५० होमगार्डसह ‘रूट मार्च; अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दक्ष
आंबोली,दि.०५: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत आंबोली पोलीस दूरक्षेत्राच्या वतीने आज परिसरात रूट मार्च काढण्यात आला. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. हा रूट मार्च आंबोली पोलीस दूरक्षेत्रापासून सुरू होऊन आंबोली एस.टी. स्टँडपर्यंत काढण्यात आला. यामध्ये ४ पोलीस अंमलदार आणि ५० होमगार्ड अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. मुख्य रस्ता आणि बाजारपेठ परिसरातून हा मार्च निघाल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले गेले.निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांततेत मतदान पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. आगामी काळातही संवेदनशील भागात अशाच प्रकारे गस्त आणि संचलन वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563
तळवडे येथील बाईक रॅली मध्ये सहभागी भाजप जि.प.उमेदवार संदीप गावडे सोबत कार्यकर्ते ग्रामस्थ
सावंतवाडी दि.०५: तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केल. यावेळी त्यांनी आपल्या विजयासह पंचायत समिती सभापती देखील शिवसेनेच्या सुस्मिता जाधव होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीकडून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार गावडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जनतेची साथ विकासाला असून आमचा विजय निश्चित आहे. तसेच हा पंचायत समिती मतदारसंघ सभापती ठरवणार असून महायुतीच्या सभापती विराजमान होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी सभापती पंकज पेडणेकर, शिवसेनेचे सूरज परब, जालिंदर परब आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887
शेवटच्या दिवशी प्रचारात आघाडी: एकतर्फी विजय होणार, कार्यकर्त्यांना विश्वास..
सावंतवाडी दि.०५-: आरोंदा मतदारसंघात सुधा कवठणकर यांनी निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी थेट संवाद साधला. विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून मतदानाच्या रूपाने मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
आरोंदा मतदारसंघात सध्या चुरशीची लढत पाहायला मिळत असली तरी सुधा कवठणकर हे आघाडीवर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “आमचं मत विकासासाठी असून सुधा कवठणकर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,” अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली.नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कवठणकर यांची ताकद अधिकच वाढत असून ते विरोधकांना मोठ्या फरकाने मात देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदारसंघात त्यांच्या विजयाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563
छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत सिंधुदुर्गच्या पतसंस्थांबाबत चर्चा करताना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे सोबत सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ सोबत चेअरमन बाबुराव कविटकर,मेघश्याम चांडक आदी
सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि सैनिक नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर यांची उपस्थिती
सावंतवाडी दि.०५: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच ५० कोटींहून अधिक ठेवी असलेल्या पतसंस्थांची राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि सैनिक नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील पतसंस्थांच्या विविध समस्यांकडे राज्य फेडरेशनचे लक्ष वेधले.
*पतसंस्थांच्या समस्यांवर ‘काका कोयटे’ यांच्याशी सविस्तर चर्चा*
या दौऱ्यात श्री. सुनील राऊळ यांनी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काका कोयटे यांची विशेष भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पतसंस्थांना भेडसवणारे कर्जविषयक प्रश्न, ठेवींसाठी विमा संरक्षण, आदर्श उपविधीतील तांत्रिक बाबी, अंशदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी काका कोयटे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली की, महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीवर त्यांची निवड झाली आहे. पतसंस्थांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी आपण या कायद्यात अनेक क्रांतिकारक बदल सुचवणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासित केले.
*AI तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर भर*
कार्यशाळेत देशभरातील खासगी कंपन्यांनी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या आधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. पतसंस्थांच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी एआय तंत्रज्ञान कसे प्रभावी ठरेल, यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटीचे चेअरमन श्री. मेघश्याम चांडक आणि राज्य फेडरेशनचे संचालक श्री. भालेराव यांच्यासोबतही राऊळ यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
*सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशनाचे आमंत्रण* येत्या २३ व २४ मे २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन’ आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण सुनील राऊळ यांनी काका कोयटे यांना दिले.
