सावंतवाडी दि.२४: शहरातील वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहणाचा १२ वा वर्धापन दिन गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
या मंगलमयी सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे
धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक:
सकाळी ८.०० वा.: गणपती पूजन, पुण्याहवाचन व इतर पूजाविधी.
सकाळी ९.०० वा.: परिवार देवता आवाहन, श्री हनुमान सहपरिवार देवतांची महापूजा व हवन.
दुपारी १२.३० वा.: पूर्णाहुती.
दुपारी १.०० वा.: महाआरती व सामूहिक गाऱ्हाणे.
दुपारी १.३० वा.: महाप्रसाद (भंडारा).
रात्री ८.३० वा.: श्री मूळपुरुष धावडेश्वर भजन मंडळ, वेंगुर्ला यांचे वारकरी भजन.
वैश्यवाडा श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने या निमित्ताने भरगच्च तयारी करण्यात आली आहे. “हनुमान भक्तांनी आणि परिसरातील सर्व भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२४: 🚨 🚨”हा तर तमाम महिला वर्गाचा अवमान!” – ऑनलाईन सभेला झालेल्या विरोधानंतर नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी सुनावले खडे बोल. ✍️
✅ प्रसूती रजेवर असतानाही कामाची ओढ: आई झाल्यानंतरही शहराच्या विकासासाठी ऑनलाईन सभेला उपस्थित राहण्याचा घेतला होता निर्णय.
✅ तंत्रज्ञानाचा वापर: “आजच्या AI च्या युगात मंत्र्यांपासून अधिकारी ऑनलाईन काम करतात, मग मलाच विरोध का?” असा नगराध्यक्षांचा सवाल.
✅ संस्कृतीचा विसर: सावंतवाडीच्या सुसंस्कृत परंपरेला आणि महिला सन्मानाला हे कृत्य न शोभणारे.
✅ विकासाचा संकल्प: लवकरच सावंतवाडीत परतणार; पाणी, पर्यटन आणि रोजगारासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून कामाचा धडाका लावणार.
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांना ऑनलाईन सभेत सहभागी होण्यापासून रोखल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
🚩 काय म्हणाल्या नगराध्यक्षा? “मी रजेवर असले तरी जनतेला दिलेल्या वचनाला जागी आहे.””एका महिलेला अशा प्रकारे कामकाजापासून रोखणे हा संस्कृतीचा अपमान आहे.””विकासाच्या आड येऊ नका, शहराच्या हितासाठी एकत्र या.“
🔥 ब्रेकिंग: “हा महिला वर्गाचा अवमान!”
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचा विरोधकांवर तीव्र संताप. ऑनलाईन सभेला झालेल्या विरोधानंतर नगराध्यक्षांनी मांडली परखड भूमिका. ‘संकुचित मनोवृत्ती’ सोडून विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर. यावेळी उपस्थित नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी.
🚨 BREAKING NEWS: सावंतवाडी नगरपालिका 🚨
सावंतवाडी दि.२४:🔹 वकिली कसब पणाला: प्रशासकीय ज्ञानाच्या जोरावर सर्व नगरसेवकांच्या प्रश्नांना दिली सडेतोड उत्तरे.
🔹 युतीमधील संघर्ष: भाजप आणि शिंदे गटातील शाब्दिक चकमकींनी सभा गाजली; निरवडेकरांनी कौशल्याने हाताळली परिस्थिती.
🔹 विशेष चर्चा: स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यासू वृत्तीमुळे पहिल्याच सभेवर उमटवला अनिल निरवडेकर यांचा ठसा.
सावंतवाडी नगरपालिकेची पहिलीच सभा वादळी ठरली, पण प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल अनिल निरवडेकर यांनी आपल्या वकिली अनुभवाचा आणि प्रशासकीय ज्ञानाचा वापर करत ही सभा अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीत पार पाडली. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादात त्यांनी सुवर्णमध्य साधत शहराच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले.
👉 अधिक माहितीसाठी पाहत राहा… [ अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्युज चैनल]
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
आज रात्री ९:०० वाजता. हनुमंत गडाजवळ, असनिये मार्गावर दिसलेला बिबट्या.
बिबट्याच्या दर्शनाने चौकुळ-बांदा मार्गावरील प्रवाशांची उडाली गाळण
सिंधुदुर्ग दि.२३ नरेंद्र देशपांडे: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हनुमंत गड परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, काल रात्री चौकुळ ते बांदा रस्त्यावर एका महाकाय बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश केनवडेकर आणि गजराज नाटेकर हे आज दोघे रात्री नऊच्या सुमारास आपल्या चारचाकी गाडीने चौकुळहून बांद्याच्या दिशेने येत होते. हनुमंत गडाजवळील असनिये मार्गावर आले असता, अचानक रस्त्याच्या मधोमध बिबट्या येऊन थांबला.
गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात बिबट्या स्पष्टपणे दिसून आला. काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली. अचानक समोर आलेल्या या ‘सावज’ शिकारीला पाहून गाडीतील प्रवाशांची चांगलीच गाळण उडाली होती. वाढता वावर आणि धास्ती
गेल्या काही दिवसांपासून हनुमंत गड आणि असनिये परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक सांगत होते, मात्र काल रात्री प्रत्यक्ष दर्शन झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वेळ: रात्री ९:०० वाजता.
ठिकाण: हनुमंत गडाजवळ, असनिये मार्ग.
सावधानता: या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिकांचे मत: “रात्रीच्या वेळी या मार्गावर सामसूम असते, अशातच बिबट्याचे दर्शन झाल्याने आता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये भीती आहे. वनविभागाने याकडे लक्ष द्यावे.”
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२३:(बाहेरचावाडा): एका चार वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्याने झडप घालून त्याच्या मानेचा लचका तोडला. पण म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’… सामाजिक कार्यकर्त्या समीरा खलील यांच्या रूपाने या बालकाला देवदूत भेटला!
📍 काय घडले?
घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने अचानक हल्ला केला.
कुत्र्याने मानेचा घट्ट पकड घेतल्याने बालक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
आरडाओरडा ऐकून समीरा खलील यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कुत्र्याशी दोन हात केले आणि मुलाला त्याच्या तोंडातून ओढून बाहेर काढले.
🏥 तत्काळ मदत:
मुलाला गंभीर दुखापत झाल्याचे पाहून समीरा यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव आणि समीर खलील यांनी उपचारासाठी मोठे सहकार्य केले.
⚠️ प्रशासनाचे लक्ष कुठे आहे?
आज एकाच दिवसात या कुत्र्याने ६ जणांना चावा घेतला आहे! ही बाब अतिशय गंभीर असून, ‘आणखी किती बळींची वाट पाहणार?’ असा संतप्त सवाल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.
