कुडाळ,दि.२४: तालुक्यातील नेरूर-कांडरीवाडी येथील प्रगतशील शेतकरी गोविंद वासुदेव नाईक (वय ७५) यांचे झाडावरून पडून निधन झाले. नेरूर परिसरात ‘काका नाईक’ या नावाने परिचित असलेल्या गोविंद नाईक यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद नाईक हे आपल्या घरासमोरील शेतात असलेल्या झाडावर चढले होते. मात्र, काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते कॉनबॅकचे कर्मचारी मंगेश नाईक यांचे वडील, तर पत्रकार अजय सावंत यांचे सासरे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, वहिनी, सुना, पुतणे, पुतणी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक कष्टाळू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपल्याने नेरूर पंचक्रोशीतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.२४: सिंधुदुर्ग जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असल्याने येथील रुग्णांना अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेसाठी गोवा किंवा मुंबईची वाट धरावी लागते. ही उणीव भरून काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत आयोजित ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी’ तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ९४७ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून, अत्याधुनिक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा लाभ दुर्गम भागातील जनतेला मिळाला आहे.
सावंतवाडी दि.२४: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप करत, आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. “केसरकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी,” अशी आक्रमक मागणी सावंतवाडी विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी केली.
🔥 सावंतवाडी दि.२३: शहरातील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला: यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, क्लेटस फर्नांडिस, महादेव पांगम आदी उपस्थित होते
सावंतवाडी,दि.२३: महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे अशोक खरात सारख्या भोंदू बाबाने महिलांवर अत्याचार करून जो धुमाकूळ घातला आहे, तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि शरमेची बाब आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राचे हित अपेक्षित होते, तेच लोक जर अशा भोंदू बाबांच्या आहारी जात असतील तर ही राज्यासाठी नाचक्की आहे. आमदार, खासदार आणि मंत्री जनतेला विकासाच्या गोष्टी सांगतात, मात्र स्वतःचे आयुष्य अशा भोंदू बाबांकडून घडवतात, मग हे लोक महाराष्ट्राचा काय विकास करणार? असा सवाल श्री. राऊळ यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी चंद्रकांत कासार आणि रमेश गावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सावंतवाडी दि.२३: कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सावंतवाडी दि.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून उद्या, मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात भव्य ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचार मिळणार आहेत.
वॉशिंग्टन दि.२३: मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीला आता तात्पुरता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याची मोठी घोषणा केली आहे. परंतु चर्चेचा दावा इराणने फेटाळला आहे.