25 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 63

शिरोडा परिसरात गांजा, चरस, अंमली पदार्थ रात्रौ राजरोसपणे विक्री; तात्काळ आळा घाला ग्रामस्थांची मागणी

वेंगुर्ला : पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना निवेदन देताना शिरोडा ग्रामस्थ

वेंगुर्ला दि.२९:तालुक्यातील
शिरोडा गावात अमली पदार्थ विक्री व गैर व्यवसाय सुरु आहेत व ही बाब गंभीर आहे. याबाबत शिरोडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेंगुर्ला पोलिसांना निवेदन देत लक्ष वेधले आहे.
शिरोडा गावात ब-याच ठिकाणी चायनीय सेंटर, समुद्र किनारी, मिठागर परिसर, उपजिल्हा रुग्णालय शिरोडाच्या मागील बाजूस या परिसरात गांजा, चरस, अंमली पदार्थ रात्रौ राजरोसपणे विक्री करुन सेवन केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत शिरोडा परिसरात नागरिकांच्या असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या प्रकारामुळे अमली पदार्थ विक्री करणा-यांकडून गुंडगिरी करुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पर्यटनदृष्टया महत्वाच्या असलेल्या शिरोडा गावात अनैतिक धंद्यांना आळा घालावा, अन्यथा या विरुद्ध मोठे आंदोलन करण्यातं येईल. शिरोडा गावात अमली पदार्थ विक्री सह गैर व्यवसाय सुरु असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत त्वरित पुढील कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिरोडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिरोडा ग्रामस्थ अमोल परब, दत्तगुरु परब, मयुरेश शिरोडकर, भिवा गावडे, भरत शेटये, माजी उपसरपंच राहुल गावडे, अमित गावडे, कौशिक परब, गणपत साळगावकर, प्रशांत गावडे, देऊ परब, दीक्षांत परब, विजय परब, उद्धव परब, सचिन जेठे, वेदांत परब, निखिल गावडे, ओम परब, आदित्य घोडके,माजी सरपंच मनोज उगवेकर आदी उपस्थित होते.दरम्यान शिरोड्यातील गंभीर प्रकाराबाबत त्वरित दखल न घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांची सोमवारी भेट घेण्यात येणार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https: // akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563

 

🚩 सावंतवाडी भाजपमध्ये संदीप एकनाथ गावडे यांची विधानसभा प्रमुख पदी महत्त्वाची नियुक्ती! 🚩

संदीप  एकनाथ गावडे

सावंतवाडी दि.२८: विधानसभा क्षेत्रासाठी संदीप एकनाथ गावडे यांची मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत BLA 1 (विधानसभा प्रमुख) पदी निवड. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मतदार यादी पुनर्निरीक्षण’ (SIR) अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप एकनाथ गावडे यांची BLA 1 (विधानसभा प्रमुख) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून २६ मार्च २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत पत्र निर्गमित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्ती पत्र देण्यात आले असून, या नियुक्तीबद्दल संदीप गावडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीकरांसाठी पालिकेची खास भेट; आता ‘सक्शन मशीन’द्वारे कमी दरात होणार स्वच्छता!

सावंतवाडी दि.२८: शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शहरातील घरगुती व सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी आता पालिकेचे स्वतःचे आधुनिक ‘सक्शन मशीन’ दाखल झाले आहे. पालिकेच्या या पुढाकारामुळे आता नागरिकांना अत्यंत माफक दरात ही सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली.

खाजगी ठेकेदारांच्या जाचातून सुटका
यापूर्वी शहरात शौचालय उपसण्यासाठी खाजगी ठेकेदारांकडून मशीन भाड्याने घेतली जात होती. यासाठी नागरिकांना मोठा खर्च करावा लागत असे. मात्र, आता पालिकेने स्वतःचे अडीच हजार लिटर क्षमतेचे मशीन खरेदी केल्याने सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात ही सेवा मिळणार आहे.

अरुंद गल्ल्यांमध्येही पोहोचणार सेवा
शहरातील अंतर्गत भागातील रस्ते आणि गल्ल्या अरुंद असल्याने मोठ्या गाड्या तिथे पोहोचू शकत नव्हत्या. मात्र, हे नवीन मशीन आणि गाडी आकाराने छोटी असल्यामुळे शहरातील कोणत्याही कोपऱ्यात ती सहजपणे फिरवता येणार आहे. या गाडीवर पालिकेचे कर्मचारीच कार्यरत राहणार असल्याने कामकाजात पारदर्शकता आणि तत्परता राहील.

सोमवारी होणार लोकार्पण
शनिवारी या नवीन गाडीची पाहणी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली. येत्या सोमवारी नगराध्यक्ष आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या मशीनचे रितसर उद्घाटन करण्यात येणार असून, त्याच दिवसापासून ही सेवा जनतेसाठी खुली केली जाईल, असे आडीवरेकर यांनी स्पष्ट केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 सावंतवाडीचा ऐतिहासिक वारसा धोक्यात! मोती तलावाचा १५० वर्षांचा काठ खचतोय… 🌊💔

सावंतवाडी दि.२८: ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या मोती तलावाचा दगडी काठ आता शेवटच्या घटका मोजत आहे. दीडशे वर्षांपूर्वीचे हे ऐतिहासिक बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत असून, याला कारणीभूत ठरत आहेत तलावाच्या काठावरील खोलवर गेलेली अशोक वृक्षांची झाडे!

🧐
काठ खचला: राजवाडा ते उपजिल्हा रुग्णालय परिसरातील दगडी भाग आधीच कोसळला आहे. आता कोर्ट परिसर आणि नगरपालिकेसमोरील दगडी बांधकामालाही मोठे तडे गेले आहेत.

झाडांची मुळे: अनेक वर्षांपासून असलेल्या अशोक वृक्षांची मुळे तलावाच्या पायापर्यंत पोचल्याने दगडी चिरे निखळू लागले आहेत.

पाणी ओसरल्याने वास्तव समोर: मार्च महिन्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे खचलेला पाया प्रकर्षाने दिसून येत आहे.
प्रभारी नगराध्यक्षांची भूमिका: 🗣️
प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. “धोकादायक झाडे काढून त्याजागी पर्यावरणाला पूरक आणि गार सावली देणारी नवीन झाडे लावल्यास काठ वाचवता येईल,” असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचा निर्णय आता वृक्ष प्राधिकरण कमिटीच्या अभ्यासानंतर घेतला जाईल.

सावंतवाडीकरांची मागणी: 🏛️
“नुसत्या सिमेंटच्या भिंती नकोत, तर तलावाला त्याचा ‘दगडी लूक’ (Stone Look) परत मिळावा!” ऐतिहासिक वारसा जपताना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सुशांत दळवी खून प्रकरण: तपासात टाळाटाळ केल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू; वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांचा इशारा

कणकवली दि.२८: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली असून, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने न झाल्यास पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथील ‘विजय भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तपासाबाबत संशयाचे वातावरण
सुशांत दळवी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असले, तरी पोलीस ठोस माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. “पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी येऊन गेल्यानंतरही तपासाची दिशा स्पष्ट का केली जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

धमकीचा अँगल आणि राजकीय दबाव?
नाईक यांनी धक्कादायक माहिती देताना सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याने सुशांत दळवी यांना धमकी दिली होती. यासंदर्भात दळवी यांनी रीतसर पोलीस तक्रारही दाखल केली होती. असे असतानाही पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने का पाहत नाहीत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

चर्चेचा बाजार आणि पोलिसांची भूमिका
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध चर्चांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले:
“या खुनामागे मायनिंग किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमधील वादाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. आम्ही तपासात अडथळा आणू इच्छित नाही, मात्र जर पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन वेळकाढूपणा केला, तर आम्ही शांत बसणार नाही.”

उपस्थित पदाधिकारी या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे (ठाकरे) पदाधिकारी सचिन सावंत, राजू राठोड, नगरसेवक संकेत नाईक यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.

थोडक्यात ठळक मुद्दे:
आरोप: पोलीस तपासाची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा.
इशारा: तपास योग्य दिशेने न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा.
महत्त्वाची कडी: दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी नेत्याने दिलेल्या धमकीचा मुद्दा ऐरणीवर.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीतील शाळा आता होणार ‘स्मार्ट’! 💻✨

सावंतवाडी दि.२८: शहरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि डिजिटल शिक्षणाची कवाडं खुली करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि विशेष पाठपुराव्यातून सावंतवाडीतील दोन प्रमुख शाळांना अद्ययावत संगणक प्रणाली प्रदान करण्यात आली.

📍 या शाळांना मिळाला लाभ:
१. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ (भटवाडी)
२. वि. स. खांडेकर विद्यालय, सावंतवाडी

आज शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते या संगणकांचे वितरण करण्यात आले.

नगरपरिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती श्रीमती दिपाली भालेकर आणि श्री. दिलीप भालेकर यांनी या दोन्ही शाळांच्या तांत्रिक गरजा ओळखून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही माहिती तंत्रज्ञानाचे धडे गिरवता येणार आहेत.

✨ उपस्थित मान्यवर याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

निरवडे येथे ४ फूट लांब मगर आढळली; वनविभागाकडून जेरबंद

सावंतवाडी, दि.२८ : कोकण रेल्वे स्थानक परिसरातील निरवडे येथे आज सायंकाळी सुमारे चार फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यात थेट मानवी वस्तीत मगर दिसून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यावरील बंद घराशेजारील अंगणात संशयास्पद हालचाल दिसल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता ती मगर असल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच मगरीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.
मळगाव–निरवडे रेल्वे स्थानक परिसर व आसपासचा नैसर्गिक अधिवास लक्षात घेता, भक्ष्याच्या शोधात ही मगर नागरी वस्तीत शिरली असावी, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या जलद कृती पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनअधिकारी बबन रेडकर यांनी आवश्यक खबरदारी घेत मगरीला सुरक्षितपणे पकडले व तिची जेरबंदी करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी टळली असून, मगरीला ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 पुणे-कोकण रेल्वेला ‘खो’ आणि बिहारच्या गाड्यांना ‘ओ’! मध्य रेल्वेचा मराठी माणसावर उघड अन्याय! 🚨

पुणे दि.२८: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरूच आहे. *पुण्यातून कोकणासाठी गाडी नाकारून, मध्य रेल्वेने आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करत मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.*

*काय आहे मध्य रेल्वेचा नवा डाव?*

१. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे-कोकण दरम्यान रोजची ट्रेन सुरू करण्याची मागणी केली असता, मध्य रेल्वेने पुण्यात ‘टर्मिनलची अडचण’ आणि ‘मार्गाची अडचण’ (Path constraints) असल्याचे कारण सांगून कोकणच्या गाडीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

२. पण संतापाची बाब म्हणजे, याच ‘अडचणी’ असलेल्या पुणे स्टेशनवरून ११४३१/११४३२ पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेस मंजूर करण्यात आली आहे. जी आधी स्पेशल म्हणून सुरू होती.

३. विशेष म्हणजे ही गाडी ‘मध्य रेल्वेच्या मालकीची’ (CR Owning) आहे. याचा सरळ अर्थ असा की, या बिहारला जाणाऱ्या गाडीचे मेंटेनन्स (देखभाल) पुण्यातच होणार आहे.

४. पुण्यात आधीच जागा नसताना हा मेंटेनन्स आणि पार्किंगचा स्लॉट बिहारच्या गाडीला दिल्यामुळे, आता भविष्यात महाराष्ट्रातील किंवा कोकणातील गाड्यांसाठी मध्य रेल्वेकडे क्षमताच उपलब्ध राहणार नाही! हा कोकणवासीयांवर अन्याय नाही तर काय आहे?

*पैसा महाराष्ट्राचा, फायदा परप्रांतीयांचा?*
कोणत्याही नवीन रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र राज्य शासन ५०% आर्थिक वाटा उचलते. मग या रेल्वे प्रकल्पांचा आणि पायाभूत सुविधांचा पहिला फायदा राज्यातील जनतेला, इथल्या भूमिपुत्रांना व्हायला नको का? आपल्याच घामाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या सुविधांचा लाभ उत्तरेकडील राज्यांना का?

*महाराष्ट्रातील गाड्यांना सापत्न वागणूक!*
हा दुजाभाव केवळ कोकणापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या ‘नांदेड-पुणे’ आणि ‘पुणे-हरंगुळ’ एक्सप्रेस यांसारख्या हक्काच्या गाड्या मुख्य पुणे स्टेशनवरून चक्क बाहेर ‘हडपसर’ला फेकल्या गेल्या. स्वतःच्याच राज्यातील प्रवाशांना अशी दुय्यम वागणूक का? परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मुख्य स्टेशनवर रेड कार्पेट आणि महाराष्ट्राच्या गाड्यांना मात्र हद्दपारी? मध्य रेल्वे महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर एवढा दुजाभाव का करत आहे?
मराठी माणसाची आणि कोकणी चाकरमान्यांची ही गळचेपी आता सहन करण्यापलीकडे गेली आहे. हा अन्याय असाच खपवून घ्यायचा का?

*(हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा आणि या अन्यायाविरुद्ध तमाम मराठी बांधवांनी एकत्र आवाज उठवा!) 📢🚆🚩*

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मोठी बातमी: रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा

पुणे दि.२८: अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या मोठे अडचणीचे ठरले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाची पदे गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
अशोक खरात यांना ‘गुरुस्थानी’ मानल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणावरून केवळ विरोधकांनीच नव्हे, तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गतही त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटला होता. पक्षाची प्रतिमा डागाळू नये, यासाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.

दुहेरी धक्का
महिला आयोग: या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सर्वात आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

पक्षीय पद: आयोगाचा राजीनामा देऊन २४ तास उलटत नाहीत तोच, आज त्यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही त्याग केला आहे.

“अशोक खरात प्रकरणामुळे पक्षात आणि जनमानसात निर्माण झालेली नाराजी पाहता, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.”

पक्षासमोर पेच
रुपाली चाकणकर यांनी एकापाठोपाठ एक दोन्ही पदांचे राजीनामे दिल्याने आता महिला प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर महिला आघाडीचे नेतृत्व रिकामे झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवीन चेहरा शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

इंधन-गॅस टंचाईवरून सावंतवाडीत शिवसेना (ठाकरे) आक्रमक; तहसीलदारांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी दि.२७: तालुक्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे सामान्य जनतेसह शेतकरी आणि मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि चंद्रकांत कासार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी तालुका प्रमुख राजू शेटकर, विनोद काजरेकर, विनोद ठाकूर, सुनील गावडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बळीराजा आणि मच्छीमार संकटात
शासकीय स्तरावरून इंधनाची टंचाई नसल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत विदारक आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार:

गॅससाठी वनवण: सिलिंडरसाठी ग्राहकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी बुकिंग करूनही महिनाभर सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे हाल होत आहेत.

शेतीचे नुकसान: इंधन टंचाईमुळे आंबा आणि काजू बागायतदारांना आपला माल बाजारात नेण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नाहीत. परिणामी, तयार पीक शेतातच कुजण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

मच्छीमारी ठप्प: डिझेलअभावी मच्छीमार बांधवांच्या नौका किनाऱ्यावरच उभ्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

व्हीआयपी संस्कृतीवर कडक टीका
“सामान्य माणूस इंधनासाठी वणवण फिरत असताना, मंत्री आणि शासकीय अधिकारी मात्र गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत आहेत. त्यांना या टंचाईची कोणतीही झळ पोहोचत नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकेला इंधन मिळत नाही, मग मंत्र्यांच्या ताफ्याला इंधन कोठून येते?” असा जळजळीत सवाल या निवेदनातून विचारण्यात आला आहे.

चौकट
प्रमुख मागण्यामध्ये १. शेतकरी व मच्छीमारांना व्यवसायासाठी मुबलक इंधन साठा प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा. २. नागरिकांची सोय व्हावी यासाठी सर्व शासकीय दाखले ग्रामपंचायत स्तरावरच मिळण्याची व्यवस्था करावी. ३. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी गाड्यांचा ताफा कमी करून शासकीय दौऱ्यात एकाच गाडीचा वापर करावा. ४. रुग्णवाहिकांसाठी राखीव इंधन कोटा ठेवून ती सेवा तत्काळ उपलब्ध करून द्यावी. ५. प्रलंबित गॅस सिलिंडर नागरिकांना त्वरित घरपोच मिळतील याची चोख व्यवस्था करावी.
चौकट: आंदोलनाचा इशारा “सर्व काही अलबेला आहे,” असे उत्तर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिल्यानंतर रुपेश राऊळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती प्रशासनासमोर आणण्यासाठी लवकरच पेट्रोल-डिझेल पंप आणि गॅस कार्यालयांसमोर शिवसेना (ठाकरे) व जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

फोटो ओळ: सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना लेखी निवेदन सादर करताना शिवसेना (ठाकरे) विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ. सोबत चंद्रकांत कासार, राजू शेटकर, विनोद ठाकूर, विनोद काजरेकर व अन्य.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563