25 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 60

🚨 धक्कादायक: सावंतवाडीत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून २० वर्षीय महिलेचा मृत्यू!

सावंतवाडी दि.०४: शहरातील द्वारका नगरी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वीज गेल्याने चौथ्या मजल्यावर ट्यूबलाईट जोडायला गेलेल्या रुबी खातून मुन्ना खान (२० वर्षे) यांचा खाली पडून मृत्यू झाला.

📍 नेमकी घटना काय?
द्वारका नगरी परिसरात एका सात मजली इमारतीचे काम सुरू आहे.शुक्रवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास रुबी खातून यांच्या खोलीतील लाईट गेल्याने त्या पतीसोबत ट्यूबलाईट आणण्यासाठी चौथ्या मजल्यावर गेल्या होत्या.

अंधारात ट्यूबलाईट जोडत असताना तोल गेल्याने त्या खाली पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या.तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मयत महिला मूळची बिहारची असून, नातेवाईक आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. घटनास्थळी पोलीस प्रशासनाने भेट दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 अंजली दामनियांचे आरोप निराधार; दीपक केसरकरांचे रोखठोक प्रत्युत्तर! “माझी प्रतिमा मलीन करण्यासाठीच हे षडयंत्र!” – आमदार दीपक केसरकर.

.

आमदार दीपक केसरकर पत्रकारांशी संवाद साधताना

सिंधुदुर्ग दि.०४: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

📍 महत्वाचे मुद्दे:
🔹 निराधार आरोप: केवळ फोन संभाषणावरून मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे चुकीचे आहे.
🔹 संबंध नाकारला: दीपक लोंढे यांच्याशी माझा दुरान्वयेही संबंध नाही.
🔹 बदनामीचा प्रयत्न: राजकीय हेतूने प्रेरित होऊन नाव ओढले जात असल्याची केसरकरांची खंत.

सावंतवाडीच्या राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 सावंतवाडी पंचायत समितीचे सोमवारपासून तात्पुरते स्थलांतर! जुन्या इमारतीच्या जागी लवकरच उभी राहणार नवीन देखणी वास्तू… 🏢✨

सावंतवाडी दि.०४: पंचायत समितीचे मुख्य कामकाज सोमवार, ६ एप्रिल पासून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘तालुका स्कूल इमारत क्रमांक १’ मधील हॉलमध्ये सुरू होईल.

🏗️ स्थलांतराचे कारण:
नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी जुनी इमारत आणि कृषी गोडावून रिकामे करणे आवश्यक आहे.
👥 सभापती आणि उपसभापती कोठे भेटणार?
सभापती आणि उपसभापतींचे कामकाज सध्या शिरोडा नाका येथील बांधकाम उपविभाग (सालईवाडा इमारत) येथून चालेल.
नवीन ठिकाणी दालनांचे काम पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था कायम असेल.

✅ नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना:
स्थलांतरित ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. तरी सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी ६ एप्रिलपासून प्रशासकीय कामासाठी तालुका स्कूल शाळा क्रमांक १ येथे संपर्क साधावा.
📢 प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 निरवडे महोत्सव २०२६ चा दिमाखात शुभारंभ! 🎭🍴

निरवडे सावंतवाडी दि.०४: सांस्कृतिक वारसा आणि चटकदार खाद्यपदार्थांची जत्रा; मान्यवरांच्या मांदियाळीने रंगली निरवडे महोत्सवाची पहिली संध्याकाळ!

✨ महोत्सवाचे खास आकर्षण:
✅ जिभेवर रेंगाळणारी चव देणारा ‘भव्य फूड फेस्टिवल’
✅ स्थानिक कलागुणांना वाव देणारे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम
✅ निरवडे ग्रामस्थांचे अभूतपूर्व नियोजन

🎤 मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याचे उद्घाटन भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, कणकवलीचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, सभापती श्रीमती सुष्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य श्री. संदीपजी गावडे आणि उपसभापती श्री. गौरव मुळीक यांसारख्या दिग्गज राजकीय व्यक्तिमत्त्वांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

🤝 आयोजक:
श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ, माळकरवाडी आणि समस्त निरवडे ग्रामस्थ.

