
देवगड दि.१८: काकांच्या दिवसकार्याला जात असताना देवगड तालुक्यातील मूळ रामेश्वर कोलवाडी येथील तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) याचा गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई ठाणे रेल्वेस्टेशन येथील अपघातात मृत्यू झाला. रामेश्वर येथील जि. प. च्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा तो मुलगा आहे. तेजसच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच रामेश्वरसह गिर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो सध्या दिवा मुंबई येथे पत्नीसमवेत स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होता. दरम्यान, नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या दिवसकार्याला जाण्यासाठी तेजस हा पत्नीसमवेत गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला रेल्वेत महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरित्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून रेल्वे मार्गस्थ होत असतानाच डब्यात अचानक गर्दी वाढली. या गर्दीचा झटका बसून तो रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तेथील ग – ामस्थांनी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सल्लागार उदय पवार यांचा तो मुलगा होता.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



कणकवली दि.१८: मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा थरारक अपघात घडला. बस वळत असताना वेगात असलेली दुचाकी थेट बसच्या खाली गेली. सुदैवाने, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीवरून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला.
रत्नागिरी दि.१८: काल रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरुणाकडे हक्काचे ‘कन्फर्म तिकीट’ होते, पण गाडीत घुसायला जागाच नव्हती! का? कारण गोव्यातून बिहारला जाणारी ट्रेन उत्तर भारतीयांच्या गर्दीने आधीच खच्च भरून आली होती
कणकवली दि.१८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना स्वतः अवैध धंद्यांवर धाड टाकणार, असा इशाराही त्यांनी दिला.
सावंतवाडी दि.१८: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवासी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधासाठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुलगे, सुना, विवाहित मुली, नातवंडे , पतवंडे असा मोठा परिवार आहे.
सिंधुदुर्गनगरी दि. १८: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फोफावलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट नेतृत्वाखाली महसूल विभागाने जिल्ह्याभरात एकाच वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत १५ वाहने जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
📍 सावंतवाडी (वेर्ले)दि.१७: तालुक्यातील वेर्ले-सटवाडी मार्गावर ‘जलसुविधा’ योजनेच्या नावाखाली पैशांचा अक्षरशः चिखल झाला आहे. ५ लाख रुपये खर्चून बांधलेली मोरी महिनाभरातच खचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.