
सिंधुदुर्गनगरी दि.१३: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि स्थानिक प्रवाशांच्या वाढत्या समस्यांकडे रेल्वे प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ मे रोजी कसाल येथे पहिल्या ‘सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. “रेल्वे प्रवाशांच्या हक्काच्या सोयीसुविधांसाठी ही निकराची लढाई असून, जिल्ह्यातील प्रवाशांनी आपली एकजूट दाखवावी,” असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावस्कर आणि जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
प्रवाशांच्या व्यथा आणि मागण्या
पत्रकार परिषदेत माहिती देताना समितीने सांगितले की, मुंबईहून मडगाव-कारवारकडे जाणाऱ्या ८५ पेक्षा अधिक गाड्यांपैकी केवळ ३२ गाड्या सिंधुदुर्गात थांबतात. या गाड्यांमध्येही परप्रांतीय प्रवाशांची मोठी गर्दी असते, ज्यामुळे कोकणी प्रवाशांना अक्षरशः शौचालयाच्या बाजूला किंवा दरवाज्यात बसून प्रवास करावा लागतो.
परिषदेतील प्रमुख मागण्या:
गाड्यांचे थांबे: सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या स्थानकांवर जादा गाड्यांना थांबे मिळावेत.
नवीन गाड्या: वसई ते मडुरे आणि दादर ते सावंतवाडी यांसारख्या नवीन गाड्या सुरू कराव्यात.
क्षमता वाढ: तुतारी (दादर) एक्सप्रेसला जादा डबे जोडण्यात यावेत.
पायाभूत सुविधा: रेल्वेचे दुपदरीकरण जलद गतीने पूर्ण करावे, जेणेकरून प्रवासाचा वेळ वाचेल.
रेल्वे मार्ग: वैभववाडी-कोल्हापूर, सावंतवाडी-बेळगाव आणि किनारपट्टी भागासाठी (नांदगाव-देवगड-मालवण-वेंगुर्ले-सावंतवाडी) नवीन रेल्वे मार्गांची मागणी.
दिग्गजांची उपस्थिती
कसाल येथील साई माऊली बँक्वेट हॉल मध्ये होणाऱ्या या परिषदेला केंद्रीय मंत्री खा. नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
एकजुटीचे आवाहन
आतापर्यंत समितीच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकावर काही गाड्यांना थांबे मिळाले असून सिंधुदुर्ग स्थानकावर पीआरएस तिकीट काउंटर सुरू झाले आहे. मात्र, अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, महिला प्रतिनिधी, बचत गट, रेल्वे प्रवासी संघटना आणि मुंबईकर चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन संघर्ष समितीने केले आहे.
“कोकणी प्रवाशांच्या स्वाभिमानासाठी आणि रेल्वेच्या प्रवासातील हाल सोसण्यासाठी आता शांत बसून चालणार नाही. ही परिषद आपल्या हक्काची व्यासपीठ आहे.”
— प्रकाश पावस्कर (अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती)
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.१३: साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या गडबडीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सावंतवाडीतील कारिवडे येथे घडली आहे. याप्रकरणी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आंबोली दि.१३: “हिंदूंमध्ये एकी नसल्यामुळेच जिहादी मानसिकतेच्या लोकांचे धैर्य वाढते आहे. आता केवळ चर्चा करून चालणार नाही, तर हिंदूंनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. जर आपला धर्म सुरक्षित राहिला, तरच आपण, आपली मुले आणि आपली पुढची पिढी सुरक्षित राहील,” असे परखड प्रतिपादन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी केले.
सावंतवाडी दि.१३: कित्येक वर्षे उलटली, पण इथला प्रश्न सुटलेला नाही! कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थ आणि ‘झिरंग ७ नंबर’ शाळेचे विद्यार्थी आजही एका मोडकळीस आलेल्या सिमेंटच्या खांबांच्या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.📍 भयावह वास्तव: नाल्यावर केवळ ३ सिमेंटचे पोल टाकून बनवलेल्या पुलावरून वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जावे लागते.
सावंतवाडी दि.१३: नव्या दमाच्या गायकांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या २०व्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या आंतर राज्यस्तरीय गायन स्पर्धेचा बिगुल सावंतवाडीत वाजला! बॅ. नाथ पै सभागृहात पार पडलेल्या पहिल्या प्राथमिक फेरीत स्पर्धकांनी आपल्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सावंतवाडी दि.१३: सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत अपघातांची मालिका सुरूच असून, आज सकाळी एका इको कारचा भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महिनाभरात त्याच ठिकाणी दुसरा अपघात घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०७ क्यू ७९०४ क्रमांकाची इको कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव घाटातील एका तीव्र वळणावर हा अपघात घडला. कार कडेला घसरत जाऊन दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे एक इको कार दरीत कोसळली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील तीव्र वळणे, तुटलेले संरक्षक कठडे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची नाराजी अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारावर ताशेरे ओढले. “या ठिकाणी असलेले तुटलेले रेलिंग आणि कठडे तातडीने दुरुस्त करून ते मजबूत करावेत, तसेच पावसाळ्यात निसरड्या होणाऱ्या रस्त्यावर उपाययोजना करावी,” अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने येथे तात्काळ संरक्षक गार्डरेल, वेगमर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी मागणी मळगाववासीयांकडून केली जात आहे.
पुणे/सावंतवाडी दि.१२: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यातून कोकणासाठी हक्काची गाडी देण्यास तांत्रिक अडचणींचे कारण सांगणाऱ्या मध्य रेल्वेने, आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ मंजूर करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.