या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून पतसंस्थांचे चेअरमन आणि सीईओ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक श्री. महेश्वर कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887
सावंतवाडी येथील टी जे एस बी बँकेमध्ये वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजे समवेत शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन कुलकर्णी सोबत शाखा व्यवस्थापक आणि शाखेतील कर्मचारी अधिकारी वर्ग
सावंतवाडी शाखेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन
सावंतवाडी दि.०५: ‘भरोशाची बँक, भविष्याची बँक’ अशी ओळख असलेल्या टीजेएसबी (TJSB) सहकारी बँकेचा ५४ वा वर्धापन दिन गुरुवारी, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी शाखेमध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती
या मंगलप्रसंगी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी शाखेला सदिच्छा भेट देऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. शाखेच्या वतीने शाखाधिकारी सुनील परब आणि वरिष्ठ व्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री सत्यनारायण पूजेचा मान सौ शिल्पा नाईक उभयतांना मिळाला. यावेळी नागेश कांबळे नरेंद्र परब विद्या राऊळ तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होता
यावेळी शहरांतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बँकेला भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने:
अन्नपूर्णा कोरगावकर (माजी उपनगराध्यक्ष)
अॅड. सुभाष पणदूरकर (माजी अध्यक्ष, सावंतवाडी अर्बन बँक),लक्ष्मण आरोसकर (शाखाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक),बबन साळगावकर (माजी नगराध्यक्ष),सीए लक्ष्मण नाईक, देव्या सूर्याजी (नगरसेवक), अॅड. अभिजीत पणदूरकर, डॉ. काजरेकर,याशिवाय सीमा मठकर, मिलिंद मठकर, व्यापारी मुंज लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अधिकारी आणि कर्मचारी स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ठेवीदार व कर्जदार उपस्थित होते. बँकेची प्रगती आणि परंपरा
बँकेचे अध्यक्ष श्री. शरद गांगल, उपाध्यक्ष श्री. वैभव सिंगवी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांनी आणि ग्राहकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. उभाबाजार येथील विठ्ठल मंदिराजवळील बँकेच्या आवारात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
५४ वर्षांची अखंड परंपरा, विश्वासाची आणि प्रगतीची! 🏦✨
आज टीजेएसबी बँकेच्या सावंतवाडी शाखेत ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमयी सोहळ्याला लाभलेली मान्यवरांची उपस्थिती आणि ग्राहकांचे प्रेम यामुळे हा दिवस अधिकच खास ठरला.
सावंतवाडी प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी दिल्या अपक्ष उमेदवार रमेश निर्गुण यांना शुभेच्छा
अष्टविनायक धाऊसकर यांना पाठिंबा!
सावंतवाडी दि.०५: न्हावेली पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना, अपक्ष उमेदवार रमेश निर्गुण यांनी आपली उमेदवारी मागे घेत भाजपचे अधिकृत उमेदवार अष्टविनायक धाऊसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे न्हावेली परिसरात भाजपची ताकद प्रचंड वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.
पक्षहितासाठी घेतला निर्णय
उमेदवारी मागे घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना रमेश निर्गुण म्हणाले की, “मी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होतो, मात्र तांत्रिक कारणांमुळे ती मिळू शकली नाही. तरीही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या शब्दाचा मान राखून मी माघार घेत आहे. माझ्यासाठी वैयक्तिक पदापेक्षा पक्षाचे हित आणि भागाचा विकास महत्त्वाचा आहे.”
भाजप ही कार्यकर्त्यांची संघटना – अनिल निरवडेकर
या घडामोडीचे स्वागत करताना सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्याला मोठे करणारा पक्ष आहे. निर्गुण यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, नारायण राणे, रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपचा विजय आता अधिक सुकर झाला आहे.”
*आमची शक्ती आता दुप्पट -* अष्टविनायक धाऊसकर
भाजप उमेदवार अष्टविनायक धाऊसकर यांनी निर्गुण यांचे आभार मानले. ते म्हणाले की, “सरपंच म्हणून काम करताना मी नेहमी विकासाला प्राधान्य दिले. आता निर्गुण यांच्या पाठिंब्यामुळे आमची शक्ती दुप्पट झाली आहे.” यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “विरोधक सध्या गोंधळलेले आहेत, त्यांनी आपली नेमकी भूमिका आधी स्पष्ट करावी,” असा टोलाही त्यांनी लगावला.
*विकासाच्या प्रवाहात कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश*
या राजकीय घडामोडींदरम्यान, न्हावेलीतील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गावाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या सभेला भाजपचे अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.०५: तालुक्यातील तळवडे मतदारसंघाला विकासात एक नंबरवर नेण्याचा निर्धार मी केला असून, आतापर्यंत हाती घेतलेली प्रत्येक विकासकामे पूर्णत्वास नेणारच, असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला.
विकास, प्रगती आणि तळवडे मतदारसंघाची सर्वांगीण उभारणी हेच माझे स्पष्ट व्हिजन असल्याने जनतेचा भरभरून पाठिंबा मला मिळत आहे. त्यामुळेच माझे विरोधक केवळ एकाच मुद्द्यावर अडकून वारंवार मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.आणि प्रत्यक्षात माझाच विजय अधिक सोपा करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे भक्कम आशीर्वाद माझ्या पाठीशी असून, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वासही गावडे यांनी व्यक्त केला.
