20.7 C
New York
Saturday, September 12, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 68

🚨 निरवडेत भरवस्तीतील डुक्कर व्यवसायामुळे ग्रामस्थ त्रस्त! 🚨 — संजू परब यांचा प्रशासनाला इशारा; पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार —

सावंतवाडी दि.२१: तालुक्यातील निरवडे गावात भरवस्तीत सुरू असलेल्या डुक्कर व्यवसायामुळे स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तक्रार करूनही आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

📍 भरवस्तीत प्रकल्प असल्याने विष्ठेचा प्रचंड दुर्गंध, ग्रामस्थांचे जगणे असह्य.
📍 आरोग्य विभागाकडे ६ महिने पाठपुरावा करूनही कारवाई शून्य.
📍 “व्यवसाय जरूर करा, पण इतरांना त्रास नको” – संजू परब.
📍 पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

यावेळी राजू धुमाळ, विलास नाईक, प्रतीक्षा पारकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणावर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 निरवडे ग्रामस्थांचा टाहो! डुक्कर व्यवसायाच्या दुर्गंधीने गाव त्रस्त!

सावंतवाडीतील निरवडे गावात वस्तीच्या मध्यभागी चालणाऱ्या डुक्कर व्यवसायामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग ढिम्म असल्याने ग्रामस्थांनी संजू परब यांच्याकडे धाव घेतली.

💥 संजू परब यांचा इशारा:
“जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. हा विषय तातडीने नितेश राणे यांच्या कानावर घालणार!”

🐷 निरवडेत डुक्कर व्यवसायाचा ग्रामस्थांना त्रास!
गेल्या ६ महिन्यांपासून आरोग्य विभागाचे दुर्लक्ष. संजू परब यांनी घेतली दखल; आता थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार जाणार!
“अधिकाऱ्यांनी वेळीच सुधारले नाही, तर पालकमंत्र्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल!” – संजू परब

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावधान! दारू आणि बिअरचे ‘कॉकटेल’ करताय? शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

मुंबई दि.२१: अनेकदा पार्टी किंवा सेलिब्रेशनमध्ये दारू (हार्ड लिकर) आणि बिअर एकत्र करून पिण्याची पद्धत दिसून येते. मात्र, असे ‘कॉकटेल’ शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. या मिश्रणामुळे केवळ नशाच लवकर चढत नाही, तर यकृत आणि पोटाच्या आरोग्यावरही याचे दूरगामी परिणाम होतात. दारू आणि बिअर एकत्र घेतल्यास शरीरात नेमकी काय उलथापालथ होते, याचा घेतलेला हा आढावा.

रक्तातील अल्कोहोलची पातळी झपाट्याने वाढते
दारू आणि बिअर एकत्र घेतल्यास रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) वेगाने वाढते. बिअरमधील कार्बन डायऑक्साइड (गॅस) मुळे अल्कोहोल शोषण्याचा वेग वाढतो, ज्यामुळे व्यक्तीला अपेक्षेपेक्षा लवकर आणि जास्त नशा चढते.

मेंदू आणि शारीरिक हालचालींवर परिणाम
या मिश्रणामुळे मेंदूवरील नियंत्रण कमी होते. निर्णयक्षमता मंदावते, बोलताना अडखळणे, चालताना तोल जाणे आणि शरीराचा समतोल बिघडणे असे प्रकार घडतात. तीव्र नशेमुळे अपघात किंवा अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता वाढते.

पचनसंस्थेवर ताण आणि अ‍ॅसिडिटी
बिअरमध्ये कार्बोनेशन (गॅस) असतो, तर हार्ड लिकरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण तीव्र असते. हे दोन्ही घटक एकत्र आल्यावर पोटात अ‍ॅसिडिटी वाढते. यामुळे पोट फुगणे, छातीत जळजळ, मळमळ आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू होतो.

यकृत आणि किडनीवर ताण
अल्कोहोलवर प्रक्रिया करण्याचे मुख्य काम यकृत (Liver) करत असते. मिश्रित अल्कोहोलमुळे यकृतावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे ‘फॅटी लिव्हर’ किंवा ‘लिव्हर डॅमेज’चा धोका संभवतो. तसेच, दोन्ही पेये मूत्रवर्धक असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन तीव्र ‘डिहायड्रेशन’ होते.

भयंकर हॅंगओव्हर
अशा कॉकटेलनंतर येणारा हॅंगओव्हर अत्यंत वेदनादायक असतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी तीव्र डोकेदुखी, थकवा, तोंड कोरडे पडणे, चिडचिड होणे आणि कामात लक्ष न लागणे अशा समस्या उद्भवतात.

महत्त्वाची टीप: “बिअर आधी आणि दारू नंतर घेतल्यास त्रास होत नाही,” हा निव्वळ एक समज आहे. शरीरातील अल्कोहोलचे एकूण प्रमाण आणि तुमच्या यकृताची क्षमता यावरच सर्व परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे आरोग्याचा विचार करता असे जीवघेणे प्रयोग टाळणेच हिताचे ठरते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

ऑप्थॅल्मिक व्हॅन: नॅबच्या फिरत्या नेत्र तपासणी वाहनाचे विशेष कौतुक. 🚐

🏥 👁️✨सावंतवाडी: भटवाडी येथील आधुनिक आरोग्य सुविधांचे केले कौतुक !

सावंतवाडी दि.२१: शहरातील भटवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एच. पाटील यांनी नुकतीच नॅब (NAB) नेत्र रुग्णालय, भटवाडी येथे भेट देऊन संस्थेच्या सामाजिक कार्याची पाहणी केली.

📍 भेटीचे मुख्य आकर्षण: मॉड्युलर ऑपरेशन थिएटर: अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाची पाहणी. 🏥 ऑप्थॅल्मिक व्हॅन: नॅबच्या फिरत्या नेत्र तपासणी वाहनाचे विशेष कौतुक. 🚐अद्ययावत यंत्रणा: गोरगरीब रुग्णांना मिळणाऱ्या आधुनिक सुविधा पाहून व्यक्त केले समाधान.

💬 डॉ. पाटील यांचे प्रतिपादन: “नॅब सिंधुदुर्ग करत असलेले सामाजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आधुनिक यंत्रणांचा फायदा ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना निश्चितच होईल.”

🤝 स्वागत व उपस्थिती:यावेळी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी अॅड. दिमाख धुरी, डॉ. मधु साळी, नॅबचे टेक्निकल हेड श्री. संतोष कदम, सौ. दिपाली कदम आणि श्री. अनंत उचगावकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे जंगी स्वागत केले.नॅबच्या माध्यमातून अंधत्व निवारणासाठी सुरू असलेल्या या महान कार्याला मनापासून शुभेच्छा! 💐👏

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

इन्सुलीत विनापरवाना खैराच्या लाकडाची तस्करी रोखली; २५ लाखांच्या मुद्देमालासह टेम्पो जप्त

पकडण्यात आलेला मुद्देमाल

दोडामार्ग/सावंतवाडी दि.२१: दोडामार्ग मार्गे होणारी खैराच्या लाकडाची बेकायदेशीर वाहतूक वनविभागाने सापळा रचून यशस्वीरित्या पकडली आहे. इन्सुली येथील खामदेव नाका येथे करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ९ ते १० लाख रुपये किमतीचा खैर साठा आणि टेम्पो असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, MH-07-AJ-9111 या क्रमांकाच्या टेम्पोमधून विनापरवाना खैराच्या लाकडाची तस्करी केली जाणार होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने इन्सुली खामदेव नाका येथे पाळत ठेवून सापळा रचला. संशयित टेम्पो अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खैराचे लाकूड आढळून आले.

जप्त मुद्देमाल आणि आरोपी
या कारवाईत वाहन चालक मितेश शरद लोके (रा. तळवडे) आणि दीपक विठोबा हरमळकर (रा. तळवडे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वनविभागाने १० लाखांचे लाकूड आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा मिळून एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून तो उपरल विक्री आगार येथे जमा करण्यात आला आहे.

वनविभागाची कारवाई
सदरची धडक कारवाई वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप (आजगाव) आणि वनरक्षक (पाडलोस) यांनी केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या या धाडसी कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

भोंदूबाबा अशोक खरातचे बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या जाळ्यात; ५८ सीसीटीव्ही फुटेजसह ५ कोटींची मागणी?

नाशिक दि.२०: भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. खरातचे छुपे कारनामे जगासमोर आणणारा संशयित नीरज जाधव याला नाशिक क्राईम ब्रँचने अखेर ताब्यात घेतले आहे. नीरजच्या अटकेमुळे खरातच्या ‘काळ्या कुंडली’तील अनेक धक्कादायक गुपिते बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑफिस बॉय ते ब्लॅकमेलर?
मिळालेल्या माहितीनुसार, नीरज जाधव हा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये ‘ऑफिस बॉय’ म्हणून कामाला होता. कामावर असताना नीरजने खरातच्या नकळत त्याच्या ऑफिसमधील तब्बल ५८ सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवले होते. या व्हिडिओंमध्ये खरातचे आक्षेपार्ह कृत्य कैद असल्याचे समजते. याच व्हिडिओच्या जोरावर नीरजने खरातला ५ कोटी रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पीडितांचा वापर करून खंडणीचा कट?
अशोक खरातने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, नीरजने काही पीडित महिलांच्या मदतीने खरातला पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिर्डीतील एका महिलेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ वापरून खरातवर दबाव आणला गेल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही महिलांनी नीरज आपल्याला धमकावत असल्याची तक्रार खुद्द खरातकडेच केली होती, त्यानंतर खरातनेच त्यांना पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला होता. एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवून तिलाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप नीरजवर आहे.

भोंदू खरातचे ‘राजकीय’ कनेक्शन; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली?
अशोक खरातचे प्रस्थ केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे परराज्यातील राजकारण्यांपर्यंत पोहोचल्याचे उघड होत आहे.

हाय-प्रोफाईल भक्त: खरातचे भक्त केवळ सामान्य नागरिक नसून केंद्र आणि राज्यातील अनेक मोठे मंत्री, हरियाणा आणि राजस्थानमधील राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

चाकणकरांवर निशाणा: या प्रकरणावरून आता राजकारण तापू लागले आहे. खरातचे अनेक उच्चपदस्थांशी असलेले लागेबांधे पाहता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता विरोधकांकडून आणि सामाजिक स्तरातून जोर धरू लागली आहे.

भोंदूगिरी आणि बलात्काराच्या आरोपाखाली खरात सध्या अटकेत असला, तरी आता नीरज जाधवच्या चौकशीतून या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे आणि यात किती मोठ्या नावांचा सहभाग आहे, हे स्पष्ट होईल.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*handhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,82756595

ठळक बातमी: सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा प्रश्न विधीमंडळात गाजला! 🚆🚩

 🚆🚩मुंबई दि.२०: आमदार सुलभा गायकवाड यांनी मांडल्या कोकणवासियांच्या प्रमुख मागण्या: ✅ कोरोना काळात रद्द केलेले थांबे त्वरित सुरू करा. ✅ सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करा. ✅ ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत समावेश करण्यासाठी पाठपुरावा करा. ✅ कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी राज्य सरकारने निधी द्यावा.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत श्री रामनवमी निमित्त २८ मार्चला एकदिवसीय रामकथा सोहळा

सावंतवाडी दि.२०: इस्कॉन (ISKCON) तर्फे श्री रामनवमी निमित्त एकदिवसीय रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असून भाविकांना श्रीरामभक्तीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा रामकथा सोहळा दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच महाप्रसादाचा समावेश असणार आहे.
या प्रसंगी प्रख्यात प्रवचनकार दामोदर सखा प्रभुजी (एम.बी.ए., दिल्ली) हे रामकथेचे निरूपण करणार आहेत. श्रीरामचंद्रांच्या कृपेचा लाभ मिळावा व भक्तीभाव वाढावा, या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण हरिकृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी, सावंतवाडी येथे असून सर्व भक्तांनी उपस्थित राहून रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

“केसरकरांच्या कामांचे श्रेय लाटू नका!” .. बाबू कुडतरकर यांचा टोला

खेमराज उर्फ बाबू कुडतरकर

🚩 सावंतवाडी दि.२०: शहरातील विकासकामांवरून शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर आक्रमक झाले असून प्रभारी नगराध्यक्षांना टोला लगावला. योगा सेंटर, खाऊ गल्ली आणि क्रिकेट गॅलरीवरून राजकीय जुंपली!
कुडतरकर यांनी आमदार केसरकर यांनी मंजूर केलेल्या कामांची यादीच सादर केली आहे.
यात प्रामुख्याने:मोती तलाव काठावरील खाऊ गल्ली.
जिमखाना येथील क्रिकेट गॅलरी (गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या नावे).मोती तलावासमोरील संगीत कारंजे.
बॅ. नाथ पै सभागृह नूतनीकरण.,टर्फ क्रिकेट मैदान आणि नरेंद्र डोंगरावरील योगा सेंटर.
“यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर काहींची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प केसरकर यांच्या योगदानामुळेच उभे राहत आहेत. सत्ताधाऱ्यांनी स्वतः काय आणले ते सांगावे, मंजूर प्रकल्पांचे श्रेय लाटू नये,” अशी टीका कुडतरकर यांनी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 सावंतवाडीच्या पर्यटनाला मिळणार नवी भरारी! ‘रोप-वे’ आणि ‘बोटींग’साठी पालिकेचा पुढाकार! 🚠🛶

🚩 🚠🛶 सावंतवाडी दि.२०: शहराच्या पर्यटनाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिकेच्या सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. शहराबाहेरून गेलेला महामार्ग आणि रेल्वेमुळे पर्यटनात आलेली मरगळ झटकण्यासाठी आता ‘मोती तलाव ते नरेंद्र डोंगर’ असा भव्य रोप-वे (Ropeway) उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे.

✅ मोती तलावाकाठी ‘खाऊगल्ली’: राजवाड्यासमोर ११ गुंठे जागेत भव्य खाऊगल्ली साकारणार. १ कोटींचा निधी मंजूर! 🍔🥘
✅ स्थानिकांना प्राधान्य: खाऊगल्लीतील स्टॉल्ससाठी स्थानिक महिला आणि तरुणांना पहिले प्राधान्य दिले जाणार.
✅ बोटींग प्रकल्प: तलावातील बंद असलेली बोटींग सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार.
✅ नरेद्र डोंगर रोप-वे: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रोप-वे उभारण्याची महायुती नेत्यांकडे मागणी.

उद्यान सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांनी नगरसेविकांसह आज खाऊगल्लीच्या जागेची पाहणी केली. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेचा गट आग्रही आहे.

“सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटकांना शहरात खेचून आणण्यासाठी रोप-वे आणि बोटींग प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
— मोहिनी मडगावकर (उद्यान सभापती)

सावंतवाडीत भव्य शोभायात्रेने हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत; ‘मर्दानी खेळांनी’ वेधले लक्ष

सावंतवाडी दि.१९: शहरात आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात करण्यात आले. सकल हिंदू समाज सावंतवाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने अवघी सावंतवाडी भगवीमय झाली होती. या सोहळ्यात भाजप युवा नेते विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन नागरिकांचा उत्साह वाढवला.

राजवाड्यापासून जयघोषात सुरुवात
ऐतिहासिक राजवाड्यापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. हातात भगवे ध्वज आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष करत निघालेल्या या यात्रेने शहर दुमदुमून गेले होते. पारंपारिक वेशभूषेतील आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सामील झाले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरले होते.

चित्तथरारक मर्दानी खेळ आणि भक्तीमय सादरीकरण
शोभायात्रा नारायण मंदिर येथे पोहोचल्यानंतर महिलांनी सादर केलेल्या चित्तथरारक ‘मर्दानी खेळांनी’ उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यासोबतच, वसंत शिशुवाटिका विद्याभारतीच्या लहान मुलांनी प्रभू श्रीरामावर आधारित सुंदर गीत सादर करून संपूर्ण परिसर भक्तीमय करून टाकला.

बालकलाकारांचा गौरव
कार्यक्रमादरम्यान विशाल परब आणि सौ. वेदिका परब यांच्या हस्ते या चिमुकल्या कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने सावंतवाडीत हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवत नवीन वर्षाची दिमाखदार सुरुवात केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563