युएसए दि.२२: जागतिक बाजारातील घडामोडी आणि आखाती देशांमधील युद्धाचा भारतीय चलनाला मोठा तडाखा बसला आहे. इतिहासात पहिल्यांदाच रुपयाने निचांकी पातळी गाठली आहे.
📍 💵 डॉलरचा भाव: ₹९३.२४ वर पोहोचला.
🛢️ कच्चे तेल: प्रति बॅरल ११५ डॉलरच्या पार.
⚔️ कारण: इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता.
वाढत्या महागाईचे सावट? तुम्हाला काय वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
💥 मोठी बातमी: रुपया ऐतिहासिक निचांकी पातळीवर!
आखाती देशांतील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय रुपया कोसळला आहे. आज सकाळी बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपया ९३.२४ या विक्रमी स्तरावर पोहोचला.
📌 परिणाम: आयात महागणार आणि महागाई वाढण्याची शक्यता.भारतीय रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण! 📉
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरची मागणी वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमती ($११५+) वाढल्याने रुपयावर दबाव वाढला असून आज रुपया ९३.२४ वर व्यवहार करत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.२२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तंत्रशिक्षणाचे अग्रगण्य केंद्र असलेल्या भोसले नॉलेज सिटीमध्ये तंत्रज्ञानाचा महाउत्सव रंगणार आहे. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने २४ आणि २५ मार्च रोजी ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या भव्य राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवाचे (Tech-Fest) आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान’ (Sustainable Technology for All) हे यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य ब्रीदवाक्य आहे.

सावंतवाडी दि.२२: शहरातील राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे गुढीपाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. त्या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे हि आयोजन केले जाते या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजा शिवाजी चौक (गवळी तीठा) येथे लवकरच लोकवर्गणीतून भव्य – दिव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण व पालकमंत्री नितेशजी राणे यांची लवकरच भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवून त्यानंतर सर्व शिवप्रेमींना एकत्र करून कमिटी स्थापन केली जाईल. ही शुभ वार्ता ऐकताच कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी एकच टाळ्यांचा गडगडात केला. मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, रवी जाधव, उपाध्यक्ष दिलीप पवार बंड्या तोरस्कर,सचिव दीपक सावंत , महादेव राऊळ यांनी हा प्रस्ताव एकमताने साळगावकर यांच्यासमोर ठेवला होता त्यामुळे या पवित्र विषयाला दिशा देण्याचे काम बबन साळगावकर यांनी केले आहे त्यामुळे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
मुंबई दि.२२: बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ आणले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व जुने विक्रम मोडीत काढत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
नाशिक दि.२२: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या विकृतीचा आणखी एक काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार करतानाचा खरातचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या नव्या पुराव्यामुळे खरातच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.
माड्याचीवाडी कुडाळ दि.२१:
📍 सावंतवाडी दि.२१: कॅप्टन अशोक खरात यांच्या अटकेनंतर त्यांचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे आपली बाजू मांडली असून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
📍 दोडामार्ग (सिंधुदुर्ग) दि.२१: