सावंतवाडी दि.२२: येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोयीसुविधांचा अभाव आणि प्रलंबित समस्यांबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत भोसले यांनी पालिका प्रशासकीय भवनात तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयाचे नूतनीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि डॉक्टरांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी ठोस निर्णयांची घोषणा केली.
पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वय बैठकीत रुग्णालयातील विविध विकासकामांच्या अंदाजपत्रकांवर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.
पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर भर
रुग्णालय परिसरातील वाढलेली झाडे आणि अस्वच्छतेबाबत बांधकाम विभाग व नगरपालिकेने समन्वयातून साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, रुग्णालयाची मागील थकीत देयके भरून, त्यावरील व्याज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतरच नवीन नळ कनेक्शन देण्यात येईल, जेणेकरून भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत राहील.
रुग्णसेवेसाठी नवीन सोयीसुविधा
रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून रुग्णालयात नवीन बाक (बेंचेस) बसवण्यात येणार आहेत. तसेच, पोस्टमार्टम रूमचे नूतनीकरण आणि रुग्णालयाच्या बाहेर पथदिवे बसवण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय, व्हीलचेअरची कमतरता दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या निवासस्थानासाठी विशेष तरतूद
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची सध्याची निवासस्थाने पडझडीच्या अवस्थेत असल्याने, तिथे नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल, असेही सौ. भोसले यांनी स्पष्ट केले.या बैठकीस उपनगराध्यक्ष एड. अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, उपअभियंता अजित पाटील, रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, रुग्णालय कृती समितीचे सदस्य संजय लाड यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि थकीत देयके लवकरच मार्गी लागल्यास सावंतवाडीच्या आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळणार आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज**वेबसाईट* :hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



शिरोडा आरवली दि.२२: कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबा चरणी युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या निमित्ताने आयोजित या भेटीत त्यांनी कोकणातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले.
वाशी नवीमुंबई दि.२२: कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी ‘वास्को-पटना एक्सप्रेस’ आता स्थानिक कोकणी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दर बुधवारी धावणारी ही गाडी वास्को आणि मडगाव स्थानकांवरूनच तुडुंब भरून येत असल्याने सावंतवाडी स्थानकावर प्रवाशांना गाडीत चढणेही अशक्य झाले आहे.
सावंतवाडी दि.२१: माजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महायुतीच्या अधिकृत सरपंचपदाच्या उमेदवार श्रीमती रंजना कानसे यांच्या प्रचार मोहिमेचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
सावंतवाडी दि.२१: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी येथे तातडीने उड्डाणपूल (Flyover) उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कणकवली दि.२१: सरकारी व निमसरकारी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले असून कामकाज ठप्प झाले आहे.
📍 सावंतवाडी (मळगाव घाटी) दि.२१: सावंतवाडी-बेळगाव मार्गावर आज सायंकाळी लग्नावरून परतणाऱ्या शिरसाट कुटुंबीयांच्या कारला मळगाव घाटीत भीषण अपघात झाला. डिके टुरिझम हॉल परिसरात इको कार थेट दरीत कोसळली.
सिंधुदुर्ग दि.२१:माजी केंद्रीय मंत्री आणि ऋषीहुड विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश प्रभू २२ एप्रिलपासून अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. शिक्षण, संशोधन आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेला जागतिक व्यासपीठावर नेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
सिंधुदुर्ग दि.२१: राज्यात आणि जिल्ह्यात महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना मौन बाळगणाऱ्या भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर अचानक आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू लागल्या आहेत, ही बाब लक्षवेधी आहे. त्यांना जर ‘डिलिमिटेशन’चा (मतदारसंघ पुनर्रचना) अर्थ समजत नसेल, तर त्यांनी जरूर एक चर्चा सत्र आयोजित करावे, आम्ही त्यांना ते सविस्तर समजून सांगू, असा टोला सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी लगावला आहे.
सिंधुदुर्ग दि.२०: बदलत्या जीवनशैलीत आपण अनेक पाश्चात्य गोष्टींचा स्वीकार करत असताना, आपल्या पूर्वजांनी दिलेली ‘घोंगडी’ ही अनमोल देणगी मागे पडत चालली आहे. मात्र, शास्त्रांनुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने घोंगडीचे महत्त्व अनन्यसाधारण असून, तिला ‘पवित्र वस्त्र’ मानले जाते. आध्यात्मिक साधना असो वा गंभीर आजारांवरील उपचार, घोंगडी आजही तितकीच प्रभावी ठरत आहे.