27.1 C
New York
Tuesday, September 8, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 49

आई कुणा म्हणू मी! मायेचा अथांग सागर आणि कष्टांची शिदोरी

भावपूर्ण श्रद्धांजली !

आई, तू अशी अचानक अनाथ करून निघून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी नियती आणि दैवापुढे कोणाचं काही चालत नाही, याची प्रचिती आज तुझ्या जाण्याने येत आहे.

हा देह केवळ रक्त-मांसाचा गोळा नाही, तर तू दिलेली चेतना, संस्कार आणि भावनांचा ठेवा आहे. तू घेतलेल्या कष्टांचं आणि प्रेमाचं कर्ज या जन्मात काय, पण पुढच्या अनेक जन्मांतही फिटणं शक्य नाही. आई, तुझ्याशिवाय जीवनाची कल्पना करणंही कठीण आहे. तुझे शब्द आणि तुझी शिकवण आजही माझ्या अंगाखांद्यावर खेळत आहेत. “माझा ‘विजय’ हा तुझा अभिमान ! मी सार्थ केला काय?” – या माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच तू लहानपणीच्या लपाछुपीसारखी कायमची दडून बसलीस.निघून गेलीस !!

कष्टांची पहाट आणि रानावनातील सोबत

आई, तुझ्या आठवणी येतात त्या तुझ्या अपार कष्टांच्या. बाबा सीमेवर देशाचं रक्षण करत असताना तू घर आणि मुलं दोन्ही सांभाळलंस. आई तू ‘बाबा’ ही झालीस. पहाटेच्या साखरझोपेत मी असायचो, तेव्हा तू डोईवर लाकडाचा भारा घेऊन भटवाडी किंवा पेळपीच्या जंगलातून घरी यायचीस. तुझ्या हातात माझ्यासाठी असलेला रानमेवा, ती करवंदं आणि घसोळी आजही डोळ्यांसमोर आहेत.

१९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी तुझ्या डोळ्यातली ती भीती आणि आसवांची धार मला आजही आठवते. रेडिओवरच्या बातम्या ऐकताना ‘शेकडो सैनिक धारातीर्थी पडले’ असं ऐकलं की तुझ्या काळजाचा ठोका चुकायचा. बाबांची चिंता आणि आमचं संगोपन अशा दुहेरी कात्रीत तू स्वतःला झिजवलंस.

एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात तिचा जन्म झाला इन्दुमती हे तिचे माहेरचे नाव,त्याकाळची सातवीपर्यंत शिक्षण तिचे झालेले होते म्हणून ती आम्हा मुलांना शाळेत जा शिकून मोठे व्हा असे नेहमी सांगत असे.आम्ही कमी शिकलो तुम्ही तरी शिका असे नेहमी सांगत असे.आजोबा महादेव,आजी द्वारका,गजानन व एकनाथ मामा,मामी,शांती मावशी यामुळे शनिवार रविवार माझा मुक्काम मामाच्या मळेवाड गावी असे. बऱ्याचदा आमच्या सोबत आई असे.तेव्हाही तिचे अपार कष्ट पाहिले.

संस्कारांची शिदोरी आणि यशाची वाट

शाळेत जाण्याचा आळस केला की तुझा धाक आणि बाबू काकांचा वचक असायचा. छडी घेऊन शाळेत पोहोचवणारा बाबू काका आणि डबा करून देणारी तू, यामुळेच मी अभ्यासात प्रगती करू शकलो. सावंतवाडीच्या ‘श्री पंचम खेमराज’ महाविद्यालयात जाताना पहाटे सहाची बस पकडण्यासाठी तू केलेली धडपड आजही काळजाला स्पर्श करते. घरची परिस्थिती बेताची असतानाही मळेवाडच्या मामा-आजोबांच्या सोबतीने तू आमचं विश्व समृद्ध केलंस.

शेवटचा निरोप आणि न विझणारी आठवण

आयुष्यात स्थैर्य आलं, घर-संसार सुखाचा झाला, पण तुझ्या मायेची सावली कायम असावी असं वाटत होतं. नव्या घरात तुझा वावर हवा होता, काही काळ राहिलीस ही, पण तुझ्या अर्धांगवायूच्या झटक्याने सर्व काही बदललं. उपजिल्हा रुग्णालय, रेडी येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि शेवटी गोवा मणीपाल… आम्ही आशा सोडली नव्हती. तू बरी होऊन घरी येशील असं वाटत होतं. हॉस्पिटलमध्ये असतानाही तुला तुझी काळजी नव्हती, तर “बाबांची काळजी घ्या, त्यांना वेळेवर जेवण द्या,” हेच तुझे शब्द होते. तुझ्या ७९ व्या वर्षी, एकसष्ठाव्या लग्नाच्या वाढदिवसानंतर नियतीने तुला हिरावून नेलं.

“आई तुझं लेकरू, वेडं गं कोकरू, रानात फसलयं, रस्ता चुकलंय, सांग मी काय करू?”

‘विजय’: एका नावाचा विलक्षण प्रवास

प्रत्येकाच्या नावामागे काहीतरी गोष्ट असते, पण माझ्या नावाचा इतिहास थेट देशाच्या सीमेवरच्या कर्तव्याशी आणि खेळाच्या मैदानावरील विजयाशी जोडलेला आहे. माझ्या जन्माचा तो दिवस केवळ माझ्या कुटुंबासाठीच नाही, तर एका अभिमानास्पद विजयासाठीही लक्षात राहणारा ठरला.

वारसा आणि परंपरेचा कौल

माझा जन्म झाला तेव्हा घरात आनंदाचे वातावरण होते. आजी आणि आई सोबत होत्या, पण बाबा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात होते. जुन्या पद्धतीच्या कुटुंबामध्ये थोरल्यांचा शब्द प्रमाण मानला जाई. त्यानुसार, आजीच्या आग्रहाखातर माझे नाव पूर्वजांच्या आठवणीत ‘हरिश्चंद्र’ ठेवण्याचे निश्चित झाले. ‘हरिश्चंद्र’ – जे नाव सत्य आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते, तेच आता माझ्या आयुष्याची ओळख बनणार होते.

मैदानावरील पराक्रम आणि नवा वळण

मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच दिवशी, माझे तिसऱ्या क्रमांकाचे काका—ज्यांना आम्ही ‘आबा काका’ म्हणतो—जे सैन्य दलात इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होते, ते एका मोठ्या बॉक्सिंग स्पर्धेत लढत होते. २ मार्चचा तो दिवस! इकडे माझा जन्म झाला आणि तिकडे आबा काकांनी रिंगण गाजवून गोल्ड मेडल (सुवर्णपदक) पटकावले.

त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर निर्भेळ ‘विजय’ मिळवला होता. आपल्या पुतण्याच्या जन्माची गोड बातमी आणि स्वतःचा पराक्रम यांचा हा अनोखा संगम पाहून त्यांनी मनाशी एक निश्चय केला.

पत्राने धाडलेला संदेश

त्या काळात आजच्यासारखे मोबाईल नव्हते. आबा काकांनी पत्राद्वारे कळवले की, “या मुलाने माझ्या आयुष्यात विजयाची बातमी आणली आहे, त्यामुळे त्याचे नाव ‘विजय’ ठेवावे.”एका बाजूला आजीचा परंपरेचा आग्रह होता आणि दुसरीकडे सैनिकाने रणांगणासारख्या बॉक्सिंग स्पर्धेतून मिळवलेला गौरव! अखेर सुवर्णमध्य साधला गेला. कागदोपत्री माझे नाव ‘हरिश्चंद्र’ लागले, जे माझ्या कुळाची परंपरा जपतं, पण घराघरात आणि मित्रमंडळीत मी ‘विजय’ म्हणूनच ओळखला जाऊ लागलो.

आज मागे वळून पाहताना वाटतं, माझं नाव केवळ एका व्यक्तीची ओळख नाही, तर तो माझ्या काकांच्या कष्टाचा, त्यांच्या सुवर्णपदकाचा आणि आमच्या कुटुंबाच्या लष्करी बाण्याचा एक जिवंत दस्तऐवज आहे. एकाच वेळी दोन नावं मिरवताना मला नेहमीच ‘सत्य’ आणि ‘विजय’ या दोन्ही मूल्यांची जाणीव होत राहते.

चिमणी आणि तिचे घरटे: मायेचा एकच रंग

आईच्या निधनानंतर सातार्डा गावी असताना घरासमोरच्या एका झाडावर एका चिमणीचं घरटं दिसलं. ती चिमणी आपल्या पिल्लांना चोचीने खाऊ घालत होती, त्यांच्यावर लक्ष ठेवत होती आणि कोणी शत्रू पक्षी आला की त्यावर तुटून पडत होती. ते दृश्य पाहून जाणीव झाली की, सृष्टीतील प्रत्येक मातेचं हृदय एकसारखंच असतं. मग ती चिमणी असो वा माझी आई. पिल्लांसाठी धडपडणारी ती चिमणी पाहून आईच्या वात्सल्याची पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण आली.

आई, तू जरी देहाने आमच्यात नसलीस, तरी तुझ्या संस्कारांच्या रूपाने तू सदैव आमच्या मनात जिवंत राहशील.असेच म्हणावे लागेल.

🌸 आई… तू आणि तुझी ही गोकुळासारखी संपदा! 

आई, लोक म्हणतात श्रीमंती पैशात असते, पण आज जेव्हा आम्ही तुझ्या भोवती पसरलेलं हे आमचं विस्तीर्ण कुटुंब पाहतो, तेव्हा जाणवतं की खरी श्रीमंती तर तू कमावलेली ही ‘माणसांची संपदा’ आहे. एका वटवृक्षाप्रमाणे तू आपल्या कुटुंबाला मायेची सावली दिलीस आणि तुझ्याच संस्कारांच्या मुळावर आज हे आमचं ‘गोकुळ’ डोलत आहे.

तुझा संसार आणि तुझी माऊली माया: बाबा (माजी सैनिक चंद्रकांत) यांच्या सोबतीने तू संसाराचा गाडा ओढला आणि आज तुझे मुलगे हरिश्चंद्र व जयराम, सुना अनुराधा व प्रणिता तुझ्या शब्दाखातर उभ्या आहेत. तुझ्या मुली – सुनिता, मंगल, मनिषा आणि तेजस्विनी – यांच्या रूपाने तू घराघरात संस्कारांचे दीप लावले आहेस.

नात्यांची गुंफण आणि एकजूट: तुझ्या या मोठ्या परिवारात तुझे दीर काशिनाथ व शांताराम आणि त्यांच्या सहचारिणी प्रभावती,श्यामल तसेच कुसुम, राधाबाई, व अर्चना या सर्व जाऊबाईंच्या साथीने तू घराचं घरपण टिकवून ठेवलंस.

तुझी पुतण्या-पुतणी आणि भाच्यांची फौज तर तुझा अभिमान आहे!

पुतणे: राजन, दीपक, संतोष, महेश, सत्यवान, मनोहर, सुनील, सुधीर, सागर.पुतणी: सविता, ममता, गौरी, माया, छाया, शोभा, सुप्रिया, सुजाता, सुवर्णा, वर्षा, राखी. या सर्वांच्या संसारात तू मार्गदर्शक म्हणून नेहमीच पाठीशी राहिली आहेस. अशोक, अविनाश, कृष्णा, योगेश्वर, शरद व संग्राम या जावईबापूंनीही या कुटुंबाला तितकंच प्रेम दिलं.

पुढची पिढी… तुझ्या संस्कारांची फुले: तुझ्या डोळ्यांसमोर बागडणारे नातू डॉ. यश, हेमंत, गौरेश, पुरुषोत्तम, आयुष, अभय, अथर्व, शौर्य, प्रथमेश, स्वरूप, कुशल आणि लाडक्या नाती खुशी, मंजिरी, अनुश्री, धनश्री, स्वरा, गौरांगी, उत्कर्षा, अंकिता, सुहानी, सलोनी, स्वामिनी, श्रेया, वैष्णवी व सृष्टी… ही सगळी तुझ्या प्रेमाची फळं आहेत. अगदी छोटा निशांत (पतवंड) सुद्धा तुझ्याच मायेच्या ओलाव्यात वाढतोय.

आई, तू फक्त एक व्यक्ती नाहीस, तू एक संस्था आहेस! जयराम (बाळा), दीपक (बाबू), संतोष, सत्यवान, मनोहर, राजन, संजय, महेश, सुनील, सुधीर, सागर या सर्व मुलांच्या आणि सुनांच्या (अनुराधा,प्रणिता, दिव्या, शीतल, सई, रोशनी, करुणा, शुभांगी, गीता, सरिता) आयुष्यात तुझे स्थान अढळ आहे.

ही सगळी संपदा तुझी आहे आई! > तू दिलेली शिकवण, तू सोसलेले कष्ट आणि तू जपलेली नाती हीच आमची खरी पुंजी आहे. तुझा आशीर्वाद असाच या संपूर्ण ‘परिवारावर’ सदैव राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! तुझा ऋणी, तुझा संपूर्ण परिवार

– तुझं लेकरू शब्दशिल्पकार : हरिश्चंद्र (विजय) चंद्रावती चंद्रकांत पवार सातार्डा ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग.

बारावा दिवस – भावपूर्ण आदरांजली

बारावा दिवस – भावपूर्ण आदरांजली

कै. सौ चंद्रावती चंद्रकांत पवार (माजी सैनिक पत्नी) सातार्डा ता. सावंतवाडी

‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी,
तिच्या मायेची सावली, अनमोल आणि न्यारी.
कष्ट सोसून स्वतः, आपल्याला ती घडवते,
देवाचे रूप काय असते, हे आईकडे बघून समजते.’

चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला”आई, तू जरी देहाने आमच्यात नसलीस, तरी तुझ्या संस्कारांच्या रूपाने तुझा स्मृतीगंध क्षणोक्षणी दरवळत राहिल’ तुझ्या आत्म्यास चिरशांती व सद्गगती लाभो !

जन्म ०८ मार्च १९४७
देवाज्ञा १४ एप्रिल २०२६

शोकाकुल:
* पती- चंद्रकांत, * मुलगे – हरिश्चंद्र (विजय) ,जयराम(बाळा) .
* सुना- अनुराधा, प्रणिता.
* मुलगी – सुनिता,मंगल, मनिषा, तेजस्विनी.
* जावई- अशोक चव्हाण,अविनाश होडावडेकर , कृष्णा आसोलकर , योगेश्वर कडू .
* दीर – काशिनाथ, शांताराम .
* जाऊ -प्रभावती,कुसुम,राधाबाई, श्यामल,अर्चना.
* नणंद- सौ लक्ष्मी (पुष्पा)
* नातू -हेमंत (बंटी), डॉ यश, गौरेश,आयुष, शौर्य.
* नात – खुशी, मंजिरी,अनुश्री, गौरांगी, उत्कर्षा,अंकिता, सुहानी, सलोनी, स्वामिनी.
* भाचा -गौरेश जांभळे.नातसून श्रद्धा
* पतवंडे – कु.निशांत.
* * सर्व पुतणे, पुतण्या सुना.
आणि पवार – सातार्डेकर परिवार, सातार्डा, ता. सावंतवाडी

* ऋण निर्देश – या दुःखद समयी आमचे सांत्वन करणारे विविध क्षेत्रांतील मान्यवर हितचिंतक, मित्रपरिवार व नातेवाईक या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी आहोत!
************”*”*****

सावंतवाडीत वादळी वाऱ्याचे थैमान; अनेक ठिकाणी पडझड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सावंतवाडीत वादळी वाऱ्याचे थैमान; अनेक ठिकाणी पडझड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला; शहरात तब्बल २५ लाखांचे नुकसान

सावंतवाडी दि.२४: शहरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यांच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली असून मोठा अनर्थ टळला आहे.

वादळाचा तडाखा आणि नुकसान:
गुरुवारी सायंकाळपासूनच तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वातावरण तयार झाले होते. रात्री १२ च्या सुमारास वादळी वाऱ्याने शहरात रौद्र रूप धारण केले. याचा सर्वाधिक फटका ‘रामेश्वर प्लाझा’ला बसला, जिथले पत्र्याचे छत उडून थेट शेजारील श्री पंचम खेमराज (SPK) महाविद्यालय परिसरात जाऊन पडले.

या वादळात झालेली प्रमुख नुकसानी:
SPK महाविद्यालय: जुन्या इमारतीचे कौलारू छत उडाले असून नवीन इमारतीचे पत्रे उडून कॉलेजच्या मागील बाजूस पडले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पत्रे तीन मजली इमारत ओलांडून लांबवर फेकले गेले.

शहरातील इतर ठिकाणे: रामेश्वर प्लाझाच्या काचेच्या खिडक्या फुटल्या, राजवाडा परिसरात नारळाचे झाड पडून संरक्षक कठड्याचे नुकसान झाले, शिव उद्यान आणि उभाबाजार परिसरातही झाडे व पत्रे पडल्याच्या घटना घडल्या.

विद्युत पुरवठा: वादळामुळे शहरात सुमारे २ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षांनी केली पाहणी
वादळाची माहिती मिळताच आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. शहरासह परिसरात एकूण २१ ठिकाणी वादळाचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देतानाच, “नागरिकांनी धीर सोडू नये, शासन पाठीशी आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून मदत प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नगर परिषदेने नुकतीच पत्र्याच्या शेडबाबत ऑडिटची सूचना दिली असतानाच ही घटना घडल्याने या विषयावर आता अधिक गंभीर चर्चा सुरू झाली आहे. सुदैवाने, हे छत मोती तलावा समोरील भागात न कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

सावंतवाडी शहरात तब्बल २५ लाखांचे नुकसान

सावंतवाडी शहरात काल झालेल्या वादळाच्या तडाख्यात अंदाजे तब्बल २५ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. रात्री झालेल्या वादळी वारा व पावसाने मोठी हानी झाली. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. शहरात जवळपास २५ ठिकाणी झाडे पडणे, महावितरण पोल वाकण्यासह ४ घरांवर झाड पडून नुकसान झाले. तसेच पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठी हानी झाली. यात शहरातील ज्योती मुद्राळे यांचे अंदाजे १८ हजार, दीपक गावडे २२ हजार, प्रशांत गोसावी १९ हजार, चेतन गुप्ता २० हजार, स्नेहा सबनीस ५० हजार, वैभव सावंत यांची पत्र्याची शेड उडून गेल्याने ११ ला ७५ हाजर तर शेजारील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे १२ लाख ६६ हजार तर गौरी परब यांचे २० हजार रूपयांचे मिळून अंदाजे २५ लाख ९० हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदारांनी दिली आहे. त्यामुळे या वादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतीच्या अपेक्षेत नागरिक आहेत

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
 

 

🚩 सावंतवाडी रेल्वे स्थानक: रेल्वेची ‘तिजोरी’ भरतेय, पण प्रवाशांचे ‘नशीब’ कधी उघडणार? 🚩

सावंतवाडीकरांना उत्पन्नाचा महापूर, पण सुविधांचा दुष्काळ! रेल्वे प्रशासनाचा दुजाभाव चव्हाट्यावर! 🚆🚫

📍 ठळक बातम्या:💰 बंपर कमाई: २०२५-२६ मध्ये उत्पन्नात १२.७९% वाढ (एकूण १७.८२ कोटी महसूल).👨‍👩‍👧‍👦 प्रवासी वाढ: वर्षाकाठी ८ लाख ६२ हजार प्रवाशांचा राबता.🏗️ टर्मिनसचा घोळ: २०१५ चे भूमिपूजन अजूनही कागदावरच!

❓ अजब सवाल: रेल्वे अधिकाऱ्यांकडून ‘टर्मिनसचा पुरावा’ मागितला जातोय! काय आहे परिस्थिती? 🤔

सावंतवाडी स्थानक कोकण रेल्वेसाठी उत्पन्नाची ‘टांकसाळ’ ठरत आहे. पण आजही राजधानी आणि गरीब रथ सारख्या गाड्यांच्या थांब्यांसाठी कोकणवासीयांना संघर्ष करावा लागतोय. रेल्वे बोर्डाच्या लालफीतशाहीमुळे नवे थांबे रखडले आहेत.

लढ्याला यशही मिळतंय! 💪

प्रवासी संघटनेच्या रेट्यामुळे डिजिटल इंडिकेटर, लिफ्टचे काम आणि रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. पण मुख्य ‘टर्मिनस’ अजूनही दूरच आहे!

📢 चलो मुंबई! ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ ✊🏼

सावंतवाडी टर्मिनस आणि कोकणच्या रेल्वे प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी एकत्र या! 🗓️ दिनांक: २६ एप्रिल (येणारा रविवार)📍 ठिकाण: दादर, मुंबई.

चला, आपल्या हक्कासाठी एकत्र येऊया!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा १८ कलमी विषयांवर चर्चा; प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

सावंतवाडी दि.२३: नगरपरिषदेतील विविध विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी आज नगरपरिषदेत आढावा बैठक घेतली. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत प्रशासकीय कार्यपद्धती, वित्तीय व्यवहार आणि विकासकामांच्या सद्यस्थितीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

बैठकीच्या सुरुवातीला सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१९ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मंथन

या बैठकीत विषयसूिकेतील एकूण १९ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने:शहरातील सुरू असलेली विकासकामे आणि त्यांच्या दर्जाची तपासणी.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.नगरपरिषदेची आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता.प्रलंबित फाईल्स आणि विकास प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी.

प्रशासकीय सुधारणांचे निर्देश

शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सूचना केल्या. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक तत्परतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, जे प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत, त्यांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.

प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण बदल सुचवतानाच, कामात हलगर्जीपणा न करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीमुळे नगरपरिषदेच्या रखडलेल्या कामांना आता नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडी नगरपरिषदेकडून गोंधळाचा कारभार; नागरिक त्रस्त शिवसेना माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांची नाराजी 

सावंतवाडी दि.२३ : शहरात सध्या गॅस आणि पाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, या कामांमुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या दहा दिवसांपासून विविध ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. खोदकामादरम्यान पाण्याच्या मुख्य लाईनना धक्का बसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.याबद्दल शिवसेना माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

रस्त्यांवर सर्वत्र खड्डे असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. दिवसभर वाहतूक कोंडी होत असून, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत यंत्रांच्या आवाजामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. ध्वनी व वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन किंवा नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गॅस कंपनीला परवानगी देताना अटी व शर्तींचे पालन करून कामाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे.

खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करणे, पाण्याच्या गळतीची तात्काळ दुरुस्ती करणे आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवणे ही जबाबदारी ठेकेदाराची असताना याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे “याला जबाबदार कोण?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

पावसाळा तोंडावर असताना शहरातील नालेसफाई, गटार साफसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती यांसारखी कामे अद्याप सुरू नसल्याने आगामी काळात नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

एकूणच नगरपरिषदेचा कारभार गोंधळलेल्या अवस्थेत सुरू असून, नागरिकांना अपेक्षित नागरी सेवा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 अवकाळीचा तडाखा! आंबोलीत पावसाची धुवाधार, तर सावंतवाडी तालुक्यात विजांचा कडकडाट! ⚡⛈️

📍 आंबोली/सावंतवाडी दि.२३:
एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच आज सायंकाळी निसर्गाने अचानक कूस बदलली! कोकणातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीत तब्बल एक तास धोधो पाऊस कोसळला. सावंतवाडी तालुक्यातही विजांच्या लखलखाटासह पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच धांदल उडाली.

बागायतदार संकटात! 🥭🥜
या अवकाळी पावसामुळे कोकणचा राजा आंबा, काजू आणि फणस बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. तयार पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, “आधीच दुष्काळ त्यात फाल्गुन मास” अशी अवस्था बळीराजाची झाली आहे.

ठळक मुद्दे:
✅ आंबोलीत पावसाची जोरदार बॅटिंग; जनजीवन विस्कळीत.
✅ विजांच्या कडकडाटासह तालुक्यात ढगाळ वातावरण.
✅ आंबा-काजू पिकाला मोठा फटका बसण्याची भीती.
✅ नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

आता प्रतीक्षा फक्त मदतीची! सरकारने या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष देऊन बळीराजाला आधार द्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

“माझ्या पदाचा फायदा जनसामान्यांच्या कल्याणासाठी होईल” – विक्रांत सावंत

सावंतवाडी दि.२३: येथे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा विशेष सत्कार उत्साहात पार पडला. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना विक्रांत सावंत म्हणाले की, “तुमच्या प्रेमामुळेच मी विजयी झालो असून मिळालेलं पद हे जनतेचं आहे. या पदाचा उपयोग सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी करण्याचा माझा प्रयत्न राहील.” त्यांनी मतदार, कुटुंबीय व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सावंत यांनी शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सावंत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

पाडलोस येथे ‘केणीवाडा महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न; ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी दि.२३: तालुक्यातील उत्कर्ष कला क्रीडा मंडळ केणीवाडा (पाडलोस) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित ‘केणीवाडा महोत्सव २०२६’ चे दिमाखदार उद्घाटन नुकतेच पार पडले. या महोत्सवाचे उद्घाटन युवा नेतृत्व ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्थानिक कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उद्घाटन प्रसंगी राजन पटेकर, अमिषा पटेकर, महेश कुबल, रत्नप्रभा कुबल, नंदू परब, अविनाश माफणकर आणि अदिती माफणकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समीर नाईक, रोहन धुरी, गिरीश नाईक, अवधूत राणे, रोहन सातार्डेकर, शंकर परब, बंटी नाईक, आर्यन केणी, शुभम कोरगावकर, अमित नाईक, मंदार परब, हर्षद परब, रंजन नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सचिन कोरगावकर आणि ओमकार नाईक यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटनाच्या वेळी केणीवाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विष्णू नाईक यांनी केले. महोत्सवात आयोजित विविध कला आणि क्रीडा स्पर्धांमुळे पाडलोस परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563