18.4 C
New York
Tuesday, July 7, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 51

🎂 आमदार निलेश राणे यांचा सावंतवाडीत जलोत्सव! ५० सायकलींचे वाटप आणि दशावताराची मेजवानी 🚩

सावंतवाडी दि.१५ आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासामुळेच मी आज आमदार म्हणून जनतेचा आवाज उठवू शकत आहे,” अशा भावना आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

📍 कार्यक्रमाचे खास आकर्षण:
🚲 सामाजिक बांधीलकी: गुरू मठकर यांच्या वतीने गरजू मुलांसाठी ५० सायकलींचे वाटप.

🎭 सांस्कृतिक वारसा: कोकणच्या मातीतील दशावतार नाटकाचे भव्य आयोजन.

🛡️ सन्मान: आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि संजू परब यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन गौरवण्यात आले.

🗣️ मान्यवरांचे उद्गार:
आमदार निलेश राणे: “खासदार नारायण राणे यांनी कोकणावर जे अपार प्रेम केले, तोच विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. संजू परब आणि कार्यकर्त्यांची साथ हीच माझी खरी शक्ती आहे.”

आमदार दीपक केसरकर: “निलेश राणे हे कोकणचा बुलंद आवाज आहेत. आमदार म्हणून त्यांची विधीमंडळातील कामगिरी धडाकेबाज आहे.”

संजू परब: “गेल्या १७ वर्षांपासूनचे हे अतूट नाते आहे. निलेश राणे वरून कठोर वाटले तरी मनातून फणसासारखे गोड आहेत.”

👥 उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, तालुकाप्रमुख नारायण राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सभापती सुष्मिता जाधव यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्गात पुढील ३ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी,दि.१५: जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई येथील मंत्रालयाकडून तातडीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.​विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. विशेषतः सायंकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सतर्क राहावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय सूचनांचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

भोसले इन्स्टिट्यूटची ‘गो-कार्ट’ ठरली ‘जजेस चॉईस’… कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी

सावंतवाडी दि.15:  यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गो-कार्टला कोइमतूर येथील ‘गो-कार्ट डिझाईन चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत मानाचा ‘जजेस चॉईस’ पुरस्कार मिळाला असून देशात तेरावा क्रमांक प्राप्त करत विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर वाढवला आहे.

इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनियर्स यांच्या वतीने कोइमतूर येथे आयोजित या गो कार्ट स्पर्धेत देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या एकूण अठ्ठेचाळीस संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी टेक्निकल इन्स्पेक्शन, ब्रेकिंग टेस्ट, एक्सलरेशन टेस्ट, स्किडपॅड, ऑटोक्रॉस आणि एंड्युरन्स अशा विविध चाचण्या घेतल्या गेल्या. विशेष म्हणजे स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असतानाही भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघाने सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आणि ‘जजेस चॉईस’ हा विशेष पुरस्कार पटकावला.

हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी संघाचा कॅप्टन गौरांग तुळसुलकर याच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कॉलेजचे माजी विद्यार्थी कपिल मळगावकर व मनीष मणेरीकर यांचेही सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांना कॉलेजचे अधिव्याख्याता मिलिंद देसाई, मनीष घाटगे व आशिष सुवारे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रोजेक्टसाठी भोसले नॉलेज सिटी व्यवस्थापन, थर्मल इन्स्ट्रुमेंट्स, हिंदुस्तान पॉलिमर, सॉफ्ट मस्क प्रा.लि, मॅपसन्स यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कोकणचा आध्यात्मिक आधार हरपला: प. पू. सुवर्ण उर्फ ‘हसरे महाराज’ यांचे महानिर्वाण; मालवण परिसरात शोककळा

प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज

मालवण (कट्टा)दि.१४: कोकण ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. प. पू. भालचंद्र महाराज, प. पू. राऊळ महाराज आणि प. पू. राणे महाराज यांसारख्या महान संतांच्या परंपरेतील एक तेजस्वी व्यक्तिमत्व, प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांनी आज, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी आपला देह ठेवला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव परिसरातील भक्तपरिवारावर शोककळा पसरली आहे.

चार दशकांचा आध्यात्मिक प्रवास
गेली सुमारे ४० वर्षे हसरे महाराज आपल्या नावाप्रमाणेच हसतमुख चेहऱ्याने भक्तांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचे कार्य करत होते. अत्यंत साधा स्वभाव, प्रेमळ वागणूक आणि अध्यात्मिक अधिकार यामुळे त्यांनी असंख्य भक्तांना जीवनाची नवी दिशा दिली. प. पू. राणे महाराजांच्या देहत्यागानंतर पोरक्या झालेल्या भक्तपरिवाराला हसरे महाराजांनी आपल्या मायेने आणि मार्गदर्शनाने सावरले होते. त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून भक्त परिवार पुन्हा एकदा पोरका झाला आहे.

आज सकाळी अंत्यसंस्कार झाला
प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. हा विधी श्री राम मंदिर, प. पू. राणे महाराज मठ (कुसरवेवाडी), कट्टा, मालवण येथे पार पडला.

त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात असून, त्यांनी दिलेला भक्तीचा मार्ग आणि सद्गुरुकृपेची शिदोरी भक्तांच्या मनात सदैव जिवंत राहील.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत गॅस पाइपलाइनवरून खळबळ; सत्ताधारी नेत्यांकडून ७० लाखांचा घोटाळा ;संजू परब यांचा गंभीर आरोप!

सावंतवाडी दि.१४: शहरात सुरू असलेल्या एमएनजीएल (MNGL) गॅस पाइपलाइनच्या कामावरून सावंतवाडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. या कामात नगरपरिषदेच्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असून, एका सत्ताधारी व्यक्तीने कंपनीकडून ३० लाख रुपये आगाऊ घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. ‘उद्या गॅस गळती होऊन दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; परवानगीशिवाय काम?
आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले की, “कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता गॅस पुरवठा करण्याची तयारी केली आहे. लोकांच्या जीविताशी खेळ सुरू असून केवळ प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून दिल्याने सुरक्षा सुनिश्चित होत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास प्रशासन आणि नगराध्यक्ष याला जबाबदार राहतील.”
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
संजू परब यांनी या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीचा मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते:
शहरातील ७ हजार कनेक्शन्ससाठी प्रति कनेक्शन १००० रुपये याप्रमाणे ७० लाख रुपयांची मागणी एका सत्ताधारी व्यक्तीने केली होती.
त्यापैकी ३० लाख रुपये “पुढची ५ वर्षे आम्हीच आहोत” असे सांगून आगाऊ घेण्यात आले आहेत.
गॅस कनेक्शन्सचे दर अद्याप निश्चित नसताना ६ हजार रुपये आकारले जात आहेत, जे सामान्यांसाठी अवाजवी आहेत.
प्रशासनाला आणि नगराध्यक्षांना इशारा
प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केवळ खुर्चीवर न बसता या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे, असा टोला परब यांनी लगावला. “नळपाणी आणि गॅस योजनेतील अशाच भ्रष्टाचाराची आणखी दोन प्रकरणे माझ्याकडे आहेत. लवकरच संबंधित सत्ताधारी व्यक्तीचे नाव पुराव्यासह जाहीर करेन,” असा इशाराही त्यांनी दिला. जोपर्यंत संजू परब सक्रिय आहेत, तोपर्यंत नगरपरिषदेत बेकायदेशीर कामे होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे युवा पदाधिकारी क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.

सुरक्षा: परवानगीविना गॅस पुरवठा केल्यास दुर्घटनेची भीती.
आर्थिक आरोप: एका सत्ताधारी नेत्याने ३० लाख रुपये घेतल्याचा दावा.
अवाजवी दर: ६ हजार रुपयांचे कनेक्शन खर्चिक असल्याचा आरोप.
इशारा: पुढील काळात भ्रष्टाचाराची अधिक नावे जाहीर करणार.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

१५ दिवसांच्या रंगपंचमीमुळे बांद्याचा आठवडा बाजार रविवारी…

बांदा दि.१४-: रंगपंचमीमुळे सोमवारी बहुतांश दुकाने बंद राहणार असल्याने बांद्याचा आठवडा बाजार यावेळी रविवार दिनांक १५ मार्च रोजी भरविण्यात येणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन गैरसोय टाळावी असे आवाहन बांदा व्यापारी संघ व बांदा ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे.बांदा येथे दर सोमवारी भरणारा पारंपरिक आठवडा बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी खरेदीचे महत्त्वाचे केंद्र मानला जातो. मात्र यंदा सोमवार दिनांक १६ मार्च रोजी शिमगोत्सवनिमित्त रंगपंचमी साजरी होणार असल्याने शहरातील बहुतांश दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी संघ आणि ग्रामपंचायत प्रशासनाने एकत्रित निर्णय घेत आठवडा बाजार एक दिवस आधी म्हणजेच रविवार दिनांक १५ मार्च रोजी भरविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.बांदा दशक्रोशीतील तसेच गोवा राज्यातूनही अनेक ग्राहक आठवडा बाजारासाठी बांद्यात येत असतात. त्यामुळे ग्राहकांनी बाजाराच्या बदललेल्या दिवसाची नोंद घेऊन रविवारीच खरेदीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 ब्रेकिंग न्यूज: सावंतवाडीत हॉटेल व्यवसाय व्हेंटिलेटरवर! 🚨 “किडनी विकू की तलावात उडी मारू?” – गॅस टंचाईमुळे हॉटेल मालकाचा टाहो!

📢 सावंतवाडीत हॉटेल व्यवसाय संकटात: व्यावसायिक गॅस गायब! 📉🔥

सावंतवाडी दि.१३: तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता. गॅसअभावी हॉटेलमधील भोजन थाळी, डोसा आणि चायनीज पदार्थ बंद करण्याची वेळ.
⚠️ महत्त्वाचे मुद्दे: 📍 व्यावसायिक सिलेंडरचा तीव्र तुटवडा. 📍 इंडक्शन वापरामुळे वाढणार वीज बिलाचा बोजा. 📍 तालुक्यातील ५०० हून अधिक हॉटेल्सना फटका. 📍 प्रशासनाचे बोट राज्य शासनाकडे.
व्यापाऱ्यांना तातडीने गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

📍 सावंतवाडी (रामेश्वर प्लाझा):
इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ आता थेट आपल्या कोकणातील हॉटेल व्यवसायाला बसू लागली आहे! व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा गेल्या ८ दिवसांपासून ठप्प झाल्याने हॉटेल मालक अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

📉 काय आहे भीषण वास्तव?
हॉटेल बंद पडली: साई सुरभी हॉटेलचे मालक श्री. विजय गावडे यांची ३ पैकी २ हॉटेल्स गॅसअभावी बंद झाली आहेत. तिसरे हॉटेलही आज शेवटचा श्वास मोजत आहे.

आर्थिक संकट: मार्च महिना असल्याने बँकांचा तगादा, जीएसटी (GST), लाईट बिल, भाडे आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे? हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.चुलीचा पर्याय नाही: आरसीसी बिल्डिंग असल्याने लाकडाची चूल पेटवणे अशक्य, त्यामुळे व्यवसाय पूर्णतः ठप्प!

🗣️ व्यावसायिकाचा उद्विग्न सवाल:
“सरकार आमच्याकडे लक्ष का देत नाही? दिवसाला ३ सिलेंडर लागतात, पण ८ दिवसात १ ही मिळालेला नाही. आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही का?”
— विजय गावडे (हॉटेल व्यावसायिक)

🔍 प्रशासनाची भूमिका:
गॅस वितरकांच्या मते, घरगुती गॅसचा पुरवठा सुरू असला तरी व्यावसायिक सिलेंडरचा मुख्य पुरवठाच बंद आहे. सरकारने यावर कोणतीही डेडलाईन दिलेली नाही.

📢 आमची मागणी: शासनाने तात्काळ व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा अनेक कुटुंबांची चूल विझण्याची भीती आहे!

📢 सावंतवाडीत गॅस सिलेंडर वितरणाबाबत तहसीलदारांचे स्पष्टीकरण!
गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे:
✅ घरगुती गॅस: पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे, कोणताही अडथळा नाही. ❌ व्यावसायिक गॅस: सध्या सिलेंडर उपलब्ध नसल्याने प्रशासकीय निर्णय अद्याप प्रलंबित.
शासन आणि प्रशासनाच्या पुढील आदेशानंतरच व्यावसायिक सिलेंडरबाबत निर्णय घेतला जाईल.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड; नूतन कार्यकारिणी जाहीर

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुधीर आडिवरेकर यांचे अभिनंदन करताना

सावंतवाडी दि.१३: लायन्स क्लब सावंतवाडीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये क्लबच्या अध्यक्षपदी लायन सुधीर आडीवरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जिल्हा गव्हर्नर डॉ. वीरेंद्र जी. चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी आडीवरेकर यांच्यासोबतच क्लबच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. या निवडीबद्दल जिल्हा गव्हर्नर डॉ. चिखले यांनी नूतन कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन केले आणि भविष्यातील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्याला मिळणार नवी गती निवडीनंतर बोलताना नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आगामी काळात लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वारसा अधिक प्रभावीपणे पुढे नेला जाईल. प्रामुख्याने लोकोपयोगी उपक्रम आणि जनसेवेवर भर देऊन सावंतवाडी परिसरात क्लबच्या कार्याचा विस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सुधीर आडीवरेकर यांच्या निवडीचे वृत्त समजताच सावंतवाडीतील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी लायन्स क्लबला नवी झळाळी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.यावेळी अभिजीत पणदूरकर अमेय पई विजय चव्हाण प्रकाश राऊळ शैलेश हावळ अजित गवंडळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी भ्रष्टाचाराच्या विळख्यात; विधान परिषदेत निलंबनाची मागणी, १५ मार्चपर्यंत चौकशीचा फेरा!

सिंधुदुर्ग दि.१३: जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा मोठा स्फोट झाला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कामकाजात दिरंगाईचे गंभीर आरोप करण्यात आले असून, हे प्रकरण आता थेट राज्याच्या विधान परिषदेत गाजले आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंपी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

आमदारांचे खळबळजनक आरोप
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सभागृहात पुराव्यानिशी माहिती मांडताना सांगितले की, कविता शिंपी या कोणालाही जुमानत नाहीत. एका अनुकंपा शिपाई भरतीसाठी एका विधवा महिलेकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. “संबंधित महिलेला आपल्या मुलाच्या नोकरीच्या मान्यतेसाठी स्वतःचे मंगळसूत्र विकून पैसे द्यावे लागले,” असे सांगताच सभागृहात एकच शांतता पसरली. म्हात्रे यांनी आपल्याकडे या संदर्भातील ऑडिओ क्लिप आणि सबळ पुरावे असल्याचेही स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराचे स्वरूप आणि कार्यपद्धती
सभागृहात मांडण्यात आलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागात खालील बाबींवरून संताप व्यक्त करण्यात आला:

एजंटमार्फत व्यवहार: फायली मंजूर करण्यासाठी आणि तपासणीसाठी एजंटचा वापर केला जात असल्याचा आरोप.

आर्थिक पिळवणूक: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची बिले थकीत ठेवणे, पगार वेळेवर न करणे आणि प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी करणे.

प्रशासकीय दिरंगाई: जाणीवपूर्वक कामात अडथळे निर्माण करून कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे.

आमदार किशोर दराडे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक होत, खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करत या ‘भ्रष्टाचारी रॅकेट’वर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की:

चौकशी समिती: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

अहवालाची मुदत: या समितीला आपला सविस्तर अहवाल १५ मार्च पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारवाईचे संकेत: अहवालात दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर आणि निलंबनाची कारवाई केली जाईल, असे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात खळबळ
गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात होती. आज विधान परिषदेत आमदार म्हात्रे यांनी या विभागाचे वाभाडे काढल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आता सर्वांचे लक्ष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

भोसले नॉलेज सिटीत ‘नारीशक्ती’चा जागर; विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात

सावंतवाडी दि.१२: शहरातील नामांकित शैक्षणिक संकुल असलेल्या भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या प्रगतीचा गौरव करत आणि त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देत हा दिवस उत्साहात पार पडला.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संस्थेचे सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, वायबीआयटीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि उपप्राचार्य गजानन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान
यानिमित्ताने संस्थेतील दोन महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महिमा चारी: इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्याबद्दल.
हवाबी शेख: ‘सिव्हिल’ विभागाच्या अधिव्याख्याता असून, त्यांनी पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल.

विविध स्पर्धांनी वाढवली रंगत
महिलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी अनेक अनोख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फुलांपासून दागिने तयार करणे, लोकरीच्या वस्तू बनविणे, ‘युनिक बिझनेस आयडिया’, वक्तृत्व, पाककला, चित्रकला आणि बुके बनविणे अशा स्पर्धांचा समावेश होता. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

सांस्कृतिक सादरीकरणातून इतिहासाला उजाळा
केवळ स्पर्धाच नव्हे तर विद्यार्थिनींच्या कलागुणांनीही सर्वांची मने जिंकली:
सावित्रीबाई फुले: यांच्या जीवनावर आधारित विशेष कार्यक्रम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केला.

राणी लक्ष्मीबाई: यांच्या शौर्यगाथेवर आधारित प्रयोग ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थिनींनी सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.
महिला कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमात अधिकच रंगत भरली.

शिक्षणातूनच समाजाची प्रगती
मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी आपल्या मनोगतातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी महिलांच्या क्षमतांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. ले. कर्नल रत्नेश सिन्हा यांनी भावी पिढीमध्ये महिलांप्रती आदर निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता भोसले, स्वाती नाईक व अवंतिका वैद्य यांनी केले, तर आभार हवाबी शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या महिला कर्मचारी आणि शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563