26.7 C
New York
Tuesday, September 8, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 43

🛑 जीवघेणा प्रवास! सावंतवाडीच्या कोलगाव कुंभारवाडीत ग्रामस्थांची ‘तारेवरची कसरत’! 🛑

सावंतवाडी दि.१३: कित्येक वर्षे उलटली, पण इथला प्रश्न सुटलेला नाही! कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थ आणि ‘झिरंग ७ नंबर’ शाळेचे विद्यार्थी आजही एका मोडकळीस आलेल्या सिमेंटच्या खांबांच्या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.📍 भयावह वास्तव: नाल्यावर केवळ ३ सिमेंटचे पोल टाकून बनवलेल्या पुलावरून वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जावे लागते.
📍 धोका वाढला: सध्या यातील एक पोल पूर्णपणे मोडला असून, आधारासाठी कोणतेही रेलिंग (कठडा) उपलब्ध नाही.📍 पावसाळी संकट: पाऊस सुरू झाल्यावर हे पोल निसरडे होतात, ज्यामुळे नाल्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
📍 नेत्यांकडे दुर्लक्ष: सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना या समस्येची माहिती असूनही वर्षानुवर्षे फक्त ‘कानाडोळा’ केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.लोकप्रतिनिधींना आवाहन! 📢
पालकमंत्री नितेश राणे,
माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक भाई केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते महेश सारंग, विशाल परब, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) नेत्या अर्चना घारे-परब, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन या पुलाची डागडुजी व कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.”एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?” – असा संतप्त सवाल कोलगाव कुंभारवाडीतील जनता विचारत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🎤 सावंतवाडीत ‘सम्राट संगीत सितारा’चा स्वर घुमला! प्राथमिक फेरीत तिघांची बाजी; आता बेळगावमध्ये रंगणार पुढचा सामना! 🎶

सावंतवाडी दि.१३: नव्या दमाच्या गायकांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या २०व्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या आंतर राज्यस्तरीय गायन स्पर्धेचा बिगुल सावंतवाडीत वाजला! बॅ. नाथ पै सभागृहात पार पडलेल्या पहिल्या प्राथमिक फेरीत स्पर्धकांनी आपल्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

🏆 पुढील फेरीसाठी पात्र ठरलेले मानकरी:१. कुमार हर्ष संजय नकाशे.२. कुमार दिलीप संजय देसाई.३. पल्लवी संजय पिळणकर

📍 स्पर्धेचा पुढचा प्रवास: ७ जून २०२६: दुसरी प्राथमिक फेरी (बेळगाव)

१४ जून २०२६: उपांत्य फेरी (ब्लॅक बॉक्स, कला अकादमी, पणजी).२१ जून २०२६: ग्रँड फिनाले (दीनानाथ मंगेशकर कला अकादमी, पणजी)

या सोहळ्याला सम्राट क्लब इंटरनॅशनलचे शशिकांत पुनाजी, विनोद मळीक, सुबोध रामनाथकर, नरेश पेडणेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. परीक्षणाची जबाबदारी सौ. आमोणकर यांनी समर्थपणे पेलली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com🪀 *आमच्या Whatsapp  ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*  https://akhandhindustanlive.com 📹  *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

मळगाव घाटीत पुन्हा इको कार दरीत कोसळली; महिनाभरात दुसरा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

सावंतवाडी दि.१३: सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत अपघातांची मालिका सुरूच असून, आज सकाळी एका इको कारचा भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महिनाभरात त्याच ठिकाणी दुसरा अपघात घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०७ क्यू ७९०४ क्रमांकाची इको कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव घाटातील एका तीव्र वळणावर हा अपघात घडला. कार कडेला घसरत जाऊन दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे एक इको कार दरीत कोसळली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील तीव्र वळणे, तुटलेले संरक्षक कठडे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची नाराजी अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारावर ताशेरे ओढले. “या ठिकाणी असलेले तुटलेले रेलिंग आणि कठडे तातडीने दुरुस्त करून ते मजबूत करावेत, तसेच पावसाळ्यात निसरड्या होणाऱ्या रस्त्यावर उपाययोजना करावी,” अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने येथे तात्काळ संरक्षक गार्डरेल, वेगमर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी मागणी मळगाववासीयांकडून केली जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

पुणे-कोकण रेल्वेला ‘खो’ आणि बिहारला ‘ओ’! मध्य रेल्वेचा मराठी माणसावर उघड अन्याय

पुणे/सावंतवाडी दि.१२: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यातून कोकणासाठी हक्काची गाडी देण्यास तांत्रिक अडचणींचे कारण सांगणाऱ्या मध्य रेल्वेने, आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ मंजूर करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मध्य रेल्वेचा दुजाभाव: काय आहे नेमके प्रकरण?

काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे-कोकण दरम्यान दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर मध्य रेल्वेने पुण्यात ‘टर्मिनलची कमतरता’ आणि ‘मार्गाची अडचण’ (Path Constraints) असल्याचे लेखी उत्तर देऊन कोकणच्या गाडीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. मात्र, याच ‘अडचणी’ असलेल्या पुणे स्टेशनवरून ११४३१/११४३२ पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेस मंजूर करण्यात आली आहे.

देखभालीचा स्लॉटही परप्रांतीयांच्या गाडीला!

सर्वात संतापजनक बाब म्हणजे ही अमृत भारत एक्सप्रेस ‘मध्य रेल्वेच्या मालकीची’ (CR Owning) आहे. याचा अर्थ असा की, या गाडीची देखभाल (Maintenance) आणि पार्किंग पुण्यातच होणार आहे. पुण्यात आधीच जागा नसताना हा मेंटेनन्स स्लॉट बिहारच्या गाडीला दिल्यामुळे, भविष्यात कोकण किंवा महाराष्ट्रांतर्गत गाड्यांसाठी कोणतीही क्षमता शिल्लक राहणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राचा पैसा, फायदा कुणाला?

कोणत्याही नवीन रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र राज्य शासन ५०% आर्थिक वाटा उचलते. राज्यातील जनतेच्या करातून उभ्या राहिलेल्या या सुविधांचा पहिला हक्क इथल्या भूमिपुत्रांचा असायला हवा. मात्र, चित्र अगदी उलटे दिसत आहे:

  • पुणे-दानापूर (बिहार): मुख्य पुणे स्टेशनवरून ‘रेड कार्पेट’ स्वागत.नांदेड-पुणे / पुणे-हरंगुळ: महाराष्ट्रांतर्गत गाड्यांना मुख्य पुणे स्टेशनवरून थेट ‘हडपसर’ला बाहेर फेकण्यात आले.

कोकणी चाकरमान्यांमध्ये संतापाची लाट

“पुण्यात लाखो कोकणी माणूस राहतो, त्यांना सण – उत्सवाला जाण्यासाठी साधी हक्काची गाडी मिळत नाही. तांत्रिक अडचणी फक्त कोकणच्या गाड्यांनाच का येतात?” असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. स्वतःच्याच राज्यात प्रवाशांना अशी दुय्यम वागणूक मिळत असेल, तर हा अन्याय आता सहन करण्यापलीकडे गेला आहे, अशी भावना कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.आता या अन्यायाविरुद्ध तमाम मराठी बांधवांनी आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


स्थानिक नगरसेवकांना डावलून सुरू असलेला भूमिपूजनांचा फार्स थांबवा; शर्वरी धारगळकर यांचा नगराध्यक्षांवर प्रहार

सौ शर्वरी धारगळकर, नगरसेविका, शिवसेना

सावंतवाडी दि.१२: शहरात सध्या सत्ताधारी नगराध्यक्ष आणि प्रशासनाकडून विकासकामांच्या नावाखाली केवळ ‘प्रसिद्धीचा स्टंट’ सुरू असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील गटार कामाच्या भूमिपूजन प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधींना हेतूपुरस्पर डावलण्यात आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

‘श्रेय लाटण्याचा प्रयत्न आणि केवळ दिखावा’

धारगळकर यांनी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना खालील मुद्दे मांडले:

स्थानिक प्रतिनिधींचा अवमान: प्रभाग क्र. ६ मधील कामाच्या भूमिपूजनाला स्थानिक नगरसेवकांना बोलावले जात नाही, ही बाब लोकशाहीत दुर्दैवी आहे.

आमदारांचा निधी: शहरातील अनेक विकासकामे ही आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. शिवसेना नगरसेवक या कामांचा सातत्याने पाठपुरावा करत असताना नगराध्यक्षा मात्र केवळ स्वतःचे श्रेय लाटण्यासाठी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचा घाट घालत आहेत.

