18.4 C
New York
Tuesday, July 7, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 50

बुलेट ट्रेन नको, कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करा; खासदार अरविंद सावंत यांचा लोकसभेत सरकारवर प्रहार

नवी दिल्ली दि.१६: लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. “सरकार एकीकडे हाय-स्पीड कॉरिडॉरच्या गप्पा मारत असताना, सामान्य रेल्वे प्रवाशांना मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे,” अशा शब्दांत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

सीएसएमटीवर महाराजांच्या पुतळ्याला विरोध का?
खासदार सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा बसवण्यास होत असलेल्या विलंबावर तीव्र संताप व्यक्त केला. “जर केवडिया स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो, तर शिवरायांच्या नावाने असलेल्या स्थानकावर त्यांचा पुतळा बसवण्यास ‘नीती’चे कारण देऊन नकार का दिला जातो?” असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.

रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अद्याप अधांतरी
मुंबईतील ब्रिटीशकालीन नावे बदलण्याच्या आश्वासनांचा त्यांनी समाचार घेतला. निवडणुकीच्या काळात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स आणि चर्नी रोड या स्थानकांच्या नामांतराचे फलक दिसले, मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असे ते म्हणाले. तसेच, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि दुहेरीकरणाची मागणी
कोकणवासीयांच्या व्यथा मांडताना सावंत म्हणाले की, सणासुदीच्या काळात कोकण रेल्वेचा प्रवास अत्यंत खडतर होतो. यावर उपाय म्हणून:

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे.संपूर्ण मार्गाचे तातडीने दुहेरीकरण करावे.

कोकणच्या विकासासाठी बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे दुहेरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

बुलेट ट्रेनमुळे घरांना तडे; शेतकऱ्यांचे प्रश्न
बुलेट ट्रेन प्रकल्पावर टीका करताना त्यांनी पालघर जिल्ह्यातील सपाडे परिसरातील घरांचे उदाहरण दिले. टनेलसाठी केलेल्या स्फोटांमुळे सुमारे १०० ते १५० घरांना मोठ्या भेगा पडल्या असून कंत्राटदारांकडून मिळणारी मदत तोकडी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या वारसांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष केवळ प्रवाशांच्याच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी आवाज उठवला.

“मुंबईतील मोटरमन सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. कामाचे वाढते तास आणि केबिनमधील गोंगाटामुळे अनेक जण राजीनामे देत आहेत,” असे ते म्हणाले.

याशिवाय, ट्रॅकची सुरक्षा करणाऱ्या गँगमन आणि खलाशी यांच्या समस्यांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

माडखोल ग्रामपंचायतीत ग्रामस्थाचा राडा; सरपंच व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीसह जिवे मारण्याची धमकी

सावंतवाडी दि.१६:तालुक्यातील माडखोल ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी एका संतापलेल्या ग्रामस्थाने जोरदार राडा घालत धुमाकूळ घातला. या प्रकारात सरकारी साहित्याची तोडफोड करण्यात आली असून, सरपंच आणि कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व “ग्रामपंचायत पेटवून देईन,” अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी संशयित गुरुनाथ सोनू राऊळ (रा. माडखोल) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी माडखोल ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि लिपिक आपले दैनंदिन प्रशासकीय कामकाज हाताळत होते. यावेळी संशयित गुरुनाथ राऊळ हा एका कामाचा दाखला मिळवण्यासाठी कार्यालयात आला होता. दाखला देण्याच्या तांत्रिक प्रक्रियेवरून किंवा इतर काही कारणावरून त्याचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला.

हा वाद अचानक विकोपाला गेला आणि रागाच्या भरात राऊळ याने कार्यालयातील टेबलावर असलेले:
संगणक व मॉनिटर
प्रिंटर महत्त्वाची शासकीय कागदपत्रे
या साहित्याची फेकाफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
दहशतीचे वातावरण
केवळ साहित्याचे नुकसान करून संशयित थांबला नाही, तर त्याने उपस्थित सरपंच आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. “ग्रामपंचायत पेटवून देईन,” अशी उघड धमकी दिल्याने कार्यालयात आणि परिसरात काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस कारवाई
घटनेनंतर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयित गुरुनाथ राऊळ याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि दहशत निर्माण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रतिक्रिया: शासकीय कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे संताप व्यक्त होत असून, अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुढील तपास: सावंतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

“आपलो सिंधुदुर्ग” उपक्रमाची कार्यशाळा संपन्न जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांची समृद्ध माहिती जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “आपलो सिंधुदुर्ग” या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दुसरी कार्यशाळा जिल्हा परिषद ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपलो सिंधुदुर्ग हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावाची सविस्तर माहिती विकिपीडिया या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सुमारे ८० तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांनी आतापर्यंत सुमारे ६० गावांची माहिती विकिपीडियावर प्रसिद्ध केली आहे. या माहितीमध्ये त्या गावाचा इतिहास, वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे तसेच गावाशी संबंधित आकर्षक छायाचित्रे अशा विविध अंगांनी माहिती संकलित करून ती व्यवस्थित पद्धतीने सादर केली जात आहे.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेत शिक्षकांचे कौतुक केले. तसेच माहिती संकलन करताना अचूकता, विश्वसनीयता आणि सुस्पष्टता यांना विशेष महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले. गावांची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून शिक्षकांनी यामध्ये अधिक उत्साहाने सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेदरम्यान काही शिक्षकांनी गावांची माहिती संकलित करताना आलेले अनुभव आणि आव्हाने सांगितली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करत पुढील कामासाठी आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, पुढील आठवड्यात तालुकानिहाय तज्ञ शिक्षकांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७५६ गावांची माहिती महिनाभरात विकिपीडियावर उपलब्ध करून देण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेला उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) फारुकी अहमदि अफसोरोद्दीन, उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, उपशिक्षणाधिकारी भोजराज शेर्लेकर, तसेच या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक जावेद तांबोळी यांच्यासह जिल्ह्यातील तज्ञ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

सावंतवाडी दि.१६: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. रंगभरण स्पर्धेत धन्विका सचिन मुळीक तर चित्रकला स्पर्धेत प्रार्थना प्रणय नाईक प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

इयत्ता पहिली ते दुसरीसाठीच्या रंगभरण स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धन्विका सचिन मुळीक प्रथम, हर्षिता प्रवीण मुळीक द्वितीय, स्वराली विश्वेश‌ पांगम तृतीय, हार्दिक अमोल भिरवंडेकर, दिक्षा पराग टिळवे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. तर इ. तिसरी व चौथीसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रार्थना प्रणय नाईक, सार्थक स्नेहल मालवणकर द्वितीय, आराध्या अभिजित चव्हाण तृतीय तर आरोही विनोद गावडे, अन्वी विनोद गावडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण कलाशिक्षक बी. व्ही. मालवणकर, चित्रकार अक्षय सावंत यांनी केल. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच स्व. किशोर दत्ताजीराव भोसले स्मृती आरोग्य व सामाजिक सेवा पुरस्कार ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी’ यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे सदस्य रवी जाधव, रुपा मुद्राळे,हेलन निब्रे, समीरा खलील, लक्ष्मण कदम यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडीचे प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, कोमसाप अध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल भोसले, संचालिका मंगल भोसले, शोभा भोसले, मानसी भोसले, नमिता भोसले, सोमा सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, या स्पर्धेला माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाली. त्यांचा वारसा भोसले- तळीकर प्रतिष्ठान पुढे घेऊन जात आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे उद्गार श्री. केसरकर यांनी काढले. त्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण प्रसंगी प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही मनोगत व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गौरव भोसले, प्राजक्ता पाटील, सुलक्षणा चव्हाण, शिवम धुरी तसेच आपण व्यक्त होऊया समितीचे सर्वेश राऊळ, अविनाश बांदेकर, समर्थ केळुसकर, गोविंद मळगावकर, अनिकेत मळगावकर, मंगेश मेस्त्री, हर्षा सावंत, ऋतुजा सावंत, नेहा दळवी, समृद्धी सावंत, केतकी सावंत, ऋषिकेश केळुसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे निवेदन संचालक विनायक गांवस यांनी केले. तर आभार आपण व्यक्त होऊया समितीचे प्रमुख निरज भोसले यांनी मानले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना युतीची मोहर; प्रमोद कामत अध्यक्ष, तर दादा साईल उपाध्यक्ष!

प्रमोद कामत
दादा साईल

सिंधुदुर्गनगरी दि.१६: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा पेच अखेर सुटला आहे. ‘बंद लिफाफ्यात’ कोणाचे नाव असणार? या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दादा साईल यांची निवड निश्चित झाली आहे.
महत्त्वाचे तपशील:
अध्यक्ष: प्रमोद कामत (बांदा निर्वाचन क्षेत्र, भाजप)
उपाध्यक्ष: दादा साईल (पावशी निर्वाचन क्षेत्र, शिवसेना – शिंदे गट)
निवडणूक प्रक्रिया: आज दुपारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली.
सत्तेचे नवे समीकरण
जिल्हा परिषदेत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांची युती झाल्याने सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. बांदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रमोद कामत यांना अध्यक्षपदाची संधी देऊन भाजपने सीमाभागातील नेतृत्वाला बळ दिले आहे, तर कुडाळ तालुक्यातील पावशीचे सदस्य दादा साईल यांच्या रूपाने शिंदे गटाला मानाचे उपाध्यक्षपद मिळाले आहे.
अधिकृत घोषणा दुपारी ३:३० वाजता
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, दुपारी ३:३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गनगरी परिसरात जल्लोषाची तयारी सुरू केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

प्रमोद कामत यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी वर्णी; सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे अभिनंदन करतांना सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रिडा सभापती सुधीर आडीवरेकर सोबत दिलीप भालेकर

सिंधुदुर्ग दि.१६: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित होताच सावंतवाडीत त्यांच्या समर्थकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. ‘प्रमोद कामत आगे बढो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
आडीवरेकर आणि भालेकर यांच्याकडून विशेष सत्कार
या निवडीचे वृत्त समजताच सावंतवाडीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती सुधीर आडीवरेकर आणि भाजप सावंतवाडी सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी प्रमोद कामत यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ प्रदान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहिला
या निवडीमुळे सावंतवाडी भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, उपस्थित कार्यकर्त्यांनी कामत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. आगामी काळात कामत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवी. ; कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहुरी विद्यापीठातर्फे गौरव.

अहिल्यानगर दि.१६: शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली. ही पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतीचा विकास या कामांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सन्मानामुळे राज्यातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मानाच्या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत १९ मार्चला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन….विविध संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्ग दि.१६: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीमध्ये १९ मार्च रोजी भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. सकल हिंदू समाज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.​ही शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता राजवाडा येथून सुरू होईल. यात्रेचा मार्ग नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिवरामराजे पुतळा मार्गे भोसले उद्यान येथे संपणार आहे. हिंदू धर्माचे नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आणि सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक श्री. शैलेश गुरुदास पै आणि सह-संयोजिका श्रीम. सौ. गायत्री गुरुदास देवस्थळी यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.​या पत्रकार परिषदेत खजिनदार आनंद साधले, विकास रांगणेकर, विशाखा रांगणेकर, कस्तुरी देवस्थळी, दिनेश गावडे आदी उपस्थित होते. या नववर्ष स्वागत यात्रेत विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत असून, विविध संस्था आणि उत्सव समित्या यात सक्रिय सहभाग घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.​ ‌या यात्रेत आरंभ सखी, बजरंग दल, दुर्गावाहिनी, एकमुखी दत्तमंदिर ट्रस्ट, घे भरारी, गोरक्षक, हरेकृष्ण संस्कार केंद्र, हिंदू वैश्य वाणी संघटना, पाटीदार समाज, पुर्व सैनिक सेवा परिषद, रासाई कला क्रीडा मंडळ, रिक्षा संघटना, सालईवाडा मित्रमंडळ, समता महिला मंडळ, सनातन संस्था, शिवकन्यका, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान, श्री. रामानंद संप्रदाय नरेंद्र महाराज, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सुवर्णकार संघ, वैश्यवाडा मित्रमंडळ, वेदपाठशाळा सावंतवाडी, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, विद्याभारती शिशुवाटिका, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांचा समावेश आहे. हिंदू नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे संयोजक शैलेश पै व सह संयोजक सौ गायत्री देवस्थळी यांनी आवाहन केले आहे.​

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी हालचालींना वेग! २६३ किमी मार्गाच्या अभ्यासासाठी निविदा जाहीर रेल्वेचा प्रवास होणार सुसाट! 🚄💨

सावंतवाडी दि.१६: कोकण रेल्वे मार्ग आता कात टाकणार आहे. मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा विलंब टाळण्यासाठी ‘पॅच डबलिंग’चा (टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:
📍 दोन महत्त्वाचे टप्पे: माजोर्डा (गोवा) ते वैभववाडी रोड (१५१ किमी) आणि थोकूर ते मूकंबिका रोड (११२ किमी) अशा एकूण २६३ किमी मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास होणार.
💰 निविदा प्रक्रिया: अभ्यासासाठी १.३१ कोटींची निविदा; ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
⏳ अहवाल: कंत्राटदाराला ३ महिन्यांत जमिनीची उपलब्धता आणि तांत्रिक बाबींचा अहवाल सादर करावा लागणार.

एकेरी मार्गामुळे होणारी क्रॉसिंगची डोकेदुखी आता लवकरच थांबण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून मालवाहतुकीलाही गती मिळेल.

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! 📢

कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. वैभववाडी ते माजोर्डा आणि थोकूर ते मूकंबिका रोड या दोन महत्त्वाच्या पट्ट्यांत ‘पॅच डबलिंग’साठी निविदा जाहीर झाल्या आहेत.

✅ गाड्यांच्या क्रॉसिंगचा वेळ वाचणार.
✅ रेल्वेची क्षमता वाढणार.
✅ प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार.

कोकणच्या विकासासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरेल! 🚆✨

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी पोलिसांचा ‘ऑल आऊट’ धडाका; दारू आणि जुगार अड्ड्यांवर छापे, ५ जणांवर कारवाई

सावंतवाडी दि.१५: सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत अवैध दारू विक्री, वाहतूक आणि मटका जुगारावर पोलिसांनी जोरदार प्रहार केला असून, हजारो रुपयांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या कारवाईचा तपशील:
आंबोली चेक पोस्ट
शुभम अजित कुमार मुधा
अवैध दारू वाहतूक
८० बाटल्या दारू व सुझुकी एक्सेस (एकूण ₹९५,०००)
तळवडे गडगेवाडी
शंकर विठ्ठल मांजरेकर
अवैध दारू साठा
४८ दारूच्या बाटल्या (किंमत ₹५,७००)
सालईवाडा
शेखर बाबाजी नलावडे
मटका जुगार
जुगार साहित्य (किंमत ₹२,६००)
कोलगाव नाईक बाग
रामचंद्र वसंत सावंत
अवैध दारू विक्री
२३ दारूच्या बाटल्या (किंमत ₹२,३००)
सातार्डा रायचे पेड
चेतन पिळणकर
अवैध दारू विक्री
१५ दारूच्या बाटल्या (किंमत ₹१,५००)

मुख्य कारवाई: आंबोलीत मोठी जप्ती
या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई आंबोली चेक पोस्ट येथे झाली. गोवा ते कोल्हापूर प्रवासादरम्यान शुभम मुधा हा आपल्या Access (MH 51 E 6290) दुचाकीवरून २५ हजार रुपये किमतीच्या ८० दारूच्या बाटल्यांची तस्करी करताना पकडला गेला. पोलिसांनी दारूसह ७० हजार रुपयांची दुचाकीही जप्त केली आहे.
पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई API पंकज शिंदे, जमादार टाकेकर, हवालदार अनिल धुरी, जाधव, राऊत, शिंदे, मंगेश शिंगाडे आणि प्रकाश कदम यांच्या पथकाने केली. सावंतवाडी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563