
सिंधुदुर्ग दि.१६: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित होताच सावंतवाडीत त्यांच्या समर्थकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. ‘प्रमोद कामत आगे बढो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
आडीवरेकर आणि भालेकर यांच्याकडून विशेष सत्कार
या निवडीचे वृत्त समजताच सावंतवाडीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती सुधीर आडीवरेकर आणि भाजप सावंतवाडी सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी प्रमोद कामत यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ प्रदान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहिला
या निवडीमुळे सावंतवाडी भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, उपस्थित कार्यकर्त्यांनी कामत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. आगामी काळात कामत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली. ही पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतीचा विकास या कामांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सन्मानामुळे राज्यातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मानाच्या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग दि.१६: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीमध्ये १९ मार्च रोजी भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. सकल हिंदू समाज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.ही शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता राजवाडा येथून सुरू होईल. यात्रेचा मार्ग नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिवरामराजे पुतळा मार्गे भोसले उद्यान येथे संपणार आहे. हिंदू धर्माचे नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आणि सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक श्री. शैलेश गुरुदास पै आणि सह-संयोजिका श्रीम. सौ. गायत्री गुरुदास देवस्थळी यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.या पत्रकार परिषदेत खजिनदार आनंद साधले, विकास रांगणेकर, विशाखा रांगणेकर, कस्तुरी देवस्थळी, दिनेश गावडे आदी उपस्थित होते. या नववर्ष स्वागत यात्रेत विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत असून, विविध संस्था आणि उत्सव समित्या यात सक्रिय सहभाग घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या यात्रेत आरंभ सखी, बजरंग दल, दुर्गावाहिनी, एकमुखी दत्तमंदिर ट्रस्ट, घे भरारी, गोरक्षक, हरेकृष्ण संस्कार केंद्र, हिंदू वैश्य वाणी संघटना, पाटीदार समाज, पुर्व सैनिक सेवा परिषद, रासाई कला क्रीडा मंडळ, रिक्षा संघटना, सालईवाडा मित्रमंडळ, समता महिला मंडळ, सनातन संस्था, शिवकन्यका, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान, श्री. रामानंद संप्रदाय नरेंद्र महाराज, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सुवर्णकार संघ, वैश्यवाडा मित्रमंडळ, वेदपाठशाळा सावंतवाडी, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, विद्याभारती शिशुवाटिका, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांचा समावेश आहे. हिंदू नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे संयोजक शैलेश पै व सह संयोजक सौ गायत्री देवस्थळी यांनी आवाहन केले आहे.
सावंतवाडी दि.१६: कोकण रेल्वे मार्ग आता कात टाकणार आहे. मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा विलंब टाळण्यासाठी ‘पॅच डबलिंग’चा (टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सावंतवाडी दि.१५ आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासामुळेच मी आज आमदार म्हणून जनतेचा आवाज उठवू शकत आहे,” अशा भावना आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
सिंधुदुर्गनगरी,दि.१५: जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई येथील मंत्रालयाकडून तातडीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. विशेषतः सायंकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सतर्क राहावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय सूचनांचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सावंतवाडी दि.15: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गो-कार्टला कोइमतूर येथील ‘गो-कार्ट डिझाईन चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत मानाचा ‘जजेस चॉईस’ पुरस्कार मिळाला असून देशात तेरावा क्रमांक प्राप्त करत विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर वाढवला आहे.
सावंतवाडी दि.१४: शहरात सुरू असलेल्या एमएनजीएल (MNGL) गॅस पाइपलाइनच्या कामावरून सावंतवाडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. या कामात नगरपरिषदेच्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असून, एका सत्ताधारी व्यक्तीने कंपनीकडून ३० लाख रुपये आगाऊ घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. ‘उद्या गॅस गळती होऊन दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.