18.5 C
New York
Wednesday, September 16, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 82

सावंतवाडीत ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात : डिजिटल युगात मराठी संवर्धनाची शपथ

यशवंतराव भोसले बी फार्म काॉलेजच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी, दि.२८: मराठी भाषेच्या गौरव आणि संवर्धनाच्या उद्देशाने यशवंतराव भोसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथे आज ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या आचार्य चरक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना होती — “मराठी भाषेचे संवर्धन – काळाची गरज”. आधुनिक आणि डिजिटल युगात मराठीचे स्थान अधिक भक्कम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. निवृत्ती कर्वेकर आणि प्रा. डॉ. रमाकांत गावडे (गोगटे–वाळके महाविद्यालय, बांदा) उपस्थित होते. तसेच ‘कोकण लाईव्ह’चे संपादक श्री. सीताराम गावडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अ. जगताप हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दोन्ही वक्त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणातून मराठी भाषेचा वैभवशाली इतिहास, संत-साहित्याची परंपरा, सामाजिक चळवळींतील मराठीचे योगदान आणि बदलत्या काळात भाषेचे जतन करण्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले. “भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृतीची ओळख आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विशेषतः दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर, शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात मराठीतील लेखन-वाचन वाढविणे, तसेच पुढील पिढीपर्यंत मराठीचा समृद्ध वारसा पोहोचविण्याची जबाबदारी यावर भर देण्यात आला. डिजिटल माध्यमांमध्ये मराठीची उपस्थिती वाढविणे ही काळाची गरज असल्याचेही वक्त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, आत्मभान आणि जाणीव निर्माण झाली. महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समितीच्या स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमास लाभला.एकूणच, हा कार्यक्रम मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देणारा आणि समाजप्रबोधन घडवणारा ठरला.या कार्यक्रमासाठी
सादर जतिन अ. टेकावडे
समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समिती,विनोद रा. बिरादार
समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समिती,प्रा. डॉ. विजय अ. जगताप,प्राचार्य, यशवंतराव भोसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, सावंतवाडी यांचे योगदान महत्त्वाचे होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं म्हणून १६ संघटना एकत्र

१० मार्च रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १६ संघटनेचा विधिमंडळ अधिवेशनात मोर्चाचा निर्धार

सावंतवाडी,दि.२८ :गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं म्हणून १६ संघटना एकत्र आल्या आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते नेतृत्व करत आहेत. घरासाठी १ लाख ७० हजार गिरणी कामगार व वारसांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सध्या १ लाख २५ हजार अर्ज छाननी होऊन पात्र होतील.त्यांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्यासाठी येत्या १० मार्च रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १६ संघटनेचा विधिमंडळ अधिवेशनात निर्धार मोर्चा काढला जाणार आहे त्याला शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वारसांची सभा श्रीराम वाचन मंदिर मध्ये आयोजित करण्यात आली होती त्यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार श्री निवृत्ती देसाई, ऑफिस सेक्रेटरी सुर्यकांत बांदलकर, सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे उपस्थित होते.
यावेळी गिरणी कामगारांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.
यावेळी बजरंग चव्हाण यांनी गिरणी कामगार संप, संघर्ष, सरकारची भूमिका आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गिरणी कामगारांना शेलू व वांगणी मध्ये घरे नको तर मुंबईत घरे हवीत यासाठी लढा उभारला त्याला यश आले आहे. मुंबई मध्ये घरं मिळावी म्हणून १६ संघटनांचा संयुक्त लढा सुरू आहे.सन १ ऑक्टोबर १९८१ च्या पुढील संपात सहभागी झालेल्या कामगारांना घर मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. गिरणी कामगार व वारसांची एकजूट दाखवून सरकारने हक्काचे घर द्यावे म्हणून निर्धार मोर्चात कामगार,वारस आणि कुटुंबातील सदस्यांनी सामिल व्हावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार श्री निवृत्ती देसाई म्हणाले, राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १६ संघटनांचा संयुक्त निर्धार मोर्चा विधानसभेवर धडकणार आहे. प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी व्हावे. महाराष्ट्र गुजरातला विलीन करणार होता ,त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढा उभारला त्यात गिरणी कामगारांचा मोठा वाटा होता. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गिरणी कामगारांच्या घराचा पाया घातला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले त्या संविधानामुळेच गिरणी कामगारांना न्याय मिळाला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी होण्यात गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे. शंभर कोटींचे कपडे निर्माण करणाऱ्या गिरणी कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले आहे. १२५ गिरणींचे राष्ट्रीयकरण झाले त्यामुळे मुंबईत रोजगार निर्माण झाला आणि मुंबई आर्थिक राजधानी बनली हे विसरून चालणार नाही. हक्काच्या घराला अजून किती काळ गिरणी कामगारांनी वाट पाहावी. मरणाच्या दारात उभा असणारा गिरणी कामगारांचे आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला मिळवायचे असतील तर गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न त्यांनी तात्काळ सोडवावा. सेलू आणि वांगणी येथे घरे नको तर ती मुंबईतच घरे हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४० कोटी जनतेचे नेतृत्व करत आहे त्यांनी गिरणी कामगारावर कृपा करून त्यांचा शंभर टक्के मुंबईत घरे देण्याचा निर्णय घेऊन आशिर्वाद मिळवावेत.आपल्या परिसरातील खासदार, आमदारांनी सुद्धा गिरणी कामगार व वारसांच्या प्रश्न धडाडीने संसदेत आणि विधानसभेत लावून धरावा यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी गिरणी कामगार व वारस सुरेखा भिसे ,लाॅरेन्स डिसोझा,सुमन मुळीक ,सतीश निकम, रामचंद्र कोठावळे, महादेव सावंत यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक आणि आभार गिरणी कामगार संघाचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत सुभाष परब, लॉरेन्स डिसोझा ,विश्वनाथ कुबल, रामचंद्र कोठावळे आदींनी केले.
यावेळी गणपत गावडे, सोनू दळवी, सुभाष नाईक, गोविंद पालव, रेखा लोंढे देसाई, मुकुंद बाईत, जयवंती सावंत, गुरुनाथ राऊळ, अशोक केरकर, हरी कुबल, अशोक दळवी, राजन देसाई ,देवराव देसाई, दशरथ नाईक, प्रकाश राऊळ ,अनुप्रिया बाईत, कविता गावडे, प्रेमानंद परब,गिता परब यांच्यासह सुमारे १५० गिरणी कामगार व वारस उपस्थित होते.
यावेळी विधानसभेवर काढण्यात येणाऱ्या १० मार्च रोजी च्या निर्धार मोर्चाला मोठ्या संख्येने गिरणी कामगार व वारसांनी उपस्थित राहणार असल्याची ग्वाही दिली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

१००० रुपये स्वीकारताना तलाठी प्रवीण पोले जेरबंद 

निरवडे तलाठी प्रवीण पोले लाच घेतांना जाळ्यात 

सावंतवाडी दि.२८: प्रविण दिलीप पोले (वय ३५), ग्राम महसूल अधिकारी व तलाठी सजा निरवडे (ता. सावंतवाडी) यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या बहिणीच्या आडनाव दुरुस्तीच्या प्रलंबित कामासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी २००० रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी १००० रुपये स्वीकारण्याची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली.
या प्रकरणी तक्रार श्री पांचाळ, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग यांनी नोंदवली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक माळी करीत आहेत.
घटनेमुळे सावंतवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

CPGQ449QDLOVs0ng

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

= 🎖️ सावंतवाडीचा ‘आरोग्यदूत’ निवृत्त! डॉ. वज्राटकर यांची रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा; निवृत्तीनंतरही सेवेचा लाभ मिळावा – ॲड. अनिल निरवडेकर

https://youtube.com/shorts/arsfyte_72A?si=

मार्गदर्शन करताना सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडे कर सोबत डॉ ज्ञानेश्वर ढवळे, डॉ पांडुरंग वज्राटकर व अन्य

🎖️ सावंतवाडी दि.२८: अनिल निरवडेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील निवृत्त होणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग वज्राटकर यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांनी केलेली रुग्णसेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असल्याचे सांगितले. शासकीय नियमानुसार ते निवृत्त होत असले तरी त्यांच्या अनुभवाचा लाभ पुढील दोन वर्षे सावंतवाडीलाच मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित निरोप समारंभात विविध मान्यवरांनी डॉ. वज्राटकर यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.या सोहळ्याला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सौ. मोहिनी वज्राटकर, डॉ. अनिकेत वज्राटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, प्रफुल्ल वालावलकर, राजू मसुरकर, भास्कर केरवडेकर, डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ गिरीश कुमार चौगुले, डॉ. अभिजित चितारी, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सोन्सुरकर यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. अमोल पावसकर यांनी त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सांगत, डॉ. वज्राटकर यांचा ज्ञानेश्वरीवरील अभ्यास आणि रुग्णांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.निवृत्तीनंतर त्यांनी कुटुंबाला वेळ द्यावा आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखमय जावे, अशी शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या. कार्यक्रमाला रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल
अनिल निरवडेकर म्हणाले की, रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. वज्राटकर यांनीही रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केला असून डॉक्टरांनी संवादकौशल्य कसे असावे, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.

फिजिशियनची गरज अधोरेखित
रवी जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची आवश्यकता असल्याचे सांगत, डॉ. वज्राटकर यांनी निवृत्तीनंतरही आधुनिक उपचारपद्धती स्वीकारून सेवा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद सज्ज; पत्रकार भवन, पार्किंग समस्या आणि मोती तलावाचे होणार संवर्धन

प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी स्पष्ट केला विकास आराखडा; विविध प्रश्नांवर पत्रकारांशी साधला संवाद

सावंतवाडी दि.२८: सावंतवाडी शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर परिषद प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यामध्ये पत्रकारांसाठी अद्ययावत ‘पत्रकार भवन’, शहराची पार्किंग समस्या, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि ऐतिहासिक मोती तलावाचे संवर्धन या विषयांना प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली.
सावंतवाडी नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, जिल्हा खजिनदार ॲड. संतोष सावंत, सचिव विनायक गावस, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, व्हाईस मीडियाचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धीप्रमुख हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी राजू तावडे, माजी तालुका सचिव सागर चव्हाण, तसेच सिद्धेश सावंत, आनंद धोंड, जतिन भिसे, भुवन नाईक आदी प्रिंट आणि सोशल मीडिया चे पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नांची तड लावणार
तालुक्यातील पत्रकारांसाठी सर्व सोयींनी युक्त असे ‘पत्रकार भवन’ उभारण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल. सध्याच्या पत्रकार कक्षात आवश्यक सुविधा वाढवण्याबाबत आगामी स्थायी समितीच्या बैठकीत तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन निरवडेकर यांनी दिले.
पार्किंगसाठी ‘गोवा पॅटर्न’ आणि शिस्तबद्ध नियोजन
शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता, पार्किंगसाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत:
मल्टीलेव्हल पार्किंग: पणजी (गोवा) शहराच्या धर्तीवर इमारतींच्या वरील मजल्यावर पार्किंग करण्याबाबत विचार सुरू आहे.नियोजित जागा: पार्किंगच्या जागांवर पांढरे पट्टे मारून शिस्तबद्ध दुचाकी व चारचाकी पार्किंग सुरू केली जाईल.वन-वे पर्याय: व्यापाऱ्यांशी चर्चा करून आणि सुवर्णमध्य साधून ‘वन-वे’ वाहतुकीचा पर्याय अवलंबला जाईल.

मोती तलावाचा काठ आणि वृक्ष संवर्धन
मोती तलावाच्या काठावर सध्या असलेली ३४ झाडे तलावाचा कठडा आणि फुटपाथ कमकुवत करत आहेत. यावर उपाय म्हणून:१०० नवीन झाडे: सध्याच्या झाडांऐवजी १०० नवीन सावली देणारी, फळझाडे आणि पक्षांना आकर्षित करणारी झाडे लावली जातील. यासाठी ‘वृक्ष संवर्धन समिती’ नियुक्त करण्यात आली असून, त्यांच्या शिफारशीनुसारच वैज्ञानिक पद्धतीने वृक्षारोपण केले जाईल.
आरोग्य आणि पायाभूत सुविधा
नगर परिषदेच्या दवाखान्यात रुग्णसंख्या वाढवून उत्तम सेवा देण्यावर भर दिला जात आहे. तसेच, अग्निशामक दलाची इमारत येत्या दीड वर्षात सुसज्ज करून त्यावर अतिरिक्त मजला बांधला जाईल. नगर परिषदेच्या मागील मोकळ्या जागेचा वापर पार्किंगसाठी करण्याबाबतही प्रशासन सकारात्मक आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘खाजगी रक्षक’
शाळा सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर शाळांना खाजगी सुरक्षारक्षक नेमण्याबाबत नगर परिषद पत्रव्यवहार करणार आहे. यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता पार करता येईल.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

पारगड रस्त्यासाठी १५ कोटींच्या निधीची मागणी; आमदार दीपक केसरकर यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पत्र

सावंतवाडी दि.२८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तिलारी-घोडगेवाडी-मोले-पारगड-कोल्हापूर या रस्त्याच्या कामासाठी मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लेखी पत्र दिले आहे.
​रस्त्याचे महत्त्व आणि पार्श्वभूमी
​हा रस्ता पूर्वी राज्य महामार्ग १३१ (जुना) म्हणून ओळखला जात होता, ज्याचा समावेश आता नवीन राज्य महामार्ग १८७ मध्ये करण्यात आला आहे. या रस्त्याची एकूण लांबी १७.२०० किमी असून, त्यातील १२.४०० किमीचा टप्पा सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी (दोडामार्ग उपविभाग) यांच्या अखत्यारीत येतो. उर्वरित रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातील मिरवेल येथे जोडला जातो.
​ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग
​आमदार केसरकर यांनी पत्रात नमूद केले की, हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले पारगड कडे जातो. परिसरातील गावांसाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत आवश्यक आहे. तसेच, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा हा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दुवा आहे.
​निधीचा तपशील
​रस्त्याच्या कामासाठी आणि भूसंपादनासाठी खालीलप्रमाणे निधीची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे:
​रस्ता बांधकाम: १० कोटी रुपये.
​भूसंपादन (८०० मीटर खाजगी जागा): ५ कोटी रुपये.
​एकूण मागणी: १५ कोटी रुपये.
​स्थानिकांच्या मागणीची दखल
​दोडामार्ग तालुक्यातील रहिवाशांची ही दीर्घकालीन मागणी असून, यासाठी वारंवार उपोषणेही झाली आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता, मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात या कामाला प्राधान्याने निधी द्यावा, जेणेकरून या परिसरातील विकासाला गती मिळेल, अशी आग्रही विनंती केसरकर यांनी केली आहे.तसेच मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग प्रमुख राज्य मार्गाचा (रस्त्यांचा )दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पत्र देऊन मागणी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मराठी भाषेचा ‘वैज्ञानिक’ वारसा; केवळ उच्चार नव्हे, तर ध्वनीचे शास्त्र!

मुंबई दि.२७: आज ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण मराठी केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून ती जगातील सर्वात वैज्ञानिक भाषांपैकी एक आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

मराठीचे व्याकरण आणि तिची वर्णमाला ही मानवी शरीरातील ‘ध्वनी निर्मिती’च्या प्रक्रियेवर आधारित आहे. आपण जेव्हा ‘क’ म्हणतो तेव्हा आवाज थेट कंठातून येतो, तर ‘प’ म्हणताना ओठांचा वापर होतो. हे नैसर्गिक क्रमाचे शास्त्र मराठीला इतर भाषांच्या तुलनेत अधिक समृद्ध आणि तर्कसंगत ठरवते.

🔍 असे आहे मराठीचे वैज्ञानिक वर्गीकरण:
वर्ग नाव उच्चाराचे स्थान अक्षरे
क-वर्ग कंठव्य कंठ (Throat) क, ख, ग, घ, ङ
च-वर्ग तालव्य टाळू (Palate) च, छ, ज, झ, ञ
ट-वर्ग मूर्धन्य मूर्धा (Hard Palate) ट, ठ, ड, ढ, ण
त-वर्ग दंतव्य दात (Teeth) त, थ, द, ध, न
प-वर्ग ओष्ठ्य ओठ (Lips) प, फ, ब, भ, म
“अमृतातेही पैजा जिंके” असं ज्ञानेश्वर माउलींनी उगाच म्हटलं नाही. ज्या भाषेत ‘ज्ञ’ पासून ‘ळ’ पर्यंत प्रत्येक उच्चाराला एक विशिष्ट शास्त्रीय आधार आहे, ती भाषा जपणे आणि तिचा अभिमान बाळगणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

“ज्या पद्धतीने आपण बोलतो, त्याच पद्धतीने लिहितो आणि ज्या क्रमाने लिहितो, त्याच क्रमाने शरीर ध्वनी निर्माण करते. हेच मराठीचे खरे सौंदर्य आहे.”

मराठी भाषा दिनाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२६ सालासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

सिंधुदुर्गनगरी दि.२७:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या वर्षासाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे.महसूल विभागाच्या नियमांनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ​या अधिसूचनेनुसार, पहिली स्थानिक सुट्टी १७ ऑगस्ट २०२६ ‘नागपंचमी’ निमित्त असेल. दुसरी सुट्टी १८ सप्टेंबर २०२६ ‘ज्येष्ठागौरी पूजन’ आणि तिसरी सुट्टी ६ नोव्हेंबर २०२६ ‘धनत्रयोदशी’ निमित्त जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल हद्दीत येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांना या सुट्ट्या लागू राहतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांची मद्य घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ‘सत्याचा विजय झाला’ म्हणत केजरीवाल भावूक

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल झाले भावूक

नवी दिल्ली दि.२७: गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात खळबळ माजवून देणाऱ्या दिल्ली मद्य धोरण (Excise Policy Case) प्रकरणात आज आम आदमी पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.
केवळ दाव्यांवर न्याय होत नाही: न्यायालय
निकाल सुनावताना न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. न्यायालयाने स्पष्ट केले की:
न्यायालय केवळ ठोस आणि खात्रीशीर पुराव्यांच्या आधारावरच निकाल देऊ शकते.
तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे अत्यंत कमकुवत आणि अपुरे होते.
केवळ आरोप किंवा दावे करून गुन्हा सिद्ध होत नाही, त्यासाठी सबळ पुराव्यांची गरज असते.
सत्याचा विजय, केजरीवाल झाले भावूक
न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. ते भर न्यायालयात हमसून रडले. “आम्ही नेहमी सांगायचो की हा संपूर्ण तपास म्हणजे केवळ राजकीय सूडबुद्धी आहे. आज सत्याचा विजय झाला आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
क्रमश: मिळाली सुटका
न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना दिलासा दिला आहे. सर्वात आधी उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कुलदीप सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर मनीष सिसोदिया आणि शेवटी अरविंद केजरीवाल यांनाही न्यायालयाने सर्व आरोपांतून मुक्त केले.

महत्त्वाचे मुद्दे:
क्लीन चिट: केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यावर आता कोणताही आरोप उरलेला नाही.
तपास यंत्रणेला चपराक: पुराव्यांच्या अभावामुळे तपास यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राजकीय पडसाद: या निकालामुळे ‘आम आदमी पक्षा’ला आगामी निवडणुकांसाठी मोठे नैतिक बळ मिळाले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बांद्यात भीषण आग: ५ एकर काजू बागायती खाक; लाखो रुपयांचे नुकसान

बांद्यात भीषण आगीची मोठी दुर्घटना
कुडाळ अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळली; रोजा असतानाही मुस्लिम युवकांचे धाडसी मदतकार्य

बांदा दि.२७: शहरातील देऊळवाडी आणि मुस्लिमवाडी भरड परिसरात आज शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. काजू हंगाम तोंडावर असतानाच आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आगीचे रौद्ररूप आणि ग्रामस्थांची धावपळ
दुपारच्या सुमारास अचानक लागलेली ही आग कोरडे वातावरण आणि वाऱ्याच्या वेगामुळे काही क्षणांतच पसरली. बागायतीमध्ये सुकलेला पालापाचोळा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. विशेष म्हणजे, आगीच्या घटनेच्या अगदी जवळच महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आणि दाट लोकवस्ती असल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती.

यंत्रणेची तत्परता अन् माणुसकीचे दर्शन
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी तातडीने हालचाली केल्या. सावंतवाडीचा बंब उपलब्ध न झाल्याने कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

या कठीण प्रसंगात बांद्यातील सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू असतानाही, अनेक युवकांनी उपवासाच्या अवस्थेत जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला. स्थानिक नागरिक, तरुण आणि प्रशासकीय अधिकारी यांनी संयुक्त प्रयत्न करून आग वस्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आणली.

शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले
या आगीत खालील शेतकऱ्यांच्या बागायतींचे प्रचंड नुकसान झाले आहे: नीलेश मोरजकर,राजन मोरजकर,राजा सावंत,प्रमिला मोरजकर,श्री. सावळ यांचा समावेश आहे.

काजू झाडांसोबतच मौल्यवान सागवान आणि जांभूळ झाडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. हंगाम सुरू होण्यापूर्वीच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे.

प्रमुख उपस्थिती
घटनास्थळी बांदा तलाठी फिरोज खान, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच आबा धारगळकर, हर्षद कामत, शैलेश केसरकर, सुशांत पांगम, भय्या गोवेकर, ज्ञानेश्वर येडवे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

महत्त्वाची टीप: वाढत्या उन्हामुळे बागायती परिसरातील कचरा किंवा पालापाचोळा जाळताना शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563