24.8 C
New York
Saturday, June 6, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 65

माजगाव येथील श्री दत्त मंदिराचा शिलान्यास सोहळा उत्साहात संपन्न

माजगाव येथील श्री दत्त मंदिराचा शिलान्यास व पूजन करताना आमदार दीपक केसरकर सोबत विक्रांत सावंत आणि दत्तभक्त ग्रामस्थ

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पूजन; विक्रांत सावंत यांचीही प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी दि.०५: तालुक्यातील माजगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त मंदिराच्या भव्य पुनर्बांधणीचा शुभारंभ अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात करण्यात आला. या नूतन मंदिराचा शिलान्यास सोहळा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

नूतनीकरण: जुन्या मंदिराच्या जागी आता एक सुसज्ज, भव्य आणि देखणे मंदिर साकारले जाणार आहे.
प्रमुख उपस्थिती: या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिलान्यास सोहळा पार पडल्यानंतर आता मंदिराचे प्रत्यक्ष बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

“माजगाव येथील श्री दत्त मंदिराची पुनर्बांधणी हे एक पवित्र कार्य आहे. या कार्यासाठी सर्व ग्रामस्थांचे मिळत असलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. हे मंदिर परिसराच्या आध्यात्मिक वैभवात भर घालेल.” — दीपक केसरकर, आमदार

या सोहळ्यामुळे माजगाव परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लवकरच या ठिकाणी एक भव्य वास्तू उभी राहिलेली पाहायला मिळणार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑

*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com

———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*◾
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*

https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*

*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887

आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाडया

सिंधुदुर्ग दि.०५: आंगणेवाडी यात्रा २०२६ दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाडया चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

यात्रेकरू आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव जंक्शन दरम्यान साप्ताहिक विशेष गाडया धावणार आहेत.
ट्रेन क्र. 01004 मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक ही विशेष ट्रेन दि. 7 आणि 9 फेब्रुवारी रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 01003 लोकमान्य टिळक-मडगाव जं्शन ही विशेष ट्रेन दि. 8 आणि 10 फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 7.55 वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री 12.00 वाजता मडगाव जं्शनला पोहोचेल. या विशेष गाडया करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाडयांची रचना एकूण 22 कोचांची असून त्यामध्ये 20 स्लीपर कोच आणि 2 एसएलआर कोच असणार आहेत. ट्रेन क्र. 01004 चे आरक्षण दि. 4 फेब्रुवारीपासून सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम, इंटरनेट व आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू झाली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑

*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com

———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*◾
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*

https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*

*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887

पैशाने नव्हे, तर प्रेमाने माणसे जोडल्याचा मला सार्थ अभिमान;

भाजप उमेदवार विक्रांत विकासभाई सावंत यांचे प्रतिपादन

सावंतवाडी दि.०४: “आमच्या कुटुंबाला तीन पिढ्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेताना मी राजकारणाकडे कधीही पैसा कमावण्याचे साधन म्हणून पाहिले नाही. निवडणुकीच्या रिंगणात मी पारदर्शकतेचा आदर्श घेऊन उतरलो असून, पैशाने नव्हे तर प्रेमाने माणसे जोडता येतात, याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे परखड मत जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले.

विक्रांत सावंत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या राजकीय भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर नाव न घेता निशाणा साधला.

वारसा प्रामाणिक सेवेचा
सावंत म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक दशके प्रामाणिकपणे काम केले आहे. याच संस्कारांच्या शिदोरीवर ते जनतेसमोर जात आहेत. “राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे, संपत्ती गोळा करण्याचा अड्डा नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाचा संकल्प
निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या पैशांचा व वशिल्याचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. यावर भाष्य करताना सावंत म्हणाले:

“मी निवडणुकीच्या मैदानात पारदर्शक आणि स्वच्छ राजकारणाचा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी उतरलो आहे. काळे धंदे, गैरमार्ग किंवा पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा माझा कोणताही विचार नाही. जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास हीच माझी खरी कमाई आहे.”

