26.7 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 56

रेडी येथील नवसाला पावणाऱ्या द्विभूज गणपतीचा वाढदिवस १८ एप्रिल रोजी

श्री त्रिभुज गणपती

रेडी वेंगुर्ला दि.१५: नवसाला पावणारा आणि संकटाला धावून येणारा अशी ख्याती असलेल्या, द्विभूज गणपती, रेडी येथील गणपतीचा ५० वाढदिवस मोठ्या भक्तीभावाने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा होणार आहे. सकाळी ६ वाजता अभिषेकाने वाढदिवसाची सुरुवात होणार आहे. ८ वाजता श्री सत्याविनायक महापूजा, १२:३० महाआरती, १२:४५ तीर्थप्रसाद, ०१ ते ०४वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ०५ वाजता श्री गणेश माऊली संगीत ग्रुप प्रस्तुत स्वर गणेश हा गाण्यांचा कार्यक्रम, रात्रौ ०८: ३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य कंपनीचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी नागोळेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱ्या चालकांची आंबोलीत तपासणी करा.

सागर ढोकरे

सावंतवाडी,दि.१५: मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर घाटातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करा आणि नंतर त्यांना पुढे जाऊ द्या, अशी मागणी गेळे सरपंच तथा भाजपचे युवा नेते सागर ढोकरे यांनी केली आहे.
काही दिवसांनी वर्षा पर्यटन सुरू होणार आहे. त्यामुळे याबाबत कायमस्वरूपी योग्य ते नियोजन पोलिसांनी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी घाटातील रस्ते अरुंद आहेत. परवानगी नसताना सुध्दा त्या ठिकाणी अवजड वाहतूक केली जाते. त्याचबरोबर वाहनधारक भरधाव वेगाने येत जात असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसात तर हे प्रमाण खूप मोठे असते. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि संबंधित चालकाची तपासणी तसेच मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

निरवडेत किरकोळ कारणावरून दोन गटात ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; झरबाजार परिसरात दोन गट भिडले; पोलिसांनी ११ जणांना घेतले रडारवर

सावंतवाडी,दि.१४: निरवडे येथील झरबाजार परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली आहे.
​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील चेतन गोविंद गावडे (वय ३२, रा. निरवडे देऊळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण मोहन गावडे, श्रीमती लक्ष्मण गावडे, शिवाजी सुरेश गावडे, चंद्रा धारगळकर आणि सुनील सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मित्राला मारण्याची धमकी दिल्याबाबत शिवाजी गावडे याला विचारणा केली असता चेतन गावडे, निलेश शिरोडकर, सिताराम गावडे आणि लाडू गावडे यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत शिवाजी सुरेश गावडे यांनी सिताराम लाडू गावडे यांच्या हाताला चावा घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.​दुसरीकडे, दुसऱ्या गटातील श्रीमती लक्ष्मण गावडे (रा. निरवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दीर शिवाजी सुरेश गावडे यांना मारहाण होत असताना त्या सोडवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना देखील लाकडी दांड्याने व हाताने मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून लाडू गावडे, सिताराम गावडे, चेतन गावडे, गुरुनाथ गावडे, उमाकांत गावडे आणि निलेश शिरोडकर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे हे करीत आहेत.​घटनेनंतर रात्री उशिरा दोन्ही गटांतील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न; आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन; राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

कणकवली दि.१४: महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली येथील भगवती हॉलमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

दिमाखदार उद्घाटन सोहळा
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाढदिवसानिमित्त जीजी उपरकर यांचा शाल व पुष्पहार देऊन जंगी सत्कार करण्यात आला.

निष्ठा आणि संघर्षाचा गौरव
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की:
“जीजी उपरकर हे कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिवसेना पक्षाशी सदैव निष्ठावंत राहिले आहेत. स्वतःच्या फायद्यापेक्षा पक्षवाढीसाठी त्यांनी नेहमीच धडपड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना अधिक मजबूत करू.”

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपरकर यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. जिल्ह्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांनी उपरकर यांचा गौरव केला व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.

उपरकर यांचा संकल्प
सत्काराला उत्तर देताना परशुराम उपरकर भावूक झाले. ते म्हणाले:

“सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना जनतेचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्य आहे. उद्धव ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना संघटना जिल्ह्यात पुन्हा पूर्ववत उभी करण्याचा संकल्प मी या वाढदिवसानिमित्त करत आहे.”

तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग
या शिबिरासाठी बी.के.एल. वालावलकर रुग्णालय (डेरवण, चिपळूण) येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ. अमित वालावलकर, डॉ. क्रिशांत दिवाटे, डॉ. पूजा गीते, डॉ. आकाश राऊळ आणि अमित वैद्य यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला नीलम पालव, नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, संतोष सावंत, चंद्रशेखर उपरकर, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, समीर परब, जगन्नाथ आजगावकर, राजू कोरगावकर, संजय बेलवलकर, प्रवीण कोरगावकर, पप्पू कोरगावकर, संदीप म्हाडगूत, शैलेश नेरकर, प्रमोद सावंत, उमेश हजारे, पुरुषोत्तम तारी, निलेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले. आरोग्य शिबिराच्या या यशस्वी आयोजनाबद्दल कणकवली परिसरातून जीजी उपरकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी दि.१४: नगरपरिषद आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभीचे धार्मिक व औपचारिक कार्यक्रम
उत्सवाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्रिशरण व पंचशील ग्रहण करून करण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दलातर्फे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोजित अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण होते.

मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते.
सुस्मिता जाधव (सभापती, पंचायत समिती)
श्रद्धा सावंत-भोसले (नगराध्यक्ष, नगर परिषद)
अ‍ॅड. अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष)
मायकल डिसोजा (जिल्हा परिषद सदस्य)
चंद्रकांत नागावकर (प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चा)
संजू परब (माजी नगराध्यक्ष)
महेश परुळकर (जिल्हाध्यक्ष, संविधानिक हितकारणी)
यासह सावली पाटकर, टिळाजी जाधव, संतोष जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शन व विचार
नगराध्यक्ष श्रद्धा भोसले: त्यांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत १९३२ सालच्या त्यांच्या सावंतवाडी भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. “बाबासाहेबांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आमची सामाजिक वाटचाल सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सभापती सुस्मिता जाधव: “बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयापेक्षाही मोठी आहे. त्यांच्यामुळेच आज आम्ही प्रगतीपथावर आहोत,” असे सांगत त्यांनी समाजाप्रती बांधिलकी व्यक्त केली.

अध्यक्ष जगदीश चव्हाण: त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “संविधान हा आपला सर्वोच्च ग्रंथ असून त्याचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.”

सत्कार व गौरव सोहळा
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या भीमगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सगुण जाधव यांनी केले, तर स्वागताध्यक्ष सद्गुरु जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव व चिन्मय असंकर यांनी केले, तर शेवटी शांताराम असंनकर यांनी आभार मानले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांना मातृशोक; चंद्रावती पवार यांचे दुखःद निधन

सावंतवाडी दि.१४: तालुक्यातील सातार्डा-तरचावाडा येथील रहिवासी आणि माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार (७९) यांचे मंगळवारी पहाटे ६.३५ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातार्डा परिसरासह संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सौ. चंद्रावती पवार या अत्यंत प्रेमळ, साध्या आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. आयुष्यभर त्यांनी कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. घरातील प्रत्येकाला प्रेमाने जोडून ठेवणाऱ्या त्या एक भक्कम दुवा होत्या. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे परिसरातही त्या सर्वांच्या आदरास पात्र होत्या.

त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एक मायेची सावली हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

सौ. पवार यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शोकसंवेदना व्यक्त करत पवार कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी धीर दिला आहे.
चौकट
बुधवारी होणार अंत्यसंस्कार

सौ चंद्रावती हिच्या पार्थिवावर सातार्डा तरचावाडा स्मशानभूमीत बुधवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात. ; १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

संशयित चोरटे

सावंतवाडी दि.१३ : चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले असून, त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राजपूत संतराम पाल (वय ५२, सध्या राहणार घोडदेव नाका भाजी मार्केट, भाईंदर पूर्व; मूळ रा. तौकलपूर नगर, ता. सहगंज, उत्तर प्रदेश) आणि राहुल उर्फ दिवानसिंग ओमप्रकाश तोमर (वय ३६, सध्या राहणार घोडदेव नाका भाजी मार्केट, भाईंदर पूर्व; मूळ रा. गोकुळ गाव, ता. महावल, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) अशी आहेत. या दोन्ही आरोपींना सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सरदार पाटील व त्यांच्या पथकाने कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे, चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करणे तसेच इतर ठिकाणीही त्यांनी अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग घेतला आहे का, याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य- युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन.!भाजप स्थापना दिनानिमित्त स्वच्छता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी दि.१३: भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे “स्वच्छता सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सन्मान करून त्यांना आरोग्य विषयक वस्तू भेट देण्यात आल्या. हा उपक्रम भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता कामगारांना आवश्यक आरोग्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. समाजाच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता कामगारांचे योगदान अनमोल असल्याचे सांगत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनील ” निरवडेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक राजू बेग, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, राजे प्रतिष्ठान चे शिवा गावडे, मंडल चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–

◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________

🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :

📱9422054887,8275659563

भोसले इन्स्टिट्यूटच्या ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सीमध्ये निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले यश…*मरीन व शिप डिझाईन क्षेत्रात कामाची संधी

सावंतवाडी दि.१३: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड झाली आहे. कॉलेजमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान ही निवड करण्यात आली. बॉयन्सी कन्सल्टंट्स ही मरीन इंजिनिअरिंग व शिप डिझाईन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून जहाजांचे डिझाईन, ऑफशोअर प्रोजेक्ट्स, थ्री-डी मॉडेलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच जहाजांच्या दुरुस्ती व रूपांतरणाशी संबंधित सेवा पुरवते. भारतासोबतच कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असून अमेरिका, नॉर्वे, सिंगापूर आदी देशांतील प्रकल्पांसाठी कंपनी सेवा पुरवते.

_या कॅम्पस ड्राइव्हमध्ये कंपनी प्रेझेंटेशन, लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू अशा विविध टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया पार पडली. यात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पैकी ६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. मुलाखतींचे यशस्वी नियोजन कॉलेजचे टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील व इलेक्ट्रीकल अधिव्याख्याता समित निर्मळकर यांनी केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–

◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________

🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :

📱9422054887,8275659563

नॅब (NAB) नेत्र रुग्णालय सावंतवाडीचा वर्धापन दिन; ३० मे पर्यंत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया मोहिमेचे आयोजन

सावंतवाडी दि.१३: येथील नॅब (NAB) नेत्र रुग्णालयाने रुग्णसेवेची तीन यशस्वी वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णालयाने सिंधुदुर्गवासीयांसाठी ‘दृष्टी’ भेटीचे आयोजन केले असून, ३० मे २०२६ पर्यंत विशेष सवलत मोहीम राबवण्यात येणार आहे.

या मंगलप्रसंगी रुग्णालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष अनंत उजगांवकर, सोमनाथ जिगजिन्नी, आबा कशाळीकर, डॉ. सुहास नायडू, राजेश रेडीज यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

वर्धापन दिन विशेष मोहीम: काय आहेत फायदे?
गेल्या तीन वर्षांत हजारो रुग्णांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पसरवणाऱ्या नॅब रुग्णालयाने यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत खालील सेवा जाहीर केल्या आहेत:

मोफत नेत्र तपासणी: तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची संपूर्ण तपासणी विनामूल्य केली जाईल.

मोफत शस्त्रक्रिया: मोतीबिंदू तसेच इतर आवश्यक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.

अल्प दरात चष्मे: गरजू रुग्णांसाठी अत्यंत कमी दरात दर्जेदार चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वेळ आणि ठिकाण:
ही विशेष मोहीम ३० मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. रुग्ण दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत रुग्णालयात भेट देऊन या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
ठिकाण: नॅब (NAB) नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सावंतवाडी भटवाडी येथील नॅब नेत्र रुग्णालयातील पूजनोत्सवात अध्यक्ष अनंत उजगांवकर यांच्यासोबत सोमनाथ जिगजिन्नी, आबा कशाळीकर, डॉ. सुहास नायडू, राजेश रेडीज व इतर मान्यवर.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :