21.2 C
New York
Monday, July 6, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 36

करमळगाळूवाडीच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून करणार.. विक्रांत सावंत 

सावंतवाडी,दि.१५ : ओटवणे गावाला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. या गावाशी आपले वडील विकास भाईंसह आजोबा भाईसाहेब सावंतांपासून जवळचे नाते आहे. त्यामुळे या गावासह करमळगाळूवाडीच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली. ओटवणे करमळगाळूवाडीतील लिंग देवस्थान येथे आयोजित कार्यक्रमात विक्रांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, पंचायत समिती सदस्या उत्त्कर्षा गावकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, गावप्रमुख रवींद्र गावकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, गावठणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, मनाली गावकर, लावण्या तावडे, कलेश्वर दशावतार मंडळाचे सिद्धेश कलिंगण, पुरोहित विश्वनाथ केळकर, निवृत्त वनपाल गोविंद देवधर, विठ्ठल गावकर, सोसायटी उपाध्यक्ष स्वप्निल उपरकर, निवृत्त शिक्षक मनोहर मयेकर, पोलीस पाटील शेखर गावकर, वायरमन समीर सावंत, दशरथ शृंगारे, सुनिल मेस्त्री, विश्वनाथ बोर्ये, उमेश म्हापसेकर, शशी गोसावी, संतोष तावडे, नरेंद्र कविटकर, शांताराम श्रृंगारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक दळवी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करमळगाळूवाडीतील आबालवृद्ध प्रथमच एकत्र आल्याबद्दल कौतुक करीत या वाडीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उत्कर्षा गावकर यांनी करमळगाळूवाडीतील ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करीत या प्रलंबित विकास कामे मार्गी लागण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आत्माराम गावकर यांनी ग्रामपंचायतीच्या या वाडीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असुन ही एकजूट अशीच कायम ठेवण्याचे आवाहन करमळगाळूवाडीतील ग्रामस्थांना केले. या कार्यक्रमात विक्रांत सावंत, अशोक दळवी, उत्त्कर्षा गावकर, आत्माराम गावकर, संतोष कासकर, रवींद्र गावकर, सगुण गावकर, रवींद्र म्हापसेकर, उमेश गावकर, संजय कानसे, महेश चव्हाण, प्रशांत बुराण, मनाली गावकर, लावण्या तावडे, विठ्ठल गावकर, सिद्धेश कलिंगण, विश्वनाथ केळकर, गोविंद देवधर, स्वप्निल उपरकर, मनोहर मयेकर, शेखर गावकर, समीर सावंत, सुनिल मेस्त्री, विश्वनाथ बोर्ये, उमेश म्हापसेकर आदी व्यासपीठावरील मान्यवरांचा यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी करमळगाळू वाडीतील अर्जुन तावडे, कांता नाईक, गोरखनाथ भुते, राजन रासम, गजा रासम, विजय तावडे, प्रदीप राणे, लवू तावडे, राजा तावडे, संतोष राऊळ, गिरधर नाईक, सुदेश तावडे, प्रवीण म्हापसेकर, अभिजीत तावडे, ऋषी तावडे, नामदेव राऊळ, मंगेश गावकर, सदाशिव गावकर, सखाराम गावकर, अनंत तावडे, भगवान तावडे,शरद नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंडळाचे अश्विनी तावडे यांनी तर आभार अक्षय तावडे यांनी मानले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

विदर्भ होरपळला! अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी, ऑटोमध्ये आढळला मृतदेह

अकोला, दि-१५: अकोल्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शहरातील मालवाहू ऑटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा अंदाज अकोला पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकतोय अन् नागरिक होरपळून निघत आहे. अकोला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले होते. पुढील काही दिवस अकोल्यात उष्णतेचा इशाराही दिला होता. याच उष्मघातामुळे अकोल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे.. काल अकोल्यातील तापमान जगातील दुसऱ्या क्रमांकावर होतं.. 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यात नोंदविण्यात आलं होतं. विदर्भातील ४ जिल्हे देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामध्ये अकोल्याचे नाव आघाडीवर आहे. ४ दिवसांपासून अकोल्यात सूर्य आग ओकतोय.

मागील काही दिवसातील अकोल्यातील तापमान
14 एप्रिल : 44 अंश सेल्सियस.
13 एप्रिल : 43.8 अंश सेल्सियस.
12 एप्रिल : 43.1 अंश सेल्सियस.
11 एप्रिल : 42.1 अंश सेल्सियस.
10 एप्रिल : 40.1 अंश सेल्सियस.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह चे आयोजन*

सावंतवाडी दि.१५: शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल ता. सावंतवाडी च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत दिनांक 18/4/2026 रोजी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह चे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अशौरन्स या डिपार्टमेंटस साठी गोवा मधील नामांकित
फार्मा कंपनी या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये सहभागी होणार आहे.
याच बरोबर गतवर्षी प्रमाणेच यावर्षी ही विविध फार्मास्युटिकल कंपन्याचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्याचे संस्थेने योजले आहे.
सदरील कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये महाविद्यालयाच्या डी फार्म, बी फार्म आणि एम फार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तरी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कुडाळात कचरा डेपोला भीषण आग ; जिवीतहानी नाही

कुडाळ,दि.१५: नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली आग वाऱ्याने भडकली. आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण कचरा डेपोला वेढा दिला. आगीची माहीती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत व एमआयडीसीचे अग्नीशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका संध्या तेरसे, श्रेया गवंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा कोकणावर अन्याय करणारा; आमदार दीपक केसरकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडं; सावंतवाडी बस स्थानक राज्यातील एक उत्कृष्ट मॉडेल

सावंतवाडी दि.१५: नागपूर ते गोवा या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या सध्याच्या आराखड्यावरून कोकणात राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. “सध्याचा आराखडा हा कोकणावर, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, यामध्ये तातडीने सुधारणा करावी,” अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करून पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मांडला आहे.

‘कोकणचा विकास की केवळ गोव्याचा मार्ग?’
आमदार केसरकर यांनी विद्यमान आराखड्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या मते, जर नागपूरहून येणारा पर्यटक या महामार्गावरून थेट गोव्याला निघून जाणार असेल, तर कोकणातील पर्यटन व्यवसायाला त्याचा शून्य फायदा होईल.

“कोकणात जागतिक दर्जाचे समुद्रकिनारे आणि बंदरे असताना महाराष्ट्रातील माल निर्यातीसाठी गोव्याच्या बंदराचा वापर का व्हावा? हा महामार्ग केवळ गोव्याला जोडण्यासाठी नसावा तर तो कोकणच्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा असावा,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

केसरकरांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आणि सुधारणा:
रेडी बंदराचा विकास: महामार्गाचा एक फाटा थेट सिंधुदुर्गातील रेडी बंदराला जोडला जावा. यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळेल.

पर्यायी मार्ग (आजरा-रेडी): हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराकडे वळवल्यास तो कोस्टल रोडला (विरार ते सिंधुदुर्ग) क्रॉस करेल, ज्यामुळे पर्यटकांना पत्रादेवी किंवा कोकणच्या किनारपट्टीवर येणे सोपे होईल.

इको-सेन्सिटिव्ह झोनचे रक्षण: चंदगड ते दोडामार्ग असा ‘फोरलेन’ हायवे केल्यास पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल. तसेच आंबोली, फणसवडे आणि केसरी भागातून बोगदा (Tunnel) काढल्यास संवेदनशील वनक्षेत्राला धक्का न लावता मार्ग काढणे शक्य आहे.

पर्यटनाचे विकेंद्रीकरण: एक फाटा तिलारीमार्गे उत्तर गोव्याला आणि दुसरा दक्षिण गोव्याला जोडल्यास चंदगड व दोडामार्ग तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल.

लोकप्रतिनिधींशी चर्चा
या विषयाचे गांभीर्य ओळखून केसरकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि चंदगडच्या आमदारांशी सविस्तर चर्चा केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधला जाणारा हा महामार्ग भविष्यात कोकणच्या मुळावर न येता प्रगतीचा मार्ग ठरावा, यासाठी राज्य सरकारने आराखड्यात बदल करावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

सावंतवाडी बस स्थानक राज्यातील एक उत्कृष्ट मॉडेल ठरेल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि मोक्याच्या ठिकाणी असलेले सावंतवाडी एसटी बसस्थानकाचा आता चेहरामोहरा बदलणार असून या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर सर्व सोयीसुविधांनी युक्त असे भव्य बस स्थानक उभारले जाणार आहे. कोरोना संकटामुळे गेल्या काही काळापासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला असून, येत्या दोन महिन्यांत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

​सावंतवाडीचे हे बस स्थानक राज्यातील एक उत्कृष्ट मॉडेल ठरेल, अशा पद्धतीने त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सुमारे ४ एकर विस्तीर्ण जागेत होणारा हा प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर राबवण्यात येणार असून, यामध्ये प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी आधुनिक पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रस्ते आणि गाड्यांच्या सुलभ वळणासाठी आवश्यक ते रुंदीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी केवळ बस स्थानकच नव्हे, तर व्यावसायिक दृष्टीकोनातूनही विविध सोयी उपलब्ध करून देऊन महसूल वाढीवर भर दिला जाईल. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सावंतवाडी आणि वेंगुर्ला बस स्थानक परिसरात इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशनची ही सोय केली जाणार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

रेडी येथील नवसाला पावणाऱ्या द्विभूज गणपतीचा वाढदिवस १८ एप्रिल रोजी

श्री त्रिभुज गणपती

रेडी वेंगुर्ला दि.१५: नवसाला पावणारा आणि संकटाला धावून येणारा अशी ख्याती असलेल्या, द्विभूज गणपती, रेडी येथील गणपतीचा ५० वाढदिवस मोठ्या भक्तीभावाने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा होणार आहे. सकाळी ६ वाजता अभिषेकाने वाढदिवसाची सुरुवात होणार आहे. ८ वाजता श्री सत्याविनायक महापूजा, १२:३० महाआरती, १२:४५ तीर्थप्रसाद, ०१ ते ०४वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ०५ वाजता श्री गणेश माऊली संगीत ग्रुप प्रस्तुत स्वर गणेश हा गाण्यांचा कार्यक्रम, रात्रौ ०८: ३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य कंपनीचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी नागोळेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱ्या चालकांची आंबोलीत तपासणी करा.

सागर ढोकरे

सावंतवाडी,दि.१५: मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर घाटातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करा आणि नंतर त्यांना पुढे जाऊ द्या, अशी मागणी गेळे सरपंच तथा भाजपचे युवा नेते सागर ढोकरे यांनी केली आहे.
काही दिवसांनी वर्षा पर्यटन सुरू होणार आहे. त्यामुळे याबाबत कायमस्वरूपी योग्य ते नियोजन पोलिसांनी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी घाटातील रस्ते अरुंद आहेत. परवानगी नसताना सुध्दा त्या ठिकाणी अवजड वाहतूक केली जाते. त्याचबरोबर वाहनधारक भरधाव वेगाने येत जात असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसात तर हे प्रमाण खूप मोठे असते. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि संबंधित चालकाची तपासणी तसेच मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

निरवडेत किरकोळ कारणावरून दोन गटात ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; झरबाजार परिसरात दोन गट भिडले; पोलिसांनी ११ जणांना घेतले रडारवर

सावंतवाडी,दि.१४: निरवडे येथील झरबाजार परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली आहे.
​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील चेतन गोविंद गावडे (वय ३२, रा. निरवडे देऊळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण मोहन गावडे, श्रीमती लक्ष्मण गावडे, शिवाजी सुरेश गावडे, चंद्रा धारगळकर आणि सुनील सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मित्राला मारण्याची धमकी दिल्याबाबत शिवाजी गावडे याला विचारणा केली असता चेतन गावडे, निलेश शिरोडकर, सिताराम गावडे आणि लाडू गावडे यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत शिवाजी सुरेश गावडे यांनी सिताराम लाडू गावडे यांच्या हाताला चावा घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.​दुसरीकडे, दुसऱ्या गटातील श्रीमती लक्ष्मण गावडे (रा. निरवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दीर शिवाजी सुरेश गावडे यांना मारहाण होत असताना त्या सोडवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना देखील लाकडी दांड्याने व हाताने मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून लाडू गावडे, सिताराम गावडे, चेतन गावडे, गुरुनाथ गावडे, उमाकांत गावडे आणि निलेश शिरोडकर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे हे करीत आहेत.​घटनेनंतर रात्री उशिरा दोन्ही गटांतील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न; आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन; राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

कणकवली दि.१४: महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली येथील भगवती हॉलमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

दिमाखदार उद्घाटन सोहळा
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाढदिवसानिमित्त जीजी उपरकर यांचा शाल व पुष्पहार देऊन जंगी सत्कार करण्यात आला.

निष्ठा आणि संघर्षाचा गौरव
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की:
“जीजी उपरकर हे कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिवसेना पक्षाशी सदैव निष्ठावंत राहिले आहेत. स्वतःच्या फायद्यापेक्षा पक्षवाढीसाठी त्यांनी नेहमीच धडपड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना अधिक मजबूत करू.”

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपरकर यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. जिल्ह्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांनी उपरकर यांचा गौरव केला व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.

उपरकर यांचा संकल्प
सत्काराला उत्तर देताना परशुराम उपरकर भावूक झाले. ते म्हणाले:

“सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना जनतेचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्य आहे. उद्धव ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना संघटना जिल्ह्यात पुन्हा पूर्ववत उभी करण्याचा संकल्प मी या वाढदिवसानिमित्त करत आहे.”

तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग
या शिबिरासाठी बी.के.एल. वालावलकर रुग्णालय (डेरवण, चिपळूण) येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ. अमित वालावलकर, डॉ. क्रिशांत दिवाटे, डॉ. पूजा गीते, डॉ. आकाश राऊळ आणि अमित वैद्य यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला नीलम पालव, नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, संतोष सावंत, चंद्रशेखर उपरकर, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, समीर परब, जगन्नाथ आजगावकर, राजू कोरगावकर, संजय बेलवलकर, प्रवीण कोरगावकर, पप्पू कोरगावकर, संदीप म्हाडगूत, शैलेश नेरकर, प्रमोद सावंत, उमेश हजारे, पुरुषोत्तम तारी, निलेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले. आरोग्य शिबिराच्या या यशस्वी आयोजनाबद्दल कणकवली परिसरातून जीजी उपरकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी दि.१४: नगरपरिषद आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभीचे धार्मिक व औपचारिक कार्यक्रम
उत्सवाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्रिशरण व पंचशील ग्रहण करून करण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दलातर्फे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोजित अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण होते.

मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते.
सुस्मिता जाधव (सभापती, पंचायत समिती)
श्रद्धा सावंत-भोसले (नगराध्यक्ष, नगर परिषद)
अ‍ॅड. अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष)
मायकल डिसोजा (जिल्हा परिषद सदस्य)
चंद्रकांत नागावकर (प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चा)
संजू परब (माजी नगराध्यक्ष)
महेश परुळकर (जिल्हाध्यक्ष, संविधानिक हितकारणी)
यासह सावली पाटकर, टिळाजी जाधव, संतोष जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शन व विचार
नगराध्यक्ष श्रद्धा भोसले: त्यांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत १९३२ सालच्या त्यांच्या सावंतवाडी भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. “बाबासाहेबांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आमची सामाजिक वाटचाल सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सभापती सुस्मिता जाधव: “बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयापेक्षाही मोठी आहे. त्यांच्यामुळेच आज आम्ही प्रगतीपथावर आहोत,” असे सांगत त्यांनी समाजाप्रती बांधिलकी व्यक्त केली.

अध्यक्ष जगदीश चव्हाण: त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “संविधान हा आपला सर्वोच्च ग्रंथ असून त्याचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.”

सत्कार व गौरव सोहळा
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या भीमगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सगुण जाधव यांनी केले, तर स्वागताध्यक्ष सद्गुरु जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव व चिन्मय असंकर यांनी केले, तर शेवटी शांताराम असंनकर यांनी आभार मानले.