*जाहीर आवाहन !*
सिंधुदुर्ग दि.०३: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व ऑपरेशन स्माईल व यांच्या संयुक्त विद्यमाने केएलई रुग्णालय बेळगाव येथे मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
*जन्मतः फाटलेले ओठ व टाळू*
_(वयोमर्यात ६ महिने ते पुढील सर्व)_
*मोफत शस्त्रक्रिया*
____________________________
*शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर*
*मंगळवार दिनांक- १० मार्च २०२६*
*स्थळ – कणकवली*
*वेळ – सकाळी १०*
___________________________
*निवडलेले लाभार्थी यांना १३ मार्च ते २० मार्च २०२६ ला केएलई बेळगाव येथे शस्त्रक्रियेकरिता नेण्यात येईल*
_(मोफत वास्तव्य, भोजन व प्रवास, एक ते दोन नातेवाईकांसह )_
___________________________
*_अधिक माहिती व नोंदणी संपर्क-_* 9404740490 / 9421235586, 9403636454
———————————– शिल्पा खोत- 9309103330 हिराचंद तानावडे 9423303611
राजेश पडवळ 7057544643
मकरंद सावंत 9420306048
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



*जाहीर आवाहन !*
पुणे/मुंबई दि.०३: अवकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि विलोभनीय खगोलीय घटना आज, ३ मार्च २०२६ रोजी घडणार आहे. आज होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान आपल्याला ‘ब्लड मून’ (Blood Moon) पाहायला मिळणार आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा रंग तांबूस-लाल होतो, ज्याला शास्त्रज्ञ ‘ब्लड मून’ म्हणतात.
सावंतवाडी दि.०३: तालुक्यातील माजगाव येथील धोकादायक वळणावर काल रात्री एकच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोलगाव येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर चारचाकी चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील स्काऊट-गाईड शिबिरात उल्लेखनीय कामगिरी

दोडामार्ग (कोनशी) दि.०२: मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अभिमान वाटावा असा हा दिवस… मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. तसेच मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यी व समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे, मराठी भाषेचे संरक्षण, संवर्धन व विकास व्हावा हेतूने कोनशी शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे जीवनचरित्र व त्यांची वाङ्मय आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविली. मुख्याध्यापक श्री सुरेश जाधव, डॉ. राजेंद्र चव्हाण, श्री बाबुराव पास्ते आणि श्रीम स्वाती देसाई यांनी कवी कुमाग्रजांच्या जीवनकार्य व साहित्याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यानी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितांचे वाचन करण्यात आले. वेदांत बर्वे याने सूत्र संचालन केले तर यश सावंत याने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.
सावंतवाडीत ‘डास निर्मूलन’ मोहीम युद्धपातळीवर सुरू
प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांचा’ऑन द स्पॉट’ निर्णय!
मुंबई दि.०१: ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा वसा जपत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्याने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मूळचे वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील आणि सध्या बोरिवली (मुंबई) येथे स्थायिक असलेले श्री. दीपक कुडतरकर यांनी आज एका महिला रुग्णासाठी तातडीने रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडवले.