सावंतवाडी दि.१२: तालुक्यातील आंबोली येथील एका २९ वर्षीय तरुणाने पत्नीच्या विरहातून आणि वादातून आंबोली मुख्य धबधबा परिसरातील खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय २९, रा. आंबोली गावठाणवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी सह्याद्री ॲडव्हेंचर्सच्या मदतीने त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम कुडतरकर याचे पाच वर्षांपूर्वी सांगेली येथील एका युवतीशी लग्न झाले होते. मात्र, राजारामच्या दारूच्या व्यसनामुळे लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्यात वाद होऊन पत्नी माहेरी निघून गेली होती. सध्या या दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, पत्नीचे दुसरे लग्न ठरल्याची माहिती राजारामला मिळाली होती. याच कारणावरून तो सोमवारी (११ मे) तिला भेटण्यासाठी सांगेली येथे गेला होता. मात्र, तिने भेटण्यास नकार दिल्याने तो निराश होऊन आपल्या दुचाकीवरून आंबोलीच्या दिशेने निघाला होता.
असा लागला शोध
सोमवारी रात्री राजाराम घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. मंगळवारी सकाळी आंबोली मुख्य धबधब्यापासून ५०० मीटर अंतरावर त्याची मोटारसायकल उभी असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. मोटारसायकलला चावी तशीच असल्याने संशय बळावला. अखेर सह्याद्री ॲडव्हेंचर्स अँड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने ड्रोन आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोध घेतला असता, मुख्य रस्त्यापासून सुमारे २५० ते ३०० फूट खोल दरीत राजारामचा मृतदेह आढळून आला.
पोलिस तपास सुरू
रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक परिश्रमानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आंबोली पोलीस दूरक्षेत्रात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे आंबोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



आंबोली दि.१२: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबोली गावठणवाडी येथील राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय ३१) या डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणाहून सुमारे १२०० फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी ही घटना उघडकीस आली असून, रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
सिंधुदुर्ग दि.१२: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशातील जनतेला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि सोन्यातील गुंतवणूक थांबवण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणा आणि मंत्र्यांच्या ताफ्यात होणारा इंधनाचा वारेमाप खर्च थांबवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. “पंतप्रधानांच्या आवाहनाला खुद्द सरकारकडूनच हरताळ फासला जात असून, केवळ सामान्य जनतेनेच का होरपळायचे?” असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
देवगड दि.११: दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि पर्यटनाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. हजारो देवगड हापूस आंब्यांची भव्य आरास, स्थानिक शेतकऱ्यांसाठी आयोजित आंबा महोत्सव आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिराचे थेट प्रक्षेपण यामुळे संपूर्ण कुणकेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.
कुडाळ दि.११:“वृक्ष लागवड करून फक्त फोटो काढण्यापुरते मर्यादित न राहता, लावलेले प्रत्येक झाड जगवण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. निसर्गाचे चक्र बिघडल्याने आज हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी केले.
सावंतवाडी दि.११: विदुषी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने सावंतवाडीत सुरांची खास मेजवानी रंगणार आहे. स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या वतीने ‘माणिक मोती’ या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कुरुक्षेत्र (हरियाणा)दि.११: येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सावंतवाडी दि.११ -: शहराच्या सीमेवर असणाऱ्या न.प.च्या कचरा डेपोला आज दुपारच्या वेळी आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट वाहू लागले होते. न.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
सावंतवाडी दि.१०: येथील बॅ. नाथ पै सभागृहात, सम्राट क्लब इंटरनॅशनल (राज्य-१) आणि सम्राट क्लब मये यांच्या वतीने २०व्या ‘सम्राट संगीत सितारा’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
