25 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 59

शिक्षणसेवक जिवंत असताना दुर्लक्षित… मृत्यूनंतरही कोणी वाली नाही! सरकारी सेवेत असूनही बेवारस? शिक्षणसेवकांच्या कुटुंबाला न्याय कधी?

सिंधुदुर्ग दि.०६(प्रतिनिधी):  जिल्ह्यातील आयनल (ता. कणकवली) येथील ३८ वर्षीय शिक्षणसेवक प्रशांत गंगाराम तांबे यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मात्र, या निधनाने शिक्षणसेवक या पदाच्या नावाखाली सुरू असलेल्या शोषणाचा आणि व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “जिवंतपणी संघर्ष आणि मृत्यूनंतर उपेक्षा” अशीच काहीशी अवस्था आज शिक्षणसेवकांची झाली आहे.
संघर्ष, जिद्द आणि नियतीचा निर्दयी खेळ महाळुंगे राणेवाडी (ता. देवगड) येथील शाळेत कार्यरत असलेले प्रशांत तांबे हे अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावाचे शिक्षक होते. तब्बल १४ वर्षे नोकरीसाठी संघर्ष केल्यानंतर ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील पॅरालिसिसने अंथरुणाला खिळलेले, आई सतत आजारी, तर पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका कपड्यांच्या दुकानात काम करत होती. अशा परिस्थितीत तांबे हे कुटुंबाचा एकमेव आधार होते.
उपचारादरम्यान मृत्यू आणि व्यवस्थेचे अपयश २८ मार्च रोजी ओरोस येथील शैक्षणिक महोत्सवातून परतल्यानंतर त्यांना ताप आणि चक्कर येऊ लागली. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीपोटी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी गोवा येथे नेत असताना, ४ एप्रिल रोजी दुपारी रुग्णवाहिकेतच त्यांची प्राणज्योत मालवली. तांबे यांची नियमित सेवा सुरू होण्यासाठी केवळ एक वर्ष शिल्लक होते, मात्र नियतीने त्यापूर्वीच घाला घातला.
तुटपुंजे मानधन आणि शून्य संरक्षण प्रशांत तांबे यांना शिक्षणसेवक म्हणून केवळ १५,७९९ रुपये मानधन मिळत होते. आज त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार उघड्यावर आला आहे. शिक्षणसेवक कालावधीत कोणतेही सेवा संरक्षण नसल्याने, त्यांच्या कुटुंबाला ना शासनाची मदत मिळणार, ना अनुकंपा तत्त्वावर नोकरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणसेवकाच्या मृत्यूची ही पाचवी घटना आहे, तरीही शासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने शिक्षक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
प्रमुख मागण्या:
शिक्षणसेवक पद तात्काळ रद्द करून शिक्षकांना नियमित सेवा द्यावी.
किमान बेसिक वेतन आणि सर्व सेवा संरक्षण लागू करावे.
मृत शिक्षणसेवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व अनुकंपा नोकरी द्यावी.

चौकट

“शिक्षणसेवक हा देखील शिक्षकच आहे, मग त्याला मिळणारी वागणूक दुय्यम का? प्रशांत तांबे यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षक जातो, पण त्याच्या कुटुंबासाठी शासनाकडे कोणतीही ठोस तरतूद नाही, ही अत्यंत वेदनादायक आणि संवेदनशून्य बाब आहे. शिक्षणसेवक ही संकल्पना आता संपवण्याची वेळ आली आहे. शासनाने आता तरी जागे होऊन ठोस निर्णय घ्यावा.” — जावेद तांबोळी (प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती)

भाजपमध्ये कार्यकर्ताच राजा; १३ तारखेला ‘जुन्या-जाणत्यांचा’ सन्मान सोहळा – विशाल परब

सावंतवाडी दि.०६: “भारतीय जनता पक्ष हा राजाच्या मुलाला राजा बनवणारा पक्ष नसून, तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्व आणि ओळख देणारा पक्ष आहे. येथे कुणी राजा किंवा मोठा नाही, तर सामान्य कार्यकर्ताच राजा आहे,” असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी केले.ते यावेळी बोलत होते तर १३ एप्रिल रोजी जुन्या जाणत्या भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे
भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जुन्या कार्यकर्त्यांचा होणार गौरव
यावेळी बोलताना विशाल परब यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. गेल्या अनेक दशकांपासून जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजवण्यासाठी आणि संघटना वाढवण्यासाठी ज्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी रक्ताचे पाणी केले, त्यांचा १३ एप्रिल ला सावंतवाडीत विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष
विशाल परब पुढे म्हणाले की, “प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे अनिल निरवडेकर आणि गौरव मुळीक यांच्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पदे मिळाली, हे भाजपमध्येच शक्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून संघटना वाढवावी.”
अॅड. अनिल निरवडेकर यांनीही भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की:
“जो कार्यकर्ता तन-मन-धनाने पक्षासाठी समर्पित होऊन काम करतो, त्याला भाजपमध्ये नक्कीच न्याय मिळतो. सामान्य कार्यकर्त्याला घडवण्याचे सामर्थ्य फक्त याच पक्षात आहे.”
कार्यक्रमाची रूपरेषा
कार्यक्रमाची सुरुवात अॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत विचार मांडले. अत्यंत कमी कालावधीत जुन्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा स्तुत्य उपक्रम जाहीर केल्याबद्दल निरवडेकर यांनी विशाल परब यांचे विशेष आभार मानले.
उपस्थित मान्यवर: या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, मनोज नाईक, सिद्धार्थ भांबूरे, हितेन नाईक यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत दोन दुचाकी समोरासमोर धडकून दोघे जखमी..अधिक उपचारासाठी अनिकेत आसोलकर यांनी केले सहकार्य.

सावंतवाडी दि.०५:दोन दुचाकी समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
ही घटना आज रात्री नऊ वाजता सुमारास शासकीय गोदामा समोर घडली सौरभ मालणकर रा. सालईवाडा व श्रीराम ठाकूर रा आरोस असे दोघांचे नाव आहे जखमींना भाजपचे युवा नेते अनिकेत आसोलकर यांच्या कार मधून त्यांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की येथील गोदाम परिसरात या गाड्यांची समोरासमोर धडक झाली ही या धडके दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले यात सौरभ हा रस्त्यावर कोसळलेल्या अवस्थेत होता यावेळी त्या ठिकाणी जाणाऱ्या भाजपचे युवा नेते अनिकेत आसोलकर यांनी आपल्या कारमधून जखमींना रुग्णालय दाखल केले यावेळी पत्रकार अमोल टेंबकर, संकल्प धारगळकर राजू कासकर निखिल पाटील, सचिन मोरजकर, आदींनी त्यांना मदतकार्य केले

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

निरवडे महोत्सवात महिला बचत गट आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गौरव;दोन दिवस चालला सांस्कृतिक जागर

सावंतवाडी,दि.०५: निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘निरवडे महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावत ग्रामीण भागातील या कलाविष्काराचे आणि मंडळाच्या भव्य नियोजनाचे तोंडभरून कौतुक केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे शानदार उद्घाटन भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड अनिल निरवडेकर होते, तर यावेळी व्यासपीठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, तळवडे जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, माजी सभापती पंकज पेडणेकर, दादा परब, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सरपंच सुहानी गावडे आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर महेंद्र गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे निरवडे गावातील विविध व्यवसाय करणाऱ्या आणि स्वतःच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाला दाद देण्याच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य, देवगड येथील सुप्रसिद्ध ‘पावणादेवी समई नृत्य’ आणि नेरूर येथील ‘शिमगोत्सव’ या कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी महोत्सवाला सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, अशा महोत्सवांमुळे ग्रामीण संस्कृतीला बळकटी मिळते असे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे रजुल पाटणकर आणि पत्रकार अमोल टेंबकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
​महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची रंगत अधिकच वाढली, जेव्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, पुणे येथील ख्यातनाम शास्त्रीय गायक नागेश आडगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, स्वर्गीय प्रकाश परब फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज परब, संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री आणि संगीत विशारद रुपेंद्र परब यांच्या उपस्थितीत दुसऱ्या सत्राचा शुभारंभ झाला. संजू परब यांनी यावेळी बोलताना निरवडे सारख्या ग्रामीण भागात एवढा मोठा ‘शिवधनुष्य’ पेलणे सोपे काम नाही, अशा शब्दांत मंडळाचे कौतुक केले आणि भविष्यात कोणत्याही हाकेला धावून येण्याचा शब्द दिला. या दिवशी निरवडे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विशेष सेवेबद्दल गौरव करण्यात आला. त्यानंतर नागेश आडगावकर यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाने पूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला, ज्याला संगीतप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर ओंकार कला मंच सिंधुदुर्ग यांचा नृत्य नाट्य आणि कलाविष्काराचा कार्यक्रम संपन्न झाला त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महोत्सवाच्या समारोप प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, मधुकर देसाई, शरद धाऊस्कर, हेमंत मराठे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विनायक गावस, भुवन नाईक, प्रणव तारी आणि डॉ. अक्षय मिसाळ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या ‘लकी ड्रॉ’ च्या सोडतीने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती, ज्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निखिल माळकर, सचिव संदेश पोपकर, खजिनदार सुनील माळकर, मार्गदर्शक ओमप्रकाश तीवरेकर, चंदन गोसावी, सचिन माळकर, विशाल पोपकर, नितेश माळकर, चेतन माळकर, विराज पोपकर, संजय माळकर, राजाराम माळकर आदी कार्यकर्त्यांसह गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली. संपूर्ण महोत्सवाचे ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन राजा सामंत, निलेश गुरव, बादल चौधरी आणि श्रीधर पाचंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओमप्रकाश तीवरेकर यांनी करून या ऐतिहासिक महोत्सवाची सांगता झाली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🏆 सिंधुदुर्गाचा अभिमान! सावंतवाडी शाळा नं. २ ला राज्यस्तरीय ‘आदर्श शाळा पुरस्कार’ जाहीर! 🏆 📍 पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात गौरव!

सावंतवाडी दि.०५: शहरातील पी.एम. श्री कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर (शाळा नं. २) या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्याचा डंका वाजवला आहे. ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्यावतीने दिला जाणारा सन २०२५-२६ चा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ या शाळेला मोठ्या थाटात झालेल्या कार्यक्रमात पुणे येथे प्रदान करण्यात आला.

✨ बातमीची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
✅ एकमेव निवड: संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झालेली ही एकमेव शाळा!
✅ कोणाच्या हस्ते गौरव?: जागतिक कीर्तीचे शिक्षक श्री. वारे गुरुजी यांच्या उपस्थितीत पुण्यात सन्मान.
✅ वाढती पटसंख्या: शहरी भागात असूनही शाळेची पटसंख्या १६१ वर; गुणवत्तेचे सर्वत्र कौतुक.
✅ यशाचे श्रेय: मुख्याध्यापक श्री. तेजस बांदिवडेकर, शिक्षक वृंद, व्यवस्थापन समिती आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला फळ.

“शाळेची गुणवत्ता आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम यामुळेच हा बहुमान मिळाला आहे.”
— शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक

📢 ही अभिमानास्पद बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कोकणच्या शाळेचे अभिनंदन करा! 👏✨
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत चोऱ्यांचे सत्र रोखण्यासाठी ‘सीसीटीव्ही’चा कवच; केवळ ३ हजार रुपयांत दुकान होणार सुरक्षित जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

राजू मसुरकर

सावंतवाडी दि.०५: शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांना तपासात मदत होण्यासाठी आणि स्वतःच्या दुकानाची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे, आता अत्यंत कमी खर्चात हे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

महागड्या यंत्रणेला स्वस्त पर्याय
पूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करावा लागत असे. मात्र, आता तंत्रज्ञान प्रगत झाल्याने केवळ अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये उत्तम दर्जाचा सिंगल वायफाय कॅमेरा उपलब्ध झाला आहे. सावंतवाडी नगरपालिकेसमोर, प्रकाश चौक येथील ‘हावळ’ यांच्या मोबाईल शॉपीमध्ये हे कॅमेरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत.

थेट मोबाईलवर दिसणार प्रक्षेपण
राजू मसुरकर यांनी माहिती दिली की, या नवीन तंत्रज्ञानाच्या कॅमेऱ्यासाठी केवळ वायफाय कनेक्शन असणे आवश्यक आहे. या कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण (Live Feed) दुकानदार आपल्या मोबाईलवर जगाच्या पाठीवर कोठूनही पाहू शकतात. दुकानासमोर काय हालचाली सुरू आहेत, यावर यामुळे २४ तास लक्ष ठेवता येणार आहे.

गुन्हेगारांवर बसेल वचक
“जर प्रत्येक व्यापाऱ्याने आणि घरमालकाने आपल्या प्रवेशद्वारावर किंवा दुकानासमोर असे छोटे कॅमेरे लावले, तर चोरीच्या घटनांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल. तसेच एखादी अनुचित घटना घडल्यास पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी या फुटेजचा मोठा उपयोग होऊ शकतो,” असे मसुरकर यांनी स्पष्ट केले.

वैशिष्ट्ये थोडक्यात:
किंमत: फक्त २५०० ते ३००० रुपये.
उपलब्धता: हावळ मोबाईल शॉपी, प्रकाश चौक, सावंतवाडी.
फायदा: मोबाईलवर थेट प्रक्षेपण, फिटिंगची सोय आणि पोलिसांना तपासात मदत.

वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी सुरक्षेबाबत तडजोड न करता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कणकवली पाठोपाठ सावंतवाडीत चोरट्यांचा थरार! एकाच रात्री ६ दुकाने फोडली; व्यापारी संकुलात खळबळ

सावंतवाडी दि.०५: कणकवलीतील चोरीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी आता आपला मोर्चा सावंतवाडी शहराकडे वळवला आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नगरपरिषद कॉम्प्लेक्स (इंदिरा गांधी व्यापारी संकुल) मधील तब्बल ६ दुकानांचे कुलूप तोडून धाडसी चोरी केली, तर ४ दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. या घटनेत एकूण ७ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून, वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या गजबजलेल्या व्यापारी संकुलाला लक्ष्य केले. पहाटेच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी एकामागून एक दुकानांची कुलपे तोडली. यामध्ये एका दुकानातून ५ हजार रुपये आणि एका बेकरीतून २ हजार रुपये अशी एकूण ७ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.

आज सकाळी जेव्हा व्यापारी संकुलात आले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दुकानांची कुलपे तुटलेली आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून परिसरात खळबळ उडाली. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पुंडलिक दळवी यांनी तातडीने या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला दिली.

पोलीस यंत्रणा सतर्क; श्वान पथका पाचारण

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक सरदार पाटील, हवालदार मंगेश शिंगाडे, शिंदे आणि धोत्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

व्यापाऱ्यांकडून कडक बंदोबस्ताची मागणी
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आधी कणकवली आणि आता सावंतवाडीत झालेल्या सलग चोऱ्यांमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांनी पोलिसांना दिलेले हे एक प्रकारचे आव्हान मानले जात आहे.

“शहरातील सुरक्षिततेसाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि या चोरट्यांचा तातडीने छडा लावावा,” अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, “सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल,” असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

एलसीबी ‘ॲक्टिव्ह’! सावंतवाडीत मटक्यावर छापा; ३१ हजारांच्या रोकडसह दोघांवर कारवाई

सावंतवाडी दि.०५:जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली अवैध धंद्यांविरोधातील कारवाई पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने सावंतवाडी शहरात धडक कारवाई करत मटक्याचे आकडे घेणाऱ्या एका इसमासह त्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, एलसीबी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

सावंतवाडी शहरातील जुना बाजार परिसरात नेल्सन लुईस (वय ४९) हा इसम फिरून मटक्याच्या चिठ्ठ्या गोळा करत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून नेल्सन याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून मटक्याचे साहित्य आणि ३१ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याचा मालक सुनील आडीवरेकर याच्यावरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय भोसले, एएसआय राठोड आणि हवालदार राठोड यांच्या पथकाने सहभाग घेतला. दोन्ही संशयितांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

कारवाईत खंड पडल्याने संशयाचे वातावरण
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडली होती. त्यानंतर काही काळ पोलिसांनी जोरदार धाडसत्र राबवले, मात्र मधल्या काळात हे सत्र अचानक शांत झाले होते. शहरात खुलेआम अवैध धंदे सुरू झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, कुडाळमधील गांजा आणि मटका कारवाईनंतर आता सावंतवाडीत झालेल्या या कारवाईमुळे ‘खाकी’ पुन्हा मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

सीमावर्ती भागातून अवैध धंद्यांचे जाळे
सावंतवाडी हे गोवा आणि कर्नाटक सीमेला लागून असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर गांजा, दारू आणि इतर अवैध मालाची तस्करी होत असल्याची चर्चा आहे. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, जिल्ह्यातून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हे धाडसत्र कायम राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत रंगणार ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा; नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

सावंतवाडी दि.०४: माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर रंगणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि पारितोषिके:
या जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत:

१३ वर्षांखालील (मुले/मुली): प्रथम – ३,००० रु. | द्वितीय – २,००० रु.
१७ वर्षांखालील (मुले): प्रथम – ३,००० रु. | द्वितीय – २,००० रु.
खुला गट (मुले/मुली): प्रथम – ५,००० रु. | द्वितीय – ३,००० रु.
दुहेरी खुला गट: प्रथम – ६,००० रु. | द्वितीय – ४,००० रु.
प्रमुख उपस्थिती:
या स्पर्धेच्या नियोजनासाठी आणि उद्घाटन प्रसंगी भाजपा शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक, माजी नगरसेवक तथा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यासह खेळाडू संकेत राऊळ, शुभम मुळीक आणि अक्षय पंडित उपस्थित राहणार आहेत.

नावनोंदणीसाठी आवाहन:
जिल्ह्यातील जास्तीत जास्त टेबल टेनिस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

पंकज तुळसुळकर: +91 91306 83472
भाजपा कार्यालय: 7875525496
सावंतवाडीतील क्रीडा प्रेमींसाठी ही स्पर्धा एक मोठी पर्वणी ठरणार असून, खेळाडूंमध्ये आतापासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

तळवणे नं. ०२ ची विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम;जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी दि.०४ : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. ०२ ची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंतरा बापू मठकर हिने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे.
अंतरा हिच्या या कर्तृत्वाचा गौरव म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मेहनत, चिकाटी आणि शिस्तबद्ध सरावामुळेच हे यश मिळाल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
या सत्कार समारंभाला उपसरपंच रामचंद्र गावडे, अंतरा हिचे वडील बापू मठकर, आई अनुष्का मठकर, तसेच प्रवीण बर्वे, बाबा पालव, तुषार पालव, विश्राम पोळजी, भरत कांबळी, लवू कांबळी, अनिल मठकर, सुरेंद्र मठकर, अजित पोळजी, संदेश कांबळी, रेश्मा कांबळी, मिलिंद कांबळी, कांती मठकर आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते. सर्वांनी अंतरा हिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563