कामे केवळ कागदावर: महिनाभरापूर्वी ज्या कामांचे भूमिपूजन थाटामाटात करण्यात आले, ती कामे अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत. हा केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

पावसाळ्यापूर्वी कामांची निकड

पावसाळा तोंडावर आला असताना गटारांची कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. जर ही कामे वेळेत झाली नाहीत, तर पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. “सामान्य जनतेच्या प्रश्नांपेक्षा नगराध्यक्षांना केवळ फुकटची प्रसिद्धी मिळवण्यात रस आहे,” असे धारगळकर यांनी नमूद केले.

या इशाऱ्यामुळे सावंतवाडीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून, सत्ताधारी आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

“जर यापुढेही स्थानिक नगरसेवकांना डावलून आणि कामात दिरंगाई करून केवळ प्रदर्शनावर भर दिला, तर शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर दिले जाईल.”— सौ. शर्वरी धारगळकर (नगरसेविका, शिवसेना)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

कुडाळात भरदिवसा घरफोडीचा थरार! निवासी संकुलातील ५ फ्लॅट फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद

कुडाळ दि.१२: शहरात मंगळवारी दुपारी भरदिवसा चोरीची एक अत्यंत धाडसी घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या राज हॉटेल परिसरातील एका निवासी संकुलात अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५ फ्लॅट फोडून चोरी केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुपारच्या सुमारास धाडसी कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी २:३० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी संकुलातील एका विंगमधील तीन आणि दुसऱ्या विंगमधील दोन अशा एकूण पाच फ्लॅटचे कुलूप तोडले. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही ऐवज लंपास

चोरट्यांनी या फ्लॅटमधून नेमका किती मुद्देमाल आणि काय ऐवज लंपास केला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, घरातील कपाटांची उचकापाचक करून काही किंमती वस्तू चोरून नेल्याचे समजते.

पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगवान

घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित चोरटे कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कुडाळ शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही पुरावा हाती असल्याने पोलीस या चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

पत्नीच्या विरहातून तरुणाची आंबोली घाटात उडी मारून आत्महत्या; २५० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

सावंतवाडी दि.१२: तालुक्यातील आंबोली येथील एका २९ वर्षीय तरुणाने पत्नीच्या विरहातून आणि वादातून आंबोली मुख्य धबधबा परिसरातील खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय २९, रा. आंबोली गावठाणवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी सह्याद्री ॲडव्हेंचर्सच्या मदतीने त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम कुडतरकर याचे पाच वर्षांपूर्वी सांगेली येथील एका युवतीशी लग्न झाले होते. मात्र, राजारामच्या दारूच्या व्यसनामुळे लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्यात वाद होऊन पत्नी माहेरी निघून गेली होती. सध्या या दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, पत्नीचे दुसरे लग्न ठरल्याची माहिती राजारामला मिळाली होती. याच कारणावरून तो सोमवारी (११ मे) तिला भेटण्यासाठी सांगेली येथे गेला होता. मात्र, तिने भेटण्यास नकार दिल्याने तो निराश होऊन आपल्या दुचाकीवरून आंबोलीच्या दिशेने निघाला होता.

असा लागला शोध

सोमवारी रात्री राजाराम घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. मंगळवारी सकाळी आंबोली मुख्य धबधब्यापासून ५०० मीटर अंतरावर त्याची मोटारसायकल उभी असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. मोटारसायकलला चावी तशीच असल्याने संशय बळावला. अखेर सह्याद्री ॲडव्हेंचर्स अँड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने ड्रोन आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोध घेतला असता, मुख्य रस्त्यापासून सुमारे २५० ते ३०० फूट खोल दरीत राजारामचा मृतदेह आढळून आला.

 

पोलिस तपास सुरू

रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक परिश्रमानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आंबोली पोलीस दूरक्षेत्रात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे आंबोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

आंबोली घाटात खळबळ: १२०० फूट दरीत उडी मारून डंपर चालकाची आत्महत्या.; ड्रोनच्या साहाय्याने मृतदेहाचा लागला शोध

आंबोली दि.१२: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबोली गावठणवाडी येथील राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय ३१) या डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणाहून सुमारे १२०० फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी ही घटना उघडकीस आली असून, रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

असा लागला घटनेचा छडा

राजाराम चालवत असलेला डंपर घाटात एकाच ठिकाणी रात्रभर उभा होता. डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली. डंपर जागेवरच असल्याने त्यांनी तातडीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने दरीत शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी १२०० फूट खोल दरीत राजारामचा मृतदेह दिसून आला. ड्रोन कॅमेऱ्यात केवळ हात आणि पाय दिसत असल्याने शोधकार्याला वेग आला.

रेस्क्यू टीमचे साहसी अभियान

घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम मदतीसाठी धावून आली. उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा आणि प्रथमेश गावडे यांनी खोल दरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचले. राजु राऊळ, राकेश अमृस्कर, दिपक मेस्त्री, फास्कू देसा, गुरु सावंत, संतान अल्मेडा, सहदेव सनाम, अमरेश गावडे आणि रमेश मोहीते या सदस्यांच्या अथक परिश्रमातून मृतदेह दरीतून वर काढण्यात आला.

मानसिक तणावातून टोकाचे पाऊल?

राजारामचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र काही कारणास्तव पत्नी सोबत राहत नव्हती. याच विरहातून त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. राजाराम स्वभावाने अत्यंत शांत आणि मनमिळावू होता. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

पोलिस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मनीष शिंदे घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

मोदींच्या आवाहनानंतर तरी मंत्र्यांनी ताफ्यातील वाहने कमी करावीत; वैभव नाईक यांचा घणाघात

पंतप्रधानांच्या आवाहनाला सरकारकडूनच हरताळ; सामान्य जनतेला वेठीस धरू नका अन्यथा तीव्र आंदोलन

सिंधुदुर्ग दि.१२: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशातील जनतेला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि सोन्यातील गुंतवणूक थांबवण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणा आणि मंत्र्यांच्या ताफ्यात होणारा इंधनाचा वारेमाप खर्च थांबवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. “पंतप्रधानांच्या आवाहनाला खुद्द सरकारकडूनच हरताळ फासला जात असून, केवळ सामान्य जनतेनेच का होरपळायचे?” असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.

मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा

वैभव नाईक यांनी सरकारी यंत्रणेतील इंधनाच्या उधळपट्टीवर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की:

मंत्र्यांचा बडेजाव: मंत्र्यांच्या ताफ्यात पुढे-मागे चार-चार गाड्या असतात. केवळ गर्दी दाखवण्यासाठी वाहनांचा वापर होतो. हा ताफा कमी केल्यास मोठ्या प्रमाणात इंधन बचत होऊ शकते.

अधिकारी स्तरावर उधळपट्टी: अधिकारी विविध ठिकाणी वाहने फिरवून इंधनाचा गैरवापर करतात. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक केल्यास इंधन वाचू शकते.

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका

मोदींनी जनतेला परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले असताना, स्वतः पंतप्रधान १५ मेपासून परदेश दौऱ्यावर जात आहेत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले. वाढत्या पेट्रोल दरामुळे सामान्य माणूस आधीच हैराण असून, टू-व्हीलर वापरणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच नव्या करांचा बोजा पडणार असल्याने जनतेचे जगणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सोन्यातील गुंतवणूक आणि मोठे उद्योगपती

सोन्यावरील गुंतवणुकीबाबत बोलताना नाईक म्हणाले की, “सामान्य माणूस अडचणीच्या काळासाठी थोडं-थोडं सोनं खरेदी करतो. देशहितासाठी तो खरेदी कमी करेलही, पण मोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि गुन्हेगार जे मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का?”

“नोटबंदीच्या काळात सामान्य जनता जशी होरपळली, तशीच परिस्थिती आता पेट्रोल आणि सोन्याच्या मुद्द्यावर निर्माण होत आहे. सरकारने जनतेला वेठीस धरू नये, अन्यथा ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल.”— वैभव नाईक (जिल्हाप्रमुख, ठाकरे शिवसेना)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 मोठी बातमी: सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा अधीक्षक ACB च्या जाळ्यात!

ओरोस (सिंधुदुर्ग) दि.१२: वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी चक्क ३% लाचेची मागणी करणाऱ्या कार्यालयीन अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.

काय आहे प्रकरण? 🧐
आरोपी: महादेव नारायण तेली (वय ५६), कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा रुग्णालय ओरोस.

लाचेची मागणी: एका व्यक्तीचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या ३% (१८,००० रुपये) मागितले होते.तडजोड: अखेर १०,००० रुपये घेण्याचे ठरले.

एसीबीची धडक कारवाई! 🚔
तक्रारदाराने कुडाळ ACB कडे तक्रार केल्यानंतर, जिल्हा रुग्णालयातील अधीक्षकांच्या कक्षातच सापळा रचण्यात आला. १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

“भ्रष्टाचार मुळासकट उपटून टाका!”
जर तुमच्याकडेही कोणी लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा.असे आवाहन करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563