20.7 C
New York
Saturday, September 12, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 70

सावंतवाडी: नवसारी येथे दोन मित्रांमध्ये हाणामारी; ‘सामाजिक बांधिलकी’च्या मदतीने जखमी तरुणाला जीवदान

सावंतवाडी दि.१७: येथील नवसरणी परिसरात आज दुपारी दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला होता. मात्र, ‘सामाजिक बांधिलकी’ चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत जखमीला स्वतःच्या दुचाकीवरून रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.

नेमकी घटना काय?
आज दुपारी ३ च्या सुमारास नवसरणी येथे आनंद भोसले (वय ४८, रा. कोल्हापूर) आणि त्याच्या एका मित्रामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादातून झालेल्या हाणामारीत आनंद भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक पॅनर परेरा यांनी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांना दिली.

रवी जाधव यांची तत्परता
घटनेचे गांभीर्य ओळखून रवी जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. जखमी आनंद भोसले हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रुग्णवाहिकेची वाट न पाहता, जाधव यांनी जखमीला आपल्या स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू
सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या धावपळीत सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्यासह रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि पॅनर परेरा यांनी मोलाचे सहकार्य केले. वेळेत मदत मिळाल्याने जखमीचा जीव वाचल्याबद्दल परिसरातून या सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 सिंधुदुर्गाच्या साहित्याचा वाशीत डंका! 🚩

नवी मुंबई वाशी दि.१७: येथे महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘बाल मराठी साहित्य संमेलना’चा दिमाखात शुभारंभ झाला. या संमेलनाच्या भव्य ग्रंथदिंडीत सिंधुदुर्गच्या दोन सुपुत्रांनी पालखीचे भोई होण्याचा बहुमान मिळवला!

✨ मानकरी:
म. ल. देसाई (महादेव लक्ष्मण देसाई) – सदस्य, विश्व निर्मिती
कविवर्य विठ्ठल कदम – सदस्य, साहित्य संस्कृती मंडळ

शिवाजी चौक ते सिडको भवन दरम्यान निघालेल्या या दिंडीत पारंपारिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि मराठी भाषेचा जयघोष पाहायला मिळाला. कोकणच्या मातीतील साहित्यिकांनी या सोहळ्याचे सारथ्य करणे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. 👏✨

ग्रंथदिंडीत म. ल. देसाई व विठ्ठल कदम यांना पालखीच्या भोईचा मान! 🏆

नवी मुंबई – वाशी येथील बाल मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ उत्साहात झाला. यातील मुख्य आकर्षण ठरलेल्या ग्रंथदिंडीमध्ये सिंधुदुर्गातील म. ल. देसाई आणि कविवर्य विठ्ठल कदम यांनी पालखीचे भोई होण्याचा सन्मान स्वीकारला.

महाराष्ट्र शासनाच्या भाषा मंत्रालयामार्फत आयोजित या सोहळ्यात अनेक दिग्गज साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाशीच्या रस्त्यांवरून निघालेली ही ग्रंथदिंडी मराठी भाषेचा गौरव करणारी ठरली. सिंधुदुर्गाच्या साहित्य क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे! 🎉

📍 नवी मुंबई: बाल मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य ग्रंथदिंडीत सिंधुदुर्गच्या म. ल. देसाई आणि विठ्ठल कदम यांना ‘पालखीचे भोई’ होण्याचा बहुमान! 🚩

महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाचा स्तुत्य उपक्रम. वाशीतील सिडको भवन येथे रंगला मराठी साहित्याचा जागर. 📚✨

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी वकील संघटनेचा ॲड. आसिम सरोदे यांना सडेतोड इशारा! ⚖️🔥

📍 सावंतवाडी दि.१७: “राजकीय हेतूने प्रेरित होऊन वकिलांचे चारित्र्यहनन करू नका, अन्यथा गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी आसिम सरोदे यांच्या आरोपांचा सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला.
यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी ऍड शामराव सावंत, अनिल केसरकर, गोविंद बांदेकर अमोल कविटकर स्वप्नील कोलगावकर  सुमित सुकी सिद्धी परब संकेत नेवगी अंकुश ठाकूर राहुल मडगावकर प्रतीक्षा भिसे सुशील राजगे आदी उपस्थित होते.

✅ प्रमुख मुद्दे: 🔹 सरोदे यांचे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित. 🔹 संग्राम देसाई यांच्या माध्यमातून वकिलांसाठी खंडपीठ, एआय रिसर्च सेंटर आणि संरक्षण कायद्याचे मोठे काम. 🔹 निवडणूक प्रक्रिया निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली पूर्णपणे पारदर्शक. 🔹

‘चळवळ बदनाम होत आहे’
‘निर्भय बनो’ चळवळीच्या नावाखाली चुकीच्या प्रवृत्तींना थारा दिला जात असल्याचा आरोप.
“आम्ही ‘निर्भय बनो’च्या अनेक सभा घेतल्या आहेत, मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसोबत काम करण्यात सरोदे यांना काय रस आहे? अशाने चळवळ बदनाम होत आहे,” अशी टीका ॲड. संदीप निंबाळकर यांनी केली. तर ॲड. बी. बी. रणशूर यांनी स्पष्ट केले की, सावंतवाडी वकील संघटनेकडे सभेसाठी कोणताही अधिकृत अर्ज आला नव्हता; संघटना सर्व सदस्यांच्या संमतीनेच निर्णय घेते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ‘मेगा मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिर’ पूर्व तपासणी शिबिर संपन्न

 

सावंतवाडी दि.१७: येत्या २४ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या ‘मेगा मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिरा’च्या पार्श्वभूमीवर, आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पूर्व स्क्रीनिंग (तपासणी) कॅम्प उत्साहात पार पडला. या कॅम्पच्या माध्यमातून आगामी मुख्य शिबिरासाठी रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शित करण्यात आले.
दिग्गजांच्या उपस्थितीत उद्घाटन
या विशेष पूर्व तपासणी शिबिराचे उद्घाटन नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बांदेकर यांनी नागरिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणारे हे शिबिर सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त रुग्णांनी आपली नावनोंदणी करून तपासणी करून घ्यावी,” असे ते म्हणाले.
तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
वैद्यकीय अधीक्षक: डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, तज्ञ डॉक्टर: डॉ. देसाई, डॉ. अवधूत, डॉ. रेड्डी, डॉ. सागर जाधव, डॉ. अटक.
तसेच: टी.एम.ओ (TMO) ऑफिस कर्मचारी, प्राथमिक आरोग्य कर्मचारी आणि व्यापारी मुंज यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य शिबिराचे स्वरूप (२४ मार्च रोजी)
आगामी २४ मार्च रोजी होणाऱ्या महाशिबिरामध्ये विविध व्याधींवरील नामांकित तज्ञ डॉक्टर रुग्णसेवा देणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील विभागांचे तज्ञ उपलब्ध असतील हृदयरोग तज्ञ,कर्करोग (कॅन्सर) तज्ञ,मधुमेह व हार्मोन तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ
युरोलॉजिस्ट (मूत्रविकार तज्ञ),हाडांचे तज्ञ (ऑर्थोपेडिक)
जनरल सर्जन या पूर्व तपासणी कॅम्पमुळे कोणत्या रुग्णाला कोणत्या तज्ञाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, हे निश्चित करण्यात आले असून, यामुळे मुख्य शिबिराच्या दिवशी होणारी गर्दी टाळून रुग्णांना शिस्तबद्ध पद्धतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बार कौन्सिल निवडणूक पारदर्शक व्हावी; वकील असीम सरोदे यांचा सावंतवाडीतून एल्गार

सावंतवाडी दि.१६: “महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. वकिलांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, सारासार विचार करूनच आपले मतदान करावे,” असे आवाहन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सावंतवाडी येथे आयोजित वकील संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि वकिलांच्या समस्यांवर जोरदार भाष्य केले.

राजकीय गुलामगिरी स्वीकारणाऱ्यांपासून सावध राहा
निवडणुकीला उभे असलेल्या काही उमेदवारांवर टीका करताना सरोदे म्हणाले की, “जे उमेदवार राजकीय गुलामगिरी स्वीकारून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या मनात पराभवाची भीती आहे. ते खऱ्या अर्थाने वकिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. महाराष्ट्रात असा अनुभव कुठेच आला नव्हता, मात्र सावंतवाडीत तो पाहायला मिळत आहे.” बार कौन्सिलने वकिलांच्या न्याय्य हक्कांसाठी लढले पाहिजे, समाजात भ्रम पसरवू नये, असेही त्यांनी नमूद केले.

न्यायालय कोणाची खासगी मालमत्ता नाही
न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, न्यायालय हे ‘पब्लिक प्लेस’ असून ते संविधानात्मक दृष्टिकोनातून समाजासाठी काम करण्यासाठी आहे. “न्यायालय कोणाच्या मालकीचे नाही. जे निवडून आले आहेत ते केवळ प्रतिनिधी आहेत, मालक नाहीत. न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्यांनी हा गैरसमज दूर करावा,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, न्यायाधीशांनी सत्कार स्वीकारताना विचार करावा आणि पोलीस प्रशासनाने निवृत्त न्यायाधीशांचा अवमान करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीतील कार्यक्रमाला मज्जाव आणि दबावतंत्राचा आरोप
सावंतवाडीतील कार्यक्रमाबाबत बोलताना सरोदे यांनी गंभीर आरोप केले. “येथील खरी वस्तुस्थिती समोर येईल या भीतीने पोलिसांच्या दबावातून या कार्यक्रमात अडथळा आणला गेला. स्थानिक वकिलांवर दबाव टाकण्यात आला. संग्राम देसाई यांनी पदाचा गैरवापर करून कार्यक्रम करण्यास मज्जाव केला असेल, तर अशी व्यक्ती पदावर राहण्यास पात्र नाही,” असे ते म्हणाले. बार कौन्सिलची निवडणूक आता राजकीय होत चालली असून वकिलांना दबावाखाली ठेवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

२ लाख १५ हजार वकिलांच्या कल्याणाचे काय?
“मी स्वतः निवडणूक लढवत नाही, पण समाजासाठी आणि वकिलांच्या हितासाठी महाराष्ट्रभर फिरत आहे. महाराष्ट्रात २ लाख १५ हजार वकील आहेत, त्यांच्या कल्याणासाठी बार कौन्सिलने गेल्या काही वर्षांत काय केले, हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे,” असे सरोदे यांनी म्हटले. तसेच, बार कौन्सिलमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी असावा आणि कामकाजात पूर्ण पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली.

बोगस मतदारांचा प्रश्न आणि तक्रारी
बार कौन्सिलच्या निवडणुकीत बोगस नावांचा वापर करून निवडणूक लढवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष कमिटी नेमण्याची गरज व्यक्त केली. “माझ्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र वकिलांवर अन्याय होऊ देणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बुलेट ट्रेन नको, कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करा; खासदार अरविंद सावंत यांचा लोकसभेत सरकारवर प्रहार

नवी दिल्ली दि.१६: लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. “सरकार एकीकडे हाय-स्पीड कॉरिडॉरच्या गप्पा मारत असताना, सामान्य रेल्वे प्रवाशांना मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे,” अशा शब्दांत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

सीएसएमटीवर महाराजांच्या पुतळ्याला विरोध का?
खासदार सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा बसवण्यास होत असलेल्या विलंबावर तीव्र संताप व्यक्त केला. “जर केवडिया स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो, तर शिवरायांच्या नावाने असलेल्या स्थानकावर त्यांचा पुतळा बसवण्यास ‘नीती’चे कारण देऊन नकार का दिला जातो?” असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.

रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अद्याप अधांतरी
मुंबईतील ब्रिटीशकालीन नावे बदलण्याच्या आश्वासनांचा त्यांनी समाचार घेतला. निवडणुकीच्या काळात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स आणि चर्नी रोड या स्थानकांच्या नामांतराचे फलक दिसले, मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असे ते म्हणाले. तसेच, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि दुहेरीकरणाची मागणी
कोकणवासीयांच्या व्यथा मांडताना सावंत म्हणाले की, सणासुदीच्या काळात कोकण रेल्वेचा प्रवास अत्यंत खडतर होतो. यावर उपाय म्हणून:

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे.संपूर्ण मार्गाचे तातडीने दुहेरीकरण करावे.

कोकणच्या विकासासाठी बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे दुहेरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

बुलेट ट्रेनमुळे घरांना तडे; शेतकऱ्यांचे प्रश्न
बुलेट ट्रेन प्रकल्पावर टीका करताना त्यांनी पालघर जिल्ह्यातील सपाडे परिसरातील घरांचे उदाहरण दिले. टनेलसाठी केलेल्या स्फोटांमुळे सुमारे १०० ते १५० घरांना मोठ्या भेगा पडल्या असून कंत्राटदारांकडून मिळणारी मदत तोकडी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या वारसांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष केवळ प्रवाशांच्याच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी आवाज उठवला.

“मुंबईतील मोटरमन सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. कामाचे वाढते तास आणि केबिनमधील गोंगाटामुळे अनेक जण राजीनामे देत आहेत,” असे ते म्हणाले.

याशिवाय, ट्रॅकची सुरक्षा करणाऱ्या गँगमन आणि खलाशी यांच्या समस्यांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

माडखोल ग्रामपंचायतीत ग्रामस्थाचा राडा; सरपंच व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीसह जिवे मारण्याची धमकी

सावंतवाडी दि.१६:तालुक्यातील माडखोल ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी एका संतापलेल्या ग्रामस्थाने जोरदार राडा घालत धुमाकूळ घातला. या प्रकारात सरकारी साहित्याची तोडफोड करण्यात आली असून, सरपंच आणि कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व “ग्रामपंचायत पेटवून देईन,” अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी संशयित गुरुनाथ सोनू राऊळ (रा. माडखोल) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी माडखोल ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि लिपिक आपले दैनंदिन प्रशासकीय कामकाज हाताळत होते. यावेळी संशयित गुरुनाथ राऊळ हा एका कामाचा दाखला मिळवण्यासाठी कार्यालयात आला होता. दाखला देण्याच्या तांत्रिक प्रक्रियेवरून किंवा इतर काही कारणावरून त्याचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला.

हा वाद अचानक विकोपाला गेला आणि रागाच्या भरात राऊळ याने कार्यालयातील टेबलावर असलेले:
संगणक व मॉनिटर
प्रिंटर महत्त्वाची शासकीय कागदपत्रे
या साहित्याची फेकाफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
दहशतीचे वातावरण
केवळ साहित्याचे नुकसान करून संशयित थांबला नाही, तर त्याने उपस्थित सरपंच आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. “ग्रामपंचायत पेटवून देईन,” अशी उघड धमकी दिल्याने कार्यालयात आणि परिसरात काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस कारवाई
घटनेनंतर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयित गुरुनाथ राऊळ याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि दहशत निर्माण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रतिक्रिया: शासकीय कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे संताप व्यक्त होत असून, अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुढील तपास: सावंतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

“आपलो सिंधुदुर्ग” उपक्रमाची कार्यशाळा संपन्न जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांची समृद्ध माहिती जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “आपलो सिंधुदुर्ग” या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दुसरी कार्यशाळा जिल्हा परिषद ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपलो सिंधुदुर्ग हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावाची सविस्तर माहिती विकिपीडिया या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सुमारे ८० तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांनी आतापर्यंत सुमारे ६० गावांची माहिती विकिपीडियावर प्रसिद्ध केली आहे. या माहितीमध्ये त्या गावाचा इतिहास, वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे तसेच गावाशी संबंधित आकर्षक छायाचित्रे अशा विविध अंगांनी माहिती संकलित करून ती व्यवस्थित पद्धतीने सादर केली जात आहे.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेत शिक्षकांचे कौतुक केले. तसेच माहिती संकलन करताना अचूकता, विश्वसनीयता आणि सुस्पष्टता यांना विशेष महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले. गावांची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून शिक्षकांनी यामध्ये अधिक उत्साहाने सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेदरम्यान काही शिक्षकांनी गावांची माहिती संकलित करताना आलेले अनुभव आणि आव्हाने सांगितली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करत पुढील कामासाठी आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, पुढील आठवड्यात तालुकानिहाय तज्ञ शिक्षकांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७५६ गावांची माहिती महिनाभरात विकिपीडियावर उपलब्ध करून देण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेला उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) फारुकी अहमदि अफसोरोद्दीन, उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, उपशिक्षणाधिकारी भोजराज शेर्लेकर, तसेच या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक जावेद तांबोळी यांच्यासह जिल्ह्यातील तज्ञ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