महायुतीचाच गुलाल उधळू
दरम्यान, यावेळी बोलताना सूरज परब म्हणाले,“महायुती आज अभेद्य आहे. कितीही डावपेच आखले तरी येथे महायुतीचेच सर्व उमेदवार विजयी होणार. ९ फेब्रुवारीला गुलाल आम्हीच उधळणार!”
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887
रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी प्रस्तुत धम्माल दोन अंकी विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा” चे आयोजन
मळेवाड येथील पतितपावन मंदीर व पाषाणी मूर्ती
सावंतवाडी,दि.०५: श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मळेवाड येथील पतित पावन भक्ती मंदिर ,श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यानिमित्त सकाळी ६:३० वा. ते ९: ०० वा. पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक,महाराजांची महापूजा, स.९:३० ते १२:०० वा.राम हृदय स्तोत्र अनुष्ठान,सकाळी ८:०० वाजता श्रीं ची महापूजा, सकाळी १०:०० वाजता श्री. ह. भ. प.श्री.गोरे बुवा ,तुळस यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी १२:०० वाजता महानैवेद्य ,दुपारी १२:३० वाजता आरती, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद,झुणका भाकर प्रसादाचे वाटप, दुपारी २:०० वा.पासून गायन, सांस्कृतिक कार्यक्रम,महिला भजन , त्यानंतर “संगीत स्वर रजनी” गायक रुपेंद्र परब आणि साथीदार , सायंकाळी ५:०० ते ६:३० वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ, सरमळे बुवा संजय गावडे यांचा भजनाचा कार्यक्रम. रा.७:०० वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा , रा.८:३० वाजता महाआरती.त्यानंतर रा.९:३० वाजता लेखक वैभव परब , रुपेश कवठणकर दिग्दर्शित ” रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी” प्रस्तुत धम्माल दोन अंकी विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा” चे आयोजन करण्यात आले आहे.या प्रकट दिन सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पतित पावन भक्ती मंदिर,श्री गजानन महाराज सेवा मंडळ, मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
माजगाव येथे बोलताना मंत्री नितेश राणे सोबत आम दीपक केसरकर, विक्रांत सावंत आदी.
मंत्री नितेश राणे यांचे माजगावमध्ये आवाहन
सावंतवाडी दि.४ : “विक्रांत सावंत हे बिनविरोध निवडून येणार होते, मात्र आमच्याच काही लोकांनी काड्या घातल्यामुळे या ठिकाणी निवडणूक लागली. असे असले तरी विक्रांत सावंत यांचा विजय आता निश्चित आहे. त्यांना केवळ घासून नाही, तर ठासून निवडून आणा,” असे रोखठोक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी आज माजगाव येथे केले.
जिल्हा परिषदेचे भाजपचे अधिकृत उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांच्या प्रचारासाठी माजगाव येथील पोपकर हॉलमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितेश राणे बोलत होते.
विरोधकांवर आणि स्वकीयांवर निशाणा: नितेश राणे म्हणाले की, विक्रांत सावंत यांची लोकप्रियता पाहता ते बिनविरोध निवडून येणे अपेक्षित होते. मात्र, पक्षांतर्गत काही लोकांनी अडथळे निर्माण केल्यामुळे निवडणूक लागली. यावर सध्या सावंत काही बोलणार नाहीत, पण निवडणुकीनंतर मी स्वतः यावर भाष्य करेन, असा इशाराही त्यांनी दिला. विकासाची जबाबदारी माझी: “मी विक्रांतचा मोठा भाऊ म्हणून सत्तेत बसलो आहे. ते जे काही विकासाचे काम सुचवतील, ते मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आहे,” असा शब्द राणे यांनी माजगाववासीयांना दिला.
विजयाचा विश्वास: सभेतील अलोट गर्दी पाहून राणे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, विक्रांत सावंत यांचा विजय ही केवळ औपचारिकता उरली आहे. “मी तर थेट जल्लोषालाच येणार होतो, पण विक्रांतच्या प्रेमापोटी या सभेला आलो आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या सभेला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गुंडू जाधव, गुणाजी गावडे, मधू देसाई यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
/——–/——-/—–/
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com
हे देवा उपरलकरा, तुज्या भक्तांक सुख राखून संभाळ कर !
सावंतवाडी दि.०५: आज गुरुवार दि. 05/02 /2026 रोजी श्री देव उपरलकर देवस्थान सावंतवाडी देवाचा वाढदिवस व त्यानिमित्त तीर्थप्रसाद व दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे या धार्मिक कार्यक्रमाचे सौजन्य सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर हे असून त्यांच्या हस्ते पूजाअर्चा कार्यक्रम होणार आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी नाईक शितप यांनी केले आहे.👏
🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com