📢 आमची मागणी:
नगरपालिका आणि प्रशासनाने या पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
“मालवणी करंडक महोत्सवातील पुरस्कार विजेते कुंभार, पोयेकर, नार्वेकर, सामंत, धोपेश्वरकर यांना “कला गौरव” पुरस्कार जाहीर
सावंतवाडी,दि.२३: ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या “मालवणी करंडक” महोत्सवात मुंबई-पुणे आणि गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२ एकांकिका सहभागी होणार आहे तर या महोत्सवाच्या निमित्ताने ५ जेष्ठ कलाकारांचा “कला गौरव” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात सावंतवाडी तालुक्यातून सचिन धोपेश्वरकर, कुडाळ तालुक्यातून अंकुश कुंभार, मालवण-भरड येथील सगुण पोयेकर, वेंगुर्ला-वडखोल येथील आनंद नार्वेकर, कणकवली येथील भास्कर उर्फ भाई सामंत यांचा समावेश आहे, अशी माहिती आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. दरम्यान या महोत्सवाचे औचित्य साधून त्या ठिकाणी तब्बल चार दिवस “फूड फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी महोत्सवाला साजेसा हा महोत्सव असणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पर्यटक व कलाप्रेमींनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन त्यांनी केले. हा महोत्सव दिनांक २७ व २८ फेब्रुवारी व १ आणि २ मार्च या कालावधीत सावंतवाडी पालिकेच्या मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर रंगणार आहे. यात तब्बल १२ एकांकिका सहभागी झाल्या आहेत. याबाबतची माहिती या पत्रकार परिषद देण्यात आली. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर, दादा मडकईकर, सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, सदस्य निरंजन सावंत, आनंद काष्टे, निखिल माळकर, प्रणव तारी, मृणाल चेंडके आदी उपस्थित होते. यावेळी साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराला संस्थानकालीन आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून सुरू असलेला “मालवणी करंडक महोत्सव” यावर्षी पुन्हा एकदा होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकार घडावे व त्यांना व्यासपीठ निर्माण व्हावे हा उद्देश आहे. त्या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारीला मॅड बॉक्स थिएटर मुंबई (ठोंब्या), २८ फेब्रुवारीला नाट्यसिंधू पुणे यांची (चित्रकथी), रंगवलय अंधेरी यांची (बार-बार), वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली यांची (पडीक), आघाझ द राय रायझिंग युथ यांची (लपंडाव) तर १ मार्चला अक्षर सिंधू साहित्य कला मंच, कणकवली यांची (भरकाट), आयडियल इंग्लिश स्कूल नेरुर यांची (देवराई), प्रथा थिएटर यांची (अमृत्सपुत्र), श्री गोपाळ कृष्ण कला मंच, तळाशील यांची (वाघ्या) तर २ मार्चला जी.एस. प्रोडक्शन यांची (गाऱ्हाणा), मॅड बॉक्स थिएटर यांची (बोबड्या), अभियांत्रिकी कला मंडळ, रत्नागिरी यांची (तुकारामाची टोपी) आदी एकांकिका सादर होणार आहेत. दरम्यान या महोत्सवाचे औचित्य साधून खवय्यांना विविध प्रकार खाण्याची संधी मिळावी व स्थानिकांना रोजगार मिळावा त्यासाठी त्या ठिकाणी “फूड फेस्टिवल” आयोजित करण्यात आला आहे. यात मालवणी पदार्थासह बिर्याणी, चायनीज, मोमोज, पिझ्झा असे विविध प्रकार त्या ठिकाणी पर्यटकांना व स्थानिकांना चाखता येणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन श्री.साळगावकर यांनी यावेळी केले.
CPGQ449QDLOVs0ng
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात महास्वच्छता अभियानाचा सांगता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर सोबत आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर नियोजन व वित्त सभापती आनंद नेवगी तसेच पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुनिता पेडणेकर नीलम नाईक,स्नेहा नाईक ऍड सायली दुभाषी,माजी नगरसेवक विलास जाधव, ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र टेमकर आदी
📌 संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छ, सुंदर सावंतवाडी’चा संकल्प! 🧹
सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया समोरील स्वच्छता करताना प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर व पोलीस, युवक, कर्मचारी
✨
सावंतवाडी दि.२३: शहरात आज ‘महास्वच्छता अभियान’ मोठ्या उत्साहात पार पडले. संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहरवासीयांना स्वच्छतेची शपथ दिली.
बातम्यांचे मुख्य धागे:
👉 माणुसकीचे नाते जपा: “सफाई कर्मचारी सुद्धा एक माणूस आहे. आपण केलेली घाण साफ करताना त्यांना होणारा त्रास आपण जाणून घेतला पाहिजे. कचरा न करणे हीच त्यांच्याप्रती खरी माणुसकी ठरेल,” असे भावनिक आवाहन निरवडेकर यांनी केले.