सावंतवाडी दि.१६: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. रंगभरण स्पर्धेत धन्विका सचिन मुळीक तर चित्रकला स्पर्धेत प्रार्थना प्रणय नाईक प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

इयत्ता पहिली ते दुसरीसाठीच्या रंगभरण स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धन्विका सचिन मुळीक प्रथम, हर्षिता प्रवीण मुळीक द्वितीय, स्वराली विश्वेश‌ पांगम तृतीय, हार्दिक अमोल भिरवंडेकर, दिक्षा पराग टिळवे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. तर इ. तिसरी व चौथीसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रार्थना प्रणय नाईक, सार्थक स्नेहल मालवणकर द्वितीय, आराध्या अभिजित चव्हाण तृतीय तर आरोही विनोद गावडे, अन्वी विनोद गावडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण कलाशिक्षक बी. व्ही. मालवणकर, चित्रकार अक्षय सावंत यांनी केल. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच स्व. किशोर दत्ताजीराव भोसले स्मृती आरोग्य व सामाजिक सेवा पुरस्कार ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी’ यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे सदस्य रवी जाधव, रुपा मुद्राळे,हेलन निब्रे, समीरा खलील, लक्ष्मण कदम यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडीचे प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, कोमसाप अध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल भोसले, संचालिका मंगल भोसले, शोभा भोसले, मानसी भोसले, नमिता भोसले, सोमा सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, या स्पर्धेला माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाली. त्यांचा वारसा भोसले- तळीकर प्रतिष्ठान पुढे घेऊन जात आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे उद्गार श्री. केसरकर यांनी काढले. त्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण प्रसंगी प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही मनोगत व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गौरव भोसले, प्राजक्ता पाटील, सुलक्षणा चव्हाण, शिवम धुरी तसेच आपण व्यक्त होऊया समितीचे सर्वेश राऊळ, अविनाश बांदेकर, समर्थ केळुसकर, गोविंद मळगावकर, अनिकेत मळगावकर, मंगेश मेस्त्री, हर्षा सावंत, ऋतुजा सावंत, नेहा दळवी, समृद्धी सावंत, केतकी सावंत, ऋषिकेश केळुसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे निवेदन संचालक विनायक गांवस यांनी केले. तर आभार आपण व्यक्त होऊया समितीचे प्रमुख निरज भोसले यांनी मानले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना युतीची मोहर; प्रमोद कामत अध्यक्ष, तर दादा साईल उपाध्यक्ष!

प्रमोद कामत
दादा साईल

सिंधुदुर्गनगरी दि.१६: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा पेच अखेर सुटला आहे. ‘बंद लिफाफ्यात’ कोणाचे नाव असणार? या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दादा साईल यांची निवड निश्चित झाली आहे.
महत्त्वाचे तपशील:
अध्यक्ष: प्रमोद कामत (बांदा निर्वाचन क्षेत्र, भाजप)
उपाध्यक्ष: दादा साईल (पावशी निर्वाचन क्षेत्र, शिवसेना – शिंदे गट)
निवडणूक प्रक्रिया: आज दुपारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली.
सत्तेचे नवे समीकरण
जिल्हा परिषदेत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांची युती झाल्याने सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. बांदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रमोद कामत यांना अध्यक्षपदाची संधी देऊन भाजपने सीमाभागातील नेतृत्वाला बळ दिले आहे, तर कुडाळ तालुक्यातील पावशीचे सदस्य दादा साईल यांच्या रूपाने शिंदे गटाला मानाचे उपाध्यक्षपद मिळाले आहे.
अधिकृत घोषणा दुपारी ३:३० वाजता
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, दुपारी ३:३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गनगरी परिसरात जल्लोषाची तयारी सुरू केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563