनात तात्काळ संमत करावा यासाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.सर्व आमदार , महाराष्ट्र विधानसभा/विधान परिषद. यांना देण्यासाठी येथील नायब तहसीलदार श्री रवींद्र निपाणीकर यांच्या जवळ निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदुजनजागृती समितीचे कार्यकर्ते असेच धर्मप्रेमी उपस्थित होते.सर्वश्री.जीवन केसरकर, गौरेश सावंत, शंकर निकम, चंद्रकांत बिले, संदेश गावडे,उमाजी चव्हाण, सहदेव राऊळ, चंद्रकांत राऊळ, रवी भिसे, कौस्तुभ राऊळ, मिलिंद सावंत सौ, कालिंदी सावंत,सौ,उषा निकम, सौ,उमा राऊळ,सौ, रेश्मा पाटील,सौ, स्वाती केसरकर सौ,पल्लवी पेडणेकर, सौ,रश्मी कविठकर. आदी उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ या गंभीर समस्यांविरोधात सकल हिंदू समाज, हिंदु जनजागृती समिती आणि विविध महिला संघटनांनी एकत्रित येत प्रचंड जनआक्रोश मोर्चे काढले. या मोर्चामध्ये राज्यातील लाखो माता-भगिनी आणि हिंदू बांधव रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून ‘लव्ह जिहाद’ विरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही दुर्दैवाने या घटना थांबलेल्या नाहीत, उलट त्यांची तीव्रता आणि क्रूरता वाढतच चालली आहे.पालघरची श्रद्धा वालकर, जिचे ३५ तुकडे करण्यात आले; झारखंडची रबिका पहाडन, जिचे ५० तुकडे झाले; आणि नुकतेच कर्नाटकातील हुबळी येथे काँग्रेस नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिची झालेली निघृण हत्या -या घटना केवळ बातम्या नसून, त्या संपूर्ण हिंदू समाजासाठी आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा आहेत.’लव्ह जिहाद’ हे केवळ प्रेमाचे नाटक नसून, ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध (Organized Crime & Demographic War) आहे. यामध्ये हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांचे धर्मांतर करणे, लैंगिक शोषण करणे, दहशतवादासाठी वापरणे आणि विरोध केल्यास त्यांची निघृण हत्या करणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे, जिथे परस्त्रीला मातेसमान मानले जाते. परंतु, आज त्याच महाराष्ट्रात हजारो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ च्या बळी ठरत आहेत. वर्ष २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण या गंभीर विषयावर चर्चा करून कठोर कायदा संमत करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.
या संदर्भात अत्यंत गंभीर वस्तुस्थिती आणि नवीन पुरावे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.यात लव्ह जिहाद’ची सद्यस्थिती आणि भयावह आकडेवारीः(अ) बेपत्ता महिलांची आकडेवारी (NCRB व महाराष्ट्र गृह विभाग): राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अहवालानुसार, २०१९ ते २०२१ या तीन वर्षात महाराष्ट्रातून सुमारे १,७८,४०० महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तसेच, राज्याच्या गृहविभागाने विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या एका वर्षातच महाराष्ट्रातून ३७,६९५ महिला बेपत्ता झाल्या. म्हणजेच दररोज सरासरी १०३ भगिनी बेपत्ता होत आहेत,(आ) मानवी तस्करीचा संशयः जरी सरकार ९०% बेपत्ता महिलांचा शोध लागत असल्याचे सांगत असले, तरी उरलेल्या १०% (म्हणजेच वर्षाला सुमारे ३,७०० मुली) नक्की कुठे जातात? या मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘मानवी तस्करी’ (Human Trafficking) च्या बळी ठरत आहेत का? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे.
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि दहशतवादाशी संबंध : ‘एनआयए’ (NIA) च्या अहवालानुसार, केरळमधील निमिषा (फातिमा) आणि सोनिया (आयशा) यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून घर्मातरित केले गेले आणि नंतर सीरिया-अफगाणिस्तानमध्ये इसिस च्या दहशतवादी कारवायांसाठी पाठवले गेले. महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या मुलींची वेश्याव्यवसायात किंवा आखाती देशांत ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून विक्री होत असल्याचा दाट संशय आहे.
आदिवासी पट्ट्यात ‘लैंड जिहाद’ आणि अस्तित्वाचा प्रश्नः महाराष्ट्रातील पालघर, नंदुरबार, रायगड, अमरावती यांसारख्या आदिवासी पट्टधात जमिनी हडपण्यासाठी आदिवासी मुलींशी विवाह करून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ विवाहाचा नसून ‘अनुसूचित जाती-जमातींच्या (SC/ST) अस्तित्वाचा’ बनला आहे. असाच प्रकार झारखंड व छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
कायदेशीर आणि प्रशासकीय पार्श्वभूमीः(अ) केरळ उच्च न्यायालय (२००९): १५ वर्षापूर्वीच केरळ उच्च न्यायालयातील माहितीतून पुढे आले होते की, ‘लव्ह जिहाद’ ही कल्पना नसून एक संघटित कट आहे. यासाठी आखाती देशांतून पैसा पुरवला जातो. केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. टी. शंकरन यांनी ‘लव्ह जिहाद’द्वारे मुलींचे धर्मांतर होत असल्याचे नमूद केले आहे.(आ) न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समिती (२०१४): महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असताना महिलांवरीलअत्याचार रोखण्यासाठी नेमलेल्या या समितीने, प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलींचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी कायदा करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस गृह खात्याला केली होती.(इ) इतर राज्यांचे कायदेः उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी आधीच कठोर कायदे केले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर आता जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राने यात मागे का राहावे ?
सद्यस्थितीतील नवीन आव्हाने (इग जिहाद आणि ब्लैकमेलिंग): केरळ पोलीस अहवालानुसार, मुलींना आधी ड्रग्ज देऊन त्यांच्यावर बलात्कार करणे आणि नंतर त्याचे व्हिडिओ बनवून त्यांना धर्मांतरासाठी ब्लेकमेल करणे हे प्रकार वाढले आहेत. तसेच, सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सवर खोटी हिंदू नावे धारण करून फसवणूक करण्याचे प्रकार १० पटींनी वाढले आहेत.
आमच्या प्रमुख मागण्या मध्ये कठोर कायदा करा अशी विनंती केली आहे तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांप्रमाणे गुन्हेगाराला जन्मठेप शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा’ महाराष्ट्रात तात्काळ लागू करावा. विशेष तपास पथकः प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ‘लव्ह जिहाद विरोधी विशेष पथक’ स्थापन करावे. अशा प्रकरणांचा निकाल ६ महिन्यांच्या आत लागावा, यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करावीत. बेपत्ता मुलींचा शोधः महाराष्ट्रातून बेपत्ता असलेल्या १,७८,४०० महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी ‘विशेष मोहीम’ (Special Drive) राबवावी आणि त्यातील ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वेगळी नोंद करावीत.
पूर्वपरवानगी बंधनकारकः धर्मातर किंवा आंतरधर्मीय विवाह करण्यापूर्वी किमान ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आणि पोलीस चौकशी होणे बंधनकारक करावे.जर नारी सुरक्षित राहिली, तरच राष्ट्र सुरक्षित राहील. हिंदू समाजाने संयम बाळगून अनेक मोर्चे काढले, निवेदने दिली. आता सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राला ‘लव्ह जिहाद मुक्त’ करावे असे निवेदनात म्हटले आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
“सावंतवाडीत आजपासून क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषदे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दिनकर धारणकर स्मृती *क्षितिज नाट्यमहोत्सवाचा आज शुभारंभ…*
सावंतवाडी दि.२०: नाटयमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारी ला ‘लगोरी’ व ‘देवराई’ अशा दोन बालनाट्यांचे सादरीकरण होणार असून 15 वर्षांखालील मुलांना ही दोन्ही बालनाट्ये विनामूल्य बघता येणार आहेत.
दिनांक 21 फेब्रुवारी ला म्हणजेच दुसऱ्या दिवशी”श्रीरंगा कमलाकांता” सारख्या अजरामर गीतांनी सजलेले “संगीत होनाजी बाळा” या नाटकाचे सादरीकरण तपस्या क्रिएशन या संस्थे मार्फत सादर होणार आहे.
नाटयमहोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 22 फेब्रुवारी ला रणझुंजार, स्वाभिमानी वीरांगनेची गाथा दर्शविणारे “संगीत वीज म्हणाली धरतीला” हे नाटक क्षितीज इव्हेंट या संस्थेमार्फत सादर होणार आहे.