जनतेच्या प्रेमावर विश्वास
“माणसे पैशाने विकत घेता येतात हा काहींचा भ्रम असू शकतो, मात्र प्रेमाने जोडलेली माणसे कायम सोबत राहतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून विक्रांत सावंत यांनी मतदारांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

मुलांमधील कलागुणांना वाव दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास शक्य – तहसीलदार श्रीधर पाटील

निरवडे संस्कार नॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळ्याचे उद्घाटन करताना मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री धर्माचार्य आणि विश्व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष योगेंद्र महंतजी , सोबत श्रीधर पाटील, डॉ. शेखर जैन, अनंत सोहनी, हरी वारंग, प्रणाली रेडकर, सागर चव्हाण, हरिश्चंद्र पवार, चंदन गोसावी संदेश घाडी व अन्य मान्यवर

 सावंतवाडीच्या ‘संस्कार नॅशनल स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी दि.०४:“आजच्या पालकांनी आपल्या मुलांमधील उपजत कलागुण ओळखून त्यांना त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांच्या आवडीला आणि कलेला वाव दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास निश्चितपणे घडू शकतो,” असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ग्रामीण भागातील एक आदर्श शाळा – योगेंद्र महंतजी माजी कॅबिनेट मंत्री कार्यक्रमाचे उद्घाटन मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री धर्माचार्य आणि विश्व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष योगेंद्र महंतजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी प्रशालेचे कौतुक केले. ते म्हणाले की, “संस्कार नॅशनल स्कूल हे एक आदर्श विद्यालय असून ग्रामीण भागात इतक्या दर्जेदार सोयी-सुविधा आणि शिक्षण देणे ही कौतुकास्पद बाब आहे. खऱ्या अर्थाने हे विद्यालय एक आदर्शवत शाळा म्हणून नावारूपास येत आहे.”

गुणवंतांचा गौरव आणि सांस्कृतिक मेजवानी: या सोहळ्यात प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बक्षीस वितरणानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. त्यांच्या नृत्याविष्काराने आणि कलागुणांनी उपस्थित पालक आणि मान्यवरांची मने जिंकली.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन, अनंत सोहनी, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग, मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर, पत्रकार सागर चव्हाण, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, चंदन गोसावी संदेश घाडी ( उपाध्यक्ष पालक शिक्षक समिती),सौ. ऋतुजा मुळीक ( उपाध्यक्ष माता पालक समिती)यांसह अनेक मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रशालेच्या प्रगतीचा आढावा मुख्याध्यापकांनी सादर केला. या दिमाखदार सोहळ्यामुळे निरवडे परिसरात शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी या सोहळ्याचे सूत्रसंचालन जुहीली पांगम ,हर्षदा खवणेकर,आभार प्रदर्शन – पांडुरंग मिशाळ यांनी केलें.

 

लोकप्रतिनिधीच ठेकेदार झाल्याने विकासकामांचा दर्जा खालावला!

कोलगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा सोबत कार्यकर्ते.

अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांचा घणाघात; ‘फूड कोलगाव मतदारसंघात रोजगारावर भर देणार; प्रोसेसिंग’द्वारे तरुणांना कामाची संधी देणार

सावंतवाडी दि.४ : “मतदारसंघात सिमेंट-काँक्रीटची कामे दिसत असली, तरी रोजगाराच्या अभावामुळे इथली घरे रिकामी होत आहेत. गेल्या काही वर्षांत लोकप्रतिनिधीच स्वतः ठेकेदार बनल्यामुळे कामांचा दर्जा खालावला असून जनतेच्या पैशाची लूट होत आहे,” अशी सडेतोड टीका कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी केली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रोजगाराला प्राधान्य: निवडून आल्यास मतदारसंघात ‘फूड प्रोसेसिंग युनिट’ (अन्न प्रक्रिया उद्योग) सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगाराची दालने खुली करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निकृष्ट कामांचा पर्दाफाश: विकास ही निरंतर प्रक्रिया असली, तरी सध्याचे लोकप्रतिनिधी स्वतःच ठेकेदारीत गुंतले आहेत. मलाई खाण्याच्या नादात कामांकडे दुर्लक्ष झाल्याने मतदारसंघ मागे राहिला आहे, असा आरोप डिसोजा यांनी केला.

नागरी समस्यांवर प्रहार: कोलगाव परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांना रस्ते आणि पथदीपांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. कारीवडे येथील कचरा प्रकल्प हलवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सेवेचा वारसा: कोविड काळात राजकारण न पाहता ऑक्सिजन बेड आणि मदतीचा हात दिला होता. विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला शैलेश टिळवे, बबन डिसोजा, मेघश्याम काजरेकर, दिनेश घोगळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

“ही निवडणूक वैयक्तिक टिकेची नसून कोलगावच्या अस्तित्वाची आणि विकासाची आहे. ७ फेब्रुवारीला होणारी निवडणूक शांततेत पार पडेल आणि जनता विकासाला साथ देईल, याची मला खात्री आहे.” — मायकल डिसोजा

राष्ट्रीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत ग्रेटा कर्पे हिला सुवर्ण

ग्रेटा कर्पे

सावंतवाडी दि.०४: 5वी राष्ट्रीय सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या स्पर्धेत ग्रेटा महेश कर्पे हिने सुवर्णपदक पटकावले. ती कुपवाड येथील जिद्द स्पोर्ट्स फौंडेशनची खेळाडू आहे.
या स्पर्धा महा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील तसेच हरियाणा, पंजाब आदी राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील एअर शिल्ड प्रकारात ग्रेटा हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यासाठी तिला महाराष्ट्र राज्य प्रमुख मिलिंद काटमोरे, सांगली जिल्हा अध्यक्षा काजल लोंढे, सचिव प्रथमेश लोंढे, पारस माने, वैभव शिंदे, शुभम लांडगे आदींचे मार्गदर्शन, तसेच वडील महेश व आई स्वाती यांचे प्रोत्साहन लाभले.

*’कमळ’ फुलणारच!* *विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग

भाजप युवा नेते विशाल परब याचा दोडामार्ग तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा

*दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशाल परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह*

दोडामार्ग दि. ०४: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात झंझावाती दौरा केला. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, ठिकठिकाणी होणाऱ्या गाठीभेटींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना विशाल परब यांनी विश्वास व्यक्त केला की,दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. जनतेचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर पूर्ण विश्वास असून, हा विश्वास आगामी निवडणुकीत आशीर्वादाच्या रूपाने मतांमधून नक्कीच दिसून येईल. महायुतीचा सर्व कार्यक्षम नेतृत्व उमेदवार जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देईल.

या झंझावाती दौऱ्यात विशाल परब यांच्यासोबत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये भाजपा जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार दिपक गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, ज्येष्ठ नेते रंगनाथ गवस,
युवा पदाधिकारी देवा शेटकर आदी उपस्थित होते. यावेळी गावागावात झालेल्या कोपरा सभा आणि गाठीभेटींमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. दोडामार्ग तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि पाठिंबा पाहता, महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

लोकनेते भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती उत्साहात

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील समाधीस्थळी लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आमदार दीपक केसरकर सोबत विक्रांत सावंत, संजू परब, बबन साळगावकर,अमोल सावंत, अशोक दळवी, संदीप राणे आदी

माजगाव समाधी स्थळी मान्यवरांची मांदियाळी

सावंतवाडी दि.०४ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री, लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती बुधवारी माजगाव येथील त्यांच्या प्रेरणा समाधी स्थळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

पुष्पांजली आणि अभिवादन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या समाधीवर आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकनेते भाईसाहेब सावंत यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी कोकणच्या विकासासाठी दिलेले योगदान यावेळी अधोरेखित करण्यात आले.

याप्रसंगी भाईसाहेब सावंत प्रेमी, त्यांचे नातेवाईक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश होता.राजकीय व सामाजिक नेतृत्व: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बबन साळगावकर, अमोल सावंत, प्रदीप सावंत, अजित सावंत.

शिक्षण व अन्य क्षेत्रातील व्ही. बी. नाईक, चंद्रकांत नाईक, अशोक दळवी, ॲड. दिलीप नार्वेकर, संजय कानसे, रवींद्र म्हापसेकर, संदीप राणे, डॉ. दिनेश नागवेकर.इतर मान्यवर: प्रसाद सावंत, म. ल. देसाई, राजू कुबल, सचिन बिर्जे, संजय लाड, अर्चित पोकळे, मेघश्याम काजरेकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, एस. पी. नाईक, प्रा. सतीश बागवे आदी.यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाईसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.माजगांव समाधी स्थळ परिसरात यावेळी अत्यंत प्रेरणादायी वातावरण होते.

 

 

💫​स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!!💐🙏 _

🙏!!…विनम्र अभिवादन…!!🙏अखंड हिंदुस्तान लाईव्ह स्पेशल🙏!!…विनम्र अभिवादन…!!🙏

💫​स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!!💐🙏 _

♦️-:शुभेच्छुक:-♦️_ _*💫अध्यक्ष, उपाध्यक्ष, समस्त संचालक मंडळ, अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग*_

_*💫​राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!💐🪷

🙏 विनम्र अभिवादन…!🙏अखंड हिंदुस्तान लाईव्ह स्पेशल🙏🙏 विनम्र अभिवादन…!🙏🙏

स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!💐🪷

:- विनम्र अभिवादन ❗:-

**श्री. विक्रांत विकासभाई सावंत अध्यक्ष : शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी.

*नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान* , सावंतवाडी.जि.सिंधुदुर्ग.

*शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल सावंतवाडी.जि.सिंधुदुर्ग.