👉 तरुणाईचा सहभाग: सावंतवाडी नगर परिषदेच्या महास्वच्छता अभियानाच्या सांगता कार्यक्रमास आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर नियोजन व वित्त सभापती आनंद नेवगी तसेच पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुनिता पेडणेकर नीलम नाईक,स्नेहा नाईक ऍड सायली दुभाषी,माजी नगरसेवक विलास जाधव, ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र टेमकर लोकप्रतिनिधी, सावंतवाडी नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी वैभव अंधारे,विनोद सावंत तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पोलीस प्रशासन आणि तरुण पिढीच्या समन्वयातून अभियान यशस्वी झाले.त्याचबरोबर महिला बचत गट महिला मंडळ यामध्ये सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांचे आभार मानण्यात आले. “संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा मंत्र घेऊन आता आपण घरी परतूया आणि शहराला निरोगी ठेवूया,” या शब्दांत अभियानाचा समारोप झाला.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींनी या मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला. पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.
👉 भविष्यातील ध्येय: सावंतवाडी १००% कचरामुक्त आणि निरोगी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या परिसराची जबाबदारी घेण्याचा निर्धार केला.
💡 महत्त्वाचे मुद्दे:
✅ प्रभागनिहाय टीमद्वारे स्वच्छता.
✅ ‘स्वच्छता म्हणजे आरोग्य’ मंत्राचा जागर.
✅ पोलीस भरतीतील उमेदवारांना अधिकारी होण्यासाठी शुभेच्छा.
“चला, संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा मंत्र घराघरात पोहोचवूया आणि आपली सावंतवाडी स्वच्छ ठेवूया!” 🚩
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडीत २८ फेब्रुवारीला मुंबईतील घरांच्या प्रश्नावर होणार मंथन
सावंतवाडी दि.२२: मुंबईतील गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी येथे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीचा तपशील:
स्थळ: श्रीराम वाचन मंदिर (मोती तलावासमोर), सावंतवाडी.वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता.
प्रमुख मार्गदर्शक: श्री. निवृत्ती देसाई आणि श्री. बजरंग चव्हाण (राष्ट्रीय मिल मजदूर संघ). बैठकीचा मुख्य उद्देश
सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली परिसरातील हजारो गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार सध्या मुंबईतील घरांच्या प्रतीक्षेत आहेत. या सभेमध्ये:
१. मुंबईतील घरांच्या सद्यस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल.
२. प्रलंबित मागण्यांसाठी भविष्यात कराव्या लागणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे.
३. कामगारांच्या कायदेशीर अडचणी आणि वारसा हक्काबाबत मार्गदर्शन केले जाईल.
“मुंबईच्या उभारणीत रक्त सांडलेल्या गिरणी कामगाराला आजही हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कामगारांनी आणि वारसांनी या बैठकीला उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवावी.” > — श्री. श्याम कुंभार, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटना.
कामगारांना आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गिरणी कामगारांनी आणि त्यांच्या वारसांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहून आपल्या हक्काच्या घरासंबंधीची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीनंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नाला नवी धार मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२२: राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. प्रभाग क्रमांक ६ मध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ‘महास्वच्छता अभियानात’ लोकप्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली.
स्वच्छतेसाठी सामूहिक पुढाकार
या मोहिमेचे नियोजन नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रामुख्याने सालईवाडा परिसरातील रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे, तर स्थानिक महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
शहर सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी: ॲड. निरवडेकर
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले की, “संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा जो विचार दिला, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. आपले शहर आणि आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र मिळून काम केल्यास सावंतवाडी शहर अधिक देखणे होईल.”
यांची लाभली उपस्थिती
या मोहिमेत आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, परिक्षित मांजरेकर, नगरपरिषदेचे विनोद सावंत, गजानन परब, अनिकेत पाटणकर, संकल्प धारगळकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सालईवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानाच्या शेवटी, सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून प्रभागातील परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल देव्या सुर्याजी यांनी सर्व सहभागी नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563