हे नाटक 15 वर्षांखालील मुलांना विनामूल्य बघण्यात येणार आहे.या सर्व नाटकांचा नाटय रसिकांनी जरूर आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
🚨 सावधान! तिलारी कालव्याच्या गळतीमुळे विलवडे येथे मुख्य रस्ता पाण्याखाली🚨
सावंतवाडी दि.२०:तिलारी कालव्याच्या गळतीमुळे विलवडे येथे मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतीचे पाणी आता थेट रस्त्यावर वाहू लागल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
📌 मुख्य समस्या:
✅ रस्ता निसरडा झाल्याने अपघाताची भीती.
✅ कालव्याच्या भिंतीतून पाणी झिरपल्याने शेतीचे नुकसान.
✅ पाण्याचा प्रचंड अपव्यय.
प्रशासनाने एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता तातडीने ही गळती थांबवावी, हीच आमची मागणी! 📢
🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887
सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियानात उतरले. सोबत आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आदी
सावंतवाडीत महास्वच्छता मोहीम आणि ‘पेहेल’ ई-कचरा अभियानाचा प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडे कर यांच्या हस्ते शुभारंभ
सावंतवाडी येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम आणि ‘पेहेल’ ई-कचरा अभियानाचा शुभारंभ करताना प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर सोबत आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, मोहिनी मडगावकर यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वैभवकुमार अंधारे विनोद सावंत देविदास आडारकर दीपक म्हापसेकर सपना नाईक आदीसावंतवाडी येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम आणि ‘पेहेल’ ई-कचरा अभियान आपल्या प्रभागात राबवताना वित्त व नियोजन सभापती आनंद नेवगी सोबत नगरसेविका मोहिनी मडगावकर आणि कर्मचारी महिला बचत गट आदी
सावंतवाडी दि.२०:स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने शहरात ‘महास्वच्छता मोहीम’ आणि ‘पेहेल २०२६’ ई-कचरा संकलन अभियानाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १ मधील बाहेरचा वाडा आणि भटवाडी येथून या मोहिमेला सुरुवात झाली. लोकसहभागातून शहर चकाकणार
यावेळी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करत अॅड. निरवडेकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, २३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी होऊन शहर स्वच्छ व सुंदर बनवावे. या मोहिमेत आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, मोहिनी मडगावकर यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वैभवकुमार अंधारे विनोद सावंत देविदास आडारकर दीपक म्हापसेकर सपना नाईक शितल वाळके संजीवनी शिरसाट मनोज शिरोडकर परवीण शेख शुभम गवळी दिनेश भोसले तुषार सरडे टिळाजी जाधव मनोज राऊळ माधवी म्हापसेकर नेहा आडेकर प्रदीप सावरवाडकर नागेश बिद्रे आदी सह कर्मचारी व सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता., सामाजिक संस्था आणि महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये:
नियोजन: शहरातील अशा ३ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे जिथे सर्वाधिक कचरा आढळतो.
कार्यवाही: रस्ते साफसफाई, झाडीझुडपे काढणे आणि ‘जीव्हीपी पॉइंट’ (कचरा कुंडीमुक्त ठिकाणे) स्वच्छ करण्यावर विशेष भर.
सहभाग: श्रावणी, सखी, ईस्वटी, श्री गुरुदत्त, साई दत्त यांसारख्या महिला बचत गटांसह वि. स. खांडेकर शाळेचे शिक्षक व विद्यार्थी प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.
‘पेहेल २०२६’: ई-कचरा व्यवस्थापनाचा नवा आदर्श
पर्यावरण रक्षणासाठी २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘पेहेल २०२६’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. सावंतवाडी नगरपरिषद, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे.
अभियानाचे खास आकर्षण: संकलित केलेल्या ई-कचऱ्यापैकी जे लॅपटॉप किंवा संगणक दुरुस्त करण्यायोग्य असतील, ते दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळांना शैक्षणिक कामासाठी दिले जाणार आहेत. उर्वरित कचरा ‘MPCB’ च्या अधिकृत रिसायकलिंग केंद्रात पाठवला जाईल. नागरिकांसाठी ११ संकलन केंद्रे:
१) मिलाग्रीस हायस्कूल २) जि. प. शाळा क्र. ४ ३) वि. स. खांडेकर हायस्कूल ४) राणी पार्वतीदेवी हायस्कूल ५) भोसले नॉलेज सिटी ६) उपवनसंरक्षक कार्यालय (सालईवाडा) ७) समाज मंदिर ८) फिश मार्केट ९) घनकचरा प्रक्रिया केंद्र १०) जिमखाना मैदान ११) ज्येष्ठ नागरिक संघ (शिरोडा नाका).
सावंतवाडी येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम आणि ‘पेहेल’ ई-कचरा अभियान आपल्या प्रभागात राबवताना नगरसेविका मोहिनी मडगावकर आणि कर्मचारी महिला बचत गट आदी
पुढील ३ दिवसांचे नियोजन:
२१ फेब्रुवारी: प्रभाग ४ (मदारी पिंपळ) आणि प्रभाग ५ (नरेंद्र डोंगर, भागीरथी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा).
२२ फेब्रुवारी: प्रभाग ६ (कळसुलकर शाळा, दर्पण रेसिडेन्सी), प्रभाग ७ (शिल्प ग्राम) आणि प्रभाग ८ (तहसीलदार कार्यालय, आयटीआय परिसर).
२३ फेब्रुवारी: प्रभाग ९ (मराठा समाज वसतिगृह, पोलीस लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, राजवाडा, मोती तलाव परिसर). “सावंतवाडीला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी सर्व गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यापाऱ्यांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर आणि नगरपरिषद प्रशासन यांनी केले आहे.
सावंतवाडी येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम आणि ‘पेहेल’ ई-कचरा अभियानाची माहिती देताना प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर सोबत आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, मोहिनी मडगावकर यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वैभवकुमार अंधारे विनोद सावंत देविदास आडारकर दीपक म्हापसेकर सपना नाईक आदी
🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887
🚩 सावंतवाडीत 🚩विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न!🚩
सावंतवाडी दि.१९: शहरात आज शौर्याचा आणि भक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण कॉलनी ते गांधी चौक अशी भव्य रॅली काढण्यात आली. भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजरा आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण सावंतवाडी परिसर भगवामय झाला होता! 🧡
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण:
✨ छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन.
✨ हजारो शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग.
✨ गांधी चौक येथे भव्य सभेने रॅलीची सांगता.
प्रमुख उपस्थिती:
युवराज लखमराजे भोंसले, नितीन महाजन (विहिंप), ॲड. अनिल निरवडेकर, कृष्णा धुळपनवर, सुधीर आडीवरेकर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी व शिवभक्त.
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887
🚩 ‘जाणता राजा’ – प्रशासनासाठी आजही आदर्श! पालकमंत्री नितेश राणे आणि आ. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत घुमला शाहिरी बाणा!
सावंतवाडी दि.१९ : “आज आपण हिंदू म्हणून सन्मानाने श्वास घेतोय, याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांनाच जाते,” असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
शिवरायांचे विचार हेच प्रेरणास्थान
पालकमंत्री राणे म्हणाले की, शिवाजी महाराजांची युद्धनीती, प्रशासनशैली आणि रयतेस न्याय देण्याची पद्धत ही आजही आदर्श आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शिवरायांच्या विचारांवर चालत असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा – केसरकर
आमदार केसरकर म्हणाले, “शेतकरी धोरण, पर्यावरण संवर्धन आणि महिलांचा सन्मान जपणारे शिवराय हे खऱ्या अर्थाने जाणते राजे होते. ते आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख प्रेरणास्थान आहेत.”
शाहिरी सादरीकरणाची रंगत
उद्घाटनानंतर लेखक-दिग्दर्शक रूपचंद चव्हाण यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या कार्यक्रमातून पोवाड्यांच्या माध्यमातून शिवचरित्र जिवंत झाले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, युवराज लखमराजे भोंसले, प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, भूसंपादन अधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील तसेच दिग्दर्शक दीपक कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर घारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीधर पाटील यांनी मानले. मोठ्या संख्येने शिवप्रेमी व शासकीय कर्मचारी उपस्थित राहिल्याने सोहळा उत्साहात पार पडला.
🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887
सावंतवाडी दि.१९: तालुक्यातील वेर्ले येथे माजी सैनिकांनी स्वबळावर उभारलेल्या ‘माजी सैनिक भवन’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दोन्ही वास्तूंचे लोकार्पण माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही तेच होते.
व्यासपीठावर सैनिक सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. शौर्याचा सन्मान
माजी सैनिकांनी जिद्दीने उभारलेल्या या भवनाचे कौतुक करत केसरकर म्हणाले, “हे भवन केवळ इमारत नसून येणाऱ्या पिढीसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरेल.” शिवरायांचा आदर्श
शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत असून त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी मानवंदना असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. विकासासाठी कटिबद्धता
मतदारसंघातील विकासकामे आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.
या सोहळ्यास वेर्ले व परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. माजी सैनिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. शेवटी माजी सैनिक संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887