18.7 C
New York
Tuesday, September 22, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 92

सावंतवाडीत उद्या शिवरायांचा जयघोष! १४ व्या ‘शिवचेतना रॅली’चे भव्य नियोजन

    सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित नगरसेविका मोहिनी मडगावकर सोबत साक्षी वंजारी राजू कासकर महेश पांचाळ श्रीपाद सावंत व अन्य

सावंतवाडीत उद्या शिवरायांचा जयघोष! वेशभूषा स्पर्धेचेही आकर्षण

सावंतवाडी दि.१८: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सावंतवाडी शहरात उद्या, १९ फेब्रुवारी रोजी ‘स्वराज्य संघटना’ आणि शहरातील शिवप्रेमींच्या वतीने भव्य **’शिवचेतना रॅली’**चे आयोजन करण्यात आले आहे. गेली १४ वर्षे सातत्याने निघणाऱ्या या रॅलीने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली असून, यंदाही मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रॅलीचा मार्गाचा
प्रारंभ: गुरुवारी 19 फेब्रुवारीला सकाळी १०:०० वाजता,सावंतवाडी राजवाडा येथून शुभारंभ होणार आहे
राजवाडा येथून बाजारपेठमार्गे रॅली मार्गस्थ होईल. आणि रॅलीची
सांगता: जिमखाना मैदान येथे रॅलीचे विसर्जन होईल.
फेटे बांधणी: सकाळी ८:३० वाजल्यापासून फेटे बांधण्यास सुरुवात होईल.

या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक वेशभूषा स्पर्धा. यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पारंपारिक पेहराव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे गट खालीलप्रमाणे आहेत:
१३ वर्षांखालील मुले: वेशभूषा सादरीकरण.
१३ वर्षांवरील मुले व महिला: वेशभूषा स्पर्धा.
“२०१२ मध्ये या शिवचेतना रॅलीची स्थापना झाली. त्यानंतर गावोगावी अशा रॅली सुरू झाल्या, ही अभिमानाची गोष्ट आहे.” — राजू कासकर, आयोजक यांनी यावेळी बोलताना सांगितले

ही रॅली ‘सर्वपक्षीय’ स्वरूपाची असून यामध्ये राजकीय, सामाजिक आणि शाही घराण्यातील व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर,भाजपा युवा नेते विशाल परब,सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले तसेच
आरंभ सखी, घे भरारी, समता महिला मंडळ आणि शिवकन्या यांसारखी महिला मंडळे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
बलिदान मास पाळण्याचे आवाहन
यावेळी नूपूर मठकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आजपासून ‘बलिदान मास’ सुरू होत असून, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी तरुणांनी हा महिना पाळावा आणि शिवकार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन मठकर यांनी केले आहे.
या रॅलीच्या नियोजनासाठी आयोजित पत्रकार परिषदेला नगरसेविका मोहिनी मडगावकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी,नगरपरिषदेचे सभापती सुधीर आडिवरेकर, श्रीपाद सावंत, सुशांत पाटणकर, राजू कासकर, अजित सांगेलकर, संदीप धुरी, संजय पार्सेकर, प्रमोद तावडे, महेश पांचाळ, समीर सावंत, अमोल साटेलकर, साक्षी वंजारी, कृतिका कोरगावकर, अंकित तेंडुलकर, हर्षल सावंत, विजय कदम, सायली शिंदे, पल्लवी रेगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडीत ‘स्वच्छता पर्व’२० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण शहर स्वच्छता अभियान

संत गाडगे महाराज
अॅड अनिल निरवडेकर

सावंतवाडीत ‘स्वच्छता पर्व’: संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम आणि ‘पेहेल’ ई-कचरा अभियान

सावंतवाडी दि.१८: स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेने शहरात भव्य ‘महास्वच्छता मोहीम’ आणि ‘पेहेल २०२६’ ई-कचरा संकलन अभियान आयोजित केले आहे. दि. २० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण शहर स्वच्छतेच्या या उपक्रमात न्हाऊन निघणार आहे. यासाठी चार दिवसीय महास्वच्छता मोहीम नगर परिषदेच्या वतीने राबवणार येणार असल्याचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी सांगितले.

सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या नियोजन बैठकीनुसार, शहरात २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान ही मोहीम राबवली जाईल. शहरातील प्रत्येक प्रभागातील अशा ३ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे, जिथे सर्वाधिक कचरा आढळतो. रस्ते साफसफाई, झाडीझुडपे काढणे आणि ‘जीव्हीपी पॉइंट’ (कचरा कुंडीमुक्त ठिकाणे) स्वच्छ करणे यावर भर दिला जाणार आहे. या मोहिमेत मुख्याधिकारी, नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि सार्वजनिक मंडळे प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत.

‘पेहेल २०२६’: ई-कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
पर्यावरण रक्षणासाठी आणि ई-कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत ‘पेहेल २०२६’ अभियान राबवले जाणार आहे. सावंतवाडी नगरपरिषद, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान होत आहे.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे संकलित झालेल्या ई-कचऱ्यापैकी जे लॅपटॉप किंवा संगणक दुरुस्त करण्यायोग्य असतील, ते दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळांना शैक्षणिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. उर्वरित टाकाऊ कचरा ‘MPCB’ च्या अधिकृत रिसायकलिंग केंद्रात पाठवला जाईल.

शहरातील ११ संकलन केंद्रे: नागरिकांनी आपला ई-कचरा खालील ठिकाणी जमा करावा: १) मिलाग्रीस हायस्कूल २) जि. प. शाळा क्र. ४ ३) वि. स. खांडेकर हायस्कूल ४) राणी पार्वतीदेवी हायस्कूल ५) भोसले नॉलेज सिटी ६) उपवनसंरक्षक कार्यालय (सालईवाडा) ७) समाज मंदिर ८) फिश मार्केट ९) घनकचरा प्रक्रिया केंद्र १०) जिमखाना मैदान ११) ज्येष्ठ नागरिक संघ (शिरोडा नाका).

“सावंतवाडीला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी नागरिकांनी, गृहनिर्माण सोसायट्यांनी आणि व्यापारी प्रतिष्ठानांनी या दोन्ही उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर आणि नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

 

_*YBIT चा सलग तिसऱ्या वर्षी ‘साऊथ इंडिया इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रम यशस्वी….*_

_*YBIT ची सलग तिसऱ्या वर्षी *बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरीतील नामांकित उद्योगांना भेट; १११ विद्यार्थ्यांचा सहभाग….*_

सावंतवाडी दि.१८: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या १११ विद्यार्थ्यांनी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रमांतर्गत दक्षिण भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली. बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरी आणि महाबलीपुरम या शहरांमधील प्रमुख उद्योग आणि संशोधन संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला. दक्षिण भारतातील औद्योगिक प्रकल्पांना भेट देण्याचे कॉलेजचे हे सलग तिसरे वर्ष आहे._

_बेंगळुरूमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्सला भेट देऊन विमाने आणि हेलिकॉप्टर निर्मितीची प्रक्रिया जवळून पाहिली. विश्वेश्वरय्या म्युझियममध्ये अभियांत्रिकीच्या विविध संकल्पना प्रयोगांद्वारे समजून घेतल्या. चेन्नईमधील प्रसिद्ध आयआयटी मद्रास येथे स्टार्टअप संस्कृती आणि संशोधनावर आधारित विशेष सत्रात सहभाग घेतला. यावेळी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचे निओमोशन या स्टार्टअपच्या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले._

_विद्यार्थ्यांनी महाबलीपुरम येथील युनेस्को मान्य प्राचीन शिल्पकला आणि स्थापत्यशास्त्राचाही अभ्यास केला. बेंगळुरूचे इस्कॉन मंदिर आणि पाँडिचेरी येथील श्री अरबिंदो आश्रम यांसारख्या ठिकाणांना भेट देऊन सांस्कृतिक वारसा अनुभवला. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि टीमवर्क वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गटांत विभागून गुण देण्याची पद्धत या भेटी दरम्यान राबवण्यात आली. या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य आणि उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण झाली._

_या यशस्वी दौऱ्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी आयोजन समितीचे अभिनंदन केले. विभागप्रमुख प्रा.स्वप्नील राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.प्राजक्ता राणे, प्रा.बोनी शेरॉव्ह व प्रा.मदीहा शेख यांनी या दौऱ्याचे नियोजन, समन्वय व यशस्वी अंमलबजावणी केली.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सावंतवाडी-दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा ‘पेन्शनर्स डे’ आणि वार्षिक सभा २० फेब्रुवारीला

सावंतवाडी-दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाला८० वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा होणार गौरव; आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी दि.१८: सावंतवाडी-दोडामार्ग तालुके सेवानिवृत्त कर्मचारी संघ, सावंतवाडी यांच्या वतीने शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता वार्षिक सभा आणि ‘पेन्शनर्स डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी गार्डन येथील सैनिक मुलींचे वसतिगृह व विश्रामगृह हॉल मध्ये संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मार्गदर्शन माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री आमदार श्री. दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. श्री. अनिल निरवडेकर, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी श्री. परशुराम बा. चव्हाण आणि जीवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ. शंकर सावंत (M.S. Ayu) उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संघटनेच्या ज्या सदस्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत, अशा सर्व सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पात्र सभासदांनी आपली नावे जन्म तारखेसह संघटनेकडे त्वरित नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संघटनेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पणदूरकर, सचिव श्री. संभाजी कांबळे आणि खजिनदार श्री. सुभाष गोवेकर यांनी सर्व सभासद बंधु-भगिनींना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सभेच्या सांगतेनंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांना पितृशोक.

सहवेदना:

लक्ष्मण बागवे निवर्तले

सावंतवाडी दि.१८: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरपीडी महाविद्यालयाचे संचालक प्रा. सतीश बागवे यांचे वडिल लक्ष्मण बागवे यांचे कसाल येथे राहत्या घरी नुकतेच निधन झाले ते 96 वर्षाचे होते.त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान परिवार त्यांच्या दुःखात सहभागी होऊन कै. लक्ष्मण बागवे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

🛑/—–/—-🛑/—–/—-🛑/—–/🛑/—-🛑*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

वेंगुर्ले नगरपरिषदेने “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत कोकण विभागात पटकावला प्रथम क्रमांक

“माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत कोकण विभागाचा निकाल

वेंगुर्ले दि.१८: महाराष्ट्र शासनाच्या “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत १५,हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावून रोख रुपये ७५ लाखांचे पारितोषिक मिळविले आहे. सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे वेंगुर्ला नगरपरिषदेला सलग तिसऱ्या वर्षी कोकण विभागात प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. हे यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून वेंगुर्ला शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. नगरपरिषद पुढील काळातही पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांना अधिक बळकटी देणार असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला आहे. माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत अधिक प्रभावी नियोजन करून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली असून भविष्यातही हा लोकसहभाग कायम राहील, असा विश्वास नगरपरिषदेमार्फत व्यक्त करण्यात आला.

🛑/—–/—-🛑/—–/—-🛑/—–/🛑/—-🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887

 🚩 शिवजयंतीनिमित्त ‘शिवसंस्कार’ स्पर्धेचा निकाल जाहीर

चार राज्यांतील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी दि.१८: नवीन पिढीने इतिहास अभ्यासावा आणि शिवविचार आत्मसात करावेत, या उद्देशाने मातृभूमी शिक्षण संस्थेच्या ‘शिवसंस्कार’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध ऐतिहासिक स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धांना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या चारही राज्यांमधून स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला
विजेत्यांची नामावली खालीलप्रमाणे:
१. निबंध स्पर्धा (विषय: शहाजीराजे – दक्षिणेतील कारभार)
प्रथम क्रमांक: सौ. साक्षी टिळवे (सावंतवाडी)
द्वितीय क्रमांक: हर्षदा कुबल (कणकवली)
तृतीय क्रमांक: जयश्री पेडणेकर (सावंतवाडी)
उत्तेजनार्थ: पूजा गावडे (सावंतवाडी)
२. राजमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धागट
लहान गट
प्रथमऐश्वर्या खोत (मुंबई)
द्वितीयवरदा कुलकर्णी (वाशी)
तृतीयशौर्य पंडित (खोपोली)
उत्तेजनार्थमीहीका राऊळ (बुलढाणा)
मोठा गट
ग्रंथा मळीक (गोवा)
ज्ञानेश्वरी तांडेल (तुळस)
स्वरा सावंत (कोल्हापूर)
चिन्मयी बागवे (सावंतवाडी)
खुला गट
सौ. प्रणाली गायकवाड (बेळगाव)
समीरा जाधव (पुणे)
शितल सुर्वे (मुंबई)
सौ. निर्मला टोपले (गोवा)

३. छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा
प्रथम क्रमांक: ऋषी पाटील (कोल्हापूर)
द्वितीय क्रमांक: स्वराज पाटील (बेळगाव)
तृतीय क्रमांक: राजवीर राऊळ (बुलढाणा)
उत्तेजनार्थ: केतकी बागवे (सावंतवाडी) व तनुष सावंत (गोवा)

सन्मान सोहळा आणि आगामी परीक्षा
यशस्वी आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे शिवसंस्कारच्या पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

या विजेत्यांचा विशेष सन्मान सोहळा ऑक्टोबर २०२६ मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
महत्त्वाची सूचना: संस्थेतर्फे आयोजित ‘जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षा’ (१०० गुण) दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत संस्थेने जाहीर केलेल्या जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर पार पडणार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

इन्सुली क्षेत्रफळ-भिसेवाडी येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

जेरबंद करण्यात आलेला बिबट्या

सावंतवाडी वन विभागाची चित्तथरारक मोहीम

सावंतवाडी दि.१८ :सावंतवाडी तालुक्यातील मौजे इन्सुली क्षेत्रफळ-भिसेवाडी येथे शिकारीच्या शोधत असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने अवघ्या तासाभरात सुखरूप बाहेर काढून जेरबंद केले. वन विभागाच्या या अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

नेमकी घटना काय?

आज सकाळी इन्सुली क्षेत्रफळ-भिसेवाडी येथील श्री. जयराम नाईक यांच्या विहिरीत एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. भक्ष्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विहिरीत बिबट्या असल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली होती.

वन विभागाची ‘सुपरफास्ट’ कारवाई

घटनेची माहिती मिळताच वनविभागाची यंत्रणा तातडीने हलली. वनक्षेत्रपाल श्री. सुहास पाटील आणि वन परिमंडळ अधिकारी (आजगाव) श्री. पृथ्वीराज प्रताप यांनी आपल्या पथकासह व सावंतवाडी येथील जलद कृती दलासह (RTF) घटनास्थळी धाव घेतली.

संयुक्त मोहीम: आजगाव वन कर्मचारी आणि जलद कृती दलाने परिस्थितीची पाहणी करून तात्काळ विहिरीत पिंजरा सोडला. अवघ्या तासाभरात यश: वन कर्मचाऱ्यांचे कसब आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे केवळ एका तासाच्या आत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले.यांनी बजावली महत्त्वाची भूमिका सदरची यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा (सावंतवाडी) व वैभव बोराटे सहाय्यक वनसंरक्षक (सावंतवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत खालील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला: श्री. सुहास पाटील (वनक्षेत्रपाल, सावंतवाडी),श्री. पृथ्वीराज प्रताप (वनपरिमंडळ अधिकारी, आजगाव),श्री. अतुल पाटील (वनरक्षक, इन्सुली),जलद कृती दल (RTF), सावंतवाडी

या मोहिमेदरम्यान इन्सुली क्षेत्रफळ गावातील ग्रामस्थांनी वन विभागाला मोलाचे सहकार्य केले. जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com_____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा**बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 सावंतवाडी टर्मिनसचे काम ‘अर्ध्यावरती’च; ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना’ आक्रमक! ✊🏼

२०१४ च्या मूळ ठरावानुसार अंमलबजावणी करा!

​प्रवासी संघटनेचे कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना साकडे; २०२६-२७ च्या बजेटमध्ये निधीची मागणी

​सावंतवाडी दि.१७: कोकण रेल्वेवरील महत्त्वपूर्ण स्थानक असलेल्या सावंतवाडी टर्मिनसच्या प्रलंबित कामांबाबत ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. २०१४ मध्ये मंजूर झालेल्या मूळ आराखड्यानुसार या टर्मिनसचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांना पत्र लिहून हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

​सावंतवाडी स्थानकाचे ‘पूर्ण क्षमतेचे टर्मिनस’ मध्ये रूपांतर करण्याच्या २०१४ च्या मूळ ठरावाची अंमलबजावणी करा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सागर तळवडेकर यांनी कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना (CMD) पत्र लिहून सद्यस्थितीतील त्रुटींकडे लक्ष वेधले

सुविधांबद्दल आभार, पण मूळ प्रश्न प्रलंबित संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी दिलेल्या निवेदनात, रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी स्थानकावर नव्याने बसवलेली लिफ्ट आणि डिजिटल कोच पोझिशन इंडिकेटर्सबद्दल आभार मानले आहेत. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांना दिलासा मिळाला असला तरी, टर्मिनसच्या मूळ संकल्पनेला प्रशासनाने बगल दिल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

​नेमका पेच काय? (२०१४ चा ठराव) डिसेंबर २०१४ मध्ये कोकण रेल्वेच्या संचालक मंडळाने सावंतवाडी स्थानकाचे ‘प्रवासी टर्मिनस’ मध्ये रूपांतर करण्यासाठी २१.२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यात खालील कामांचा समावेश होता:

​दोन नवीन लूप लाईन्स हाय-लेव्हल आयलंड प्लॅटफॉर्म वॉशेबल ऍप्रनसह स्वतंत्र स्टेबलिंग लाईन नवीन पादचारी पूल (FOB) आणि आरओबी (ROB) मात्र, तत्कालीन गरजेनुसार मूळ ठरावात बदल करून केवळ ‘अत्यावश्यक’ कामांसाठी ११.४२ कोटी रुपये खर्च केले गेले. यामुळे केवळ एक लूप लाईन, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि पादचारी पूल इतकेच काम पूर्ण झाले.

​प्रमुख मागण्या आणि गरजा प्रवासी संघटनेने प्रशासनाचे लक्ष खालील त्रुटींकडे वेधले आहे: अपुुरे रेल्वे रूळ: आराखड्यानुसार तीन नवे रूळ अपेक्षित असताना सध्या केवळ एक लूप लाईन आणि एक स्टेबलिंग लाईन आहे. आणखी एका लूप लाईनची येथे नितांत गरज आहे.

​टर्मिनस इमारत आणि पाणी: पर्यटन जिल्हा असूनही स्थानकाच्या पूर्व बाजूला अद्ययावत टर्मिनस इमारत नाही. तसेच गाड्यांमध्ये पाणी भरण्याची (Water filling) सोय नसल्याने गाड्या सोडण्यात तांत्रिक अडचणी येतात.

​”केवळ ‘किमान आवश्यक’ कामे करणे हे तात्पुरते समाधान असू शकते, मात्र ते अंतिम उद्दिष्ट नाही. सावंतवाडीला पूर्ण क्षमतेचे टर्मिनस बनवण्यासाठी २०२६-२७ च्या कॅपिटल बजेटमध्ये तरतूद करणे आवश्यक आहे.” सागर तळवडेकर, उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

​थेट रेल्वे सेवेची प्रतीक्षा
​सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यास, भविष्यात येथून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसाठी थेट रेल्वे गाड्या सुरू करणे शक्य होईल. यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. आता कोकण रेल्वे प्रशासन या मागणीवर काय पाऊल उचलते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आगामी सण-उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करा.

शांतता समितीच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना डीवायएसपी विनोद कांबळे सोबत पी आय अमोल चव्हाण व अन्य

Dysp विनोद कांबळे यांचे आवाहन;शांतता समितीची बैठक संपन्न

​सावंतवाडी,दि.१७: आगामी काळातील सर्व सण आणि उत्सव नागरिकांनी अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करावेत. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच स्तरातील नागरिकांनी आणि समाजघटकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदकर प्रामुख्याने उपस्थित होते.
​या महत्त्वाच्या बैठकीमध्ये आगामी काळात येणाऱ्या शिवजयंती, रमजान ईद, शिमगोत्सव, होळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा या सणांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील सण-उत्सवांना मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. ही परंपरा जोपासताना कोणत्याही प्रकारे सामाजिक सलोखा बिघडणार नाही किंवा उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनी आणि मान्यवरांनीही प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, सर्व सण आदर्श पद्धतीने साजरे करण्याची ग्वाही दिली.
​बैठकीचे औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तौकीर शेख यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हिदायतुल्ला खान,ऑगोस्तीन फर्नांडिस, संजय लाड, कृष्णा धुळपनावर, साईराज नार्वेकर, दिनेश गावडे, विनायक रांगणेकर यांच्यासह अखिल भारतीय मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर, पोलीस कर्मचारी अमित राऊळ आणि शांतता समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563