सावंतवाडी दि.३०: अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक प्रा. रूपेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी सावंतवाडी येथील पर्णकुटी शासकीय विश्रामगृहावर आयोजित विशेष कार्यक्रमात ही घोषणा केली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव
यावेळी संघटनेच्या कोकण विभागातील अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचीही अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये
कोकण विभाग अध्यक्ष: प्रा. रूपेश पाटील जिल्हाध्यक्ष: भरत केसरकर
कोकण विभाग संघटक: राजेश नाईक (ज्येष्ठ पत्रकार)
सावंतवाडी तालुका अध्यक्ष: सिद्धेश सावंत,तालुका संघटक: आनंद धोंड यांची निवड जाहीर केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सिताराम गावडे यांच्यासह कोकण विभागातील अनेक मान्यवर पत्रकार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डिजिटल पत्रकारितेला मिळणार बळ
प्रा. रूपेश पाटील आणि इतर अनुभवी पत्रकारांच्या नियुक्तीमुळे कोकण पट्ट्यातील डिजिटल पत्रकारितेला आता अधिक संघटित स्वरूप प्राप्त होणार आहे. या निवडीबद्दल सर्वाचे अभिनंदन होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



मुंबई दि.३०: सिंधुदुर्गच्या राजकारणातील बडे नाव आणि माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी अखेर दीड वर्षांचा राजकीय अज्ञातवास संपवून पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
कणकवली दि.३०: कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्या चे भूमिपूजन आणि प्लॅटफॉर्म नजीकच्या वातानुकूलीत वेटींग रूम चा शुभारंभ करण्यात आला.
कणकवली दि.३०: कणकवली-नरडवे रोडवरील कनकनगर येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका चालत्या कारला अचानक आग लागल्याची भीषण घटना घडली. ही कार सीएनजीवर चालणारी असून, आगीत कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
सावंतवाडी दि.२९: तालुक्यातील ओवळीये-मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून एक भीषण हत्याकांड घडले. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा कोयत्याच्या वारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (३७) यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सावंतवाडी दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे, माळकरवाडी येथे शुक्रवार, ३ एप्रिल आणि शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी ‘निरवडे महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कलागुणांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
सावंतवाडी दि.२९: अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भरत केसरकर यांची पुनश्च एकदा निवड करण्यात आली आहे. कोकणातील डिजिटल पत्रकारितेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, सावंतवाडी येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
🎨 🚩कोल्हापूर दि.२९:भारताच्या १७ राज्यांतील अद्भुत हस्तकलेचा वारसा एकाच छताखाली पाहण्याची सुवर्णसंधी! श्री सिद्धगिरी संस्थान (कणेरी मठ) आणि महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय घेऊन येत आहेत – ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’.