निखिल माळकर (अध्यक्ष), सुनील माळकर (उपाध्यक्ष), अर्जुन पोपकर (सचिव) व त्यांच्या संपूर्ण टीमने या महोत्सवासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

📍 ठिकाण: निरवडे
चला तर मग, सहकुटुंब सहपरिवार या दोन दिवशीय महोत्सवाचा आनंद लुटायला विसरू नका!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 सावंतवाडी क्रिकेट क्षेत्रावर शोककळा: ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक यासीन मुलाणी यांचे निधन! 🏏💔

यासीन मुलानी

सावंतवाडी दि.०४: सावंतवाडीत क्रीडा विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. अनेक खेळाडूंचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक यासीन मुलाणी (६०) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

📍 काय घडली घटना?
आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास श्री. मुलाणी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी तयार होत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

⭐ क्रिकेटमधील मोठे योगदान:
मूळचे सांगलीचे असलेले मुलाणी सर क्रिकेटच्या आवडीपोटी सावंतवाडीत आले आणि येथेच स्थायिक झाले.
आपल्या कोचिंगच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू घडवले.
त्यांच्या मिश्किल आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते खेळाडूंमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.

त्यांच्या अचानक जाण्याने सावंतवाडी शहरासह क्रिकेट वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🌷

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

घरच्या माणसांनी दिलेली थाप हीच खरी पावती! – प्रमोद कामत

सावंतवाडी येथे सारस्वत समाजातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सन्मान करताना रघुवीर मंत्री, सुनील सौदागर, सुधीर झांटे, सौ. कामत व इतर मान्यवर.छाया : नरेंद्र देशपांडे

सावंतवाडी दि.०४: “आजवर अनेक ठिकाणी सत्कार झाले, पण आपल्या हक्काच्या सारस्वत समाज बांधवांनी केलेला हा सत्कार थेट माझ्या अंतर्मनाला भिडला आहे,” अशा भावना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. प्रमोद कामत यांनी व्यक्त केल्या.

सावंतवाडी येथे सारस्वत समाजातर्फे आयोजित विशेष सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाचा गौरव करण्यात आला.

📍 ठळक मुद्दे:
संघर्षाची गाथा: केवळ २१ दिवसांचे असताना घर सोडावे लागले, गरिबीत मराठा समाजाने दिलेला आधार आणि आई-मामांच्या खंबीर पाठिंब्यामुळे इथपर्यंत पोहोचलो – कामत यांची भावूक आठवण.

समाजसेवेची सुरुवात: १९८५ मध्ये युवक मंडळापासून सुरू झालेला प्रवास आज जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत पोहोचला आहे.

अखंड व्रत: “श्वास असेपर्यंत समाजकार्य सुरूच राहील आणि समाज बांधवांच्या हाकेला सदैव ओ देईन,” अशी दिली ग्वाही.

🤝 मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला सौ. कामत, रघुवीर मंत्री, सुनील सौदागर, सुधीर झांटे यांच्यासह सारस्वत समाजातील अनेक मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा!’ कोल्हापूरच्या शाहूवाडीत १२ एप्रिलला भव्य शेतकरी परिषद

सावंतवाडी दि.०३: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी येत्या १२ एप्रिल रोजी शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथे “शेती वाचवा, शेतकरी वाचवा” या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत शेतकरी प्रश्नांवर मोठा एल्गार पुकारला जाणार असल्याची माहिती संघटक समितीचे प्रमुख कॉ. अतुल दिघे, बी. के. आमरे आणि धोंडीबा कुंभार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शेतकरी नेते खासदार राजाराम सिंग असणार आहेत, तर परिषदेचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील हे स्वागताध्यक्ष असून, अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव पुरुषोतम शर्मा, राजेंद्र बावके, उद्धव शिंदे, किशोर ढमाले आणि एस. व्ही. जाधव यांसारखे दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ऐरणीवर परिषदेत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करून लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे:
वन्यजीव संघर्ष: जंगली प्राण्यांचे वाढते हल्ले, पिकांचे नुकसान आणि मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई.
जमीन संपादन: महामार्ग व विविध प्रकल्पांसाठी कवडीमोल भावाने होणारे शेतजमिनींचे संपादन.
आर्थिक संकट: बियाणे, खते व औषधांचे वाढते दर आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव.
पर्यावरण ऱ्हास: बेकायदेशीर जंगलतोड, खाणकाम आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे शेती व मत्स्यव्यवसायावर होणारे दुष्परिणाम.
स्वामीनाथन आयोग: आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ.
कोकणातील शेतकऱ्यांना आवाहन यापूर्वी कोकणातील काजू आणि आंबा उत्पादकांनी आपापल्या परीने आंदोलने करून या प्रश्नांची तीव्रता सरकारला दाखवून दिली आहे. मात्र, आता एकत्रित धोरण आखून निर्णायक लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि कोकण विभागातील शेतकरी, महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शाहूवाडी येथील परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन कॉ. अतुल दिघे, बी. के. आमरे व धोंडीबा कुंभार यांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 महावितरणचा गलथान कारभार! उघड्या डीपीमुळे सावंतवाडीकरांचा जीव टांगणीला!

उघडा डिपी
शब्बीर मणियार📍 सावंतवाडी बुराण गल्ली दि.०३:सावंतवाडी शहरातील बाहेरचा वाडा, बुराण गल्ली परिसरात महावितरणचे दोन डीपी बॉक्स उघड्या अवस्थेत असून यामुळे मृत्यूला निमंत्रण मिळत आहे. या गंभीर प्रश्नावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

⚠️ काय आहे धोका?
रहिवासी भागात डीपीचे बॉक्स पूर्णपणे उघडे.
लहान मुले आणि नागरिकांची सतत वर्दळ.
चुकून स्पर्श झाल्यास जागीच मृत्यू ओढवण्याची भीती.
जाहीर इशारा! 👊
“जर हे डीपी बॉक्स तातडीने बंदिस्त केले नाहीत, तर महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याला कार्यालयात बसू देणार नाही!”
— शब्बीर मणियार (जिल्हा संघटक, ठाकरे शिवसेना)

ठाकरे सेनेने आता थेट महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला असून प्रशासकीय दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.वीज महावितरण प्रशासन आता तरी जागी होणार का?

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत अवकाळीचा तडाखा; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, आंबा-काजू बागायतदार चिंतेत

सावंतवाडी दि.०२: राज्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सावंतवाडी शहरासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शहरात नागरिकांची मोठी धावपळ उडाली, तर दुसरीकडे या पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बाजारपेठेत उडाली तारांबळ
दिवसभर कडक ऊन आणि उकाडा जाणवत असतानाच, सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि रत्यावरील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. पावसामुळे व्यापाऱ्यांनाही आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ करावी लागली.

बळीराजा संकटात
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. सध्या कोकणात आंबा आणि काजूचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने बागायतदार धास्तावले आहेत. पावसामुळे आंबा आणि काजूच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची आणि तयार फळांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे अधिकच चिंतेत पडला आहे.

वातावरणात गारवा
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज झालेल्या या पावसामुळे वातावरणात लक्षणीय बदल झाला असून परिसरात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास सतर्कतेचा इशारा दिला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची उत्तुंग भरारी! ४३० कोटींचा व्यवसाय पूर्ण! 🚀💰

बाबुराव कविटकर, चेअरमन
सुनील राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी

सावंतवाडी दि.०२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य अर्थवाहिनी असलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. संस्थेने ४३० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय पूर्ण करत सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.

📈 आर्थिक वर्षातील ठळक यश:एकत्रित व्यवसाय: ४३० कोटी रुपये.ढोबळ नफा (Gross Profit): ४ कोटी रुपये.रोजगार निर्मिती: १५७ कर्मचारी आणि १६० हून अधिक कमिशन एजंट्सना दिला आधार.

✨ सभासदांसाठी आनंदाची बातमी:
चेअरमन श्री. बाबुराव कविटकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील राऊळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सभासदांना गेल्या वर्षापेक्षा जास्त लाभांश (Dividend) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सक्षमीकरण निधीचीही तरतूद केली आहे.

जिल्ह्यातील ३०० हून अधिक कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार आणि तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणाऱ्या सैनिक पतसंस्थेच्या या यशात सर्व ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांचा मोलाचा वाटा आहे.
सभासदांना मिळणार जादा लाभांश

​संस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील राऊळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सभासदांना चालू वर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त स्वरूपात लाभांश (Dividend) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
​या यशाबद्दल बोलताना व्हाइस चेअरमन श्री. चंद्रकांत शिरसाट, संचालक श्री. दीनानाथ सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. भिवा गावडे, श्री. चंद्रशेखर जोशी, श्री. संतोष मुसळे, श्री. शामसुंदर सावंत, श्री. बाबु वरक, श्री. शांताराम पवार आणि श्री. गोपाळ बाईत यांनी सिंधुदुर्गवासीयांचे आणि संस्थेच्या हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563