20 C
New York
Monday, September 21, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 91

माजी आमदार वैभव नाईकांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन

माजी आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन

सिंधुदुर्ग दि.१९: मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगव्या शाली,भगवे झेंडे, भगवे फेटे, परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज कि जय! जय भवानी,जय शिवाजी! चा जयघोष करीत, लेझीम नृत्य आणि ढोल ताशाच्या गजरात किल्ल्यावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी छत्रपतींच्या मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व जिल्हावासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिर असून शिवसेनेच्या वतीने दरवर्षी याठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या मंदिराचे नूतनीकरण व मंदिरात आकर्षक असे दगडात कोरलेले सिंहासन उभारण्यात आले आहे. शिवराजेश्वर मंदिरात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. याप्रसंगी पुजारी श्री. सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, प्रा. मंदार सावंत, नितीन राऊळ, किल्ला रहिवाशी मंगेश सावंत, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, तळगाव सरपंच लता खोत,रेवंडी सरपंच अमोल वस्त, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत,नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, अमित भोगले, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, राहुल सावंत,उदय दुखंडे, सचिन रेडकर,संजना रेडकर,कृष्णा आंगणे,दिनेश चव्हाण, गौरी मयेकर, राधिका मोंडकर, माधुरी प्रभू, मनोज मोंडकर,हेमंत मोंडकर,उमेश मांजरेकर, महेश शिरपुटे, निलेश दुधवडकर, साक्षी कोंडरकर, राजू मेस्त्री, भावेश कांबळी, संजय कांबळी,सिद्धेश मांजरेकर, राजू नार्वेकर, महेश शिरपुटे, रूपा कुडाळकर, बाप्पा वायंगणकर, किशोर गावकर,चिंतामणी मयेकर,गजा नेवाळकर,प्रत्यूश भोगले, संतोष अमरे,सोनाली डिचवलकर,बबन वाघ,निलेश केळुसकर,आबा केळुसकर,रवी तळाशिलकर,स्वप्नील आचरेकर, समीर लाड, गजा नेवाळकर,राका रोगे,राहुल जाधव, कल्पेश रोगे, नारायण कुबल, सुनील माळकर,सुधाकर वायंगणकर, चंद्रकांत घाडीगावकर, विलास तांडेल अमृता मयेकर, विजया तांडेल, संतोष सावंत,बबन दुखंडे,बाबल पडवळ,सुरज आचरेकर,दिनेश कांबळी,मेघना कांबळी, अनिरुद्ध पोयरेकर,प्रशांत कांबळी, गणेश घोगळे,संतोष कांबळी,शौर्या कांबळी, दत्ता पोईपकर,अरुण परब आदींसह किल्ला रहिवाशी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

गोव्यात रंगणार पहिले ‘जनवादी’ कविता संमेलन;

‘जनवादी’ कविता संमेलन फेब्रुवारीला पणजी येथे आयोजन

​पणजी दि.१९: ‘जनवादी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र-गोवा’ यांच्या वतीने येत्या रविवार, २२ फेब्रुवारी रोजी गोव्याची राजधानी पणजी येथे पहिल्या ‘जनवादी कविता संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. साहित्यातील गांभीर्य आणि कवितेचा सामाजिक आशय अधोरेखित करण्यासाठी हे संमेलन पाटो येथील ‘संस्कृती भवन’ (कला आणि संस्कृती संचालनालय) येथे पार पडणार आहे.
​संमेलनाचे स्वरूप आणि सत्रे
​दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात विविध पाच सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९:३० वाजता उद्घाटन सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
​चर्चासत्र: दुसऱ्या सत्रात ‘कविता समजून घेताना’ या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा होईल. यामध्ये अभिजनवादी, मार्क्सवादी, फुले-आंबेडकरी आणि स्त्रीवादी अशा विविध काव्यप्रवाहांवर डॉ. नीता तोरणे, राहुल पुंगलिया, डॉ. दिलीप चव्हाण आणि वंदना महाजन आपले विचार मांडतील.
​काव्यवाचन: दुपारच्या सत्रात संतोष पद्माकर पवार, वीरधवल परब यांच्यासह अनेक नामवंत कवींच्या कवितांचे सादरीकरण होईल.
​मुख्य कविसंमेलन: सायंकाळी ३:४५ वाजता प्रा. गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कविसंमेलन रंगणार आहे, ज्याचे सूत्रसंचालन रूपाली कदम करतील. यात महाराष्ट्रातील आणि गोव्यातील अनेक दिग्गज कवी सहभागी होणार आहेत.
​प्रमुख उपस्थिती
​या संमेलनासाठी स्वागतार्थाध्यक्ष म्हणून मिलिंद माटे, तर प्रास्ताविक जनवादी सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष संपत देसाई करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. समारोप सत्रात डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर) आणि श्रीधर चैतन्य मार्गदर्शन करतील.
​कवितेकडे केवळ करमणूक म्हणून न पाहता, ती मानवी जीवनाचा आणि संघर्षाचा आरसा कशी आहे, हे जनमानसापर्यंत पोहोचवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. तरी सर्व कविताप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन अंकुश कदम, मधुकर मातोंडकर आणि डॉ. महेश पेडणेकर यांनी केले आहे.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडीत ‘राजा शिवाजी चौक मित्र मंडळा’तर्फे शिवजयंती उत्साहात संपन्न

सावंतवाडी प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी दि.१९: शहरातील गवळी तिठा येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. या परिसरातील शिवजन्मोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

साखर वाटून केली तोंडं गोड
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंडळाचे सल्लागार तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित शिवप्रेमींना आणि नागरिकांना साखर वाटून सर्वांची तोंडं गोड केली. शिवरायांच्या विचारांचा गोडवा जनमानसात जावा, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून शिवरायांना अभिवादन केले.

यामध्ये प्रामुख्याने: प्रमुख उपस्थिती: सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे. पत्रकार राजन तावडे, दीपक सावंत, नगरसेविका दिपाली भालेकर.सामाजिक कार्यकर्ते: नारायण सावंत, बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अशोक पेडणेकर हे होते.

कार्यकर्त्यांचा उत्साह
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, मंतेश पडते, सत्यम सावंत, सुरेश ठाकूर, चिनू खानोलकर, प्रदीप नाईक, महादेव राऊळ, संजय साळगावकर, सोन्या कासार, शुभम मळकाचे, मनोज घाटकर, संदीप नाईक, राजेंद्र सांगेलकर, मनोज राऊळ, सचिन तेली आणि रवी जाधव यांसह मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.सावंतवाडीत राजा शिवाजी चौक परिसरात झालेल्या या उत्सवामुळे संपूर्ण शहरात शिवसेवेचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

 

सावंतवाडीत शिवजयंतीनिमित्त ठाकरे शिवसैनिकांचा सत्कार;

सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या धाडसी उमेदवारांचा सन्मान‌ व गौरव

शिवजयंतीनिमित्त ठाकरे शिवसैनिकांचा धैर्याने निवडणूक लढवणाऱ्यांचा गौरव

सावंतवाडी दि.१९: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता, पैसा आणि बळाचा वापर होत असतानाही ताठ मानेने जनतेसमोर उभे राहिलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा शिवजयंतीनिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. पक्षाच्या सावंतवाडी मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विजयी तसेच पराभूत उमेदवारांचा भगवी शाल देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली, तर रुपेश राऊळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
या वेळी तालुकाप्रमुख रमेश सावंत, राजू शेटकर, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, महिला संघटक नम्रता झारापकर, तसेच शब्बीर मणियार, अशोक धुरी, विनोद काजरेकर, दादु सावंत, फिलिप्स रॉड्रिक्स यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत विजयी ठरलेले देवेंद्र टेमकर आणि पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांचा विशेष सत्कार झाला. तसेच पराभव स्वीकारूनही धैर्याने निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये निशिकांत तोरस्कर, राजा वाडकर, प्रशांत बुगडे, रुपेश गावडे आदींचाही गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना रुपेश राऊळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न त्यांच्या विचारांतून प्रेरित होऊनच शिवसेनेने पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवरायांचे आदर्श घेऊन शिवसेनेची स्थापना केली, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तेच विचार पुढे नेले जात आहेत.”
कार्यक्रमाच्या शेवटी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. आयोजकांच्या मते, प्रचंड दबावातही निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या धैर्याचा गौरव करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडीत आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंतीचा उत्साह;

सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करताना जिल्हाप्रमुख संजू परब सोबत ॲड नीता सावंत कविटकर अशोक दळवी शर्वरी धारगळकर सीमा नाईक ऍड सायली दुभाषी बाबू कुडतरकर गुरु मठकर आदी

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालय ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला

सावंतवाडी दि.१९: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपाळांच्या जयघोषाने आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
महाराजांचे विचार लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी: संजू परब
या सोहळ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की:
“छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे कार्यकर्तृत्व आणि स्वराज्य निर्मितीचा इतिहास आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊनच आपण सर्वांनी जनसेवेचे आणि लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केले पाहिजे.”
असा झाला सोहळा
प्रारंभ: कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
उत्साह: यावेळी उपस्थित लहान मुलांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणा दिल्या, ज्यामुळे सावंतवाडी शहर परिसर दणाणून गेला.
प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमाला महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, ॲड. सायली दुभाषी, नगरसेवक बाबू कुडतरकर आणि नवनिर्वाचित सभापती सुष्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर आणि शिवप्रेमी
या मंगलप्रसंगी माजी नगरसेवक गुरु मठकर, सुप्रिया धारगळकर, पूजा नाईक, भारती परब, शिवानी पाटकर, सिद्धी निंबाळकर, राजश्री निर्गुण, शितल नाईक, प्रतीक्षा मिशाळ, अनघा सावंत, हर्षद जाधव, गुंडू जाधव, विश्वास घाग, राजन रेडकर, सुनील नाईक, राजन परब, संदेश सोनुर्लेकर, विजय देसाई, महादेव राऊळ, वैशाली कानसे, शिल्पा मेस्त्री आणि विनायक महाडेश्वर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडीत शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व जल्लोष;

सावंतवाडी शहरात स्वराज्य संघटनेतर्फे आयोजित शिवचेतना रॅलीचे उद्घाटन करताना भाजप युवा नेते विशाल परब,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले व अन्य तर निघालेली शिवचेतना रॅली,नूपूर मठकर हिचा स्वराज्य संघटनेतर्फे सत्कार करतांना

सावंतवाडीत ‘स्वराज्य शिवचेतना’ रॅलीने शहर दणाणले

सावंतवाडी दि.१९ : “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “जय भवानी जय शिवाजी”च्या घोषणांनी शहर दुमदुमले आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी झाली. स्वराज्य संघटनेतर्फे आयोजित १४ वी भव्य ‘शिव चेतना रॅली’ शहरातून दिमाखात निघाली. या सोहळ्यास विशाल परब (युवा नेते, भारतीय जनता पक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग. डिजे, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यामुळे वातावरण ऐतिहासिक रंगात रंगले. दुचाकी व पायी निघालेली रॅली सबनीसवाडा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तीन मुशी, मोती तलाव काठ, बाजारपेठ, जयप्रकाश चौक, गांधी चौक, उभा बाजार, चितारआळी मार्गे गवळी तिठा ते जिमखाना येथे समारोपाला पोहोचली.
लहान बालकलाकारांनी साकारलेली शिवरायांची वेशभूषा आणि घोड्यावरून सहभागी झालेल्या कलाकारांनी विशेष लक्ष वेधले. महिला-युवती व युवकांनीही पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित तरुण हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला लखमराजे भोसले (उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा), सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, प्रतीक बांदेकर तसेच महिला पदाधिकारी सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते. विविध महिला मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
वेशभूषा स्पर्धा आकर्षण
रॅलीदरम्यान १३ वर्षांखालील मुलांसाठी वेशभूषा सादरीकरण तर १३ वर्षांवरील गटासाठी स्पर्धा घेण्यात आली.यात मोठ्या गटातील महिला स्पर्धकांचाही सहभाग होता.पारंपरिक सादरीकरणांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
शहरातील संस्थानकालीन राजवाडा इस्टर गेट समोर रॅलीचे उद्घाटन झाले. एकूणच, शिवभक्तांच्या जोशात पार पडलेला हा सोहळा शहरासाठी अविस्मरणीय ठरला.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचा जल्लोष !

सावंतवाडी संस्थानकालीन राजवाड्यामध्ये जि.प शाळा नं ४ मधील बालचमू बनले छत्रपती शिवराय !

हा सोहळा पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांची उपस्थिती.शिवचेतना रॅलीसाठी शिवप्रेमी जमू लागले !!

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडी: विनापरवाना बैल वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ५ लाखांच्या मुद्देमालासह टेम्पो जप्त

 

https://youtube.com/shorts/arsfyte_72A?si=CPGQ449QDLOVs0ng

सावंतवाडी दि.१८:
सावंतवाडी ते चंदगड रोडवर विनापरवाना आणि निर्दयपणे बैलांची वाहतूक करणाऱ्या टाटा एसे (छोटा हत्ती) गाडीवर सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १८ हजार रुपये किमतीचे दोन बैल आणि ५ लाख रुपयांची गाडी, असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील
आज, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास चंदगड रोडवरील चौकुळ, चिखलव्हाळ, बेरडकी या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून MH 09 GJ 0847 या क्रमांकाच्या टाटा एसे गाडीला थांबवले. तपासणी केली असता, गाडीमध्ये दोन बैल अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयपणे बांधलेले आढळून आले.

कायदेशीर उल्लंघन
या वाहतुकीबाबत आरोपींकडे कोणतेही कायदेशीर परवाने मिळून आले नाहीत. प्रामुख्याने खालील बाबींमुळे ही कारवाई करण्यात आली:

विनापरवाना वाहतूक: वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता.फिटनेस प्रमाणपत्र: बैलांचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सोबत नव्हते. प्राण्यांना क्रूरता: बैलांना अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयपणे गाडीत कोंडण्यात आले होते.

आरोपींची नावे
पोलिसांनी याप्रकरणी खालील व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे:
१) बाबू लुमा नाईक (वय २९, रा. चौकुळ, चिखलव्हाळ, ता. सावंतवाडी)
२) अभिजीत धोंडीबा गावडे (वय २५, रा. चंदगड, इनाम कोविंद्रे, जि. कोल्हापूर)
३) युसुफ इस्माईल खेडेकर (वय ४०, रा. चंदगड) – वाहन मालक (वाहन गुन्ह्यासाठी वापरण्यास दिल्याने कारवाई).

पुढील तपास
सदर कारवाईनंतर जप्त केलेला मुद्देमाल पोलीस कोठडीत जमा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार गलोले हे करत आहेत. प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887.

सावंतवाडीत उद्या शिवरायांचा जयघोष! १४ व्या ‘शिवचेतना रॅली’चे भव्य नियोजन

    सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित नगरसेविका मोहिनी मडगावकर सोबत साक्षी वंजारी राजू कासकर महेश पांचाळ श्रीपाद सावंत व अन्य

सावंतवाडीत उद्या शिवरायांचा जयघोष! वेशभूषा स्पर्धेचेही आकर्षण

सावंतवाडी दि.१८: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सावंतवाडी शहरात उद्या, १९ फेब्रुवारी रोजी ‘स्वराज्य संघटना’ आणि शहरातील शिवप्रेमींच्या वतीने भव्य **’शिवचेतना रॅली’**चे आयोजन करण्यात आले आहे. गेली १४ वर्षे सातत्याने निघणाऱ्या या रॅलीने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली असून, यंदाही मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रॅलीचा मार्गाचा
प्रारंभ: गुरुवारी 19 फेब्रुवारीला सकाळी १०:०० वाजता,सावंतवाडी राजवाडा येथून शुभारंभ होणार आहे
राजवाडा येथून बाजारपेठमार्गे रॅली मार्गस्थ होईल. आणि रॅलीची
सांगता: जिमखाना मैदान येथे रॅलीचे विसर्जन होईल.
फेटे बांधणी: सकाळी ८:३० वाजल्यापासून फेटे बांधण्यास सुरुवात होईल.

या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक वेशभूषा स्पर्धा. यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पारंपारिक पेहराव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे गट खालीलप्रमाणे आहेत:
१३ वर्षांखालील मुले: वेशभूषा सादरीकरण.
१३ वर्षांवरील मुले व महिला: वेशभूषा स्पर्धा.
“२०१२ मध्ये या शिवचेतना रॅलीची स्थापना झाली. त्यानंतर गावोगावी अशा रॅली सुरू झाल्या, ही अभिमानाची गोष्ट आहे.” — राजू कासकर, आयोजक यांनी यावेळी बोलताना सांगितले

ही रॅली ‘सर्वपक्षीय’ स्वरूपाची असून यामध्ये राजकीय, सामाजिक आणि शाही घराण्यातील व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर,भाजपा युवा नेते विशाल परब,सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले तसेच
आरंभ सखी, घे भरारी, समता महिला मंडळ आणि शिवकन्या यांसारखी महिला मंडळे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
बलिदान मास पाळण्याचे आवाहन
यावेळी नूपूर मठकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आजपासून ‘बलिदान मास’ सुरू होत असून, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी तरुणांनी हा महिना पाळावा आणि शिवकार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन मठकर यांनी केले आहे.
या रॅलीच्या नियोजनासाठी आयोजित पत्रकार परिषदेला नगरसेविका मोहिनी मडगावकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी,नगरपरिषदेचे सभापती सुधीर आडिवरेकर, श्रीपाद सावंत, सुशांत पाटणकर, राजू कासकर, अजित सांगेलकर, संदीप धुरी, संजय पार्सेकर, प्रमोद तावडे, महेश पांचाळ, समीर सावंत, अमोल साटेलकर, साक्षी वंजारी, कृतिका कोरगावकर, अंकित तेंडुलकर, हर्षल सावंत, विजय कदम, सायली शिंदे, पल्लवी रेगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडीत ‘स्वच्छता पर्व’२० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण शहर स्वच्छता अभियान

संत गाडगे महाराज
अॅड अनिल निरवडेकर

सावंतवाडीत ‘स्वच्छता पर्व’: संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम आणि ‘पेहेल’ ई-कचरा अभियान

सावंतवाडी दि.१८: स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेने शहरात भव्य ‘महास्वच्छता मोहीम’ आणि ‘पेहेल २०२६’ ई-कचरा संकलन अभियान आयोजित केले आहे. दि. २० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण शहर स्वच्छतेच्या या उपक्रमात न्हाऊन निघणार आहे. यासाठी चार दिवसीय महास्वच्छता मोहीम नगर परिषदेच्या वतीने राबवणार येणार असल्याचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी सांगितले.

सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या नियोजन बैठकीनुसार, शहरात २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान ही मोहीम राबवली जाईल. शहरातील प्रत्येक प्रभागातील अशा ३ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे, जिथे सर्वाधिक कचरा आढळतो. रस्ते साफसफाई, झाडीझुडपे काढणे आणि ‘जीव्हीपी पॉइंट’ (कचरा कुंडीमुक्त ठिकाणे) स्वच्छ करणे यावर भर दिला जाणार आहे. या मोहिमेत मुख्याधिकारी, नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि सार्वजनिक मंडळे प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत.

‘पेहेल २०२६’: ई-कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
पर्यावरण रक्षणासाठी आणि ई-कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत ‘पेहेल २०२६’ अभियान राबवले जाणार आहे. सावंतवाडी नगरपरिषद, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान होत आहे.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे संकलित झालेल्या ई-कचऱ्यापैकी जे लॅपटॉप किंवा संगणक दुरुस्त करण्यायोग्य असतील, ते दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळांना शैक्षणिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. उर्वरित टाकाऊ कचरा ‘MPCB’ च्या अधिकृत रिसायकलिंग केंद्रात पाठवला जाईल.

शहरातील ११ संकलन केंद्रे: नागरिकांनी आपला ई-कचरा खालील ठिकाणी जमा करावा: १) मिलाग्रीस हायस्कूल २) जि. प. शाळा क्र. ४ ३) वि. स. खांडेकर हायस्कूल ४) राणी पार्वतीदेवी हायस्कूल ५) भोसले नॉलेज सिटी ६) उपवनसंरक्षक कार्यालय (सालईवाडा) ७) समाज मंदिर ८) फिश मार्केट ९) घनकचरा प्रक्रिया केंद्र १०) जिमखाना मैदान ११) ज्येष्ठ नागरिक संघ (शिरोडा नाका).

“सावंतवाडीला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी नागरिकांनी, गृहनिर्माण सोसायट्यांनी आणि व्यापारी प्रतिष्ठानांनी या दोन्ही उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर आणि नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887