26.7 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 54

🚩 संजू परबांचा ‘सेनास्टाईल’ हिसका! MNGL च्या मनमानी कारभारावर सावंतवाडीत शिवसेना आक्रमक! 🚩

सावंतवाडी दि.१७:“लोकांना धूळ खायला लावू नका आणि सावंतवाडीकरांच्या संयमाचा अंत पाहू नका!” अशा कडक शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख सजू परब यांनी MNGL च्या अधिकाऱ्यांना झापले.

📍 काय घडलं?

सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईनचे काम सायंकाळच्या गर्दीच्या वेळीही सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. ही माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेतली.🔥अधिकारी निरुत्तर: सायंकाळी गर्दीच्या वेळी काम सुरू ठेवून रस्ता अडवल्याने संजू परब यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना भररस्त्यात फैलावर घेतले.

मुख्याधिकाऱ्यांना जाब: “रात्री काम करण्याची परवानगी दिली आहे का?” असा सवाल करत त्यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना फोन लावून जाब विचारला.

धुळीचे साम्राज्य: काम झाल्यावर रोलर न फिरवल्याने शहरात धूळ उडत आहे, त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी सत्यवान बांदेकर, श्री. सावंत आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकांना त्रास होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. तात्काळ रस्ते व्यवस्थित करा, अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे!” — संजू परब (जिल्हाप्रमुख, शिवसेना)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/ *अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

📍 सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याला बळ! भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून १ लाखांची मदत… 🤝💰

मदतीचा धनादेश प्रदान करताना युवा नेते विनोद राऊळ

सावंतवाडी दि.१७: ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल आता राज्यस्तरावर घेतली जात आहे. संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. रवींद्र चव्हाण यांनी १ लाख रुपयांचा मदत निधी देऊन कौतुकाची थाप दिली आहे. 🌟

ठळक मुद्दे:

🔹 मदतीचा हात: प्रतिष्ठानच्या उपक्रमांसाठी १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द.🔹 हस्ते: नेमळेचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या हस्ते धनादेश प्रदान.🔹 स्वीकार: संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे व उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांनी स्वीकारला निधी.

काय म्हणाले विनोद राऊळ: “सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत पारदर्शक आणि समाजाला दिशा देणारे आहे. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून यापुढेही संस्थेला असेच सहकार्य मिळत राहील,” अशी ग्वाही विनोद राऊळ यांनी यावेळी दिली. 🎤या मोलाच्या सहकार्याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण आणि विनोद राऊळ यांचे मनापासून आभार मानले आहेत. 🙏

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा दणका!१० हजारांची लाच घेताना भूमापक रंगेहात ताब्यात; शहरात खळबळ! 🛑

सावंतवाडी दि.१७: जमीन मोजणीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज मोठी कारवाई केली आहे. सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक ओंकार सुरेंद्र आपटे (वय ३३) याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय? 👇

मागणी: तक्रारदाराने दोन महिन्यांपूर्वी जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी आपटेने २० हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोड: तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले. सापळा: लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. आज सापळा रचून आपटेला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

✅ कलम: भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ नुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

शासकीय कार्यालयातील या धडक कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत!

📢 भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा! जर तुमच्याकडे कोणी लाचेची मागणी करत असेल, तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीत गॅस पाईपलाईनचे काम बंद; नगरसेवक देव्या सुर्याजी आक्रमक

सावंतवाडी दि.१७ : शहरातील रस्त्यांची गेल्या तीन महिन्यांपासून झालेली दुरवस्था आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास यामुळे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोती तलाव परिसरातील गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत जुने काम पूर्ण करून रस्ते सुस्थितीत आणले जात नाहीत, तोपर्यंत नवीन काम करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीला दिला आहे.

तीन महिन्यांपासून रस्त्यांची दुरवस्था
सालईवाडा भागातील रस्ते तीन महिन्यांपूर्वी गॅस पाईपलाईनसाठी खणण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत न केल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन निंबाळकर पीर, कामत नगर, कळसुलकर स्कुल आणि दैवज्ञ मंदिर ते युको बँक या परिसरातील रस्त्यांची पाहणी केली.

नगरसेवकांच्या मागण्या:
रस्ते चुकीच्या पद्धतीने बुजविल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, महिलांचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यावरील मातीचे ढीग तातडीने समांतर करावेत.
मातीने बुजवलेली गटारे पुन्हा सुस्थितीत आणावीत.
रस्ता डांबरीकरण होईपर्यंत धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर नियमित पाणी मारावे.

मुख्याधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
यावेळी नगरसेवक सुर्याजी यांनी मुख्याधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत संताप व्यक्त केला. शहरातील परिस्थिती पाहता, जोपर्यंत खोदून ठेवलेले मार्ग पूर्णपणे दुरुस्त केले जात नाहीत, तोपर्यंत पाईपलाईनचे पुढील काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून, “आधी जुने काम पूर्ण करा, त्यानंतरच पुढील काम सुरू करा,” असे स्पष्ट आदेश दिले.

यावेळी नगरपालिकेकडून खडीकरण व डांबरीकरणासाठीचे पैसे कंपनीकडून जमा करून घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, आता रस्ते दुरुस्तीच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनावेळी मेहर पडते, ॲड. प्रथमेश प्रभू, श्री. सावंत यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ म्हशींचा मृत्यू

कणकवली दि.१७: मुंबई-गोवा महामार्गावर प्राण्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असून, आज जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात एका अज्ञात वाहनाने पाच म्हशींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून २ म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज (१७ एप्रिल) जांभूळवाडी परिसरातून महामार्गावर अचानक म्हशींचा कळप आला. यावेळी महामार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या म्हशींना भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तीन म्हशी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच दगावल्या. अपघातानंतर वाहन चालक थांबण्याऐवजी वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.

वाहतुकीचा खोळंबा आणि स्थानिक मदत
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी असलेल्या दोन म्हशींना बाजूला करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांकडून करण्यात आला.

प्रशासनाकडून उपाययोजनांची मागणी
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर भटक्या आणि पाळीव जनावरांचा वावर वाढल्याने अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत. यामुळे केवळ जनावरांचेच नव्हे, तर वाहनचालकांचेही जीव धोक्यात येत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने आणि स्थानिक प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

शिरोडा येथे ७ कोटींचे ‘अंबरग्रीस’ जप्त; वनविभागाच्या जाळ्यात चौघे जण अडकले

वेंगुर्ले दि.१७: शिरोडा परिसरात दुर्मिळ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींचे मूल्य असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्ल्यू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाने उधळून लावला आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईत सुमारे ९.१२० किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची बाजार किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बनावट ग्राहक बनवून रचला सापळा
शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीस विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल फिरते पथकाचे श्री. सचिन शिडतुरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, विभागीय वनअधिकारी (दक्षता) संजय वाघमोडे आणि सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने स्वतः बनावट ग्राहक बनून संशयितांशी संपर्क साधला आणि सापळा रचला. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास व्यवहार निश्चित झाला असतानाच, वनविभागाने छापा टाकून या टोळीला रंगेहाथ पकडले.
चौघांना अटक; ९ किलो मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी खालील संशयितांना अटक केली आहे: १. रणजित रामचंद्र नायर (वय ४०, रा. परबगाव-शिरोडा) २. गुरुनाथ नाईक (वय ७०, रा. परबगाव-शिरोडा) ३. विभव आडारकर (वय ३५, रा. शिरोडा) ४. निलेश मनोहर पांडजी (वय ३३, रा. रेडी) यांच्या ताब्यातून ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. हे अंबरग्रीस सुमारे ७ कोटी रुपयांना विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ब्ल्यू व्हेल हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ‘अनुसूची १’ मध्ये येत असल्याने, त्याच्या शरीरातील पदार्थांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे.
कारवाईत सहभागी पथक
सदरची धाडसी कारवाई वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे, अमित कटके (दोडामार्ग), वनपाल सावळा कांबळे (मठ), महेश पाटील, वनरक्षक ब्रम्हकुमार भोजने, संग्राम पाटील, अनिकेत माने, रवींद्र पाटील, ऋषीका होले आणि चालक नितीन सावंत यांनी यशस्वी केली.

वनाधिकाऱ्यांचे आवाहन: “अंबरग्रीस किंवा कोणत्याही वन्यप्राण्यांचे अवयव, उपपदार्थ यांची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार आढळल्यास तात्काळ वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,” असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

२९ एप्रिलच्या ‘जनता आरोग्य दरबारा’साठी शनिवारी संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक; पालकमंत्री नितेश राणे यांना निमंत्रित करणार; नियोजन बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी येत्या २९ एप्रिल २०२६ रोजी सावंतवाडी येथे “जनता आरोग्य दरबार” आयोजित करण्यात आला आहे. या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सावंतवाडी तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

भवानी मंदिरात होणार मंथन

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कळसुलकर हायस्कूलमधील भवानी मंदिरात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आरोग्य दरबाराचे स्वरूप, तालुक्यातील संस्थांचा सहभाग आणि प्रत्यक्ष आयोजनाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

पालकमंत्र्यांची उपस्थिती राहणार?

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि सामान्यांचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या ‘जनता आरोग्य दरबारा’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे.

सहभागाचे आवाहन

सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त संस्था आणि मंडळांनी या नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील खालावलेली आरोग्य यंत्रणा आणि सामान्यांची होणारी गैरसोय या पार्श्वभूमीवर आयोजित या ‘आरोग्य दरबारा’कडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  1. “आरोग्य हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे.”— एन.बी. रेडकर व राजू केळुसकर (कृती समिती)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीत गॅस कंपनीचा ‘जुगाड’; ब्रिटिशकालीन लोखंडी जलवाहिनीला ठोकला प्लास्टिकचा जोड!

सावंतवाडी दि.१६: शहरात गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान गॅस कंपनीचा अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. रामेश्वर प्लाझा परिसरात खोदकाम करताना फुटलेली ब्रिटिशकालीन ‘भीडाची’ (लोखंडी) जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कंपनीने चक्क प्लास्टिक पाईपचा वापर करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमका प्रकार काय? गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी रामेश्वर प्लाझा परिसरात खोदाई सुरू असताना पिण्याच्या पाण्याची मुख्य वाहिनी फुटली. ही वाहिनी ब्रिटीशकालीन असून ती अतिशय मजबूत मानली जाते. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही वाहिनी पूर्ववत करताना कोणताही तांत्रिक विचार न करता लोखंडी पाईपला प्लास्टिकचा तुकडा जोडून त्यावर माती लोटण्याचा प्रयत्न केला.

स्थानिकांचा आक्षेप अन् काम रोखले गॅस कंपनीचा हा ‘जुगाड’ स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने यावर आक्षेप घेतला. याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचे अधिकारी वैभव सरडे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत सदर काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

गॅस कंपनीचा अजब तर्क: एककीडे तांत्रिक निकष धाब्यावर बसवल्याचा आरोप होत असताना, गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी अजब सारवासारव केली. “आमचा प्लास्टिक पाईप भीडाच्या पाईपपेक्षा जास्त टिकेल,” असा अजब दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला. मात्र, अशा प्रकारच्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे भविष्यात मोठी पाणी गळती होण्याची आणि रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नगरपरिषदेचा कारभार रडारवर शहरात ५७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेवरून आधीच सत्ताधारी महायुतीमध्ये (भाजप-शिवसेना) आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, या नवीन प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.शहरात खोदाई सुरू असताना नगरपालिकेकडे कोणताही तांत्रिक आराखडा उपलब्ध नाही का?गॅस कंपनीच्या मनमानीवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेची यंत्रणा अपयशी ठरली आहे का?असे सवाल आता सावंतवाडीकर विचारत आहेत.सध्या याठिकाणी काम थांबवण्यात आले असले तरी, गॅस कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण आहे. आता प्रशासन कंपनीवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“ब्रिटिशकालीन पाईपलाईन ही शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा आहे. अशा प्रकारे प्लास्टिकचा जोड देऊन काम दडपणे हे भविष्यात धोक्याचे ठरू शकते. जोपर्यंत योग्य तांत्रिक पद्धतीने दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत काम करू दिले जाणार नाही.”— स्थानिक नागरिक

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

अमेरिका बनली भारताची सर्वात मोठी LPG पुरवठादार!मध्यपूर्व संघर्षाचा भारताच्या गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम; आयात घटली! 📉🔥

नवी दिल्ली दि.१६: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारताच्या स्वयंपाकाच्या गॅसवर (LPG) दिसू लागला आहे. एप्रिल महिन्यात भारताची LPG आयात मोठी घटली असून, ती फेब्रुवारीच्या तुलनेत चक्क निम्म्यावर आली आहे. या कठीण काळात अमेरिका भारताचा सर्वात मोठा आधार आणि पुरवठादार म्हणून पुढे आली आहे.

📊 महत्त्वाचे मुद्दे:आयातीत मोठी घट: फेब्रुवारीमध्ये दररोज ७३,००० टन होणारी आयात एप्रिलमध्ये केवळ ३७,००० टनांवर आली आहे.

देशांतर्गत उत्पादनात घट: देशातील गॅस उत्पादनातही १०% घट झाल्याने पुरवठ्यावर ताण वाढला आहे.अमेरिकेचा वाटा: एप्रिलमध्ये झालेल्या एकूण आयातीपैकी सर्वाधिक २७% (१,४२,००० टन) पुरवठा एकट्या अमेरिकेने केला आहे.

इतर पुरवठादार: यूएई (१.४१ लाख टन), सौदी अरेबिया (९२ हजार टन) आणि कतार (८२ हजार टन) या देशांचा क्रमांक लागतो.

⚠️ का वाढले संकट? १. यूएस-इराण संघर्ष: आखाती देशांतून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत.२. स्पॉट मार्केटची मर्यादा: जागतिक बाजारपेठेत केवळ १०% गॅस उपलब्ध असल्याने जादा पैसे देऊनही पुरवठा मिळवणे कठीण होत आहे.

पुढील काळात आव्हाने कायम: तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील अस्थिरता अशीच राहिली तर भारताला ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी स्रोतांचा विचार करावा लागेल. सध्यातरी अमेरिकेच्या मदतीमुळे पुरवठा साखळी टिकून आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीत आंबा विक्रेत्या महिलांवरील कारवाई थांबवा; स्वतंत्र बाजारपेठ देण्याची विलास जाधव यांची मागणी

विलास जाधव, माजी नगरसेवक,भाजप

सावंतवाडी दि.१६: शहरात ग्रामीण भागातून आंबे विक्रीसाठी येणाऱ्या कष्टकरी महिलांवर नगरपरिषदेकडून होणाऱ्या कारवाईचा मुद्दा आता तापू लागला आहे. माजी नगरसेवक विलास जाधव यांनी या महिलांच्या समर्थनार्थ धाव घेत, त्यांच्यावरील कारवाई तात्काळ थांबवून त्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे केली आहे.

उपजीविकेवर गदा; कारवाई अन्यायकारक

ग्रामीण भागातील अनेक महिला दरवर्षी आंबा हंगामात दोन महिन्यांसाठी शहरात विक्रीसाठी येतात. या हंगामी व्यवसायावरच त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, शहरात हक्काची जागा नसल्याने या महिला मिळेल त्या ठिकाणी बसून व्यवसाय करतात. अशा परिस्थितीत नगरपरिषदेकडून त्यांना हुसकावून लावणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

अवकाळीचे संकट आणि प्रशासनाची भूमिका

यावर्षी आधीच अवकाळी पावसामुळे बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात महिला विक्रेत्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

काय आहे विलास जाधव यांची मागणी?विलास जाधव यांनी या समस्येवर प्रशासनाला पर्याय सुचवला आहे: स्वतंत्र आंबा बाजारपेठ: आठवडा बाजाराच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी.

सन्मानाने व्यवसायाची संधी: यामुळे महिलांना अधिकृतपणे आणि सन्मानाने आपला व्यवसाय करता येईल.प्रशासनाला आवाहन: नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले आणि मुख्याधिकाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.

“कष्टकरी महिलांच्या पोटावर पाय न देता, त्यांना हक्काची जागा देऊन प्रशासनाने दिलासा द्यावा,” असे आवाहन माजी नगरसेवक विलास जाधव यांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563