21.6 C
New York
Sunday, September 13, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 73

सावंतवाडीत ‘प्रयाण टुरिस्ट महिला संस्थे’तर्फे महिला दिन उत्साहात साजरा; आमदार दीपक केसरकर यांचे लाभले सहकार्य

सावंतवाडी दि.१२: येथील ‘प्रयाण टुरिस्ट महिला संस्था, सावंतवाडी’ यांच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर भर देत विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
क्रांतीज्योतींना अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी सावित्रीबाईंच्या कार्याचे स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन केले.
प्रमुख उपस्थिती आणि सहकार्य
या कार्यक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी आर्थिक सहाय्य केले असून, त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संस्थेच्या अध्यक्षा अनारोजीन लोबो यांच्यासह भारती मोरे, छाया नरेंद्र देशपांडे, माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे आणि अपर्णा कोठावळे यांनी पुढाकार घेतला.
महिलांची लक्षणीय उपस्थिती
याप्रसंगी सावंतवाडीतील अनेक महिला पदाधिकारी आणि सदस्या उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने मीरा सावंत, सायली होडावडेकर, ज्योत्स्ना सुतार, आरती खोरागडे, नीता प्रसादी, वैशाली पटेकर, माधुरी वाडकर, किरण नाटेकर यांच्यासह इतर महिलांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येत सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवण्याचा निर्धार केला. प्रयाण टुरिस्ट महिला संस्थेच्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

भावपूर्ण श्रद्धांजली:जि.प. माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांना मातृशोक! 🙏🕊️

संवेदना ! 🙏🕊️ सावंतवाडी दि.१२: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या मातोश्री सौ. जयश्री दत्ताराम गावडे (वय ८४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन.

त्यानी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.त्या माजी सैनिक किरण गावडे यांच्या मातोश्री, ॲड. नीता गावडे यांच्या सासू आणि ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या आजी होत्या.

🌹 शोकाकुल वातावरण:
इन्सुली परिसरातील एक ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व हरपल्याने गावडे परिवारासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता इन्सुली कोंडवाडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि आप्तेष्टांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत उद्या एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी दि.१२: राज्य परिवहनच्या
एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने उद्या, गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी विशेष नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९:३० वाजता सावंतवाडी येथील ‘नॅब’ (NAB) नेत्र रुग्णालयात संपन्न होणार आहे.तरी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन नॅबचे अनंत उचगावकर यांनी केले आहे.

अनेकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना सततच्या प्रवासामुळे डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची सखोल तपासणी केली जाणार आहे.

तरी सावंतवाडी आगारातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि सकाळी ९:३० वाजता नॅब नेत्र रुग्णालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

गॅस पाईपलाईनच्या कामावरून संजू परब आक्रमक; “त्या” बैठकांचे गुपित उघड करण्याचा सत्ताधाऱ्यांना इशारा

सावंतवाडी दि. ११: शहरात सध्या सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या नियोजित कामावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सजू परब यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “शहरात चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले गॅस पाईपलाईनचे काम तात्काळ थांबवावे, अन्यथा या कामासाठी गॅस कंपनीसोबत कोणी, कुठे आणि का बैठका घेतल्या, त्यांची नावे पुराव्यासह जाहीर करेन,” असा खळबळजनक इशारा त्यांनी आज दिला.

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘व्हिजन’वर आणि प्रशासकीय अनास्थेवर जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे:
नियोजनशून्य कारभार: शहरात सुरू असलेली सर्व कामे कोणत्याही नियोजनाशिवाय होत आहेत. याचा मोठा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहराचे ‘व्हिजन’ सांगणारे नेते आता गायब झाले असून प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.

गॅस पाईपलाईनचा घोळ: पाईपलाईनच्या कामामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांच्या खडीकरणाचे टेंडर झाल्याशिवाय हे काम पुढे नेऊ नये. जर काम थांबले नाही, तर पडद्यामागच्या हालचाली उघड केल्या जातील, असे परब यांनी ठणकावून सांगितले.

नळपाणी योजनेत त्रुटी: नळपाणी योजनेचे काम कोणत्याही तज्ज्ञ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली होत नाही. तांत्रिक त्रुटी असतानाही बांधकाम विभाग हे काम रेटत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आंदोलनाचा इशारा: येत्या आठ दिवसांत प्रशासनाने कामकाजात सुधारणा केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणार
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत संजू परब यांनी सांगितले की, ते लवकरच आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

📌 मोठी बातमी: मुंबई लोकल आणि कोकण रेल्वेबाबत केंद्राचा मोठा निर्णय!

मुंबई दि.११: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत खासदार रवींद्र वायकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत:

✅ प्रवासी क्षमता वाढणार: १५ डब्यांच्या गाड्यांसाठी ३४ रेल्वे स्थानकांची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे.
✅ सुरक्षेला प्राधान्य: लोकलच्या दरवाज्यातून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी २३८ गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर्स बसवले जाणार.
✅ कोकण रेल्वे: दुपदरीकरणाचे काम तांत्रिक स्तरावर (DPR) सुरू झाले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: भारतीय सैन्यात ४६,००० ‘अग्निवीर’ पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी
देशातील बेरोजगार तरुणांसाठी भारतीय लष्कराने आनंदाची बातमी दिली आहे. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात ‘अग्निवीर’ पदांच्या सुमारे ४६,००० जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ८ वी, १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना देशसेवेची ही मोठी संधी उपलब्ध झाली असून यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

भरतीचा तपशील:
पद: अग्निवीर (General Duty, Technical, Clerk, Tradesman)

शैक्षणिक पात्रता: ८ वी, १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण (पदांनुसार)

वयोमर्यादा: १७.५ ते २१/२३ वर्षे (काही तांत्रिक पदांसाठी शिथिलता)

निवड प्रक्रिया: शारीरिक चाचणी (Physical), वैद्यकीय तपासणी (Medical) आणि लेखी परीक्षा (CEE).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

आर्थिक लाभ आणि सेवा निधी:
अग्निवीर म्हणून चार वर्षे सेवा बजावल्यानंतर तरुणांना आकर्षक पगार आणि आर्थिक सुरक्षा दिली जाणार आहे.

पगार: पहिल्या वर्षी ३०,००० रुपयांपासून सुरुवात होऊन चौथ्या वर्षी ४०,००० रुपयांपर्यंत वाढ.

सेवा निधी: ४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर सुमारे ११.७१ लाख रुपये (करमुक्त) ‘सेवा निधी’ पॅकेज म्हणून दिले जातील.एकूण आर्थिक लाभ: पगार आणि सेवा निधी मिळून ४ वर्षांत सुमारे २३.४३ लाख रुपयांचा लाभ मिळतो.

इतर महत्त्वाचे फायदे:
१. सैन्यातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध जीवनशैली.
२. ४ वर्षांनंतर सीआरपीएफ (CRPF), बीएसएफ (BSF), रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि विविध राज्यांच्या पोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य.
३. टाटा, महिंद्रा सारख्या खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीच्या विशेष संधी.
४. सेवेदरम्यान ४८ लाख रुपयांचे विम्याचे कवच.

येथे करा अर्ज:
इच्छुक उमेदवारांनी खालील अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊन आपली नोंदणी करावी:

भारतीय सैन्य: www.joinindianarmy.nic.in

भारतीय नौदल: www.joinindiannavy.gov.in

भारतीय वायू दल: https://agnipathvayu.cdac.in

तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीतील अगरबत्ती विक्रेते तेजस खटावकर यांचे आकस्मिक निधन; आकेरी येथील घरात आढळला मृतदेह

तेजस खटावकर

सावंतवाडी दि.११: सावंतवाडी शहरात फिरून अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करणारे परिचित युवक तेजस खटावकर (रा. आकेरी) यांचे आकस्मिक निधन झाले. बुधवारी आकेरी येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तेजस खटावकर हे सावंतवाडी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून चालत फिरून अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय करत होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते शहरात सर्वांना परिचित होते. अनेक राजकीय पदाधिकारी आणि स्थानिकांशी त्यांचे जवळचे संबंध होते. सर्वांना नावाने ओळखणे आणि आपुलकीने संवाद साधणे ही त्यांची खासियत होती, ज्यामुळे अनेक नागरिक त्यांच्याकडून आवर्जून अगरबत्ती खरेदी करत असत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १०-१५ दिवसांपासून तेजस यांची मानसिक प्रकृती बिघडली होती. ते काहीसे आक्रमक झाले होते, त्यामुळे कुटुंबीय त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. गेल्या चार दिवसांपासून ते आकेरी येथील एका घरात वास्तव्यास होते. आज सकाळी ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांना पाचारण केले. तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील व्यापारी वर्ग आणि परिचित नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

निरवडे येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ ;पोलिसांकडून सखोल तपास सुरू;​ ग्रामस्थांची सावंतवाडी पोलिसांची घटनास्थळी धाव

सावंतवाडी,दि११: निरवडे येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, निरवडे येथील एका ठिकाणी संबंधित कामगाराचा मृतदेह झाडाच्या खाली मृतदेह असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तपास सुरू आहे. दरम्यान, मृतदेह ज्या संशयास्पद अवस्थेत सापडला आहे, त्यावरून ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कोकण रेल्वे मार्गावर ११ मार्च रोजी धावणार एर्नाकुलम–अंबाला होळी विशेष एक्सप्रेस

सावंतवाडी दि.१०:होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी विशेष सुविधा
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी Southern Railwayने Ernakulam Junction ते Ambala Cantonment दरम्यान वन-वे विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०६०७४ एर्नाकुलम जंक्शन – अंबाला कॅन्टोनमेंट वन-वे एक्सप्रेस स्पेशल ही गाडी ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी एर्नाकुलम जंक्शन येथून सकाळी ०९:५० वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी १३ मार्च रोजी सकाळी ११:२५ वाजता अंबाला कॅन्टोनमेंट येथे पोहोचणार आहे. ही विशेष सेवा एकदाच चालवण्यात येणार आहे.
गाडीची रचना
या विशेष एक्सप्रेसमध्ये एकूण पुढीलप्रमाणे डबे असतील –
१ एसी थ्री टियर डबा
१३ स्लीपर वर्ग डबे
३ जनरल सेकंड क्लास डबे
२ दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल जनरल सेकंड क्लास डबे
कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाची स्थानके
ही गाडी Konkan Railway मार्गावरून धावणार असून केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक स्थानकांवर थांबा घेणार आहे.
मुख्य थांबे पुढीलप्रमाणे –
एर्नाकुलम जंक्शन – ०९:५० (११ मार्च)
अलुवा – १०:१२ / १०:१४
त्रिशूर – ११:०७ / ११:१०
शोरनूर – १२:०० / १२:०५
कोझिकोड – १३:२२ / १३:२५
कन्नूर – १४:४२ / १४:४५
कासरगोड – १५:४८ / १५:५०
मंगळुरू जंक्शन – १७:०० / १७:१०
उडुपी – १९:३० / १९:३२
कुंदापूर – २०:१० / २०:१२
मुरुडेश्वर – २१:३० / २१:३२
कारवार – २३:१० / २३:१२
कोकण व महाराष्ट्रातील थांबे (१२ मार्च)
मडगाव – ००:१० / ००:२०
थिवीम – ०१:०० / ०१:०२
सावंतवाडी रोड – ०१:४० / ०१:४२
कणकवली – ०२:२० / ०२:२२
राजापूर रोड – ०३:१८ / ०३:२०
रत्नागिरी – ०४:३५ / ०४:४०
संगमेश्वर रोड – ०५:२५ / ०५:२७
चिपळूण – ०६:१० / ०६:१५
खेड – ०६:४० / ०६:४२
माणगाव – ०८:१२ / ०८:१४
रोहा – ०९:०० / ०९:०५
पनवेल – १०:२५ / १०:३५
वसई रोड – १२:३५ / १२:४५
पुढील प्रवास
यानंतर ही गाडी सूरत, वडोदरा, कोटा, मथुरा आणि नवी दिल्ली मार्गे १३ मार्च रोजी सकाळी ११:२५ वाजता अंबाला कॅन्टोनमेंट येथे पोहोचणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे होळीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी: सामाजिक कार्यकर्त्या संजना परब यांचा वटसावित्री महिला मंडळाकडून गौरव

सावंतवाडी येथील संजना संजू परब यांचा सत्कार करताना वटसावित्री महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां.

सावंतवाडी दि.१०: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीतील खासकीलवाडा येथील वटसावित्री महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्या संजना संजू परब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्याची दखल
संजना परब या खासकीलवाडा परिसरातील सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रभागी असतात. परिसरातील विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना त्या मोलाचे योगदान देत आल्या आहेत. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कार्याची आणि निस्वार्थी सेवेची दखल घेत महिला मंडळाने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.
मान्यवरांकडून कौतुक
या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी संजना परब यांच्या कार्याचा गौरव केला. “समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि कामातील तत्परता यामुळेच परब यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे,” अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला खासकीलवाडा परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वटसावित्री महिला मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563